कापूस वाणाचा लागवड

कोरडवाहू शेतीमध्ये देशी कापूस वाणाचा लागवड खर्च अमेरीकन संकरीत आणि सुधारीत वाणापेक्षा कमी व आर्थिक मिळकत अधिक असल्यामुळे देशी सुधारीत वाणाच्या एकेए-५ व एकेए-७ लागवडीस प्राधान्य देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे.
-कपाशीचे लागणीसाठी २२ ते २५ सें.मी. खोल नांगरट, २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन हेक्टरी २० ते २५ गाड्या कंपोस्ट खत जमिनीत मिसळून जमीन तयार ठेवा.
-बागायती कपाशीसाठी एल.आर.एच. ५१६६ किंवा जे.एल.एच. १६८ या सुधारीत वाणांची निवड करा. तसेंच संकरीत वाणापैकी फुले ४९२, एन.एच.एच.४४, फुले-३८८ संकर ६ किंवा संकर १० यापैकी संकरीत वाणांची निवड करावी.
-बागायती कापसाची लागवड १० ते २५ मार्च या कालावधीत करावी.
-उगवण चांगली होण्यासाठी बियाणे ६ तास पाण्यात भिजवावे. तसेंच नंतर ते १ टक्का सक्सिनीक आम्लात ६ तास बुडवावे. त्यामुळे चांगली व लवकर उगवण होणेस मदत होते.
-लागणीसाठी सुधारीत वाणाचे हेक्टरी ८ ते १० किलो आणि संकरीत वाणांचे २.५ ते ३ किलो बियाणे वापरा.
-लागणीचे अंतर खालीलप्रमाणे ठेवा.
-संकरीत जाती – मध्यम जमिन – ९० बाय ९० सें.मी.
-भारी जमिन – १२० बाय ९० सें.मी.
-सुधारीत वाण – एल.आर.ए. ५१६६ – ९० बाय ९० सें.मी.
-पेरणीपुर्वी अँझोटोबँक्टर जीवाणूची २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर प्रक्रीया करावी.
-पेरणीपूर्वी हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकावे.
-बागायती कापसात हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. त्यापैकी लागवडीचेवेळी हेक्टरी २० किलो नत्र (४५ किलो युरीया) संपूर्ण स्फुरद (३१५ किलो सिगल सुपर फॉस्फेट) व संपूर्ण पालाश (८५ किलो म्युरेट ऑफ पोटँश) द्यावे. पिकास पाने येणेच्या वेळेस हेक्टरी ४० किलो नत्र (९० किलो युरीया) व पुन्हा फुले येणेच्या वेळेस हेक्टरी ४० किलो नत्र (९० किलो युरीया) द्यावे.

– कापसावरील एकात्मिक किड नियंत्रण पध्दत –
कापसाचे रोग व किडीमुळे प्रचंड नुकसान होते. तसेंच किड व रोग नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांवर पैसा खर्च होतो ते टाळणेसाठी कापसावर खालील एकात्मिक किड नियंत्रण पध्दतीचा अवलंब करावा.
-एका गावात एका जातीची संकरीत वाणांची लागवड करावी.
-बीजप्रक्रीया इमिडँक्लोप्रीड १० ग्रँम प्रती किलो बियाणे
-एका आठवड्यात सर्वांनी लागवड करावी.
-लागवडी अगोदर नत्राची अर्धी मात्रा व संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे.
-मका व चवळी शेताच्या कडेला मिश्र पीक घ्यावे, त्यासाठी शेताच्या सभोवताली एक ओळ मक्याची टोकावी, दोन मक्याच झाडामध्ये एक बी चवळीचे टोकावे.
-पक्ष्यांना बसणेसाठी प्रत्येकी ९ ते १० कपाशी ओळीमध्ये एक ओळ राळा किंवा ज्वारी घ्यावी.
-पीक ६०-६५ दिवसांचे झाले किंवा पाते येणेस सुरूवात होताच शेतात प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत, सापळ्यामध्ये हिरव्या अळीचे पतंग दिसल्यास परोपजीवी किटक ट्रायकोग्रामा चिलोनीस प्रति हेक्टरी दिड लाख याप्रमाणे १५ दिवसाचे अंतराने दोन वेळा सोडावेत.
-ठिपक्याची बोंडअळी व अमेरीकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के दोन ते तीन वेळा १५ दिवसाचे अंतराने फवारावे. अमेरीकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. विषाणू याची ५०० रोगग्रस्त अळ्या प्रती हेक्टर या प्रमाणात एक फवारणी करावी.
-जर बोंडअळ्याच्या नुकसानीचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त (१० टक्के कळ्यांचे, फुलांचे, बोंडाचे, पात्यांचे नुकसान) गेल्यास एन्डोसल्फान ०.०५ टक्के कार्बारील ०.२ टक्के क्विनॉलफॉस ०.०५ टक्के यापैकी एका किटकनाशकाची एक फवारणी करावी.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: