उसासाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची..

पाण्याची उपलब्धता असल्यास हलक्‍या प्रतीच्या जमिनीपासून भारी ज मिनीपर्यंत सर्व प्रकारच्या जमिनीत उसाची लागण केली जाते. ज मिनीच्या प्रकारानुसार जमीन आणि पीक व्यवस्थापनामध्ये योग्य बदल केल्यास आणि जमिनीच्या सुपीकता पातळीमध्ये सुधारणा केल्यास प्रत्येक प्रकारच्या जमिनीत अधिकाधिक उत्पादकता घेणे शक्‍य आहे. जमिनीची सुपीकता शाश्‍वत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून खालील काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल.

अतिवृष्टीच्या काळात धूपविरोधक बाबींची पूर्तता नसल्यास सुपीक ज मिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जमिनीची धूप थांबविण्यासाठी शेताचे बांध चांगले मजबूत असावेत, जमिनीचा उतार पाहून उतारास आडवी मशागत करावी आणि सऱ्या पाडाव्यात. पिकांची पेरणी किंवा लागण ही उतारास आडवी असावी. शेताच्या बाजूने बांधावर वृक्ष लागवड असावी. बांध फुटू नयेत म्हणून बांधावर गवताची लागण करावी.

जमिनीचा कस कायम ठेवण्यासाठी उसापाठोपाठ ऊस घेण्याची पद्धत टाळावी. ऊस पिकाच्या अगोदर सोयाबीन, तूर, भुईमूग यांसारखी द्विदल वर्गीय पिके घ्यावीत. धैंचा किंवा ताग ही हिरवळीची पिके खरीप हंगामात घेऊन जमिनीत गाडावीत. बागायती भागात एका पाठोपाठ पिके घेतली जात असल्यामुळे जमिनीला उसंत मिळत नाही. त्यामुळे जमिनीला उसंत देणे हेही फायदेशीर ठरते. ऊस पिकाची मुळे खोलवर जात असल्यामुळे जमिनीची मशागत ही खोलवर होणे आवश्‍यक आहे. उभी आणि आडवी नांगरट खोल करून ढेकळे फ ोडून जमीन भुसभुशीत करावी. मशागतीची सर्व कामे वाफसा स्थितीत करावीत म्हणजे मशागत चांगली होते. जमिनीत ओलावा असताना ना ंगरट केल्यास ढेकळे निघतात. जमीन कडक बनते. योग्य पीक फ ेरपालट आणि सेंद्रिय खताचा वापर केल्यास मशागत चांगली होते आणि जमिनीचे भौतिक गुणधर्म योग्य स्थितीत राहतात.

एकात्मिक खत व्यवस्थापन
सध्या ऊस शेती बागायतदारांचा खत व्यवस्थापनाचा अभ्यास केला, तर बरेच शेतकरी सेंद्रिय खताचा कमी किंवा वापर न करता फक्त रासायनिक खते वापरतात. रासायनिक खतांचा संतुलित वापर होताना दिसत नाही. त्यामुळे रासायनिक खतांची उपयुक्तता अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि पिकाच्या वाढीवर तितकासा परिणाम दिसून येत नाही. वातावरणातील अधिक तापमानामुळे जमिनीचे तापमानही वाढते आणि सेंद्रिय पदार्थांचे विघटन जोरात होते. त्यामुळे सेंद्रिय खते किंवा पिका ंचे अवशेष जमिनीत सतत गाडणे आवश्‍यक असते. ऊस लागवडीचया अगोदर हेक्‍टरी 25 टन खत जमिनीत मिसळणे आवश्‍यक आहे; परंतु शेणखताच्या अभावामुळे शेतकरी फक्त रासायनिक खतांचा वापर करतात. शेणखत किंवा कंपोस्ट योग्य प्र माणात उपलब्ध नसल्यास पर्यायी सेंद्रिय खते पेंडी, मासळी खत, हाडांच्या चुऱ्याचे खत यांचा वापर करावा. शेतातील उपलब्ध शेणखत, पिकांचे अवशेष यांपासून शेतावरच गांडूळ खत तयार करून ऊस लागवडीअगोदर सरीत चांगले मिसळावे. ऊस पिकाच्या अगोदर धैंचा किंवा तागासारखे हिरवळीचे पीक घेऊन जमिनीतून गाडल्यास हेक्‍टरी 20 ते 21 टन हिरवे सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात. खोडवा पिकात पाचट न जाळता ते सरीमध्ये आच्छादन करावे म्हणजे पाचट शेतातच कुजल्यास हेक्‍टरी तीन ते चार टन सें द्रिय खत जमिनीत मिसळले जाते.

सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म अनुकूल राहतात. पाणीधारण क्षमता वाढते, पाण्याचा निचरा चांगला होतो. अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण कमी होते. सूक्ष्म जिवाणूंची संख्या व क्रिया वाढते. स्फुरद आणि सूक्ष्मद्रव्ये पिकास उपलब्ध होतात. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची योग्य संख्या आणि जिवाणूंची कार्यक्षमता यावर जैविक सुपीकता अवलंबून असते. जमिनीत अनेक प्रकारच्या जीव रासायनिक अभिक्रिया चालू असतात. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे विघटन करण्यासाठी वेगवेगळे सूक्ष्म जिवाणू कार्यरत असतात. जमिनीत सें द्रिय पदार्थ कुजविण्यासाठी लागणारे जिवाणू, स्फुरद विरघळविणारे जिवाणू, गंधक विघटन करणारे जिवाणू, नत्र स्थिर करणारे जिवाणू असे अनेक प्रकारचे उपयुक्त जिवाणूंचे कार्य जमिनीत चालू असते. अशा जिवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी जमिनीचे भौतिक गुणधर्म, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, आर्द्रता, तापमान यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची अनुकूलता असणे गरजेचे असते.

द्विदल वर्गीय पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर याद्वारे जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारतात. लवकर पक्व होणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस जाती, जमिनीची सुपीकता पातळी लक्षात घेता शिफारशीत असलेल्या खतमात्राऐवजी माती परीक्षण आणि ऊस वाणांची गरज लक्षात घेऊन खतांचा वापर करावा.

 

क्षारपड जमीन सुधारणा
जमिनीची निर्मिती होत असताना क्षारांची उत्पत्ती होत असते. पाण्याच्या माध्यमातून बरेच क्षार जमिनीत मिसळतात. त्यामुळे ज मिनीत साचवलेले क्षार निचऱ्यावाटे बाहेर जाणे महत्त्वाचे असते. निचरा मंद असल्यास क्षार जमिनीच्या खालच्या थरात साचले जातात व जमिनी क्षारयुक्त होतात. मंद निचरा असणाऱ्या जमिनीत सबसॉ यलरचा वापर करावा. सबसॉयलरमुळे जमिनीचा दीड ते दोन फूट खालचा तळी भरलेला घट्ट थर फोडला जातो. निचरा सुधारून वरच्या थरातील क्षार निचऱ्यावाटे निघून जातात. क्षारयुक्त-चोपण किंवा चोपण जमीन सुधारणा करण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागावरील किंवा पृष्ठभागांतर्गत निचराप्रणालीचा अवलंब करावा. मातीच्या कणांवरील सोडिअम मुक्त करण्यासाठी जिप्समची गरज माती परीक्षणानुसार आजमवावी आणि त्यानुसार शिफारशीत भूसुधारके जमिनीत मिसळावीत. भूसुधारकांच्या अभिक्रियेमुळे मुक्त झालेले सोडिअम क्षार चांगल्या पाण्याचा वापर करून निचरा व्यवस्थेद्वारे बाहेर काढावेत. अशा पद्धतीने जमिनीची सुधारणा करून जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढवता येते.

 

उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी कंपोस्ट जिवाणूंच्या वापराचे तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. शेतामध्ये कितीतरी सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.
या सेंद्रिय पदार्थांपैकी काही पदार्थ थोडेफार कुजवून लगेच शेतात वापरता येतात. उसाचे पाचट, गव्हाचे काड, पिकांची धाटे, पालापाचोळा हे सेंद्रिय पदार्थ जरी कुजण्यास कठीण असले, तरी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास व कंपोस्ट जिवाणूंचा वापर केल्यास कुजण्याची क्रिया जलद होते आणि अन्नद्रव्यांनी युक्त असे कंपोस्ट खत लवकर उपलब्ध होते.

कंपोस्ट खताचा खड्डा आठ ते दहा मी. लांब, दोन ते तीन मी. रुंद व एक मीटर खोलीचा असावा. गरजेप्रमाणे त्यात वाढ करावी. जास्त पावसाच्या प्रदेशांत खड्ड्याऐवजी ढीग पद्धतीचा अवलंब करावा. पाचटाचे किंवा उपलब्ध कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचे, काडीकच-याचे शक्‍य तेवढे बारीक तुकडे करावेत. त्यांचा खड्ड्यात वीतभर जाडीचा थर द्यावा.

एका ड्रममध्ये पाणी घेऊन त्यात प्रति टन कचऱ्यासाठी जनावरांचे 100 किलो शेण मिसळावे. त्याचप्रमाणे सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन करणारे जिवाणू प्रति टन कच-यास एक किलो या प्रमाणात शेणकाल्याच्या ड्रममध्ये टाकून चांगले मिसळून द्रावण तयार करून घ्यावे. दुसरा एक ड्रम घेऊन त्यात पुरेसे पाणी घ्यावे व त्यामध्ये आठ किलो युरिया व दहा किलो सुपर फॉस्फेट प्रति टन काडीकच-याच्या प्रमाणात घेऊन ड्रममधील पाण्यात विरघळवावे. ही दोन्ही द्रावणे खड्डे भरताना काडीकच-याच्या प्रत्येक थरावर सम प्रमाणात संपूर्ण खड्ड्यास पुरतील अशा बेताने टाकावीत.

प्रथम युरिया व सुपर फॉस्फेटचे द्रावण शिंपडावे आणि शेणकाला व जिवाणूंचे मिश्रण नंतर शिंपडावे. नंतर काडीकचरा ओला राहण्यासाठी आवश्‍यकतेनुसार जादा पाणी टाकावे, पण खड्ड्यात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.

अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा जमिनीवर 30 ते 60 सेंटिमीटर येईल इतका उंच भरावा. संपूर्ण खड्डा मातीने अगर शेणमातीने झाकून घ्यावा, म्हणजे खड्ड्यातील पाण्याचे बाष्प होऊन उडून जाणार नाही. दीड महिन्याच्या अंतराने खड्ड्याची चाळवणी करावी आणि आवश्‍यकता वाटल्यास पाणी टाकावे. या पद्धतीने चार ते साडेचार महिन्यांत उत्तम कंपोस्ट खत तयार होते.

उत्तम कुजलेल्या कंपोस्ट खतात नत्राचे प्रमाण 1 ते 1.5 टक्के, कर्ब व नत्राचे गुणोत्तर जवळ जवळ 20 : 1 राहते. उत्तम कुजलेले कंपोस्ट खत पिसासारखे मऊ दिसते. कंपोस्ट खताचा रंग तपकिरी, गर्द काळा असतो व त्यास मातकट वास येतो. बागायती एक एकरासाठी पाच टन, तर जिराइतात दोन ते तीन मेट्रिक टन कंपोस्ट खत आवश्‍यक असते.

 

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: