तुती पानांपासून 'ग्रीन टी'

तुती झाडांचा उपयोग रेशीमकीटक संगोपनाशिवाय तुती चहा, कोंबडी खाद्य, जनावरांचे खाद्य तयार करण्यासाठी केला जातो. त्याविषयी सविस्तर माहिती करून घेतल्यास गावपातळीवरही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

ती चहासाठी तुतीच्या पानांच्या विविध भागांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने तुतीच्या पानांची पावडर केली जाते. तुतीच्या शेंड्याच्या पानांचा वापर तर काही वेळा तुतीच्या फांदीवरील संपूर्ण पानाचा वापर प्रक्रिया करून तुती चहा बनविण्यासाठी केला जातो. तुतीचा चहा बनविण्यामध्ये प्रामुख्याने ग्रीन टी बनविण्यासाठी प्राधान्य दिले जाते. अनेक प्रक्रियांद्वारे तुती चहा विविध स्वादांमध्येही उपलब्ध आहे. तुती चहाचा शरीरातील जैविक क्रियांचा अभ्यास केला असता सस्तन प्राण्यासाठी अत्यंत उपयोगी असल्याचे दिसून आले. तुतीमध्ये डोपा अमाईन, एल डोपा कॅमाईन असते, तो प्राण्यांमध्ये कॅफीक ऍसिड आणि इतर घटकांच्या उपलब्धतेसाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

तुती चहाचे फायदे ः
1) रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत रक्तदाब नियंत्रित केला जातो. 2) मधुमेहामध्ये शर्करा नियंत्रित होते, तर हाडांचा ठिसूळपणाही कमी होतो. 3) स्नायू वेदना, यकृत कर्करोगाचा धोका कमी होतो. 4) रक्तवाहिन्याचा आकार नियंत्रित राहतो. शरीरातील रक्ताभिसरण कार्यान्वित ठेवून फुफ्फुसे, जठर, आतडे, मूत्राशय आणि मूत्रपिशवी यांचे कार्य प्रभावीपणे, सुरळीत चालण्यासाठी मदत करते. 5) रक्तवाहिन्यांतील रक्त गुठळ्यांना प्रतिबंध होतो. 6) हृदयाच्या स्नायूपेशी कमकुवतपणा, तसेच रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. 7) तुतीतील फायटोस्टिरॉल रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगी आहे. 8) तुती चहामध्ये कॅफेन अत्यल्प असते, त्यामुळे इतर चहांतील हे घटक मानवाच्या शरीरास अपायकारक होण्याचा धोका नाही. नेहमीच्या चहा पानांच्या तुलनेत तुती पानामध्ये सहा पट जास्त कॅल्शिअम, 20 पटीने जास्त लोह आहे, तर कोबी पानांच्या तुलनेत 63 पटीने अधिक कॅल्शिअम आहे. 9) शंभर ग्रॅम तुती सुकलेल्या पानामध्ये 230 मि.ग्रॅम अमायनो ब्युटिरिक ऍसिड व 46 मिलि ग्रॅम सिस्टो स्टेरॉल आणि फायटो स्टेरॉल आहेत. हे घटक रक्तदाब व कोलेस्टेरॉल कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते. 10) तुतीमधील गुणधर्मांमुळे तारुण्यपणा टिकण्यास मदत होते. 11) तुतीझाडांचा उपयोग रेशीमकीटक संगोपनाशिवाय तुती चहा, कोंबडी खाद्य, जनावरांचे खाद्य यामध्ये वाढविल्यास गावपातळीवरही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, मूल्यवर्धित उत्पादनामुळे कोषउत्पादन खर्च कमी होऊन इतर घटकांपासून आर्थिक मिळकत वाढेल.

 

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: