
thibak
संगणकीकृत ठिंबक सिंचन प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा तयार झाला. आता चिंता होती पैशाची, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ही सभासदांची ही चिंताही मिटवली. बँकेकडून सभासदानां एकरी 30 हजार रूपये कर्ज मिळालं. 1 कोटी 80 लाख रूपये मंजूर झालं. या गोटखिंडी गावाचं 1600 हेक्टर क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्राला हक्काचा पाणी मिळण्याच्या कामाला वेग आला.
पाण्याच्या अनियमिततेमुळे ऊस, सोयाबीन, द्राक्ष, ज्वारी यासारख्या पिकांचं अर्थशास्त्र बिघडलं होतं. ठिबक सिंचनानं ही समस्या सुटेल यावर गावकऱ्यांचा विश्वास बसला. ठिबक सिंचन प्रकल्पातून सभासदांना आता पिकनीहाय पाणी मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचंही मार्गदर्शन मिळालं.
संगणकीकृत ठिबक सिंचनासाठी 608 एकर क्षेत्राची चार भागात विभागणी केरण्यात आलीय.त्यातल्या वीस एकरला एक या प्रमाणं उपभाग तयार करण्यात आलेत. नदीवरून आणलेलं पाणी 10 लाख लिटरच्या स्टोरेज टँकमध्ये साठवलं जाणार आहे. याच ठिकाणी संपूर्ण पाण्याची
कंन्ट्रोल रूमही राहणार आहे. याच रुममधून संगणकाद्वारे पाणी आणि खत सोडण्याची यंत्रणा उभारली जाणार आहे. ही यंत्रणा उभारणीचं काम सध्या सूरू आहे.
याआधी पाटपाण्यानं दिवसाला 76 लाख लिटर पाण्यात 10 एकरचंही क्षेत्र भिजत नव्हतं. आता मात्र मोजून मापून पाणी मिळणार आहे. एकरी अडीच तासात साडेबारा हजार (१२,५००)लिटर पाणी दिलं जाणार आहे. सध्या तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात सात फूटाला एका लॅटरलचं नियोजन करण्यात आलंय.
याआधी गोटखिंडी गावात फारसं क्षेत्रं ठिबकखाली नव्हतं. पण आता शेतकऱ्यांना ठिबकचं महत्त्व कळलंय. संगणकीकृत ठिबक सिंचनामुळे शेतकऱ्यांना पिकानुसार पाणी मिळणार आहे. शिवाय या शेतकऱ्यांना ऊसाव्यतिरीक्त इतर पिकांचेही पर्याय आता खुले झालेय.
महादेव पुरवठा संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना या सिस्टिमसाठी एकरी 58,366 रूपये खर्च येणार आहे. त्यात एकरी 15,000 रूपये अनुदान सोय आहे. संपूर्णत: संगणीकृत यंत्रणेमुळे मजुर, खत, पाणी आणि वेळेची बचत होणार आहे, शिवाय पिकांना पुरेसं पाणी मिळाल्यानं उत्पादनातही वाढ होणार हे नक्की. हे झालं गोटखिंडी या गावचं आणि महादेव पाणीपुरवठा संस्थेचं पाणी नियोजन. पण आजही अशी अनेक गावं आणि अनेक संस्था आजही अवाजवी पाण्याचा वापर करत आहे. या गावांना आणि संस्थांना आपली जमिनी वाचवण्यासाठी आतातरी ठिबक सिंचनाकडं वळाय़लाच हवं.