तूर

तूर हे पीक महाराष्ट्रात विस्तृत प्रमाणात घेण्यात येते. मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ होत असुन महाराष्ट्रात लागवडीखालील जातींचा कालावधी ११० ते २०० दिवसांपर्यंतचा आहे. अवर्षणामध्ये पाण्याच्या अल्प उपलब्धीवर तग धरण्याचा पिकांचा अनुवांशीक गुणधर्म आहे. या पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे ती जमिनीत आंतरस्तरावरील ओलावा व अन्नद्रव्ये शोषण करतात.

सुधारीत वाणः

तूरीचे पीक तयार होण्यास लागणा-या कालावधीनुसार तुरीच्या वाणांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.

(१)   अति लवकर तयार होणारे वाण (कालावधी ११०-११५ दिवस)

(२)  लवकर तयार होणारे वाण (कालावधी १३५ ते १६० दिवस),

(३)  मध्यम उशीरा तयार होणारे वाण (१६० ते २०० दिवस) आणि

(४)  उशीरा तयार होणारे वाण. (२०० दिवसापेक्षा जास्त) आपल्या जमिनीची प्रत आणी पावसाचे प्रमाण यानुसार योग्य वाणांची निवड करावी.

साधारणपणे उधळ व हलक्या जमिनीत पाणि साठवुन ठेवण्याची क्षमता कमि असते. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर पिकाला जास्त द्वस पाणि उपलब्ध होते नाही. म्हणुन अशा जमिनीत लवकर तयार होणारे वाण घेणे अधिक चांगले. याउलट खोल व भारी जमिनीत ओलीताची सोय असल्यास दुबार पिक पद्धतीसाठी अति लवकर किंवा सवकर येणारे वाण सोयीचे टरतात.

 

लागवडिकरीता तूरीच्या हळव्या किंवा गरव्या वाणांची निवड करतांना प्रामुख्याने वाणांचा कालावधी, जमिनीचा पोत, पर्जन्यमाण आणि पीक पद्धती (आंतर, सलग, दुबार) या बाबींचा वीचार करुण सर्व साधारणपने खालील प्रमाण वाणांची निवड करावी.

 

जमिन आणि पर्जन्यमानाप्रमाणे योग्य (हळवे-गरवे) वाणः

१) मध्यम जमीन, मध्यम पर्जन्यमानः हळवे आणि अति हळवे वाण. उदा. टीएटी-१० आयसीपीएल् ८७ (प्रगती) टी विशाखा-१, एकेटी ८८११ विपुला.

२)   मध्यम ते भारी जमिन व खात्रीचे पर्जन्यमानः मध्यम कालावधी वाण. उदा. बीडीएन २, मारोती (आय.सी.पी.८८६३) बी.एस.एम.आर. ७३६, बी.डी.एन. ७०८ इ.

३)      भारी जमिन आणि खात्रीचे पर्जन्यमान: उशीरा तयार होणारी वाण उदा. सी-११, आशा (आयसीपीएल-८७११९), बी.एस.एम.आर.८५३

पीक पद्धतीप्रमाणे वाणांची निवडः

१.  बुबार पीकः अति लवकर आणि लवकर तयार होणारे वाण उदा. टीएटी १०, टी विशाखा-आयसीपीएल् ८७ (प्रगती)

२.                        आंतरपीकः उशीरा तयार होणारे वाण उदा. सी-११ आशा बी.एस.एम.आर. ८५३

हळवे सुधारीत वाणः

विविध वाणांचे उत्पन्नाचे दिलेले आकङे सर्वसाधारण परिस्थितीत येणारे उत्पन्न दर्शविते. वातावरणातील तफावतीमुळे ते कमी जास्त होऊ सकतात.

 

१) टीएटी १०:

हा वाण ११० ते १२० दिवसांत तयार होतो. दाण्याचा रंग लाल असुन दाम्याचा आकार मध्यम आहे. १०० दाण्याचे वजन ८.४ ग्रॅम, उत्पन्न सुमारे ८ ते ९ क्विं हेक्टर मिळते.

२) आयसीपीएल ८७:

हा संकरित वाण १२० ते १२५ दिवसांत तयार होतो. ओलीत ुपलब्ध असल्यास पहिल्या बहाराच्या शेंगा तोडून दुस-या आणि तीस-या बहाराचे पीक मिळु शकते. परंतु विदर्भात उष्ण तापमाणामुळे बहुतेक तीस-या बहारापासुन मिळणारे पीक फार कमि येते. या वाणाचा पहील्या बहारापासुन सुमारे ९ ते १० क्विंटल –हेक्टरी उत्पन्न मिळते व तेवढेच या वाणाच्या पडिल्या बहारापासुन देखाल अपेक्षीत आहे. दाणे चांगले टपोर व लाल आहे. (१०० दाण्याचे वजन १० ग्रॅम)

३) एकेपीएच ४१०१:

हा संकरित वाण १३५ ते १४० दिवसात तयार होतो. मध्यम टपोर दाणे लाल असुन १०० दाण्याचे वजण सुमारे ९.५ ग्रॅम आहे. मध्य विभागाकरीता (महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यासाठी) त्यांचे राष्ट्रीय स्तरावरुन शीफारस करण्यात आली आहे.

४) एकेटी ८८११ः

हा वाण सुमारे १४५ ते १५० दिवसांत पक्क होतो. हा लाल आणि मध्यम टपोर दाण्याचा (१०० दाणे= ९.० ग्रॅम) वाण मर रोगास मध्यम प्रतीबंधक आहे. सरासरी उत्पन्न १० ते ११ क्वि. हेक्टरी मिळते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाद्वारे सन १९९५ याली या वाणाची प्रसारित करण्यासाठी शिफारस करण्यात आलि.

निमगरवे सुधारीत वाणः

१) बी.डी.एन २:

हा वाण पांढ-या असुन मर रोगांस प्रतिबंधक आहे. त्याचे १०० दाण्याचे वजन १० ग्रॅम आहे. तो १७० ते १७५ दिवसात पक्क् होतो. दर हेक्टरी सरासरी सुमारे १५ ते १६ क्विं. उत्पन्न मिळते. भारी जमिनीत उत्पन्न चांगले येते.

२) संतुर १ (एकेपीएच २०२२):

हा संकरीत वाण १६५ ते १७५ दिवसात तयारे होतो. दामे लाल असुन १०० दाण्याचे वजन सुमारे १० ग्रॅम आहे. उत्पन्न बीडीएन-२ किंवा सी-११ पेक्षा सुमारे दाण्याचे वजन सुमारे १० ग्रॅम आहे. उत्पन्न बीडीएन-२ किंवा सी-११ पेक्षा सुमारे २४ टक्के जास्त आहे. आंतरपीक पद्धतीसाठी उपयुक्त आहे.

३) सी ११:

हा वाण लाल हाण्याचा असुन १०० दाण्याचे वजन ९.५ ग्रॅम आहे. १८० ते २०० दिवसात पक्क होते. भारी जमिनीतील लागवडीकरीता अत्यंत उपयोगी ठरतो. त्याची उत्पीदनक्षमता २० ते २५ क्वि.-हेक्टर असुन सरासरी उत्पन्न २० ते २२ क्वि.-हेक्टर मिळते . अमरावती अकोला जिल्ह्यातील खोल काळ्या जमिनीत कापसाबरोबर माहुरी या अति गरव्या स्थानीक जातीची आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हमुन लागवड करतात. माहुरी हा वाण सर्व रोगास बळी पडणारा आहे. त्यामुळे सुमारे २० ते २५ झाडे मरतात. सी-११ ही जात देखील कापसामध्ये आंतरपीक पद्धतीत घेण्यास योग्य आहे.

४) आशा (आयसीपीएल् ८७१९):

हा वाण मध्यम टपोर लाल दाण्याचा असुन मर आणि वांझ (स्टर्ल्टी मोझॅक) रोगास चांगला प्रतीबंधक आहे. तो १८० ते २०० दिवसात परीक्व होतो. तो आंतरपीक पद्धतीत तसेच आर्धरबी किंवा रबी हंगामाचे पेरणीसाठी योग्य आहे.

५) बीएसएमआर ७३६:

हा वाण १७० ते १८० दिवसात तयार होतो. वांझ रोगास प्रतीबंधक आहे. वांझ रोगग्रस्त क्षेत्रासाठी तो उपयुक्त आहे. या वाणाचेया परीपक्वतेच्या पुर्वीपर्यंत शेंगा चट्टा वीरहीत व पुर्णपमे हीरव्या असतात. वाळलेल्या दाण्याचा रंग लाल आहे्.

६)   मारोती (आयसीपी८८६३): हा वाण लाल दाण्याचा आहे तो मर रोगग्रस्त क्षेत्रासाढी वीशेश महत्वाचा आहे कारण तो प्रभावी मर प्रतीबंधक आहे.

७)     बीएसएमआर ८५३: हा वाम १८० ते २०० दिवसात तयार होतो. वांझ रोग प्रतीबंधक आहे वाळलेल्या दाण्याचा रंग पांढरा आहे.

 

 

याशिवाय महाराष्ट्रासाठी प्रसारीत झालेल्या इतर राज्यातील विकसीत जातिंची माहीती तक्तयामध्ये दिली आहे.

इतर राज्यातुन विकसित परंतु महाराष्ट्रात राज्याकरिता प्रसारीत झालेल्या तूरीच्या जातीः

जातीचे नावं विकास करणारी संस्था प्रसारण वर्ष विशेष गुणधर्म
एनपीब्लुआर-१५

 

भा.कृ.अ.संस्था नवी दिल्ली १९७५ मर रोग प्रतिबंधक, दाण्याचा रंग पांढराउशीरा परिपक्क होणारी (२५० दिवस) १०० दाण्याचे वजण ७ ग्रॅम सरासरी ुत्पन्न २० ते २५ क्विं हेक्टरी मध्ये विभागाकरीता शिफारस करण्यात आलि आहे. मिश्र पीक पद्धतीकरीता उपयुक्त
टी-२१ कृ.सं.केंद्र, कानपुर, उत्तरप्रदेश १९७४ १३० ते १४० दिवसात तयार होणारी दाण्याचा रेग पिवळा करडा दाणा बारीक १०० दाण्याचे वजण ७ ग्रॅम सरासरी उत्पादन १५ ते २० क्विंटल हेक्टरी
पुसा अगेती

(एस-५)

भा.कृ.अ. संस्था नवी दिल्ली १९७१ मध्यम कालावधीत परीपक्व होणारी (१५० ते १६० दाणे मध्यम जाड विटकर रंगाचे वाढीचा प्रकार शेंड्यावर शेंगा गुच्छामध्ये येणारा उत्पन्न ८ ते १० क्वि. हेक्टरी
पुसा-३३ भा.कृ.अ. संस्था नवी दिल्ली १९८८ ११५ ते १२५ दिवसात तयार होणारी मर रोगास प्रतीकारक झाडाचा आकार अर्धपसरट असुन फांद्या सांब शेंडा असलेल्या उत्पन्न १० क्विं हेक्टर
पुसा-७४ भा.कृ.अ. संस्था नवी दिल्ली १९८२ उभट वाढणारी दाणा विटकर रंगाचा १०० दाण्याचे वजण ८.५ ग्रॅम मर रोगास प्रतिकारक १३५ ते १५० दिवसांत तयार होणारी उत्पन्न १२ क्वि हेक्टर.
आयसीपीएल-१५१ (जागृत) इक्रीसॅट, हैद्राबाद १९८९ आखुड शेंड्याची अर्धपसरट वाढणारी दाण्याचा आकार मध्यम जाड (१०० दाण्याचे वजन १०.६ ग्रॅम) ११० ते १२० दिवसात तयार होणारी वांझ रोग प्रतीबंधक दाण्याचा रंग पांढरा सरासरी उत्पन्न १० क्विंटल हेक्टरी
आयसीपीएच-८ इक्रीसॅट, हैद्राबाद १९९१ (एम.एस प्रभात×आय.सी.पी.एल १५१) संकरित वाण. १३० ते १४० दिवसात तयार होणारी संकरीत तूर १०० दाण्याटे वजण ८.५ ग्रॅम सरासरी उत्पन्न १६ क्वि. हेक्टरी.
केएम-७ कृ.सं.के खरगोन

(म.प्र.) १९९५

१७५ ते १८० दिवसात तयार होमारी झाड उंट मध्यम पसरट दाण्याचा रंग कथ्था मर रोग प्रतीबंधक १०० दाण्याचे वजन क्विं हेक्टरी.

तूरीच्या हळव्या (अतिलवकर तयार होणा-या) वाणांची उपयुक्तताः

तूर हे पीक हलक्या ते भारी तसेच उथळ ते अती खोल अशा वीवीध प्रकारच्या जमिनीवर घेतलेले जाते महाराष्ट्रातील तूर घेणा-या काही प्रदेशात १५ सप्टेंबर नंतर पाऊस कमि प्रमानात पदतो. उथळ हलक्या वामध्यम जमिनीत उशीरा येना-या (गरव्या) वाणांना फुलो-यावर किंवा तदनंतर शेंगा भरतांना पाण्याचा ताण पडतो त्यामुळे फुले भरपुर असुन देखील पार कमि शेंगा लागतात व उत्पन्न कमि मिळते काही विभागात पाऊस १५ ऑक्टोंबर नंतर अनियमीत येतो. तर काही वर्षी तो ३० ऑगस्ट किंवा १०, १५ सप्टेंबर नंतर मुळीच येत नाही अशा परीस्थातीत हळवे किंवा अति हळवे वाण साधारण पणे जुलैच्या सुरवातीला किंवा तत्तपुर्वी पेरल्यास ऑगस्टचे शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरवातीला फुलावर येतात.व ऑक्टोंबरच्या शेवटी परीपक्क होतात.त्यांना शेगा भरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडण्याची शक्यता कमी असते त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरच्या थोड्या पावसावर देखील हळव्या वाणांचे पीक हमखास मिळु शकते.

 

ओलीताची सोय उपलब्ध असल्यास हळव्या पानांच्या पहील्या फुलो-यांच्या शेंगा काडुन दुस-या फुलो-या पासुन (खोडव्याचे) उत्पन्न घेता येते रबी हंगामात हळव्या तुरीनंतर रबी गहु हरभरा इत्यदी पिकांची योजना करता येते. हळव्या तुरीच्या हीरव्या शेंगा सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये विकण्याकरीता तयार होतात. जादा बाजार भावाचा फायदा अशा हिरव्या शेंगापासुन मिळु शकते.

 

अशा प्रकारे तूरीच्या हळव्यावाणांच्या पीक पद्धतीत योग्य वापर करुण हलक्याते मध्यम व उथळ जमिनीची उत्पादकता वाढवीता येईल. उत्पादकतेमध्ये स्थैर्य प्राप्त करता येऊल. तसेच दुबार पिक पद्दती तूरीच्या पीकाला स्थान मिळु शकते .यामुळे कडधाण्याचे उत्पादन वाढवण्याकरीता मदत होऊ शकेल या दृष्टीने ९० ते १०० दिवसात तयार होणा-या वाणांचा अभ्यास केला आहे. या वाणांचे प्रायोगीक उत्पन्न तक्ता क्र. ४ मध्ये दिले आहेत. या वाणांमध्ये मर आणि वांझ रोगप्रतीबंधक गुणधर्म समावीष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे.


अति हळव्या वाणाचे विद्रभातील प्रयोगांत उत्पन्न

वाण कालावधील दिवस फत्पादन (किलो हेक्टरी) सरासरी
९०-९१ (३) ९१-९२ (२)
टीएटी-१० ११५-१२० ११४२ ११४२ ५१० ९६५
आयसीपीएल-८५०१२ १००-११० १०१७ १०१७ ४१८ ८१९
आयसीपीएल-८५-१४ १००-११० ९०७ ९०७ ५५० ८५५

(कंसात प्रयोगांची संख्या दिली आहे.)

 

अर्ध रबी तूरः

खरीप हंगामातील जुन जुलैमध्ये केलेली पेरणी असफल झाल्यास असे क्षेत्र ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पुन्हा पेरमासाठी वापरले जाते कधी कधी पावसाअभावी पेरणी लांबवणी वर पडल्यामुळे ऑगस्टमध्ये पेरणी करावी लागते या करीता काही ठरावीक पीके घेतली जातात त्यामध्ये तुर पीकाचा समावेश आहे ऑगस्टमधील पेरणीला उशीरा खरीप तर सप्टेंबरच्या पेरनीला अर्ध रबी पीक असे संबोधतात. उशीरा पेरलेल्या तुराची कमी वाढ होते. झाडांची उंची तसेच फांद्याचा पसारा कमी होतो. त्यामुळे प्रती झाडाचे उत्पन्न कमु येते. प्रती हेक्टरी उत्पन्नात येणारी ही तफावत झाडांची संख्या वाढवुन काही प्रमानात कमु करता येते. या दृष्टीने ओळीतील तसेच झाडातील अंतरल कमि करावे लागते. अर्धरबीतूरीच्या लागवडीबाबत महत्त्वाची माहीती खाली दिली आहे. जमिनीची सुपीकता अणि पेरणीची वेळ यैा नुसार योग्य फेरबदल करावा.

पेरणाची वेळः २० ऑगस्ट ते २० सप्टेंबर.

वाणःमध्यम ते उशीराच्या कालावधीचे

ओळीतील अंतरः ३० ते ४५ सेमी

झाडातील अंतरः १० ते २० से.मी (उशीरा पेरणीसाठी कमि अंतर)

हेक्टरी बीयाणेः २५ ते ४० किलो प्रती हेक्टर

इतर लागवडीच्या बाबी खरीप हेगामाच्या तूरीप्रमाणे आहेत.

 

विकसित वाणः

अनुवांशीक तत्वावरील नपुंसक तूर वाणाचा शोध १९७८ मध्ये सागस्यापासुन संकरीत तूर निर्मान करण्याची संकल्पना उदयास आलेली आहे. सन १९८९ साली आंरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था हैद्राबाद येथुन लवकर होणा-या आयसीपीएच ८ हा संकरीत तुरीचा पहीला वाण मध्यबारत विभागात लागवडीसाठी प्रसारीत करण्याकरीता आला. त्यानंतर पीपीएच-४१०१ हा लवकर तयार होणारा तुरीचा संकरीत वाण मध्यभारत )(महाराष्ट्र, गुजरात, आणि मध्यप्रदेश) विभागातील अखिल भारतीय समन्वयी कडधान्य संशोधन प्रकल्पाद्वारे लागवडीसाठी १९९७ ला पुर्व प्रसारीत केला आहे. या वामाचे आयसीपीएच-८ या वाणापेक्षा २५ टक्के जास्त उत्पादन मिळते. मध्यम कालावधीत तयार होणारा एकेपीएच-२०२२ हा संकरित तुरीचा वाण विदर्भात आशादायक वाटतो. पुढील काळात आणखि काही चांगले संकरीत वाम महाराष्ट्रात प्रसारीत होण्याची शक्यता बळावली आहे.

सलग तूरीकरणः

अनुवांशीक नरनपुंसक वाणावर आधारावरील संकरीत तूर

संकरीत वाण एकेपीएच ४१०१ एकेपीएच २०२२
दोन ओळीनंतर अंतर ६०-९० सें.मि. ९०-१२० सें.मि
दोन झाडातील अंतर २०-३० सें.मि ३०-९० सें.मि.
हेक्टरी बीयाण्याचे प्रमाण ५-६  किलो ३ ते ४ किलो

 

टीपः १) इतर माहीती खरीप हंगामात पेरावयाच्या तुरीप्रमाणेच.

१) रुंद अंतरावरील ओळी मध्ये मुंग किंवा उडीदाचे आंतरपीक घेता येते.

आंतरपीक पद्धतीकरीताः

हेक्टरी बीयाणेः एकेपीएच ४१०१: ३ते४ किलो

(आंतरपीकेः मुग, उडीदासारखी ८० दिवस कालावधीची)

टीपः विविध पिकांच्या ओळीच्या प्रमाणावर बियाण्याचे प्रमाण अवलंबुन आहे.

 

पिकाची काढणी व मळणीः

 

पीक परीपक्क झाल्यानंतर (शेंगा वाळल्यानंतर) प्रथम नराच्या ओळी वेगाणे काडाव्यात मादीवाणाच्या ओळीतील फक्त पांढरा दोर किंवा चिंदी बांधलेली झाडेच आहे याची खाी केल्यानंतर या झाडाच्या पेंड्या व्यवस्थीत बांधन नीट सुकवीण्यास वेगळ्या ठेवाव्यात व्यवस्थीत वाळल्यानंतर त्याची मळणी करावी वाळवतांना किंवा मळणी करतांना तसेच साठवणुकीत मादीवाणाच्या किंवा झाडाच्या शेंगमध्ये किंवा दाम्यामध्ये कुढल्याही प्रकारची भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी मादीवाणापासुन मिळणारे बियणे संकरीत तूरीचे बी राहील तेचांगले वाळवुन त्याची सुरक्षीत साठवणुक करावी. सर्वसाधारमपणे प्रती हेक्टरी ४ ते ६ क्विंटल संकरित बीयामे मिळु शकते नराच्या ओळीचे उत्पन्न सर्वसाधारणपणे तुर म्णुन वापरण्यास हरकत नाही

ओलीत व्यवस्थापणः

मान्सुन पुर्व पेरणी झाल्यास ओलीताची सोय आवश्यक आहे. जर पीकाला जास्त कालावधीचा तान पडल्यास संरक्षीत ओलीत करावे. तूर पिकाच्या नाजुक अवस्थामध्ये म्हणजे फुले धरणाच्या वेळेस व शेंगा भरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

ओलीताची सोय असल्यास तुरीच्या पीकाला पाण्याच्या दोन पाळ्या दिल्यास उत्पन्नात ६४ टक्क्याने वाढ झाल्याचे आढळुन आले आहे. पाण्याची पहीली पाळी फुले धरण्याच्या वेळस व दुसरी शेंगा भरण्याच्या वेळेस द्यावी. पाण्याची कमतरता असल्यास पाण्याची एक पाळी दिली तरी चालेल त्यामुळे उत्पन्नात जवळजवळ ३० टक्के वाढ होते. पाऊस मानावर देखील ओलीताची वेळ अवलंबुन राहील.

तूर

तुर हे महाराष्ट्रातील डाळीवर्गातील एक प्रमुख पिक आहे. उत्पन्नात घट आणण्या-या अनेक कारणापैकी तुरीवर होणारा किडीचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. डाळी वर्गिय पिकावर पेरणीपासुन पिक निघेपर्यंत जवळ जवळ २०० प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव आढळुन आला. तसेच साठवनुकीमध्ये अनेक किडीवर तुरीवर स्वताचे पोषन करतात. परंतु फुले शेंगावर होणा-या किडीचे आक्रमण अतिशय मुकसानकारक ठरले आहे. कधी कधी साथीच्या स्वरुपात किड असल्यास ७० टक्क्यापेक्षाही अधिक नुकसान शेंगा पोखरणा-या किडीपासुन होते.

परागीकरण आणि किड नियंत्रणः

फुलो-यावर पक्त मादी वामातील नर नपुंसकत झाडे ओळखुन राखल्यावरपुढे या झाडावर नैसर्गिक करीता मलमाथा आणि इतर किटकाद्वारे नर वामाच्या परागीकरणापासुन संकरित बियाणे तयार होते . त्यामुले किटक नाठकाची फवारणी फुलो-याच्या काळात शक्यतो टाळावी. कि़ नियंत्रणासाठी वनस्पती जन्य (५ टक्के निंबोळी अर्क) तसेच प्राणा जण्य (बायोकंट्रोल जैवीक एट.एन.पी.व्ही.) नियंत्रणाचे विविध उपयोग करावे ते  परागीकरण करणा-या किडींला अपायकारक नसल्यामुळे जास्त उपयुक्त आहे.

 

१)पाने गुंडाळणारी अळीः

ही किड भारतामध्ये महाराष्ट्र बिहार, उत्तरप्रदेश, प. बंगाल, तामिळनाडू आन्धप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, हरीयाना, व दिल्ली ह्या प्रदेशात नेहमिच आढळुन येते. ही तुरीवर येणारी प्रमुख किड असुन उदिड, मुंग, चवळी, हरभरा, मसुर, वाटाना, बोरु, ई.पिकावरही आढळुन आली. ह्या किडीचा पंतग लहान आकाराचा अशुन धुरकट, तपकिरी रंगाचा असतो.पुढिल पंख जोडीवर ४ काळे ठिपके असतात. आणि पांढरट पारदर्शक चट्टे असतात. मादी नरा पेक्षा आकाराने मोठी असुन अंडी गोलकार पांढ-या रंगाची असतात. पुर्ण वाढ झालेली अळी १० मि. मि. लांब असुन पांढरट पिवळी असते. कोष तपकिरी रंगाचा असतो.

 

पिक फुलो-यावर येण्या पुर्वी अळी पानाची गुंडाळी करुन पाने कुरतडुन खाते. पिक फुलोरावर आल्यानंतर अळी कळ्या, फुले, व शेंगामधिल अपरीपक्व दाने फस्त करते. लहान अळ्या कोवळी पाने कुरतडुन खातात. ह्या किडीची मादी कोवळ्या पानेवर अंडी घालते. अंडी अवस्था ५ दिवसाची असुन अंड्याकुन बाहेर पडलेली अळी पांनाची गुंडाळी करुन त्यात राहते व पाने कुरतडते. अळीची पुर्ण वाढ १९ दिवसात होते. ती पानाच्या गुंडाळीत राहुन स्वतःभोवती रेशमी आच्छादन करुन त्यात कोषावस्थेत जाते. कोषावस्था ७ दिवसाची असते.

व्यवस्थापनाचे उपायः

१) प्रादुर्भाव कमी असल्यास सुरवातीस तुरीच्या झाडावरील गुंडाळलेली पाने अळीसकट नष्ट करावीत.

२)पिकावर प्रादुर्भाव दिसुन येताच मोनोक्रोटोफॉस ३६% प्रवाही ११ मि. लि. एन्डोसल्फान ३५ % प्रवाही २० मि लि किंवा क्विनॉलफॉस २५ % प्रवाही १६ % मि. लि. किंवा फोझ्यालॉन ३५ % प्र. २० मि.लि. किंवा फेन्थोएट ५० % प्रवाही १४ मि. लि. प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणात घेउन फवारमी करावी.

 

२)शेगा पोखरणारी हिरवी अळीः

ह्या किडीस हिरवी अमेरीकन बोंडअळी, घाटेअळी, इत्यादी नावांनी संबोधन्यात येते. ही किड बहुपक्षी असुन भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडु, ओरीसा, पंजाब, व उत्तरप्रदेशात उदिड, मुंग, चवळी, हरभरा, मसुर, वाटाना, मसुर, सोयाबिन, इ. कडधान्यावर फा मोठा प्रमाणावर आढळुन येतो. याशिवाय कपाशी ज्वारी, टमाटे, तंबाखु, गांजा सुर्यफुल, करडई ित्यादी पिकावरही आढळुन येते. तुरीवर ह्या किडीचा प्रादुर्भाव २.७ ते ३५.९० टक्के आढळुन येतो.

 

ह्या पंतग शरीरामे दनकट असुन पिवळसर रंगाचा असतो. पंखाची लांबही सुमारे ३७ मि. मि. असते. पुढिल तपकिरी पंखजोडीवर काळे ठिपके असतात. तर मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या असतात. पुर्ण वाढ झालेली अळी ३७ ते ५० मि. मि. असुन पोपटी रंगाची असली तरी विविध रंगछटा असलेल्या अळ्याही दृष्टीस जडतात. त्याच्या शरीराच्या बाजुवर तुटक तुटक करड्या रंगाच्या उभ्या रेषा आढळतात. अंडी पिवळसर पांढ-या रंगाची असुन गोलाकार असतात. त्याच्या खालील भाग सपाट असुन पृष्ट भाग घुमटाकार असतो. त्याच्या पृष्टभागावर उभ्या कडा असतात. कोष तपकिरी रंगाचा असतो. मादी नरापेक्षा मोठी असुन तिच्या शरीराच्या मागील बागवर केसाच्या झुपका असतो. सुरवातीस अंडीतुन बाहेर पडलेली लहान अळी तुरीची कोवळी पाने खाते. पिक फुलो-यावर आल्यानंतर कळ्या यांचा फज्जा उडविते. नंतर शेगाना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पडुन आंत शिरते तिचे अर्धे शरीर बाहेर असुन शेंगेतील अपरीपक्व तसेचपाने व देठे कुरतडुन खाते.  परीपक्व झालेले दाणे खाउन टाकते. एक अळी ७ ते १६ तुरीच्या शेंगाचे नुकसान करते. डिसेंबर जानेवारीत आभाळ आभ्राच्छित असल्याह्या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

 

ह्या किडीची मादी नराशी समागम झल्यानंतर ४-५ दिवसांनी अंडी देन्या सुरवात करते. मादी कोवळी पाने देठ अथवा कळ्या, फुले, तसेच शेंगावर अलग अलग अंडी घालते. ही अंडी घालन्यास प्रक्रिया बहुधा उशिरा सायंकाळी सुरु होते. सरासरी एक मादी ६०० ते ८०० अंडी घालते. अंडी अवस्था ३-४ दिवसाची असते. अंडीतुन बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीस सुस्त असुन प्रथम कोवळी पाने व देठे कुरतुन खातात. त्यानंतर शेंगाना छिद्रे पाडुन आतील दाणे खातात. ही अळी ६ अवस्थामदुन जात १८ ते २५ दिवसात जमिणीत मातीच्या वेष्टणात अथवा झाडाच्या पालापापोळ्यात कोषावस्थेत जाते. कोषावस्थेत जाते. कोषावस्था ७ ते १४ दिवसाची असते. किडीचा जिवनक्रंम४ ते ५ आठवड्यात पुर्ण होते.

 

२) विषारी पतंगः

भारतात  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडु, ओरीसा, पंजाब, व उत्तरप्रदेशात ही किड विशेषतः तुरीवर आढळुन येते. क्वचित तुरीशिवाय हील किड कुलथी व वाल या पिकावरही आढउन येते.ह्या किडीचा पतंग नाजुक निमुळत्, १२.५ मि. मि. लांब करडा  भु-या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले व मीगिल पंख तिन भागत विभागलेले असुन त्यांचा कडावर नाजुक केसाची दाट लव असते. पुढील पंख खुपच लांब असते. त्यामुळे त्यांना पिसारी लव म्हणतात. त्यांचे लांब व बारीक असतात. पुर्ण वाढ झालाली अळी १४ ते १५ मि. मि. लांब हिरवट रंगाची अंडगोलाकार असते. त्चे शरीर केस व लहान लहान काट्यांनी आच्छादलेले असते. मध्ये फुगीर व टोकाकडे मिमुलती गेलेली असते. कोष केसाल लालसर तपकिरी रंगाचे असुन अळी सारखे दिसते. अंड्यातुन बाहेर पडलेली अळी कळ्या, फुले व शेगांना छिद्रे पाडुन खाते. पुर्ण वाढ झालेली अळी प्रथम पृष्टभाग पोखरुन खाते. पुर्णपणेअळी शेंगेमध्ये कधिच शिरत नाही.

 

समागमणानंतर मादी कोवळी देठे, पाने, कळ्या, फुले, व लहान शेंगावर रात्रीच्यावेळी अलग अलग अंडी घालते. अंडी ३ ते ५ दिवसात. उडिन त्यातुन बाहेर पडलेली अळी शेंगेची साल खरडुन तिला छिद्र पाडते. व बाहेर राहुन आतील दाने खाते. अळी अवस्था १-१६ दिवसाची असते. त्यानंतर पुर्ण वाढलेली

अळी शेंगेवर अथवा शेंगेवरील छिद्रात कोषावस्थेत जाते. कोषावस्था ४ ते ७ दिवसाची असुन त्या किडीची एक पिढी १८ ते ३८ दिवसात पुर्णहोते. ही किड पावसाळा संपल्यानंतर तुरी मोठ्या प्रमाणावर क्रियाशील असते

 

३) माशी

ही किड भारतातील महाराष्ट्र बिहार, उत्तरप्रदेश, प. बंगाल, तामिळनाडू आन्धप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, ह्या प्रदेशात आढळुन येते. तेथे ह्या किडीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आढळुन येते. ओरीसा खंडात घाटे अळीचा नुकसान करण्यामागे दुसरा क्रमांक लागतो. तुरीशिवाय ही किड हरभ-यावरही आढळते. शेंगमाशी आकाराने फारच लहान १.५मि. मि. लांब असते. माशीचा रंग हिरवा असतो. माीदी नरापेक्षा किंचीत मोठीअसते. पुढिल पंखाची लांबी ४ मि. मि. असते. अळी गुळगुळीत व पांढ-या रंगाची असुन तिला पाय नसतात. तिच्या तोंडाकडील भाग निमुळता असते. अंडी पांढ-या रंगाची लांबगोलाकार असतात. कोषावर तपकिरी रंगाचे असुन लांब गोलाकृती असते. कोषावरणाच्या आंत कोष असुन सुरवातीस हा कोष पिवळसर पांढा असुन नंतर तपकिरी होतो.

 

सुरवातीला ह्या किडीच्या प्रादुर्भावाचे शेंगेवर कोणतेही लक्षन दिसत नाही. परंतु जेव्हा पुर्ण वाढलेली अळी कोषवस्थेत जाण्यापुर्वी शेंगेला छिद्र पाडते. व त्या छिद्रातुन माशी बाहेर पडते. तेव्हा नुकसानीचा प्रकार आढळुन येतो. आपद अळी शेंगेत शिरुन दाणे अर्धवट कुरतडुन खाते. त्यामुळे दाण्याची मुकनी होते. त्यावर वाढणा-या बुरशीमुळे दाणे कुजतात. हे दाने खावयास व बिजाईस उपयोगी पडत नाही.

 

मादी शेंगाच्या सालीच्या आत ही अळी ३-८ दिवसात उबुन त्यातुन निघनारी आपाद अळी सुरवतीस दााण्याचा पृष्टभाग कुरतडुन खाते. व दाण्यावर नागमोडी खताचा तयार झाल्यासारखा दिसतो. एक अळी एका दाण्यवरच उदर भरण करूनजिवनक्र पुर्ण करते. अळी अवस्था १० ते १८ दिवसांची असुन पुर्ण वाढ झालेली अळी शेंगेतच कोषवस्थेत जाते. कोष दाण्याच्या बाहेरपण शेंगेतच असतो. कोषावस्था ४-९ दिवसाची असते. कोषावरणातुन बाहेर पडलेली अळी शेंगेत जाण्यापुर्वी तिने तयार केलेल्या छिद्रावरील पातळ आवरण फोडुन माशी शेंगेच्या बाहेर पडते. शेंगमाशीचा जिवनक्रम ३-४ आठवड्यात पुर्ण होतो.

 

शेंगा पोखरनारी हिरवी घाटे अळी, पिसारी पतंग,व शेंगमाशीचे एकात्मिक व्यवस्थापणाचे उपायः-

या तिन्ही किडी कळ्या व शेंगेवर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापणाकरीता जवळ जवळ सारखे उपाय योजावे लागतात.

१)       उन्हाळ्यात जमिनीत खोल नांगरणी करावी. जेनेकरुन जमीवनीतील कोष उन्हामुळे नांगराच्या फाळामुळे मरतात. तसेच नांगरणीमुळे जमिणीच्या पृष्ठभागावर आलेले कोष वेचुन खातात.

२)      किड प्रतिबंधक वानांचा वापर करावा .

३)      तुरूसोबत ज्वारी, बाजरी मका ही आंतर पिके घ्यावी.

४)      प्रतिहेक्टी २० पक्षीस्थानके उभारवे. त्यामुळे पक्षीकिडीच्या अळ्या खाउन फस्त करतात.

५)     तुरीच्या झाडाखाली पोते टाकुन पोते हलवावे. त्यामुळे त्या अळ्या पोत्यावर पडुन गोळा करुन नष्ट कराव्यात.

६)      तुरीवरील घाटे अळीची नुकसान करण्याची पातळी १ ते २अळ्या प्रतिझाड असतातंना व पिसारी पतंगाचा  ५ ते १० अळ्या प्रति १० झाड आढळुन आल्यास.

अ)     वनस्पती जन्य किटकनाशकाचा वापरः-तुरीवरील घाटेअळीच्या नियंत्रणाकरीता ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. किंवा ५% निंबोळी अर्क + १० मि. लि. एन्डोसल्पॉन ३५ % प्र. किंवा ६ मि. लि. मोनोक्रोटोफॉस प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. घाटे अळी सोबत इतर किडीचाही बंदोबस्त होते.

ब)      जैविक नियंत्रण घाटेअळीच्या नियंत्रणाकरीता त्या अळीचा निषाणु ( एच ए.एन. पी व्ही.) प्रति हेक्टरी २५० रोगग्रस्त अळ्याचा अर्क वापरावा.

क)     रासायनिक किटकनाशकाचा उपयोगः- एन्डोसल्पॉन ३५ % प्र. किंवा क्विनॉलफॉस २५ % प्रवाही १६ मि. लि किंवा फेंथोएट ५०% प्रवाही १४ मिली किंवा फोझॅलॉन ३५ %प्र. २० मि. लि. किंवा मोनोक्रोटोफॉस ३५ %प्रवाही ११ मि. लि. प्रति लिटर पाण्यात घेउन फवारणी करावी.

 

शेंगावरील ढेकण्याः-

महाराष्ट्र बिहार, उत्तरप्रदेश, प. बंगाल, तामिळनाडू आन्धप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, ओरीसा, ही किड इत्यादी राज्यात मोठ्या प्रातांत आढळुन येते. ही किड तिरीशिवाय हरभरा, वाल इ. पिकावरही दिसुन येते.प्रौढ ढेकुन तपकिरी रंगाचे १२.५ मि. लि. लंब असतात. त्याच्या पाठीवर समोरील भागात दोन्ही बाजुस अणुकुचीतदार काटे असतात. पिल्ले मात्र लाल रंगाची असतात. त्यांच्या पायाची पोटरी फुगीर व काटेरी असते. अंडी सुरवातीस पांढरी असुन वरचा पृष्ठभाग चपटा असते. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने शेंगावर असलातरी प्रौढ व पिल्ले पाने, कळ्या, फुले व नाजुक खोडातीलही रस शोषम करतात. शेंगातील रस शोषन केल्यामुळे शेंगावर सुरवातीस चिकट पट्टे पडतात व नंतर अशा अकसतात व वाळतात.

 

मर मादी ढेकुन अनेकदा समागम करतात. समागम अवस्थेतील नर मादी तुरीवर आढळतात. मादी ३ ते १५ अंडीचा एक पुंजका अशा प्रकारे शेंगेवर व कधी कधी पानांवर आढळतात. अंडी अवस्था ८ दिवलसाची असुन त्यातील बाहेर पडलेल्या १५ दिवसात पुर्ण वाढ होउन ती प्रौढावस्थेत जातात. ह्या किडीची पिल्ले पाने व शेंगावर शेंगावर समुहाने एकत्रित राहुन फितात. ह्या किडीचा जिवनक्रम ४ आठवड्याचा पुर्ण होतो.

 

एकात्मिक व्यवस्थापणः-

१)       झाडाऱखाली पसरट भांड्यात पाणी + रॉकेलचे मिश्रन ठेउन पाणी हलवावे. ह्या मिश्रनात पडलेल्या ढेकणाचा नायनाट करावा. किड प्रतिबंधक कणाचा वापर करावा.किडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच डायमेथोएट ३० % प्रवाही १० मि. लि.य किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ %  प्रवाही ११% मि. लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

जमिनीची पुर्वमशागतः

 

पुर्विच्या हंगामातील पिक काढल्यानंतर जमिन नांगरुन नंरत वखराच्या दोन तीन पाळ्या देऊन भुसभुशीत तरावी. मशागत चांगली केल्यामुळे मुळांची वाढ उत्तम होते. त्यामुळे अन्नद्रव्ये शोषणासाठी झाडाची ताकत वाडते. व पिकाची वाढ चांगली होते. १० ते १२ गाड्या प्रती हेक्टर चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रीय खत (कंपोस्ट) शेवटच्या वखराच्या पाळीपुर्वी द्यावे तसेच २५ किलो नत्र + ४० किलो स्फुरद प्रती हेक्टरी पेरणीच्या वेळी द्यावे. माती परीक्षन करुन आवश्यकतेनुसार १० ते २० क्वि. हेक्टर गंधक आणि २ ते ५ क्वि हेक्टर जस्ताची मात्रा पेरणीचे वेळी द्यावे.

 

संरक्षित ओलिताची सोय असलेली मध्यम ते भारी, सपाट, चांगल्या खोलीची, उत्तम निचरा होणा-या जमिनीत बिजोत्पादन घेता येईल. पाणि धरुन ठवणारी चोपण व आम्ल जमिनीत तुर पीक बरोबर येत नाही. त्यामुळे अले क्षेत्र टाळावे. बिजोत्पादन क्षेत्राच्या शेतात कमित कमि १ ते २ वर्ष तुरीचे पीक घेतलेले नसावे. मर रोगग्रस्त जमिनीची निवड कटाक्षाने टाळावी. पुर्विचे पीक काढल्यानंतर जमिन नांगरुन व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन भुसभुशीत व समपातळीत करावी. मशागत चांगली केल्यामुळे मुळांची वाढ उत्तम होते. त्यामुळे अन्नपाणि भरपुर शोषुन घेण्याची ताकद निर्माण होते व १० तो १२ प्रती हेक्टर चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या वखऱणीपूर्वि जमिनीत मिसळावे.

पेरणीची वेळः

पेरणी जुलैच्या पहील्या आठवड्यात किंवा समाधानकारक पाऊस पडल्यास त्या अगोदर करावे. पेरणीला जसजसा उशीर होतो तसतशी उत्पन्नात घट होते.

जिवामु खताचा वापरः

बीयाण्यास चवळी गटाचे रायझोबीयम तसेच स्फुरद विरघळणारे जीवाणु खते. लावल्यास उत्पन्नात अंदाजे १० ते २२ टक्के वाढ होत असल्याचे आढळते. जीवानु संवर्धन १० ते १२ किलो बीयाण्यास पुरेसे होईल असे पॉलीथीन पाकीटात मिळते जिवाणु संवर्धणे थायरम प्रक्रीया केलेल्या बियाण्यास सुद्धा लावता येतात. जिवाणु संवर्धणे बियाण्यास पेरणीपुर्वक लावुन बी सुकवावे मात्र या नंतर बी पुन्हा साठवु नये लगेट पेरणीसाठी उपयोगात आणावे.

 

बीज प्रक्रीयाः

तीन ग्रॅम थायरम किंवा ४ ते ५ ग्रॅम ट्रायकोडमा संवर्धन प्रती किलो बीयाण्यास चोळावे. यामुळे जमिनीत मुळकुजव्या रोगाच्या जीवीणुमुळे बीयाण्याचे तसेच अंकुरलेल्या रोपाचे नुकसान टळते.

 

हेक्टरी बियाणे व लागवड पद्धतः

सलग पिकांसाठी ओळीदरम्याण आणि दोन झाडातील अंतर आणि हेक्टरी बीयाण्याचे प्रमाण खालील प्रमाणे ठेवावे.

 

अक्र जात दोन ओळीतील अंतर (से.मि.) दोन धाडातील अंतर (सेंमि.) हेक्टरी बीयाणे (किलो)
टीएटी १० ३० ते ४५ १० ते १५ ४० ते ५०
टी विशाखा १ ४५ १५ ते २० १५ ते २०
आयसीपीएल ८७ ३० ते ४५ १० ते १५ ४० ते ५०
नं. १४७ बीडीएन १ बीडीएन२, मारोती, एकेटी ८८११, बीएसएमआर ७३६ ६० ते ९० २० ते ३० १२ ते १५
सी ११, आशा (आयसीपीएल

८७ ११९), बीएसएमआर ८५३

६० ते १२० ३० ते ६० १२ ते १५

 

जमिनीच्या प्रतीवर दोन ओळीतील किंवा दोन झाडातील अंतर अवलंबुन राहील भारी व खोल जमिनीत ओळीतील तसेच झाडातील अंतर जास्त ठेवावे कारण झाडाची वाढ खुप होते. मात्र हलक्या जमिनीकत तीतकी जोमदार वाढ होत नसल्यामुळे अंतर कमि ठेवावा. पेणी मे जुन मध्ये झाल्यास झाडांची वाढ जास्त होते अशा वळी दोन ओळीतील अंतर वाढवावे. पेरमीस उशीर होईल तसतशी वाढ संभवते. त्याप्रमाणे हे अंतर कमि करावे आणि बीयाण्याचे प्रमाण वाढवावे.

 

संकरित तूर बिजोत्पादन तंत्र:

संकरीत तूरीखाली महाराष्ट्रात तसेच देशात एकुण क्षेत्र फारच नगण्य आहे. याचे कारण म्हणजे संकरित तूर वाणाचे बियाणे पुरेशा प्रमानात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधुंनी आपले गरजेपुरते संकरित बियाणे पुरेशा आपल्याच शेतात थोड्या फार क्षेत्रात (५ त् १० गुंठ) तयार केल्यास फायद्याचे होऊ शकते.

तूरीचे संकरित बीयाणे मादी आणि नर वाणाचा नैसर्गिकरितिने संकर घडवुन तयार करता येते. ज्वारी, बाजरी व सूर्यफुल मधील संकरित वाणाची मादी सायटोप्साझमीन नर नपुंसकता (सी.जी.एम.एस.) तत्त्वाचा उपयोग करुन तयार करतात तर तुरीमध्ये वर दिलेल्या संकरीत वामासाी जेनेटीक नरनपुंसकता (जी एम.एस.) तत्वाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तुरीचे बियोत्पादन तंत्रामध्ये ज्वारी, बाजरी किंवा सुर्यफुलापेक्षा थोडा वेगळेपणा आहे. संकरित तुरीच्या बियोत्पादन कार्यक्रमामधील मादी वाणामध्ये ५० टक्के झाडे नरनपुंसक तर बाकी ५० टक्के फलमक्षम झाडे उपटुन टाकावी लागतात. मादी वाणातील फक्त नरनपुंसक झाडांपासक संकरित तूर बिजोत्पादन होते.

संकरित तूरीच्या अधिक बिजोत्पादनाकरिता डॉ.पं.दे.कृ.वि च्या खडधान्य संशोधन विभाग अकोलाद्वारे बिजोत्पादन तंत्रज्ञान विकसीत केले आहे. थोडक्यात ते देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

बिजोत्पादन लागवड तंत्रः

विलगीकरण अंतरः

बिजोत्पादन क्षेत्राचे चारही बाजुंनी ४०० मिटर विलयांतर ठेवावे. या परिसरात दुसरे तुरीचे पीक असतात कामा नये.

रासायनिक खतेः

पेरणापुर्वी हेक्टरी २५ किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद रासायनिक खताद्वारे द्यावा. नत्राची मात्री अमोनीयम सल्फेट व स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट मदुन द्यावी. कारण ही खते दिल्याने नत्र व स्फुरद व्यतिरिक्त गंधक व कॅलशीयम पिकास मिळतो. जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्याचे परीक्षन करुन आवश्यकता असल्यास प्रति हेक्टरी १० किलो गंधक आणि किंवा ५ ते १० किलो जस्ताची मात्रा द्यावी.

 

बियाणेः ३ ते ४ किलो मादी- १ ते २ किलो नर प्रती हेक्टर.

 

पेरणीची चैफुलीवर शुधारीत पदधतः

संकरित बिजोत्पादन क्षेत्राची पेरणी शक्यतो चौफुली पद्धतीने करावी आणि त्यासाठी दोन ओळीतील (९० त् १२० सें.मि) आणि दोन चैफुलीतील अंतर (६० सें.मि.) नेहमिच्या व्यापारी पीका करीता (तूर) वापरावयाच्या अंतरापेक्षा जास्त असावे. तसेच प्रत्येक चौफुलीवर मध्यभागी चांगले कुजलेले शेणखत (अंदाजे १०० ते १५० ग्रॅम-फुली) टाकावे किंवा उताराच्या विरुद्ध दिशेणे डव-याणे स-या ओढतांना रस्त्याद्वारे पेरावे. प्रत्येक चौफुलीवर मादीवाणाच्या चार बिया चैकोणी पद्धतीने चार ठिकाणी एकमेकापासुन साधारण २० ते ३० सें.मि अंतरावर लावाव्यात तर नर वाणाच्या २ ते ३ बीया लावाव्या.

बियाण्याची लागवड केल्यानंतर सरीमधुन पाणि सोडावे. त्यामुळे बीयाण्याची उगवण एकाट वेळी व चांगली होईल. व जनक वाणाच्या झाडाची वाढ सारखी मिळेल मादी आणि नर वाणाचे ओळीचे प्रमाण ४.१ किंवा ६.१ असे ठेवुन अशा क्षेत्राचे सभोवताल ४ ते ६ ओळी नर वाणाच्या पेराव्यात (आ.क्र.६) नर वाणाच्या ओळी ओळखण्याकरीता त्यात सुरवातीला मध्ये व शेवटी बुरु मका किंवा सुर्यफूलाचे बि लावावे. बिजोत्पादन क्षेत्राची लागवड जुन अखेर ते १० जुलै पर्यंत करावी.

 

पेरणीची जोड ओळ पद्धतीः

चैफुलीच्या पेरणात टोकन पद्धतीने पेरणा अवघड वाटस असल्यास आकृती क्र ४ मध्ये दाखवील्या प्रमाने जोड ओळ पद्धतीत टोकम पद्धतीने पेरणा करता येऊ शकेल.

सरळ ओळीची पेरणी सुद्धा करता येईल ,सरळ ओळ  किंवा जोड ओळीची पेरणी टोकण पद्धतीने किंवा त्याच्या सहाय्याने केली तरी चालेल परंतु एकाच ठिकाणी एक पेक्षा जास्त बिया पेरल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. उगवण फाल्यावर ७-८ दिवसाचे आंतरवीरळणी करुन १० ते २० स्.मी वर १ जाड राहील याची खात्री करुन घ्यावी.

 

 

आंतरमशागतः

तुरीचे पीक सुरवातीला अतीशय सावकाश वाढते तुरीच्या पीकाची वीरलणी बी उगवल्यानंतर साधारणपणे १० ते १५ दिवसांणी करावी. वीरळणी करतांना एका ठीकाणी एक कींवा दोन रोपे ठेवावी पहीली कोळपमी २५ ते ३० दिवसांणी करावी या नंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराणे २ ते ३ कोळपण्या कराव्यात. त्याचप्रमाणे तीरीच्या पीकाला कमितकमि दोन वेळा निमणी करण्याची आवश्यकता आहे.तण नियंत्रणाचे दृष्टीणे तीरीचे पीक पेरणीपासुन सुमारे ६० ते ९० दिवसापर्यंत तण मुक्त ठेवणे आवश्यक आहे.

पेरणीची वेळः

पेरणी जुलैच्या पहील्या आठवड्यात किंवा समाधानकारक पाऊस पडल्यास त्या अगोदर करावे. पेरणीला जसजसा उशीर होतो तसतशी उत्पन्नात घट होते.

जिवामु खताचा वापरः

बीयाण्यास चवळी गटाचे रायझोबीयम तसेच स्फुरद विरघळणारे जीवाणु खते. लावल्यास उत्पन्नात अंदाजे १० ते २२ टक्के वाढ होत असल्याचे आढळते. जीवानु संवर्धन १० ते १२ किलो बीयाण्यास पुरेसे होईल असे पॉलीथीन पाकीटात मिळते जिवाणु संवर्धणे थायरम प्रक्रीया केलेल्या बियाण्यास सुद्धा लावता येतात. जिवाणु संवर्धणे बियाण्यास पेरणीपुर्वक लावुन बी सुकवावे मात्र या नंतर बी पुन्हा साठवु नये लगेट पेरणीसाठी उपयोगात आणावे.

 

बीज प्रक्रीयाः

तीन ग्रॅम थायरम किंवा ४ ते ५ ग्रॅम ट्रायकोडमा संवर्धन प्रती किलो बीयाण्यास चोळावे. यामुळे जमिनीत मुळकुजव्या रोगाच्या जीवीणुमुळे बीयाण्याचे तसेच अंकुरलेल्या रोपाचे नुकसान टळते.

 

हेक्टरी बियाणे व लागवड पद्धतः

सलग पिकांसाठी ओळीदरम्याण आणि दोन झाडातील अंतर आणि हेक्टरी बीयाण्याचे प्रमाण खालील प्रमाणे ठेवावे.

 

अक्र जात दोन ओळीतील अंतर (से.मि.) दोन धाडातील अंतर (सेंमि.) हेक्टरी बीयाणे (किलो)
टीएटी १० ३० ते ४५ १० ते १५ ४० ते ५०
टी विशाखा १ ४५ १५ ते २० १५ ते २०
आयसीपीएल ८७ ३० ते ४५ १० ते १५ ४० ते ५०
नं. १४७ बीडीएन १ बीडीएन२, मारोती, एकेटी ८८११, बीएसएमआर ७३६ ६० ते ९० २० ते ३० १२ ते १५
सी ११, आशा (आयसीपीएल

८७ ११९), बीएसएमआर ८५३

६० ते १२० ३० ते ६० १२ ते १५

 

जमिनीच्या प्रतीवर दोन ओळीतील किंवा दोन झाडातील अंतर अवलंबुन राहील भारी व खोल जमिनीत ओळीतील तसेच झाडातील अंतर जास्त ठेवावे कारण झाडाची वाढ खुप होते. मात्र हलक्या जमिनीकत तीतकी जोमदार वाढ होत नसल्यामुळे अंतर कमि ठेवावा. पेणी मे जुन मध्ये झाल्यास झाडांची वाढ जास्त होते अशा वळी दोन ओळीतील अंतर वाढवावे. पेरमीस उशीर होईल तसतशी वाढ संभवते. त्याप्रमाणे हे अंतर कमि करावे आणि बीयाण्याचे प्रमाण वाढवावे.

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: