हवामानबदल वेलदोडा

हवामानबदल व तापमानवाढीमुळे जगभरात विविध समस्या निर्माण होताना दिसत असल्या तरी वेलदोडा पिकासाठी मात्र हा बदल फायदेशीर ठरत असल्याचे शास्त्रज्ञांनी अभ्यास करून तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल नुकताच “हवामान बदल’ विषयक दैनिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, वेलदोडा लागवड केलेल्या भागातील तापमानवाढीमुळे पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले. बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि सेंटर प्लॅंटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट, कयमकुलम (केरळ) येथील संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे गेल्या 17 वर्षांपासून यावर अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. त्यातील निष्कर्षानुसार हवामानबदल व तापमानवाढीचा वेलदोडा, कॉफी, चहा आणि काळी मिरी या पिकांवर चांगला परिणाम होत असल्याचे आढळले. रात्रीच्या किमान तापमानात झालेली वाढ आणि दिवसाचे कमाल तापमान वाढल्यामुळे वातावरणात एकप्रकारे ऊब निर्माण होऊन त्याचा फायदा वेलदोड्याच्या उत्पादनवाढीसाठी तसेच काहीसा कॉफीच्या उत्पादनासाठीही होत आहे. याबाबत केरळ येथील वेलदोडा संशोधन केंद्राचे सहायक प्राध्यापक मुथुसामी मुरुगन यांनी सांगितले, की वेलदोड्याच्या उत्पादनात वाढ होण्यास गेल्या शतकापासून सुरवात झाली. 1990 मध्ये प्रति हेक्‍टरी उत्पादन 84 किलो मिळत होते. 1994 मध्ये त्यात वाढ होऊन प्रति हेक्‍टरी 136 किलो उत्पादन मिळू लागले. 2007 मध्ये हे उत्पादन प्रति हेक्‍टरी 300 किलो मिळाले. एनजालानी, पीव्ही-1 या जाती उत्पादनवाढीसाठी फायदेशीर ठरल्या. चहा आणि काळी मिरीच्या उत्पादनवाढीसाठी अनेक वर्षे काम करूनही त्यावर उपाय मिळत नव्हता, मात्र हवामानबदल व तापमानवाढीमुळे ते शक्‍य झाले आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: