पर्लस्पॉट माशाचे बीजोत्पादन

केरळमध्ये शेतीच्या बरोबरीने मत्स्यशेती हा पूरक उद्योग चांगल्या प्रकारे विकसित झाला आहे. त्यामुळे मत्स्यबीजांना देखील चांगली मागणी असते हे लक्षात घेऊन अथोली (जि. कोझिकोडे) येथील मनोज के. के. यांनी पर्लस्पॉट मत्स्यपालन आणि मत्स्यबीजोत्पादनातून चांगला रोजगार निर्माण केला आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, की पहिल्यांदा मी घराजवळील लहानशा शेततळ्यात टायगर कोळंबीच्या संवर्धनास सुरवात केली; परंतु “व्हाइट स्पॉट’ रोगाच्या प्रादुर्भावामुळे कोळंबीचे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे मी नीमखाऱ्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाकडे लक्ष केंद्रित केले. आमच्या तळ्यामध्ये पर्ल स्पॉट, मुलीट या जातीचे मासे चांगल्या प्रकारे वाढताना आढळले. या माशांना बाजारात चांगली मागणी असते. या मत्स्य संवर्धनासाठी पिरुवन्नामुझी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.

कृषी विज्ञान केंद्रातील मत्स्यशेती तज्ज्ञ डॉ. बी. प्रदीप म्हणाले, की कोळंबी बीजोत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक लागते; परंतु श्री. मनोज यांच्याकडे असलेले शेततळे लक्षात घेऊन आम्ही कोळंबी बीजोत्पादनासाठी लहान टाक्‍या तयार केल्या. आमच्या सल्ल्यानुसार श्री. मनोज यांनी प्रायोगिक तत्त्वावर कोळंबी बीजोत्पादनास सुरवात केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी कोळंबीच्या 5000 नवजात पिल्लांची विक्री केली.

बीजोत्पादनासाठी पिंजरा पद्धत
कोळंबी बीजोत्पादनानंतर श्री. मनोज यांनी पर्लस्पॉट जातीच्या बीजोत्पादनासाठी पिंजरा पद्धतीचा अवलंब केला आहे. हा पिंजरा त्यांनी प्लॅस्टिकच्या जाळीपासून तयार केला आहे. शेततळ्यातील पाण्यात हा पिंजरा तरंगण्यासाठी त्यांना चारही बाजूने पीव्हीसी पाइपचा सांगाडा तयार केला. परंतु पिंजरा तयार करण्यासाठी पीव्हीसी पाइपचा खर्च वाढला. हा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर केला. बूच लावलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या जाळीच्या पिंजऱ्याला वरच्या बाजूला लावल्या. त्यामुळे हा जाळीचा पिंजरा पाण्यात योग्य पद्धतीने तरंगू लागला. जाळीचा हा पिंजरा 3 मीटर ु 1 मीटर ु 1 मीटर आकाराचा आहे. पी.व्ही.सी. पाइपचा वापर करून हा पिंजरा बनविण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येतो. परंतु श्री. मनोज यांनी हा जाळीचा पिंजरा एक हजार रुपयांत तयार केला आहे. या पिंजऱ्याचा वापर करून दर हंगामात 20 हजार पर्लस्पॉट बोटुकलींची विक्री परिसरातील शेतकऱ्यांना केली. या कमी खर्चाच्या मत्स्यबीजोत्पादनातून त्यांना चांगला आर्थिक नफा मिळतो आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: