मृदाआरोग्य आणि सुपीकता व्यवस्थापनेवरील राष्ट्रीय प्रकल्प

उद्दिष्टे

ही योजना प्रामुख्याने खालील उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून आखण्यात आली आहे:

 • मृदेचे आरोग्य आणि उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी जैविक खतांच्यासोबतीनेच दुय्यम आणि सूक्ष्म पोषकघटकांचा समावेश असणा-या रासायनिक खतांच्या योग्य वापराद्वारे एकात्मिक पोषणघटक व्यवस्थापनेला प्रोत्साहन देणे.
 • मृदापरीक्षणाच्या सोयी अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देणे आणि मृदेची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आणि शेतक-यांना अधिक उत्पन्न मिळावे यासाठी शेतक-यांना मृदापरीक्षणाच्या आधारे योग्य सल्ला देणे.
 • हिरवे खत वापरुन मृदेचे आरोग्य सुधारणे.
 • आम्लारी/ अल्कली मृदांच्या पुनर्वापरासाठी आणि त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मृदासुधारणेस प्रोत्साहन देणे.
 • खतवापराची क्षमता वाढवण्यासाठी सूक्ष्म पोषणघटकांच्या वापराला प्रोत्साहन देणे.
 • प्रशिक्षण, प्रात्यक्षिके (खतांच्या योग्य वापराच्या प्रत्यक्ष शेतावरील प्रात्यक्षिकासह) यांच्याआधारे एसटीएल/ अतिरिक्त कर्मचारी/ शेतकरी यांची कौशल्ये व ज्ञान व क्षमता वाढवणे.
 • खते गुणवत्ता नियंत्रण सुविधा बळकट करुन खतांची गुणवत्ता कायम ठेवणे, अंमलबजावणी करणा-या राज्य सरकारी अधिका-यांना खते नियंत्रण आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण देणे.
 • एसटीएल/ खते परीक्षण प्रयोगशाळा आणि खतांच्या संतुलित वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक अशा विविध उपक्रमांची स्थापना करणे आणि त्यांना बळकट करण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे.

 

 

घटक

या योजनेत खालील घटक समाविष्ट आहेत
i. मृदा परीक्षण प्रयोगशाळा (एसटीएल) सक्षम करणे

 • ११ व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत ५०० नवीन मृदा परीक्षण प्रयोगशाळा उभारणे आणि सूक्ष्म पोषणघटकांच्या पृथक्करणासाठी २५० फिरत्या मृदा परीक्षण प्रयोगशाळा उभारणे.
 • सध्या अस्तित्वात असणा-या ३१५ एसटीएलना सूक्ष्म पोषणघटकांच्या पृथक्करणासाठी सक्षम करणे.
 • प्रशिक्षण, प्रात्यक्षिके यांच्याआधारे एसटीएल कर्मचारी/ अतिरिक्त कर्मचारी/ शेतकरी यांची कौशल्ये व ज्ञान व क्षमता वाढवणे.
 • खतांच्या प्रमाणबद्ध वापरासाठी प्रत्येक ठिकाणासाठी माहितीसाठा तयार करणे.
 • शेतांवर प्रात्यक्षिके देऊन एसटीएलनी प्रत्येकी १० गावे दत्तक घेणे.
 • ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच जीपीएस वापरुन जिल्हावार डिजिटल मृदा नकाशा तयार करणे आणि आयसीएआर/ राज्य कृषी विद्यापीठांमार्फत चालवली जाणारी सुपीकता देखरेख यंत्रणा तयार करणे.

ii. एकात्मिक पोषणघटक व्यवस्थापनाच्या वापराला प्रोत्साहन देणे

 • जैविक खतांच्या वापराला प्रोत्साहन देणे
 • आम्लारी मृदेमध्ये मृदासुधारणेस प्रोत्साहन देणे
 • सूक्ष्मपोषकघटकांच्या वापरास आणि वितरणास प्रोत्साहन देणे

iii. खते गुणवत्तानियंत्रक प्रयोगशाळांना मजबुती देणे

 • सध्या अस्तित्वात असणा-या ६३ राज्य खते गुणवत्तानियंत्रक प्रयोगशाळांना मजबुती देणे/ सक्षम बनवणे.
 • राज्य सरकारांद्वारा २० नव्या खते गुणवत्तानियंत्रक प्रयोगशाळा स्थापन करणे.
 • खाजगी/ सहकारी क्षेत्राअंतर्गत सल्ला देण्यासाठी ५० नव्या खतपरीक्षण प्रयोगशाळा उभारणे

 

 

आर्थिक तरतूद

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध घटकांसाठी ११ व्या पंचवार्षिक योजनेत रु. ४२९.८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

 

 

अंमलबजावणी करणारे प्राधिकरण

कृषी आणि सहकार खाते, कृषी मंत्रालय

 

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: