संत्रा


नागपूर सिडलेस संत्र्याच्या नविन वाणा मध्ये बिया नसल्यामुळे फळप्रक्रीयेसाठी योग्य आहे.

जंबेरीची परत लागवडीची मॉरटॅलीटी तपासण्यासाठी. मे व जून महिन्यामध्ये जमीन 45 दिवस तापू द्यावी त्यावरती मेटाटॉक्सीस M2 0.2% चे ऑगस्ट व डिसेंबर व जून मध्ये ड्रेंचींग करावे आणि त्याची फवारणी ऑक्टोबर, फेब्रुवारी आणि एप्रिल महिण्यात करण्याची शिफारस आहे.

नागपुरी संत्र्याच्या करपा नियंत्रमासाठी बावीस्टीन ०.१ टक्के फ्लान्टावॅक्स ०.० टक्के ब्लु कॉपर ०.२५टक्के, आणि कॅप्टन ०.३ टक्के फवारण्याकराव्यात आळवणीपेत्रा हे प्रभावी नियंत्रण आहे.

नागपुरी संत्र्यामध्ये ६ X ६ मिटर अंतरावर मध्यम भारी जमिनीत जास्त उत्पादनासाठी आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. (पं.दे.कृ.वि. अकोला)

नागपुरी संत्र्यामध्ये जास्त उत्पादनासाठी ८०० ग्रँम नत्र + ३०० ग्रँम स्फुरद + ६०० ग्रँम पालाश + ७.५ किलो निंबोळी पेंड प्रती झाड द्यावे. त्यापैकी निम्मे नत्र पुर्ण स्फुरद पालाश आणि निंबोली पेंड ताण संपल्यावर लगेच द्यावे. आणि राहीलेले अर्धे नत्र त्यानंतर दोन महीन्यांनी फळधारणेवेळी द्यावे. ५० किलो शेणखत प्रती झाड सुध्दा द्यावे. (पं.दे.कृ.वि. अकोला)

जमिनीमध्ये २०० ग्रँम झिंक सल्फेट नागपुरी संत्र्यास प्रती झाड दिल्यास उत्पादन वाढते (पं.दे.कृ.वि. अकोला)

संत्र्यामध्ये ७०० ग्रँम नत्र + ४५० ग्रँम स्फुरद + ४५० ग्रँम पालाश आणि ५० किलो शेणखत १० ते १२ वर्षे वयाच्या झाडास दिल्यास मध्यम भारी जमिनीत चांगले उत्पादन मिळते. (पं.दे.कृ.वि. अकोला)

अशक्त संत्र्यांच्या झाडांचे भरपूर आणि चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळण्यासाठी रुपांदर करताना २५ ते ४५ सें.मी. छाटणी जूनमध्ये करावी. त्यानंतर ६००:३००:६०० ग्रँम एन.पी.के. आणि ७.५ किलो निंबोळी पेंड तसेचं १० ग्रँम बाविस्टीन आणि मोनोक्रोटोफॉस १४ मिली प्रती १० लिटर पाण्यातून द्यावे. (पं.दे.कृ.वि. अकोला)

नागपूरी संत्र्यामध्ये चांगले आणि भरपूर उत्पादनासाठी ६०० ग्रँम नत्र ४०० ग्रँम स्फुरद, आणि ४०० ग्रँम पालाश झाडाच्या ताण संपल्यावर आणि ६०० ग्रँम नत्र त्यानंतर दोन महिन्यांनी द्यावे. (पं.दे.कृ.वि. अकोला)

संत्र्यामध्ये जास्त उत्पादनासाठी २०० ग्रँम झिंक सल्फेट प्रती झाड शिफारशीप्रमाणे खतासोबत दिल्यास उत्पादन वाढते. (पं.दे.कृ.वि. अकोला)

बोरँकॉल २५० ग्रँम प्रती झाड जुलै, ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये विभागून शेणखतासोबत नत्र आणि स्फुरद शिफारशीनुसार नागपुरी संत्र्यामध्ये दिल्यास मध्यम भारी जमिनीत १० वर्षापुढील झाडामध्ये उत्पादन वाढते. (पं.दे.कृ.वि. अकोला)

५० दिवसाच्या पाण्याचा ताण नागपूर संत्र्याचा झाडाला दिल्यास मध्यमा भारी जमिनीत मृग-बहारामध्ये भरपूर उत्पादन मिळते. (पं.दे.कृ.वि. अकोला)

ठिंबक सिंचन पध्दत ही नागपूर संत्र्यात जास्त उत्पादनासाठी तसेंच भरपूर रस आणि गोडी वाढविण्यासाठी शिफारस केली आहे. त्यामुळे ३० टक्के पाण्याची बचत होते. (पं.दे.कृ.वि. अकोला)

नागपुरी संत्रा मध्यम प्रकारच्या जमिनीत घेतल्यास आणि ४० टक्के जमिनीतील पाणी (६० मी.मी. सी.पी.ई.) दिल्यास चांगल्या प्रतीचे भरपूर उत्पादन मिळते. (पं.दे.कृ.वि. अकोला)

दुष्काळाच्या कालावधीत पाणी वाचवण्यासाठी संत्र्याच्या बागेत गव्हाचा काडाचे आच्छादन ५ सें.मी. जाडीचे केल्यास उपयोगी ठरते त्याशिवाय वाळलेली पाने सुध्दा वापरता येतात. (पं.दे.कृ.वि. अकोला)

ग्रामोक्झोन १.८ लिटर प्रती हेक्टर + २ टक्के युरीया १ महिन्याचा अंतराने ३ वेळा फवारल्यास नागपुरी संत्र्यामध्ये तणांचा बंदोबस्त होतो. (पं.दे.कृ.वि. अकोला)

डेलँपॉन ५ किलो प्रती हेक्टर आणि ५०० लिटर पाणी पहिल्या फवारणीनंतर १० दिवसानी आणि ग्रामोक्झोन व फर्नोक्झोन याचा दोन फवारण्या महिन्याच्या अंतराने केल्यास संत्र्यामधील तणांचा बंदोबस्त होतो. (पं.दे.कृ.वि. अकोला)

सर्वप्रकारच्या तणांच्या बंदोबस्तासाठी डायुरॉन २ ते ३ किलो प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यातून फवारावे. (पं.दे.कृ.वि. अकोला)

ग्लायसेल १ टक्के आणि युरीया २ टक्के (१० मिली ग्लायसेल आणि २० ग्रँम युरीया प्रती लिटर पाणी ) तण उगवल्यानंतर २५ दिवसांनी पावसाळी हंगामामध्ये फवारल्यास संत्र्यामधील तणांचा बंदोबस्त होतो. (पं.दे.कृ.वि. अकोला)

संत्र्यामधील फळगळ थांबविण्यासाठी २, ४-डी १० पी.पी.एम. आणि १ टक्का युरीया दोनदा जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यात फवारावे. जी.ए. १० पी.पी.एम. आणि एन.ए.ए. १० पी.पी.एम. ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये फवारल्यास १० ते ३० टक्के फळगळ थांबते (पं.दे.कृ.वि. अकोला)

नागपुरी संत्र्याचा डोळा जंबेरी किंवा रंगपूर लिंबावर भरल्यास आणि शेडनेटमध्ये (७० टक्के सावली) ठेवल्यास कलमांची वाढ चांगली होते. डोळा भरल्यानंतर लगेच फेब्रुवारीमध्ये कलमे शेडनेटमध्ये ठेवावी. आणि पाऊस सूरू होईपर्यंत बाहेर काढू नयेत. (पं.दे.कृ.वि. अकोला)

नविन लागवड केलेल्या संत्रा बागेत फळधारणेपुर्वी कापसाचे आंतरपिक घेऊ नये. (पं.दे.कृ.वि. अकोला)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: