डाळिंब लागवड

डाळिंब पिकाला उष्ण, दीर्घ उन्हाळा, कोरडी हवा व साधारण हिवाळा चांगला मानवतो. डाळिंब हलक्‍या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत अत्यंत चांगल्या प्रकारे घेता येते. जमिनीत चुनखडीचे प्रमाण अत्यल्प असल्यास झाडांची वाढ चांगली होते. हमखास पाणीपुरवठा असलेली, उत्तम निचऱ्याची, हलक्‍या ते मध्यम प्रतीची जमीन डाळिंबासाठी निवडावी. लागवडीसाठी 4.5 मीटर ु 3.0 मीटर अंतर ठेवावे. लागवड कलमांपासूनच करावी. गुटी कलम लावून डाळिंबाची लागवड यशस्वीरीत्या करता येते. लागवडीनंतर सुरवातीची दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्ये कांदा, मूग, चवळी, सोयाबीनसारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत.

जाती –
गणेश – या जातीची फळे आकाराने मध्यम असून, बिया मऊ असतात. चव गोड असते.
जी – 137 – या जातीत आतील दाणे मऊ आहेत व रंग गणेशपेक्षा किंचित गडद आहे.
मृदुला – या जातीची फळे आकाराने मध्यम असून, फळांचा रंग व दाण्यांचा रंग गडद लाल असतो.
आरक्ता – गोड टपोरे, मृदू आणि आकर्षक दाणे, तसेच फळांची साल चमकदार, गडद लाल रंगाची आहे.
भगवा – या फळांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

Advertisements

१ प्रतिक्रिया (+add yours?)

  1. badrinath b. thorat
    ऑगस्ट 20, 2011 @ 18:34:03

    i want to do plantaion of dalimb. plaease guide me.

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: