केळी लागवडीसाठी जमीन कशा पद्धतीची निवडावी?

केळीसाठी जमीन भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी, हलक्‍या ते मध्यम प्रतीची, पोयटायुक्त आणि भरपूर सेंद्रिय कर्ब आणि 6 ते 7.5 सामू असलेली जमीन योग्य असते. जमिनीची क्षारता 0.05 टक्केपेक्षा जास्त नसावी. पाणी धरून ठेवणारी अत्यंत वालुकामय किंवा भरकाळीची आणि चोपण जमिनीमध्ये केळीची लागवड करू नये.
केळी पिकाची मुळे अत्यंत नाजूक आणि मांसल असतात. मुख्य मुळे झाडाला आधार देण्याचे कार्य करतात आणि दुय्यम तंतुमय मुळे पाणी व अन्नद्रव्य शोषण्याचे कार्य करतात. केळी पिकाची मुळे जमिनीमध्ये 120 सें.मी.पर्यंत खोलवर जातात आणि जवळपास 150 सें.मी.पर्यंत आडवी पसरतात. त्यामुळे जमिनीची पूर्वमशागत चांगली होणे गरजेचे आहे.
केळीची मुळे जरी 120 सें.मी. पर्यंत खोलवर जात असली तरी कार्यक्षम मुळे जमिनीच्या सर्वांत वरच्या 30 सें.मी. भागामध्ये कार्यक्षम असतात, म्हणून जमिनीची खोल, आडवी नांगरट करून दोन-तीन वेळा वखरणी करून आणि मोठी ढेकळे असतील तेथे रोटाव्हेटर चालवून जमीन भुसभुशीत करावी. मध्यम, हलक्‍या, काळीच्या जमिनीमध्ये केळी ज्या अंतरावर लागवड करणार असाल, त्या अंतरावर लागवडीच्या दोन महिने आधीच सऱ्या पाडून लागवडीसाठी शेत तयार ठेवावे. शिफारशीत अंतरानुसार रोपांची लागवड करावी.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: