तंत्र टोमॅटो लागवडीचे…

टोमॅटोच्या अपेक्षित उत्पादनासाठी योग्य जातींची निवड व रोपांची योग्यवेळी पुनर्लागवड करणे अत्यंत आवश्‍यक असते. त्यासाठी दर्जेदार रोपांची निर्मिती आणि पीक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी तीन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी. टोमॅटोच्या संकरित वाणांसाठी 125 ग्रॅम बियाणे एक हेक्‍टर क्षेत्रासाठी पुरेसे असते.

 

टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे, कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान चांगले मानवते. साधारणतः 18 अंश ते 30 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. तापमान 38 अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास पिकाची शारीरिक क्रिया मंदावते, पेशींना इजा होते. तसेच तापमान जर दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले तरी पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन पिकास इजा होते आणि उत्पादनात मोठी घट येते.

जमिनीचनिवड महत्त्वाच
हे पीक चांगला निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत उत्तम प्रकारे येऊ शकते. हलक्‍या जमिनीत पीक लवकर निघते. तर भारी जमिनीत फळांचा तोडा उशिरा सुरू होतो. परंतु उत्पादन भरपूर निघते. पावसाळी टोमॅटो पिकासाठी काळीभोर जमीन टाळावी तर उन्हाळी टोमॅटो पीक हलक्‍या व उथळ जमिनीत घेऊ नये. जमिनीचा सामू हा सहा ते 7.5 च्या दरम्यान असावा. जास्त पावसाच्या भागासाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी, त्यास योग्य उतार द्यावा, म्हणजे पावसाचे पाणी उभ्या पिकात साठून राहणार नाही. जमिनीत चर काढले तर जास्तीच्या पाण्याच्या निचरा होतो व पाणी जर क्षारयुक्त असेल तर क्षाराचाही निचरा होतो. क्षारयुक्त चोपण व पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व फुलगळ होते. टोमॅटो पीक ज्या जमिनीत घ्यावयाचे आहे त्या जमिनीत अगोदरच्या हंगामात वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत, कारण त्यामुळे कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.

पीकवाढीवर तापमानाचपरिणाम
जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कोरडे वारे असतील तर टोमॅटो पिकाची फुलगळ होते. उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या हवामानात टोमॅटो गुणवत्ता ही चांगली असते तर रंग देखील आकर्षक येतो.

लागवडीचतयार
जमीन उभी-आडवी खोलवर नांगरून घ्यावी. चांगली कुळवणी करून घ्यावी. त्या वेळी 25 ते 30 टन प्रति हेक्‍टर चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्‍या, लव्हाळागाठी चांगल्याप्रकारे वेचून जाळून टाकाव्यात. उत्तम प्रतीच्या जमिनीत90 ते 120 सें.मी. अंतरावर आणि हलक्‍या जमिनीत 60 ते 75 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधून घ्यावेत. लागण करते वेळी दोन रोपांतील अंतर 45 ते 60 सें.मी. ठेवावे. शक्‍यतो लागवड 90 ु 30 सें.मी. अंतरावर करावी. साधारणपणे 3.60 ु 3.00 मी आकारमानाचे वाफे तयार करावेत.

रोपांचलागवड
टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी. मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व चपटे खोड असणारी तसेच रोगट रोपे लागवडीसाठी घेऊ नयेत. लागवडीपूर्वी रोपे दहा मि.लि. डायक्‍लोरव्हॉस अधिक दहा ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रति दहा लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. त्यामुळे नाजूक खोड ताबडतोब पिचते व अशी रोपे नंतर दगावतात. लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर दहा दिवसांच्या आत जी रोपे मेली असतील त्या ठिकाणी नवीन रोपांचे नांगे भरून द्यावेत.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
माती परिक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत. नत्र, स्फुरद व पालाश व्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक व दुय्यम अन्नद्रव्य तसेच जस्त, लोह, बोरॉन, मॅगेनीज व तांबे इ. सूक्ष्म अन्नद्रव्ये माती परीक्षणानुसार वापरावीत.
अ) सेंद्रिय खते – प्रति हेक्‍टरी 25 टन शेणखत व 200 किलो निंबोळी पेंड.
ब) रासायनिक खते – मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरित वाणासाठी हेक्‍टरी 300 किलो नत्र, 150 किलो स्फुरद व 150 किलो पालाश, तसेच सुधारित सरळ वाणासाठी हेक्‍टरी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद व 100 किलो पालाश द्यावे. याशिवाय संकरित व सुधारित आणि सरळ वाणासाठी हेक्‍टरी 25 किलो फेरस सल्फेट, 25 किलो मॅगेनीज सल्फेट, पाच किलो बोरॅक्‍स आणि 25 किलो मॅग्नेशिअम सल्फेट द्यावे.
क) जैविक खते – एकरी दोन किलो ऍझोटोबॅक्‍टर, दोन किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू व दोन किलो पालाश विरघळविणारे जिवाणू हे सर्व एक टन शेणखतात मिसळून द्यावे.

खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र 15, 25, 40, 55 दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळांच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. या व्यतिरिक्त सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य लागवडीनंतर पाच ते सात दिवसांनी द्यावीत.

 

जात
भाग्यश्री – या जातीच्या फळात लायकोपीन या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असून बियांचे प्रमाण कमी आहे. फळे लाल गर्द रंगाची भरपूर गर असलेली प्रक्रिया उद्योगास चांगली आहेत. या जातीचे सरासरी उत्पादन 75 ते 89 टन प्रति हेक्‍टर मिळते.

धनश्री – फळे मध्यम गोल आकाराची, नारंगी रंगाची असतात. या जातीचे सरासरी उत्पादन 80 ते 90 टन प्रति हेक्‍टर मिळते. ही जात स्पॉटेड विल्ट आणि लिफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी प्रमाणात बळी पडते.

राजश्री – फळे नारंगी रंगाची, लाल रंगाची असतात व या संकरित वाणाचे उत्पादन 80 ते 90 टन प्रति हेक्‍टर मिळते. ही संकरित जात लिफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते.

फुले राजा – फळे नारंगी लाल रंगाची असतात. ही संकरित जात लिफकर्ल, व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते. प्रति हेक्‍टरी 55-60 टन उत्पादन मिळते.

रोपतयार करण
रोपवाटिकेचे नियोजन – अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी योग्य रोपांची निवड व त्यांची योग्य पुनर्लागवड करणे अत्यंत आवश्‍यक असते. त्यासाठी रोप व्यवस्थापन उत्तमोत्तम करणे आवश्‍यक असते. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी तीन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी. टोमॅटोच्या संकरित वाणांसाठी 125 ग्रॅम बियाणे एक हेक्‍टर क्षेत्रासाठी पुरेसे असते. रोपवाटिकेची जमीन दोन वेळा उभी, आडवी नांगरून कुळवून घ्यावी. रोपवाटिकेसाठी 1 मी ु 3 मी ु 15 सें.मी. आकाराचे गादी वाफे तयार करावेत. गादी वाफ्यामध्ये पाच किलो कुजलेले शेणखत 80 ग्रॅम 19ः19ः19 किंवा 100 ग्रॅम 15ः15ः15 चांगले एकसारखे मिसळावे. बीजप्रक्रिया करण्यासाठी तीन ग्रॅम थायरम, 2.5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणास चोळावे .त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. बीजप्रक्रियेमुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कूज हे रोग नियंत्रणात राहतात. त्यानंतर हाताने दहा से.मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये एक सें.मी. अंतरावर एक एक बी पेरावे. झारीने हलकेच पाणी द्यावे व त्यानंतर गादी वाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत. साधारणपणे पाच ते आठ दिवसांत बी उगवते. बी उगवल्यावर आच्छादन काढून टाकावे. जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने योग्य प्रकारे झाकून द्यावीत. यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोगांचे व किडीचे वेळीच नियंत्रण करावे. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने 25 ग्रॅम फोरेट 12 दिवसांनंतर गादी वाफ्यात योग्य पद्धतीने मिसळावे. तसेच तीन ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रति लिटर पाण्यात मिसळून वाफ्यात आळवणी करावी. रोपे चार ते सहा पानांवर आल्यावर म्हणजेच 25 ते 30 दिवसांनंतर उपटून त्यांची पुनर्लागवड करावी. रोपे उपटण्यापूर्वी त्यांना आदल्या दिवशी पाणी द्यावे.
ट्रे पद्धतीने रोपे तयार करणे – ट्रे पद्धतीने रोपे तयार करावयाची असल्यास 98 कप्पे असलेला प्रो-ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान 1.25 किलो कोकोपीट लागते. कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये एका कप्प्यात एक बी याप्रमाणे बी पेरावे. या पद्धतीत बियाणे वाया जात नाही तसेच प्रत्येक रोपाची सशक्त वाढ होते. ट्रे पद्धत रोपांच्या वाहतुकीसाठी सोईस्कर आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: