माती परीक्षण

जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन पिकांना त्यांच्या आवश्‍यकतेनुसार अतिरिक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा करता यावा यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यावरून पिकांना खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे सोपे होते; तसेच कोणत्याही फळझाडांची लागवड करण्यापूर्वी जमिनीची योग्यता तपासून पाहणे शक्‍य होते. त्यावरून ती जमीन फळपिकासाठी योग्य वा अयोग्य याचा अंदाज घेता येतो.
परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्यास टिकाव, कुदळ, सब्बल, फावडे, खुरपी किंवा स्क्रू-अगर (गिरमिट), घमेला, गोणपाट, पिशव्या आदी साहित्य लागते. पाण्याच्या पाटाजवळील जागा, विहिरीजवळील जागा, गुरे-ढोरे बसण्याची जागा, जुने बांध, कुंपणाजवळील जागा, नुकतीच खणलेली जागा, खतांच्या ढिगाऱ्याजवळील अथवा खड्ड्याजवळील जागेतून मातीचा नमुना घेऊ नये. भात, भुईमूग, ज्वारी, गहू इत्यादी पिकांसाठी 15 ते 20 सें.मी.; तसेच कपाशी, ऊस, केळीसाठी 30 सें.मी., तर फळझाडांसाठी बुंध्यापासून एक ते 1.5 फूट जागा सोडून बाहेरच्या परिघामधून 30 सें.मी. खोलीपर्यंतचा नमुना घ्यावा. नमुना उन्हाळ्यात 15 एप्रिल ते 15 मेपर्यंत घ्यावा. यामुळे माती परीक्षण अहवाल व त्याद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन पीक लागवडीपूर्वी मिळेल.

मातीचा नमुना घेताना संपूर्ण शेतीच्या मातीचा रंग, खोली, उतार याप्रमाणे भाग पाडावेत. हे भाग प्रत्येकी एक ते 1.5 हेक्‍टर क्षेत्राचे असावेत. प्रत्येक भागातील एक ते 1.5 हेक्‍टर क्षेत्रातून प्रत्येक क्षेत्रासाठी आठ ते दहा ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावर, वेगवेगळ्या दिशेने, म्हणजे थोडे सरळ, थोडे आडवे, थोडे तिरकस अशाप्रकारे स्थान निश्‍चित करावे व तेथे लाकडी खुंट्या ठोकाव्यात. नमुना घेताना त्या जागेवरील पालापाचोळा व काडीकचरा स्वच्छ करावा. नमुना घेताना त्या जागेवर 15 ते 20 सें.मी. खोलीचा व 15 ते 20 सें.मी. जमिनीवरील लांबीचा “व्ही’ इंग्रजी अक्षरासारखा खड्डा खोदावा. या खड्ड्यातून दोन्ही बाजूंनी 2.5 सें.मी. जाडीचा मातीचा थर पृष्ठभागापासून तळापर्यंत तिरकस दिशेने काढावा. साधारणपणे 2.5 सें.मी. जाडीची जमिनीच्या पृष्ठभागापासून ते खालील तळापर्यंतची माती नमुन्यासाठी दोन्ही बाजूंनी काढावी व गोणपाटावर जमा करावी. जमिनीच्या फरकानुसार प्रत्येक विभागातील आठ ते दहा नमुने घ्यावेत.

घेतलेले नमुने गोणपाटावर उत्तम प्रकारे एकत्रित करावेत. त्यातील लहान-मोठे दगड, पिकांची मुळे व त्यांचे अवशेष वेगळे करावेत. त्यानंतर त्या एकत्रित आठ ते दहा नमुन्यांच्या मातीचे चार समान भाग करावेत. गोणपाटाच्या चार ठिकाणी चारही नमुने समान भागात ठेवावेत. विरुद्ध बाजूचे समोरासमोरील कोणतेही दोन भाग एकत्रित करावेत. या एकत्रित भागामधून 500 ग्रॅम आदर्श नमुना कापडी पिशवीत ठेवावा व इतर राहिलेले विरुद्ध बाजूचे दोन भाग फेकून द्यावेत. शिल्लक राहिलेली माती कापडी पिशवीमध्ये भरावी.

पिशवीच्या लेबलवर नमुना क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, शेतकऱ्याचे पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, सर्व्हे नंबर, जमिनीचा उतार, पाण्याचा निचरा, पूर्वी घेतलेले पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीची खोली (सें.मी.), ओलित / कोरडवाहू, नमुना घेतलेल्या जमिनीचे प्रातिनिधिक क्षेत्र ही माहिती नोंदवावी.

 

मातपरीक्षणाचफायद


पीक पेरणीपूर्वी जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी पूर्ण माहिती होते.
त्यानुसार पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते.
अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रा देऊन अनावश्‍यक खर्च टाळता येतो.
जमिनीचा सामू नियंत्रित (6.5 ते 7.5) ठेवून पिकांची अन्नद्रव्यांची शोषणक्षमता वाढवता येते.
उत्तम प्रकारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येत असल्याने पीक संवर्धनावरील खर्च वाचतो. जमिनीचे गुणधर्म टिकवून ठेवण्यास मदत होते.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: