ऊस कापणी, गांठी खुडण्यासाठी श्रम वाचविणारे उपकरण

उसासाठी वापरण्यात येणारी सध्याची पद्धत ही श्रमसाध्य, वेळ घेणारी आणि महाग पद्धत आहे. मध्यप्रदेशातील मेख खेड्यातील एक शेतकरी श्री.रोशनलाल विश्वकर्मा, यांना शेतीत बर्‍याच गंभीर संकटांना तोंड द्यावे लागले आहे आणि एक-एक रोपटे लावण्यासाठी गांठी खुडण्याच्या वैकल्पिक पध्‍दतीची ही मदत झाली नाही. त्यातच मोठ्या प्रमाणात रोपट्यांच्या उपलब्धतेची टंचाई देखील जाणवू लागली. त्यावेळी शेतकर्‍याने विचार केला कि उसाच्‍या रोपट्याची लागवड करण्याऐवजी बटाट्याच्या गाठींप्रमाणे उसाच्‍या गाठींचा वापर पेरणीकरीता करता येऊ शकतो.
सोपे आणि दक्ष : श्री. विश्वकर्मा यांचे ऊस कापणीचे उपकरण वापरतांना ऊस शेतकरी.”

कठिण श्रम

त्याने या विचारावर एका तज्ञाशी चर्चा केली. तज्ञांनी देखील उत्साहजनक प्रतिक्रिया देऊन ह्या विचाराला मूर्तरुप देण्यासाठी प्रोत्साहन दिले, मग शेतकर्‍याने आपल्या विचाराप्रमाणे काम सुरु केले आणि दोन वर्षाच्या कठिण परिश्रमानंतर त्याने एक साधेसे उपकरण तयार केले.
या उपकरणाचे नाव “उस गाठी खुडे” असे असून हे जमिनीवर स्थिरावलेले आहे, त्याला एक अर्धचंद्राकार चाकू असून ते शस्‍त्रक्रियेद्वारे एक उच्च प्रभावी पद्धतीने उसाची गाठ कापते. ह्यात उसाला काहीही इजा न होता ही गाठ सफाईने कापली जाते.
“ह्या उपकरणाच्या वापराने एक माणूस एका तासात सुमारे 100 गाठी खुडू शकतो,” असे श्री. विश्वकर्मा यांचे म्हणणे आहे.

 

 

हाताळणी क्षमता

ह्या उपकरणाचा वापर उसाचे लहान तुकडे करण्यासाठी देखील करता येतो. हे वापरण्यास सोपे असून हे उसाचे वेगवेगळे आकार आणि रुंदी हाताळू शकते.
पूर्वीच्‍या परंपरागत पद्धतीमुळे हातांवर आणि अंगठ्यावर बळ द्यावे लागायचे, यात तिरप्या कापणीने उसाची नासधूस देखील जास्त प्रमाणात व्हायची, आणि कडक उसांच्या गाठी खुडण्‍यास अक्षम ठरायचे.

 

 

यंत्राचा तपशील

“ऊस गाठी खुडे” ह्या उपकरणात सरफेस प्‍लेट, होल्डिंग स्टँड, रेसिप्रोकेटिंग असेंब्ली, एडजेस्टेबल स्क्रूने वरखाली होणारे एक लीव्‍हर, कनेक्‍टर, यू आकाराचा कापणीचा चाकू, ज्याला एका स्प्रिंगने बरोबर खाली खाचेत जाऊन कापणी करेल अशा प्रकारे बसविलेले असते. त्याच बरोबर त्याला गोल स्प्रिंग आणि खिळे लावलेले असतात ज्याने कापणी करतांना बळ लावता येते.
उपकरणाची किंमत 600 रु. असून, यावर पाच वर्षाची गॅरंटी दिलेली आहे. “हे उपकरण वापरणारा माणूस आरामात जमिनीवर बसून काम करु शकतो. डाव्या हाताने एकामागून एक असे ऊस उपकरणाला पुरवून उजव्या हाताने आरामात स्प्रिंग लावलेल्या हँडलच्या सहाय्याने गाठी कापण्‍याचे काम करु शकतो.

 

 

सफाईदार कापणी

अर्धचंद्राकार कापणी ब्लेडच्या सहाय्याने आणि पकड आणि कापणी या दोन पध्‍दती वापरून सफाईदार काप मिळतो. उपकरण चालविण्यासाठी वीज किंवा कोणत्याही प्रकारच्या तेलाची गरज लागत नाही, वजनाला अगदी कमी असल्यामुळे परिवहन देखील सोयीचे आहे. ह्या उपकरणाचा उपयोग फक्त गाठी खुडण्यासाठी नसून ते मोठ्या झाडांवरच्या गाठी खुडण्यासाठी देखील वापरता येते.
“मी ह्या उपकरणाची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की त्यात कोणत्याही आकाराचा ऊस बसविता येतो आणि हे वापरण्यासाठी जमिनीवर बसून आरामात काम करता येते. वेगवेगळ्या कापणी आकाराच्या पाहणीनंतर, मला मुख्यतः यू हा आकार एकाच झटक्यात गाठीच्या कापणी साठी योग्य वाटला, कारण त्यामुळे उसाच्या इतर भागास इजा न होता अगदी अलगदपणे स्प्रिंगच्‍या सहाय्याने गाठ खुडता येते,” असे ते म्हणतात.

 

 

टेबल टॉप आवृत्ति/स्‍वरूप

जमिनीवर आधारलेल्या उपकरणाऐवजी टेवलावर बसविता येणार्‍या उपकरणात त्याचा बदल करण्याच्या प्रयोगात, त्यांना असे लक्षात आले की अशा प्रकारच्‍या स्‍वरूपात जेव्हा वेगवेगळे वापरकर्ते हे उपकरण हाताळतील तेव्हां ऊस ठराविक उंचीवरच लावावा लागेल.
दुसरे म्हणजे, त्यांना असे आढळले की ग्रामीण लोकांना टेबलापेक्षा जमिनीवर बसून काम करणे जास्त सोयीचे वाटते.
त्यांनी घडी करून ठेवता येईल असे गाठी खुडे बनविण्यास सुरूवात केली जे स्थानिकांना  जास्त पसंत पडले नाही. म्हणून मग त्यांनी ते मॉडेल बनविणे थांबविले. आता ह्या प्रांतातील बरेच ऊस शेतकरी श्री. विश्वकर्मांचे उपकरण वापरुन वेळ व पैशाची बचत करीत आहेत.

 

 

जास्‍त माहितीसाठी संपर्क करा
श्री. रोशनलाल विश्वकर्मा,
पोस्ट मेख, गोटेगांव, नरसिंगपूर,
मध्य प्रदेश – 487002
मोबाईल क्र. 09300724197
ई-मेल : info@nifindia.org आणि bd@nifindia.org,
दूरध्वनी: : 079- 26732456 आणि 26732095.

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: