आंबा


  1. विदर्भासाठी आंब्याचे वाण निलम, पायरी, आम्रपाली, राजापुरी, व नागीन या वाणांची शिफारस विदर्भासाठी जास्त ऊत्पादन देणारे व एकसारखे ऊत्पादन देणारे वाण आहेत.

  2. केशर आंबा फळे वर्तमान पत्राचा दुहेरी आवेष्टनात एक एक आंबा गुंडाळून ठेवला असता फळांचे आयुर्मान 15 दिवसांनी वाढते फळे एकसारखी पिकतात व गुणधर्म टिकून राहतात.

  3. हापूस आंब्याचे वाळवलेले तुकडे कमी खर्चामध्ये आणि चांगली चव टिकवून ठेवणयासाठी त्याचबरोबर त्यातील रासायनिक मात्रा टिकवून ठेवण्यासाठी एक भाग साखर व एक भाग फळाचे तुकडे वापरावेत.

  4. आंब्याचा रसाचा चांगल्या चवीसाठी व योग्य रासायनिक मात्रेसाठी व कमी खर्चात तयार करण्यासाठी हापूस आंब्याचा गर एक भाग व 0.30 भाग साखरेचे मिश्रण करावे त्यामुळे अँसीडीटी 0.5 पर्यत राखली जाते.

  5. हापुस आंब्यांच्या फांद्यांची एकसारखी वाढ होण्यासाठी तसेच एकसारखा मोहोर व फळे येण्यासाठी आणि तुडतुड्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक 3 वर्षानंतर विश्रांतीच्या काळामध्ये (ऑक्टो) साधी छाटणी करून घ्यावी. (50 cm) शेंड्याकडुन आडव्या फांद्यांची.

  6. हापुस आंब्याची फळधारणा व उत्पन्न वाढणपयासाठी दोन वेळा 2 % युरीया + 20 PPM NAA + 50 PPM सुक्ष्म अन्नद्रव्य किंवा 2 % युरीया + 5 PPM ट्राय कंटॅनॉल + 50 PPM सुक्ष्म अन्नद्रव्य हे वाटाण्याच्या दाण्याच्या आकाराचे आंबे लागल्यानंतर आणि त्यानंतर 10 दिवसांनी फवारावे.

  7. दापोली आंबा काढणी यंत्राचा वापर करून जास्तीत जास्त फळे काढता येतात. झेल्यांच्या साह्याने काढलेल्या फळांच्या वजनातील घटी पेक्षा कमी आढळली. हातांनी काढलेली फळे देठाजवळ कुजलेली आढळली.

 

कोकण कृषि विद्यापिठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथील संशोधनावरुन हापूस आंब्याची जुन्या तसेच उत्पादन कमी असलेल्या घनदाट झाडांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने खालील शिफारशी करण्यात येत आहेत.

 

–         आंब्याच्या जुन्या किंवा दाट वाढलेल्या झाडांच्या फांद्या जमिनीपासून ६ ते ७ मीटर उंचीवर किंवा शेंड्याकडून एक तृतीयांश भागावरील फांद्या छाटाव्यात. यामुळे सदर झाडास घुमटासारखा आकार येईल.

–         छाटणी मार्चच्या पहिल्या आठवड्यात करावी.

–         छाटलेल्या फांद्यावर (काप घेतलेल्या भागावर) बोर्डोपेस्ट लावावी. तसेच खोडावर कार्बारील किंवा एन्डोसल्फान या किटकनाशकाची भुकटी धुरळावी यामुळे खोड पोखरणा-या अळीचे नियंत्रण करता येईल. तसेच शेंडा पोखरणारी अळी, फुलकिडे आणि गाद माशीपासून संरक्षण करण्यासाठी शिफारस केलेल्या किटकनाशकांची वेळोवेळी फवारणी करावी.

–         शिफारस केलेल्या खतांची मात्रा पावसाळ्यात सुरवातीस द्यावी.

–         छाटणी केल्यानंतर पुढील वर्षाच्या जुलै-ऑगस्ट महिन्यात (साधारणतःछाटणी नंतर १६ महिन्यांनी ५ ते ७ ग्रँम (क्रियाशील घटक) पँक्लोब्युट्राझॉल शिफारशीप्रमाणे झाडाच्या बुंध्याभोवती मातीतून द्यावे.

 

मराठवाडा विभागातील कोरड्या हवामानात आंब्याची मृदकाष्ठ कलमे (Softwood graft) जगण्याचे प्रमाण वाढविण्याकरीता फळ संशोधन केंद्र, औरंगाबाद (म.कृ.वि.परभणी) येथे अभ्यास करण्यात आला. सदर प्रयोगाच्या निष्कर्षावरून खालील शिफारस करण्यात येत आहे.

–         नेत्रकाड्या झाडावर असतांनाच त्यांची पाने आठ दिवस अगोदर देठ ठेऊन काढावीत. अशा काड्या मृदकाष्ट कलमे तयार करण्यासाठी वापराव्यात.

–         बांधलेली कलमे लहान (२मी. बाय १मी. बाय १.५मी.) प्लँस्टीकगृहात ठेवल्यास कलमे जगण्याचे प्रमाण ५० टक्क्यावरून (तुल्यमात्रा) ९२ टक्क्यापर्यंत वाढते. प्लँस्टीकगृहात आर्द्रता ८० ते ९० टक्के टिकविणे गरजेचे आहे.

–         हापूस आंब्यामध्ये दरवर्षी लवकर आणि अधिक फळधारणा होण्यासाठी पँक्लोब्युट्राझोल ०.७५ ग्रँम प्रती किलो प्रती मीटर व्यास झाडाच्या (३ मिली कल्टार) पसा-याच्या व्यासाप्रमाणे १५ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान झाडाच्या बुंध्याभोवती प्रमाणित केलेल्या पध्दतीनुसार मातीतून द्यावे.

–         उपपर्वतीय जांभ्या खडकापासून बनलेल्या डोंगर उताराच्या उथळ ते मध्यम खोलीच्या जमिनीत ०.५ ते १.० मीटर उभ्या फरकावर ४५ बाय १५ सेमी. आकाराचे सलग समपातळी चर घेऊन चरात ५ ते ७ मीटर अंतरावर खड्ड्यात जागेवरच आंब्याचे मृदकाष्ठ पध्दतीने कलम करून पहिली तीन वर्षे मडका पध्दतीने पाणी द्यावे. आंब्याच्या दोन ओळीत पहिली सहा वर्षे भेंडी किंवा टोमँटो आणि त्यानंतर तीन वर्षे झेंडू, टोमँटो किंवा मिरची ही पिके घ्यावीत. (म.फु.कृ.वि.राहुरी)

–         हापूस आंब्यामध्ये दरवर्षी फळधारणा होण्यासाठी पंक्लोब्युट्रोझोल ०.७५ ग्रँम क्रीयाशील घटक मोहोर येण्यापुर्वी ९० ते १२० दिवस अगोदर (१५ जुलै ते १५ ऑगस्ट) या दरम्यान द्यावे.

–         देवगड भागातील जांभ्या कातळाच्या जमिनीत ५ मीटर बाय ५ मीटर अंतरावर सधन पध्दतीने हापूस आंब्याची लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. (को.कृ.वि.दापोली)

–         हापूस आंब्यामध्ये पुन्हा पुन्हा येणा-या मोहराचे संरक्षण करण्यासाठी पूर्ण मोहरानंतर ते फळे मोहरीच्या आकाराची असताना जीए-३ ची ५० पीपीएम तीव्रतेची फवारणी करण्याची शिफारस करण्यात येत आहे. (को.कृ.वि.दापोली)

–         हापूस आब्याच्या जातीमध्ये फळधारणा आणि फळांचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीकोनातून इतर परागदम जातींची उदा. गोवा मनकूर, रत्ना किंवा केशर या जातीच्या १० ते १५ टक्के कलमांची हापूस बागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. (को.कृ.वि.दापोली)

–         घनदाट झालेल्या हापूस आंबा बागांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी झाडाच्या मधल्या फांदीची पूर्ण तोड व घनदाट झालेल्या शेंड्याकडील फांद्यांची ३० ते ४० टक्के विरळणी पालवी किंवा मोहर सुप्तावस्थेत (ऑक्टोबर) असताना करावी व त्यानंतर जुलै, ऑगस्टमध्ये पँक्लोब्युट्रोझोलची मात्रा ०.७५ ग्रँम प्रती मिटर झाडाच्या व्यास या शिफारशीप्रमाणे द्यावी अशी शिफारस करण्यात येत आहे. (को.कृ.वि.दापोली)

–         नियमीत पालवी, मोहर आणि फळधारणा होण्यासाठी तसेच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जुन्या हापूस आंब्याच्या झाडांची दर चौथ्या वर्षी सौम्य छाटणी (५० सेमी. शेंड्याकडील फांद्या) ऑक्टोबर महिन्यात करावी. (डॉ.बा.सा.को.कृ.वि.दापोली)

–         आंब्याचे अधिक उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी राजापूरी आणि नागील सोबत निलम, पायरी, आम्रपाली ह्या जातींची विदर्भाकरीता लागवडीसाठी शिफारस करण्यात येते. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

–         विदर्भ विभागात आंबा पिकाच्या व्यापारीदृष्ट्या लागवडीसाठी केसर आणि दसेरी या जातीचा वापर करावा. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

 

विदर्भासाठी आंब्याचे वाण निलम, पायरी, आम्रपाली, राजापुरी, व नागीन या वाणांची शिफारस विदर्भासाठी जास्त ऊत्पादन देणारे व एकसारखे ऊत्पादन देणारे वाण आहेत.

केशर आंबा फळे वर्तमान पत्राचा दुहेरी आवेष्टनात एक एक आंबा गुंडाळून ठेवला असता फळांचे आयुर्मान 15 दिवसांनी वाढते फळे एकसारखी पिकतात व गुणधर्म टिकून राहतात.

हापूस आंब्याचे वाळवलेले तुकडे कमी खर्चामध्ये आणि चांगली चव टिकवून ठेवणयासाठी त्याचबरोबर त्यातील रासायनिक मात्रा टिकवून ठेवण्यासाठी एक भाग साखर व एक भाग फळाचे तुकडे वापरावेत.

आंब्याचा रसाचा चांगल्या चवीसाठी व योग्य रासायनिक मात्रेसाठी व कमी खर्चात तयार करण्यासाठी हापूस आंब्याचा गर एक भाग व 0.30 भाग साखरेचे मिश्रण करावे त्यामुळे अँसीडीटी 0.5 पर्यत राखली जाते.

हापुस आंब्यांच्या फांद्यांची एकसारखी वाढ होण्यासाठी तसेच एकसारखा मोहोर व फळे येण्यासाठी आणि तुडतुड्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक 3 वर्षानंतर विश्रांतीच्या काळामध्ये (ऑक्टो) साधी छाटणी करून घ्यावी. (50 cm) शेंड्याकडुन आडव्या फांद्यांची.

हापुस आंब्याची फळधारणा व उत्पन्न वाढणपयासाठी दोन वेळा 2 % युरीया + 20 PPM NAA + 50 PPM सुक्ष्म अन्नद्रव्य किंवा 2 % युरीया + 5 PPM ट्राय कंटॅनॉल + 50 PPM सुक्ष्म अन्नद्रव्य हे वाटाण्याच्या दाण्याच्या आकाराचे आंबे लागल्यानंतर आणि त्यानंतर 10 दिवसांनी फवारावे.

दापोली आंबा काढणी यंत्राचा वापर करून जास्तीत जास्त फळे काढता येतात. झेल्यांच्या साह्याने काढलेल्या फळांच्या वजनातील घटी पेक्षा कमी आढळली. हातांनी काढलेली फळे देठाजवळ कुजलेली आढळली.

हापूस आंब्यामध्ये लागवडीसाठी लँटेराईट जमिनीत देवगड तालुक्यात १ बाय १ बाय १ मिटर आकाराचा खड्डा घ्यावा. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

आंब्याचा सुधारीत जातीसाठी अभिवृध्दीसाठी जागेवरच मृद-काष्ठ पध्दतीने कलमे करावीत (म.फु.कृ.वि.राहुरी)

आंब्याची बाग तयार करताना जागेवरच कलम करण्यासाठी १४ ते १६ महिने वयाचे रोप जुलै ऑगस्टमध्ये निवडावे. (पं.दे.कृ.वि. अकोला)

एकसमान आणि चांगल्या वाढीचे खुंड मिळविण्यासाठी जागेवरच कलम करण्याचा पध्दतीत नुकत्याच उगवलेल्या कोया घ्याव्यात आणि फेब्रुवारी महीन्यामध्ये अकोला परीस्थीतीत कलमे करणे टाळावे. (पं.दे.कृ.वि. अकोला)

आंब्याचा कोय कलम पध्दतीतल जुलैच्या दुस-या आठवड्यात शक्यतो कलम करावे. (म.फु.कृ.वि.राहुरी)

आंब्यामध्ये कोयकलम पध्दत मे, जून. जुलैमध्ये आणि व्हेनीयर कलम तसेच मृदकाष्ठ कलम सप्टेंबर नंतर केल्यास आंब्याचे कोकणाचा परीस्थीतीत अभिवृध्दीतील यश जास्त मिळते.(बा.सा.को.कृ.वि.दापोली)

मृदूकाष्ठ कलम पध्दत ही आंब्यामध्ये सुचविलेली आणि वर्षभर करता येण्यासाऱखी कोकणातील पध्दत आहे. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

आंब्यामध्ये भेटकलम, कोयकलम, व्हेनियर कलम, मृदकाष्ठ कलम या पध्दतीमध्ये लागवडीनंतरचा झाडामध्ये उत्पादन वाढीत आणि झाडाच्या वाढीत कोणताही फरक आढळत नाही.(बा.सा.को.कृ.वि.दापोली)

सी.सी.टी. ४५ X ४५ सें.मी. अर्धा ते एक मिटर अंतरावर आणि आंब्याची लागवड ५ X ७ मिटर अंतरावर मृदकाष्ठ कलम पध्दतीने केल्यास त्यानंतर ३ वर्षे मडक्याच्या सहाय्याने पाणी दिल्यास तसेंच भेंडी किंवा टोमँटोचे सहा वर्षे आणि झेंडू, टोमँटो किंवा मिरचीचे नऊ वर्षापर्यंत उत्पादन घेता येते. (म.फु.कृ.वि.राहुरी)

आंब्यामध्ये फळांचा कळ्या तयार होण्यापुर्वी ९० ते १२० दिवस अगोदर (१५ जुलै ते १५ ऑगस्ट) पँक्लोब्युट्रॉझॉल ५ ग्रँम प्रती झाड जमिनीमध्ये द्यावे. त्यासाठी २० मि.ली. कल्टार घेऊन त्यात ३ लिटर पाणी घ्यावे. आणि ३० छिद्रामध्ये ३ ते ४ इंच खोल झाडाच्या बुंध्याशी खते दिलेल्याचा आतील बाजूस द्यावीत. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

आंब्याचा कोयकलमांची मर थांबविण्यासाठी २५० पी.पी.एम. पँक्लोब्यट्रॉझॉल नर्सरी अवस्थेमध्ये फुट आल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी फवारल्यास चांगले परीणाम मिळतात. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

जुनाट झाडांचे नुतनीकरण करताना मोठ्या प्रमाणात छाटणी करून पँक्लोब्युट्रॉझॉलच्या वापर केल्यास उत्पादन वाढते. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

आंब्याच्या हापूस जातीत ५० पी.पी.एम. जी.ए. फुलोरा आल्यानंतर फवारल्यास पुढचा फुलोरा येत नाही त्यामुळे उत्पादन चांगले मिळते. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

आंब्यामध्ये जास्त फळधारणेसाठी हापूस जातीत गोवा-मानकूर, रत्ना किंवा केशर १० ते १५ टक्के वेगवेगळ्या ठिकाणी लावावेत. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

एन.ए.ए. किंवा आय.ए.ए. २०० पी.पी.एम. १५ दिवसाचा अंतराने तीन वेळा रोपाच्या अवस्थेमध्ये फवारल्यास गुच्छाची विकृती आढळत नाही. (म.कृ.वि.परभणी)

जुनी झाडे वाचविण्यासाठी आंब्यामध्ये बगल कलम पध्दतीने अभिवृध्दी करावी. (म.कृ.वि.परभणी)

मृदूकाष्ठ कलम पध्दतीने केलेल्या कलमामध्ये य़श वाढविण्यासाठी मराठवाडा विभागात खालील शिफारशी करण्यात आल्या आहेत.

कलम फांदीवरील पाण्याचा देठ ठेवून पाने काढणे त्यानंतर आठ दिवसांनी कलम करणे.

जर कलमे पॉलीथीन पिशवित ठेवल्यास (२ X १ X १.५ मिटर) आणि आर्द्रता ८० ते ९० टक्के ठेवल्यास कलमे जगण्याचे प्रमाण ५० ते ९२ टक्के वाढते. (म.कृ.वि.परभणी)

जून्या कमी उत्पादन देणा-या झाडांचे हापूस जातीतील उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब कोकण कृषि विद्यापिठाने खालील शिफारशी केलेल्या आहेत.

1.                  जुन्या व घनदाट झाडाच्या फांद्या ६ ते ७ मिटर उंचीवर जमिनीपासून किंवा शेंड्यापासून ३३ टक्के छाटावेत त्यामुळे झाडाला घुमटासारखा आकार येईल.

2.                  मार्चच्या शेवटच्या आठवड्यात छाटणी करावी.

3.                  छाटलेल्या फांद्याच्या ठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी.

4.                  खोडकीडीच्या नियंत्रणासाठी कार्बारील किंवा एन्डोसल्फान फांद्यावर धुरळावी.

5.                  शिफारशीनुसार खतमात्रा पावसाळ्यात द्याव्यात छाटणीनंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात (१६ महिन्याने) ५ ते ७ ग्रँम पँक्लोब्युट्रॉझॉल मातीमध्ये मिसळावे. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

6.                  घनदाट लागवडीसाठी आणि तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी मधल्या फांद्या छाटाव्यात आणि इतर फांद्याच्या शेंड्यापासून ३० ते ४० टक्के फांद्या नवीन फुटी आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये छाटाव्यात त्यानंतर पँक्लोब्युट्रॉझॉल ०.७५ ग्रँम प्रती मिटर व्यासासाठी द्यावे. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

7.                  तोतापुरी जातीच्या आंब्याची कोय खुंटासाठी वापरू नये कारण त्यामध्ये कोय कीड असते. (बा.सा.को.कृ.वि.दापोली)

8.                  आंब्यावरील बांडगुळ काढल्यानंतर ते पुन्हा वाढू नये म्हणून फांदीच्या छाटलेल्या ठिकाणी १ टक्का ग्लायफोसेट फवारावे. त्यानंतर २ किंवा त्यापेक्षा जास्त फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने घ्याव्यात

Advertisements