नारळ लागवड

नारळ लागवड करण्यापूर्वी पूर्वनियोजन गरजेचे असते. ओलिताची सोय असल्यास सर्वच प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते. जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करणे आवश्‍यक आहे. रेताड जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता शेणखताचा वापर करून वाढवायला हवी, तर काळ्या चिकट जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळूचा, तसेच सेंद्रिय खतांचा वापर करायला हवा. शेताच्या बांधावरदेखील लागवड करता येते.

लागवड करताना सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन माडांतील अंतर. दोन माडांत योग्य अंतर असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. योग्य प्रमाणात उत्पादन मिळविण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 25 फूट (7.5 मी.) अंतर ठेवणे गरजेचे आहे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत लागवड करावयाची असल्यास 20 फुटांचे अंतर ठेवले तरी चालेल, तसेच ठेंगू जातीसाठीदेखील 20 फूट अंतर चालू शकते.

जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा खोदणे जरुरीचे असते. वरकस किंवा मुरूमयुक्त जमीन, तसेच जी जमीन प्रथमच लागवडीखाली आणली जात आहे अशा जमिनीत 1 ु 1 ु 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करणे आवश्‍यक असते. नारळाच्या अनेक जातींची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे, त्यामध्ये बाणवली, प्रताप; तर संकरित टी ु डी आणि डी ु टी या जाती आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बाणवली जातीची रोपे तयार केली जातात, तर काही प्रमाणात प्रताप आणि संकरित जातींची रोपे तयार केली जातात. रोपवाटिका पिशवीऐवजी जमिनीमध्ये केलेली असल्याने संशोधन केंद्रातील नारळ रोपे पावसाळा सुरू झाल्यानंतरच विक्रीसाठी उपलब्ध होतात.

नारळ रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार देणे आवश्‍यक असते आणि म्हणूनच त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव अगोदरपासूनच करणे आवश्‍यक आहे. रोप लावल्यानंतर पश्‍चिमेकडील वाऱ्याने ते हलू नये म्हणून रोपांच्या उंचीच्या दोन काठ्या 45 सें.मी. अंतरावर रोपांच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: