मुगाचे सुधारित वाण

१)कोपरगांवः

हा वाण फार जुना असला तरी चकाकणाच्या हिरव्या टपोर दाण्यामुळे तो अजूनही महाराष्टात खरीप लागवडीखाली लोकप्रिय आहे. ६० ते ६५ दिवसात तयार होतो. परंतु भूरी रोगास अति बळी पडतो. भूरी रोगाचा प्रादुर्भाव शेंगा धरण्यापूर्वी फुलो-याचे कालात झाल्यास .या वाणाच्या उत्पान्नावर फार अनिष्ट परिणाम होतो. सरासरी / हेक्टरी ८ ते १२ क्विंटल उत्पन्न मिळते.

२) टीपीए ७

हा वाण ६० ते ६५ दिवसांत तयार होतो. भूरी रोगास कमी बळी पडतो. दाणे चकाकणारे व हिरवे आहेत. परंतु दाण्याचा आकार बारीक आहे. १०० दाण्याचे वजन २.७५ ग्रॅमआहे. उत्पन्नामध्ये कोपरगांवपेक्षा सरस असून दर हेक्टरी सरासरी उत्पन्न १० ते १२ क्विंटल मिळते.

३) एकेएम८८०३

या वाणचे बहुतेक गुणधर्म कोपरगांव मुगाप्रमाणेच आहेत. फरक आहे तो.शेंगा आणि दाण्याचा कमी टपोरपणामध्ये, बूरी रोगाचे मध्यम प्रतिबंधकतेमध्ये आणि सुमारे २२ टक्के वाढीव सरासरी उत्पन्नामध्ये. खरीप हंगामात लागवडीत योग्य आहे. १०० दाण्याचे वजन सुमारे ३.५ ग्रॅम आहे. दर हेक्टरी सरसरी उत्पन्न १२ ते १५ क्विंटल मिळते.

४) फुल मूग २

हा वाणा ६५ ते ७० दिवसात तयार होतो. दाणे चकाकीदार हिरवे पंरतु बारीक (१०० दाण्याचे वजन २.९ ग्रॅम ) आहेत. उक्पनात कोपरगांव पेक्षा सरस आहे. )सुमारे १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर ) भूरी रोगास बळी पटतो.

५) बीएम् ४

हा वाण सुमारे ८० ते ९० दिवसात तयार होत असून त्याच्या शेंगा २ ते ३ वेळा तोडाव्या लागतात. दाणे बारीक (१०० दाण्याच्या वदन २.७ ग्रॅम) असून त्यांना चकाकी नाही. बूरी रोगास फार जास्त प्रमाणात बळी पडतो. सरसरी उत्पन्न १२ ते १५ क्विंटल हेक्टर मिळते.

६) टीएआरएम १८

महाराष्टात खरीप लागवडीसाठी प्रसारित झालेला हा पहिला भूरी रोगप्रतिबंधक वाण आहे. त्यवर भूरी रोग इतर वाणपेक्षा १५ ते २० दिवस उशिरा येतो. आणि त्याचा पानावर प्रसार फार हळु होतो. उत्पादनात तो सरस असून (सरासरी १२ ते १५ क्विंटल हेक्टर) भूरी रोगाचा उत्पन्नावर फारसा प्राभाव बोत नाही. १०० दाण्याचे वजन सुमारे ३.० ग्रॅम असुन त्यांना चकाकी आहे. हा वाण करपा रोगास देखाल प्रतिबंधक आहे. त्यमुळे खरीप लागवडीत योग्य. आहे.

७) पिकेव्ही मूग ८८०२

हा चमकदार हिरव्या टपोर दाण्याचा वाण कोपरगांव वाणाच्या तुलनेत सुमारे २६ टक्के जास्त उत्पन्न देतोव ६० ते ६५ दिवसात तयार होतो. रोपावस्थेत २०-२२ दिवसात पिकाची दोमदार वाढ होतो. त्यमुळे जमीन झाकल्यावर तणांवर मात करण्यास उपयुक्त आहे.

८) जळगांव ७८१

ही चमकदार टपोर दाण्याची दात खानदान आणि विदर्भात काङी भागांत पूर्वी लागवडीखाली होती. परंतु सध्या तिचे क्षेत्र आढळत नाही.

९) बीपीएमआर १४५

हा वाण भूरी रोग प्रतिबंधक आहे. १०० दाण्याचे वदन सुमारे ३.६ ते ३.८ ग्रॅम असून दाणे चमकदार आहेत.

१०) वैभव (फुले मूग ९३३९)

हा वाण भूरी रोग पर्तिबंधक आह. १०० दाण्याचे वदन सुमारे ३.६ ते ३.८ ग्रॅम आहे. दाणे चमकदार आहेत.

११) टीएआरएम २

हा वाण पूर्व विदर्भात रबी लागवडीसाठी प्रसारित करण्याची विद्यापिठाचे संशोधन समितीचे १९९१ मध्ये शिफारिस केली आहे. हा वाण भूरी रोग पर्तिबंधक आहे. रबी हंगामात त्याचे सरसरी उत्पन्न १२ क्विंटल प्रति हेक्टर आहे. दाणेे चमकदार हिरवे व लहान आकाराचे (१०० दाणे = २.७५ ग्रॅम ) आहेत.

१२)     हा वाण अखिल भारतीय स्तरावर विदर्भात आणि दक्षिण विभागात रबी लागवडीसाठी पर्सारित (१९९४) झाला तो भूरी रोगास प्रतिबंझक आहे. १०० दाण्याचे वजन सुमारे २.७ ग्रॅम असुन दाणे चकाकणारेआहेत. सरासरी उत्पन्न सुमारे १२-१३ क्विंटल / हेक्टर मिळते.

१३) पुरेसा वैशाखी

हा वाण उन्हाळी हंगामात परण्यास योग्य आहे. उन्हाळी हंगामात त्याचे दर हेक्टरी ६ ते ७ क्विंटल उत्पन्न मिळते. त्यचे दाणे मध्यम आकाराते व भुरकट हिरवे आहेत.

 

 

उडीदाचे सुधारित वाण:

१)नं. ५५

उडीदाची खरीप हंगामात पेरणीसाठी नागपूर येथून १९५६ साली प्रसारित झालेली ही जात चागंल्या टपोर दाण्याची आहे. तिचे १०० दाण्याच्या वजन कुमारे ४.५ ग्रॅम आहे. परिपक्क होण्यास ७५ ते ८० दिवसलागतात सरसरी उत्पन्न जर हेक्टरी ६ ते ७ क्विंटल मिळते. अलीकडे या वाणाचेक्षेत्र नगण्य झाले आहे.

 

२) टीएयू १

कानपूर येथून विकसित झालेली ही जात खरीप तसेत सरसरी दर किंवा उन्हाळी हंगामात चागंली येते. परिक्क होण्यास ६५ ते ७० दिवस लागतात तिचे सरसरी दर हेक्टरी उत्पन्न १४ किवंटल मिळते. तिची वाढ बुटकी आहे. दाण्याचा आकार बारीक आहे. (१०० दाण्याचे वजन ३.२ ग्रॅम)

 

३) टीएयू १

हा टपोर दाण्याचा (१०० दाणे वजन ४.४ ग्रॅम ) वाण खरीप हंगामात टी -९ प्रमाणेच लवकर (६५ ते ८० दिवसात ) तयार होत असून सरसरी उत्पन्न १४ क्विं./ हेक्टर मिळते. या वाणाच्या झाडाची वाढ टी- ९ पेक्षा बरीच जास्त होते. त्यमुळे गुरांकरिता कुटार पण जास्त मिळते. रोपावस्थेतील जोमदार वाढ होत अस्यामुळे तणामुले होणारा त्रास कमी होतो.

 

४) टीएयू २

हा टपोर दाण्याचा लवकर तयार होणारा वाण आहे. भरी खोल जमिनीत तो उत्पान्नात टीएयु-१ पेक्षा जास्त सरस आहे. हा ७० ते ८० दिवसांत तयार होतो. याचे दर हेक्टरी उत्पन्न १५-२० क्विंटल मिळते.

 

५) पीकेव्ही उडीद १५ (एकेयू)

हा टपोर दाण्याचा वाण आहे. (१०० दाण्याचे वजन सुमारे ४.३ ग्रॅम) खरीप हंगामात वाण आहे. तो सुमारे ७५ ते८० दिवसांत पक्क होत असून मूळकुजल्या रोगाला तसेच बुंध्याजवळ सडविण्याचा स्क्लेरोशियम बुरशीच्या रोगाला कमी बळी पडतो. सरसरी उत्पन्न सुमारे १४ ते १६ क्विं प्रति हेक्टर या वाणाची वाढ टीएयु-१ प्रमाणेच जोरदार असते त्यमुळे कुटारचे उत्पन्न देखील जास्त मिळते.

 

६) टीपीयू ४

हा वाण सन १९८९ साली अखिल भारतीय कडधान्य संशोधन प्रकल्पाद्वारे खरीप लागवडीसाठी मध्य विभागातासाठी म्हणजे महाराष्ट्र,गुजरात आणि मध्यप्रदेश टा राद्यासाठी प्रसारित करण्यात आला. याचे शंभर दाणयाचे वजन सुमारे ४.१ ग्रॅम आहे. सरसरी दर हेक्टरी उत्पादन सुमारे १४ क्विं. मिळते.

 

७) मेळघाट (एकेयू ४)

हा वाण पूर्व विदर्भात रबी लागवडीत करिता डॉ. पं. दे.कृ.वि.द्वारे १९९२ म्ध्ये प्रसारित करण्यात आला आहे. हा वाण भूरी रोगास पर्तिकारक असून टी-९ या वाणापेक्षा (रबी हंगामात ) ४० टक्के जास्त उत्पन्न देतो. (१३ ते १५ क्विंटल हेक्टर ) याच्या दाण्याचा आकार देखील टी-९ टपोरा आहे. (१०० वजन ५.० ग्रॅम)

उन्हाळी लागवडीकरिता उडीदाचा टी-९ हा वाण उत्कुष्ट आहे. उन्हाळी मूग, उडीदाला पाणचा ताण न पडल्यास विदर्भाचे उष्ण हवामाणात दर हेक्टरी सुमारे ७ ते १० क्विंटल इत्पादन  मिळते.

 

इतर राज्यात विकसित मूग आणि उडीदाच्या महाराष्टासाठी शिफारस केलेल्या वाणांची दिली आहे.

इतर राज्यात विकसित मूग / उडीदाचे महाराष्ट्राकरिता प्रसारित वाण

 

जातीचे नांव विकास करणारी

संस्था/प्रसारक वर्ष

विशेष गुणधर्म
मूगः
१) पुसा वैशाखी भा.कृअ. संस्था नवी दिल्ली १९७१ ६० ते ६५  दिवसात तयार होणारी, दाणा मध्यम जाट, दाण्याचा रंग मळकट  हिरवा, उम्हाळी लागवटीस योग्य, उत्पन्न ५ ते ६ क्विंटल हेक्टरी
२) पीएस १६ भा. कृ.अ. संस्था, नवी दिल्ली १९७९ ६० ते ६५ दिवसांत होणारी, दाणा हिरव्या रंगाचा, चकाकणारा, सरसरी फत्पन्न ६ ते ७ क्विंटल हेक्टरी
३)एमएल १३१ पंजाब कृषि विश्वविद्यालय, लुधियाना ८५ दिवसांत तयार होणारी, दाण्याचा रंग फिक्कट हिरवा तथा चकाकणारा, आकाराने लहान ( १०० दाण्याचे वजन २.९० ग्रॅम) केवटा रोगास प्रतिबंधक, सरसरी उत्पन्न. ६ ते ७ क्विंटर हेक्टरी
४) पुसा १०५ भा.कृ.अ.संस्था  नवी दिल्ली, १९८७ उभट वाढणारी, दाणा मध्यम जाड, (१०० दाण्याचे वजन ४ ग्रॅम) चकाकणारा, गर्द हिरवा, केवडा, भूरी व पानावरील करपा रोगास प्रतिकारक सरसरी उत्पन्न ६ ते ७  क्विंटल हेक्टर
५) एमएल ३३७ पंजाब कृषि विश्वविद्यालय, लुधियाना १९७५ ७२ दिवसात तयार होणारी, झाड उभट वाढणारे, दाण्याच्या आकार लहान (१०० दाण्याचे वजन ३ ग्रॅम ), रगं हिरवा, केवडा, भूरी व पानावरील ठिपक्याचा रोगास प्रतिबंधक, सरसरी उक्पन्न ६ ते ७ क्विंटल हेक्टर
६) पीडीएम ११ भारतीय कडधान्य संशोधन संस्था कानपुर, १९८७ ६० ते ७० दिवसात तयार होणारा, झाडाच्यां वाढीचा प्रकार उभट,  दाणा मध्यम जाड  (१०० दाणे – ३.५ ग्रॅम ),दाण्याचा रगं हिरवा,  भूरी रोगास प्रतिबंधक, पिवळा विशाणू पानावरील ठिपक्याचा रोगास प्रतिकारक. वसंत ऋतुत लागवडीसाठी, सरसरी,  उक्पन्न ६ ते ७ क्विंटल प्रति हेक्टर
७)एचयूएम १ बनारस हिंदू विश्व विद्यालय, वाराणसी, १९९९ वसंत ऋतुमध्ये पेरणीसाठी, कालावधी ८५ के ९० दिवस, केवडा रोग प्रतिबंधक, प्रति हेक्टरी उत्पान्न सुमारे ९ क्विंटल
८) पुसा ९५३१ भा. कृ. अ. संस्था  नवी दिल्ली,२००० उन्हाळी लागवडीसाठी, कालावधी ८० ते ८५ दिवस, केवडारोग प्रतिबंधक, सरासरी उत्पन्न सुमारे १० क्विंटल प्रति हेक्टर.

 

 

जातीचे नांव विकास करणारी

संस्था/प्रसारक वर्ष

विशेष गुणधर्म
उडीद
१) पंत यू ३० गोविंद वल्लभाई पंत कृषि

विश्वविद्यालय, पंत नगर, डि. नैनिताल

 
२) पीडीयू १ भारतीय कडधान्य संशोधन संस्था कानपूर १९९१ ६० जिवसात तयार होणारी, झाडाची वाढ उभट, दाण्याचा रंग काळा असून आकार मध्यम जाड (१०० दाणे – ३.७ ग्रॅम ) पिवळ्या विषाणूस  प्रतिबंधक, भूरी रोगास प्रतिकारक तसेच मावा व तुडतुडे या किडीस प्रतिबंधक आहे. सरसरी उत्पन्न ८ ते ९ क्विंटल पर्ति हेक्टर.
३) व्ही. बी. ३ वांम्बन  (तामिलनाडु) १९९५ कालावधी ७५ ते ८० दिवस, अधिक उत्पादन देणारी (सरसरी १२.२ क्विंटल प्रति हेक्टर )
३)          बरखा

(आरबीयू३८)

कृ. सं. के.,

बांसवाडा, राजस्थान १९९१

कालावधी ७५ ते ८० दिवस १०० दाण्याचे वजन ५.१ ग्रॅम सरसरी उत्पन्न ११ ते १२ क्विंटल प्रति हेक्टर स्थानिक वाणातून निवड पध्दतीले विकसित.

 


Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: