ऊस कापणी, गांठी खुडण्यासाठी श्रम वाचविणारे उपकरण

उसासाठी वापरण्यात येणारी सध्याची पद्धत ही श्रमसाध्य, वेळ घेणारी आणि महाग पद्धत आहे. मध्यप्रदेशातील मेख खेड्यातील एक शेतकरी श्री.रोशनलाल विश्वकर्मा, यांना शेतीत बर्‍याच गंभीर संकटांना तोंड द्यावे लागले आहे आणि एक-एक रोपटे लावण्यासाठी गांठी खुडण्याच्या वैकल्पिक पध्‍दतीची ही मदत झाली नाही. त्यातच मोठ्या प्रमाणात रोपट्यांच्या उपलब्धतेची टंचाई देखील जाणवू लागली. त्यावेळी शेतकर्‍याने विचार केला कि उसाच्‍या रोपट्याची लागवड करण्याऐवजी बटाट्याच्या गाठींप्रमाणे उसाच्‍या गाठींचा वापर पेरणीकरीता करता येऊ शकतो.
सोपे आणि दक्ष : श्री. विश्वकर्मा यांचे ऊस कापणीचे उपकरण वापरतांना ऊस शेतकरी.”

कठिण श्रम

त्याने या विचारावर एका तज्ञाशी चर्चा केली. तज्ञांनी देखील उत्साहजनक प्रतिक्रिया देऊन ह्या विचाराला मूर्तरुप देण्यासाठी प्रोत्साहन दिले, मग शेतकर्‍याने आपल्या विचाराप्रमाणे काम सुरु केले आणि दोन वर्षाच्या कठिण परिश्रमानंतर त्याने एक साधेसे उपकरण तयार केले.
या उपकरणाचे नाव “उस गाठी खुडे” असे असून हे जमिनीवर स्थिरावलेले आहे, त्याला एक अर्धचंद्राकार चाकू असून ते शस्‍त्रक्रियेद्वारे एक उच्च प्रभावी पद्धतीने उसाची गाठ कापते. ह्यात उसाला काहीही इजा न होता ही गाठ सफाईने कापली जाते.
“ह्या उपकरणाच्या वापराने एक माणूस एका तासात सुमारे 100 गाठी खुडू शकतो,” असे श्री. विश्वकर्मा यांचे म्हणणे आहे.

 

 

हाताळणी क्षमता

ह्या उपकरणाचा वापर उसाचे लहान तुकडे करण्यासाठी देखील करता येतो. हे वापरण्यास सोपे असून हे उसाचे वेगवेगळे आकार आणि रुंदी हाताळू शकते.
पूर्वीच्‍या परंपरागत पद्धतीमुळे हातांवर आणि अंगठ्यावर बळ द्यावे लागायचे, यात तिरप्या कापणीने उसाची नासधूस देखील जास्त प्रमाणात व्हायची, आणि कडक उसांच्या गाठी खुडण्‍यास अक्षम ठरायचे.

 

 

यंत्राचा तपशील

“ऊस गाठी खुडे” ह्या उपकरणात सरफेस प्‍लेट, होल्डिंग स्टँड, रेसिप्रोकेटिंग असेंब्ली, एडजेस्टेबल स्क्रूने वरखाली होणारे एक लीव्‍हर, कनेक्‍टर, यू आकाराचा कापणीचा चाकू, ज्याला एका स्प्रिंगने बरोबर खाली खाचेत जाऊन कापणी करेल अशा प्रकारे बसविलेले असते. त्याच बरोबर त्याला गोल स्प्रिंग आणि खिळे लावलेले असतात ज्याने कापणी करतांना बळ लावता येते.
उपकरणाची किंमत 600 रु. असून, यावर पाच वर्षाची गॅरंटी दिलेली आहे. “हे उपकरण वापरणारा माणूस आरामात जमिनीवर बसून काम करु शकतो. डाव्या हाताने एकामागून एक असे ऊस उपकरणाला पुरवून उजव्या हाताने आरामात स्प्रिंग लावलेल्या हँडलच्या सहाय्याने गाठी कापण्‍याचे काम करु शकतो.

 

 

सफाईदार कापणी

अर्धचंद्राकार कापणी ब्लेडच्या सहाय्याने आणि पकड आणि कापणी या दोन पध्‍दती वापरून सफाईदार काप मिळतो. उपकरण चालविण्यासाठी वीज किंवा कोणत्याही प्रकारच्या तेलाची गरज लागत नाही, वजनाला अगदी कमी असल्यामुळे परिवहन देखील सोयीचे आहे. ह्या उपकरणाचा उपयोग फक्त गाठी खुडण्यासाठी नसून ते मोठ्या झाडांवरच्या गाठी खुडण्यासाठी देखील वापरता येते.
“मी ह्या उपकरणाची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की त्यात कोणत्याही आकाराचा ऊस बसविता येतो आणि हे वापरण्यासाठी जमिनीवर बसून आरामात काम करता येते. वेगवेगळ्या कापणी आकाराच्या पाहणीनंतर, मला मुख्यतः यू हा आकार एकाच झटक्यात गाठीच्या कापणी साठी योग्य वाटला, कारण त्यामुळे उसाच्या इतर भागास इजा न होता अगदी अलगदपणे स्प्रिंगच्‍या सहाय्याने गाठ खुडता येते,” असे ते म्हणतात.

 

 

टेबल टॉप आवृत्ति/स्‍वरूप

जमिनीवर आधारलेल्या उपकरणाऐवजी टेवलावर बसविता येणार्‍या उपकरणात त्याचा बदल करण्याच्या प्रयोगात, त्यांना असे लक्षात आले की अशा प्रकारच्‍या स्‍वरूपात जेव्हा वेगवेगळे वापरकर्ते हे उपकरण हाताळतील तेव्हां ऊस ठराविक उंचीवरच लावावा लागेल.
दुसरे म्हणजे, त्यांना असे आढळले की ग्रामीण लोकांना टेबलापेक्षा जमिनीवर बसून काम करणे जास्त सोयीचे वाटते.
त्यांनी घडी करून ठेवता येईल असे गाठी खुडे बनविण्यास सुरूवात केली जे स्थानिकांना  जास्त पसंत पडले नाही. म्हणून मग त्यांनी ते मॉडेल बनविणे थांबविले. आता ह्या प्रांतातील बरेच ऊस शेतकरी श्री. विश्वकर्मांचे उपकरण वापरुन वेळ व पैशाची बचत करीत आहेत.

 

 

जास्‍त माहितीसाठी संपर्क करा
श्री. रोशनलाल विश्वकर्मा,
पोस्ट मेख, गोटेगांव, नरसिंगपूर,
मध्य प्रदेश – 487002
मोबाईल क्र. 09300724197
ई-मेल : info@nifindia.org आणि bd@nifindia.org,
दूरध्वनी: : 079- 26732456 आणि 26732095.

 

उसासाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची..

पाण्याची उपलब्धता असल्यास हलक्‍या प्रतीच्या जमिनीपासून भारी ज मिनीपर्यंत सर्व प्रकारच्या जमिनीत उसाची लागण केली जाते. ज मिनीच्या प्रकारानुसार जमीन आणि पीक व्यवस्थापनामध्ये योग्य बदल केल्यास आणि जमिनीच्या सुपीकता पातळीमध्ये सुधारणा केल्यास प्रत्येक प्रकारच्या जमिनीत अधिकाधिक उत्पादकता घेणे शक्‍य आहे. जमिनीची सुपीकता शाश्‍वत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून खालील काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल.

अतिवृष्टीच्या काळात धूपविरोधक बाबींची पूर्तता नसल्यास सुपीक ज मिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जमिनीची धूप थांबविण्यासाठी शेताचे बांध चांगले मजबूत असावेत, जमिनीचा उतार पाहून उतारास आडवी मशागत करावी आणि सऱ्या पाडाव्यात. पिकांची पेरणी किंवा लागण ही उतारास आडवी असावी. शेताच्या बाजूने बांधावर वृक्ष लागवड असावी. बांध फुटू नयेत म्हणून बांधावर गवताची लागण करावी.

जमिनीचा कस कायम ठेवण्यासाठी उसापाठोपाठ ऊस घेण्याची पद्धत टाळावी. ऊस पिकाच्या अगोदर सोयाबीन, तूर, भुईमूग यांसारखी द्विदल वर्गीय पिके घ्यावीत. धैंचा किंवा ताग ही हिरवळीची पिके खरीप हंगामात घेऊन जमिनीत गाडावीत. बागायती भागात एका पाठोपाठ पिके घेतली जात असल्यामुळे जमिनीला उसंत मिळत नाही. त्यामुळे जमिनीला उसंत देणे हेही फायदेशीर ठरते. ऊस पिकाची मुळे खोलवर जात असल्यामुळे जमिनीची मशागत ही खोलवर होणे आवश्‍यक आहे. उभी आणि आडवी नांगरट खोल करून ढेकळे फ ोडून जमीन भुसभुशीत करावी. मशागतीची सर्व कामे वाफसा स्थितीत करावीत म्हणजे मशागत चांगली होते. जमिनीत ओलावा असताना ना ंगरट केल्यास ढेकळे निघतात. जमीन कडक बनते. योग्य पीक फ ेरपालट आणि सेंद्रिय खताचा वापर केल्यास मशागत चांगली होते आणि जमिनीचे भौतिक गुणधर्म योग्य स्थितीत राहतात.

एकात्मिक खत व्यवस्थापन
सध्या ऊस शेती बागायतदारांचा खत व्यवस्थापनाचा अभ्यास केला, तर बरेच शेतकरी सेंद्रिय खताचा कमी किंवा वापर न करता फक्त रासायनिक खते वापरतात. रासायनिक खतांचा संतुलित वापर होताना दिसत नाही. त्यामुळे रासायनिक खतांची उपयुक्तता अपेक्षेप्रमाणे होत नाही आणि पिकाच्या वाढीवर तितकासा परिणाम दिसून येत नाही. वातावरणातील अधिक तापमानामुळे जमिनीचे तापमानही वाढते आणि सेंद्रिय पदार्थांचे विघटन जोरात होते. त्यामुळे सेंद्रिय खते किंवा पिका ंचे अवशेष जमिनीत सतत गाडणे आवश्‍यक असते. ऊस लागवडीचया अगोदर हेक्‍टरी 25 टन खत जमिनीत मिसळणे आवश्‍यक आहे; परंतु शेणखताच्या अभावामुळे शेतकरी फक्त रासायनिक खतांचा वापर करतात. शेणखत किंवा कंपोस्ट योग्य प्र माणात उपलब्ध नसल्यास पर्यायी सेंद्रिय खते पेंडी, मासळी खत, हाडांच्या चुऱ्याचे खत यांचा वापर करावा. शेतातील उपलब्ध शेणखत, पिकांचे अवशेष यांपासून शेतावरच गांडूळ खत तयार करून ऊस लागवडीअगोदर सरीत चांगले मिसळावे. ऊस पिकाच्या अगोदर धैंचा किंवा तागासारखे हिरवळीचे पीक घेऊन जमिनीतून गाडल्यास हेक्‍टरी 20 ते 21 टन हिरवे सेंद्रिय पदार्थ मिसळले जातात. खोडवा पिकात पाचट न जाळता ते सरीमध्ये आच्छादन करावे म्हणजे पाचट शेतातच कुजल्यास हेक्‍टरी तीन ते चार टन सें द्रिय खत जमिनीत मिसळले जाते.

सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म अनुकूल राहतात. पाणीधारण क्षमता वाढते, पाण्याचा निचरा चांगला होतो. अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण कमी होते. सूक्ष्म जिवाणूंची संख्या व क्रिया वाढते. स्फुरद आणि सूक्ष्मद्रव्ये पिकास उपलब्ध होतात. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची योग्य संख्या आणि जिवाणूंची कार्यक्षमता यावर जैविक सुपीकता अवलंबून असते. जमिनीत अनेक प्रकारच्या जीव रासायनिक अभिक्रिया चालू असतात. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे विघटन करण्यासाठी वेगवेगळे सूक्ष्म जिवाणू कार्यरत असतात. जमिनीत सें द्रिय पदार्थ कुजविण्यासाठी लागणारे जिवाणू, स्फुरद विरघळविणारे जिवाणू, गंधक विघटन करणारे जिवाणू, नत्र स्थिर करणारे जिवाणू असे अनेक प्रकारचे उपयुक्त जिवाणूंचे कार्य जमिनीत चालू असते. अशा जिवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी जमिनीचे भौतिक गुणधर्म, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, आर्द्रता, तापमान यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची अनुकूलता असणे गरजेचे असते.

द्विदल वर्गीय पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर याद्वारे जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारतात. लवकर पक्व होणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस जाती, जमिनीची सुपीकता पातळी लक्षात घेता शिफारशीत असलेल्या खतमात्राऐवजी माती परीक्षण आणि ऊस वाणांची गरज लक्षात घेऊन खतांचा वापर करावा.

 

क्षारपड जमीन सुधारणा
जमिनीची निर्मिती होत असताना क्षारांची उत्पत्ती होत असते. पाण्याच्या माध्यमातून बरेच क्षार जमिनीत मिसळतात. त्यामुळे ज मिनीत साचवलेले क्षार निचऱ्यावाटे बाहेर जाणे महत्त्वाचे असते. निचरा मंद असल्यास क्षार जमिनीच्या खालच्या थरात साचले जातात व जमिनी क्षारयुक्त होतात. मंद निचरा असणाऱ्या जमिनीत सबसॉ यलरचा वापर करावा. सबसॉयलरमुळे जमिनीचा दीड ते दोन फूट खालचा तळी भरलेला घट्ट थर फोडला जातो. निचरा सुधारून वरच्या थरातील क्षार निचऱ्यावाटे निघून जातात. क्षारयुक्त-चोपण किंवा चोपण जमीन सुधारणा करण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागावरील किंवा पृष्ठभागांतर्गत निचराप्रणालीचा अवलंब करावा. मातीच्या कणांवरील सोडिअम मुक्त करण्यासाठी जिप्समची गरज माती परीक्षणानुसार आजमवावी आणि त्यानुसार शिफारशीत भूसुधारके जमिनीत मिसळावीत. भूसुधारकांच्या अभिक्रियेमुळे मुक्त झालेले सोडिअम क्षार चांगल्या पाण्याचा वापर करून निचरा व्यवस्थेद्वारे बाहेर काढावेत. अशा पद्धतीने जमिनीची सुधारणा करून जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढवता येते.

 

उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी कंपोस्ट जिवाणूंच्या वापराचे तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. शेतामध्ये कितीतरी सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात.
या सेंद्रिय पदार्थांपैकी काही पदार्थ थोडेफार कुजवून लगेच शेतात वापरता येतात. उसाचे पाचट, गव्हाचे काड, पिकांची धाटे, पालापाचोळा हे सेंद्रिय पदार्थ जरी कुजण्यास कठीण असले, तरी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केल्यास व कंपोस्ट जिवाणूंचा वापर केल्यास कुजण्याची क्रिया जलद होते आणि अन्नद्रव्यांनी युक्त असे कंपोस्ट खत लवकर उपलब्ध होते.

कंपोस्ट खताचा खड्डा आठ ते दहा मी. लांब, दोन ते तीन मी. रुंद व एक मीटर खोलीचा असावा. गरजेप्रमाणे त्यात वाढ करावी. जास्त पावसाच्या प्रदेशांत खड्ड्याऐवजी ढीग पद्धतीचा अवलंब करावा. पाचटाचे किंवा उपलब्ध कोणत्याही सेंद्रिय पदार्थाचे, काडीकच-याचे शक्‍य तेवढे बारीक तुकडे करावेत. त्यांचा खड्ड्यात वीतभर जाडीचा थर द्यावा.

एका ड्रममध्ये पाणी घेऊन त्यात प्रति टन कचऱ्यासाठी जनावरांचे 100 किलो शेण मिसळावे. त्याचप्रमाणे सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन करणारे जिवाणू प्रति टन कच-यास एक किलो या प्रमाणात शेणकाल्याच्या ड्रममध्ये टाकून चांगले मिसळून द्रावण तयार करून घ्यावे. दुसरा एक ड्रम घेऊन त्यात पुरेसे पाणी घ्यावे व त्यामध्ये आठ किलो युरिया व दहा किलो सुपर फॉस्फेट प्रति टन काडीकच-याच्या प्रमाणात घेऊन ड्रममधील पाण्यात विरघळवावे. ही दोन्ही द्रावणे खड्डे भरताना काडीकच-याच्या प्रत्येक थरावर सम प्रमाणात संपूर्ण खड्ड्यास पुरतील अशा बेताने टाकावीत.

प्रथम युरिया व सुपर फॉस्फेटचे द्रावण शिंपडावे आणि शेणकाला व जिवाणूंचे मिश्रण नंतर शिंपडावे. नंतर काडीकचरा ओला राहण्यासाठी आवश्‍यकतेनुसार जादा पाणी टाकावे, पण खड्ड्यात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.

अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा जमिनीवर 30 ते 60 सेंटिमीटर येईल इतका उंच भरावा. संपूर्ण खड्डा मातीने अगर शेणमातीने झाकून घ्यावा, म्हणजे खड्ड्यातील पाण्याचे बाष्प होऊन उडून जाणार नाही. दीड महिन्याच्या अंतराने खड्ड्याची चाळवणी करावी आणि आवश्‍यकता वाटल्यास पाणी टाकावे. या पद्धतीने चार ते साडेचार महिन्यांत उत्तम कंपोस्ट खत तयार होते.

उत्तम कुजलेल्या कंपोस्ट खतात नत्राचे प्रमाण 1 ते 1.5 टक्के, कर्ब व नत्राचे गुणोत्तर जवळ जवळ 20 : 1 राहते. उत्तम कुजलेले कंपोस्ट खत पिसासारखे मऊ दिसते. कंपोस्ट खताचा रंग तपकिरी, गर्द काळा असतो व त्यास मातकट वास येतो. बागायती एक एकरासाठी पाच टन, तर जिराइतात दोन ते तीन मेट्रिक टन कंपोस्ट खत आवश्‍यक असते.

 

 

उसाला द्या संतुलित खतमात्रा

उसाच्या उत्पादनवाढीसाठी योग्य जातींची निवड, त्याचबरोबरीने सुधारित पद्धतीने लागवड, सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा माती परीक्षणानुसार वापर, पाणी व्यवस्थापन आणि कीड, रोग नियंत्रणाबाबत वेळीच उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. ऊस उत्पादकता वाढविण्याबरोबर उसाच्या रसाची प्रत सुधारणे महत्त्वाचे आहे. पिकाच्या योग्य वाढीसाठी जमिनीची सुपीकता आणि खत व्यवस्थापनाकडे लक्ष दिल्यास अपेक्षित उत्पादन घेता येईल.

ऊस पीक परिस्थिती लक्षात घेता पीक फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांची कमतरता, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अवर्षण परिस्थिती किंवा पाण्याचा जास्त वापर आणि निचऱ्याच्या अभावामुळे क्षारयुक्त, चोपण जमिनीच्या वाढत्या समस्या इत्यादी बाबींमुळे ऊस उत्पादकता घटलेली दिसून येते. अशा परिस्थितीत जमिनींचा अभ्यास करून माती परीक्षणाच्या आधारे मृदा सुपीकतेची पातळी टिकविणे आणि क्षारयुक्त, क्षारयुक्त चोपण जमिनीची सुधारणा करणे आवश्‍यक आहे. जमिनीची मशागत चांगली होण्यासाठी उभी-आडवी नांगरट वाफसा असताना करावी, म्हणजे ढेकळे निघणार नाहीत. कुळवणीनंतर जमीन भुसभुशीत होईल. पूर्व मशागत खोल आणि चांगली झाल्यास मुळांची वाढ चांगली होऊन अन्नद्रव्ये शोषली जातात.

सेंद्रिय खतांचा वापर
ऊस पिकासाठी साधारणतः हेक्‍टरी 20 टन शेणखत आणि कंपोस्ट खताचा वापर करावा. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्‍टरी दहा टन शेणखत आणि रासायनिक खतांचा पहिला हप्ता सरीमध्ये मातीत मिसळावा. सेंद्रिय खतांमुळे जमिनीत हवा व पाणी यांचे संतुलन राखले जाते, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा सुधारतो, जिवाणूंची वाढ होते, रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होतो. अलीकडे बरेच शेतकरी सेंद्रिय खतांच्या कमतरतेमुळे रासायनिक खतांचा वापर करतात; परंतु शाश्‍वत ऊस उत्पादकतेसाठी हा पर्याय नाही. शेणखत किंवा कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास हिरवळीची खते, प्रेसमड केक, कोंबडी खत, बायोकंपोस्ट उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी, पाचटाचे आच्छादन अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात. जमिनीमध्ये साधारणपणे 0.75 ते 1.00 टक्का इतका सेंद्रिय कार्बन असणे आवश्‍यक आहे.

रासायनिक खतांचा वापर
ऊस शेतीसाठी एकूण जो खर्च येतो, त्यापैकी 30 ते 35 टक्के खर्च रासायनिक खतांसाठी होतो. म्हणून रासायनिक खते वापरण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कित्येक वेळा शास्त्रीय दृष्टिकोनातून रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खताचे योग्य प्रकारे नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये खताची योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, योग्य पद्धत इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

खतांची निवड
सध्या बाजारात बऱ्याच प्रकारची खते उपलब्ध आहेत. त्यापैकी त्यात असणारे अन्नघटक व त्यांचे प्रमाण याचा विचार करून योग्य ती खते निवडावीत. ऊस पिकास दुसऱ्या व तिसऱ्या खताच्या हप्त्याच्या वेळी फक्त नत्रयुक्त खते द्यावी लागतात. अशा वेळी मिश्र खते वापरण्याची गरज नाही. मिश्र खते ऊस लागवडीच्या वेळी आणि मोठ्या बांधणीच्या वेळी देणे योग्य आहे. दोन्हीही वेळेस मिश्र खतात अन्नद्रव्याचे प्रमाण योग्य नसल्यास युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश यांसारखी सरळ खते योग्य प्रमाणात मिसळून द्यावीत. जमीन खारवट चोपण किंवा चोपण असल्यास शक्‍यतो सरळ खतांची निवड करावी. याशिवाय माती परीक्षण अहवालानुसार ज्या आवश्‍यक अन्नघटकांची कमतरता असेल, अशा अन्नघटकांचा विचार करून खते निवडावीत.

खतांची मात्रा
शास्त्रीयदृष्ट्या मातीचे परीक्षण करून त्याप्रमाणे खतांच्या मात्रा ठरविणे फायद्याचे ठरते. त्यासाठी प्रातिनिधिक मातीचा नमुना घेऊन तज्ज्ञांकडून तपासून घ्यावा व पृथक्‍करण अहवालानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने खतांच्या मात्रा द्याव्यात. शिफारशित असलेल्या खतांच्या मात्रा या मध्यम ते भारी मगदुराच्या जमिनीसाठी केलेल्या आहेत; परंतु हलक्‍या प्रकारच्या जमिनीसाठी रासायनिक खते सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावी. ज्या ठिकाणी पिकांस पाण्याचा ताण पडतो, अशा जमिनीत पालाश खतांची मात्रा हेक्‍टरी 50 किलोने वाढवून द्यावी.
को 86032 या मध्यम-उशिरा पक्व होणाऱ्या ऊस जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खतांची मात्रा 25 टक्के वाढवून द्यावी. पश्‍चिम महाराष्ट्रातील चोपण जमिनीमध्ये पूर्वहंगामी उसाच्या अधिक उत्पादनासाठी व आर्थिक फायद्यासाठी ऊस पिकास 340 किलो नत्र व 170 किलो स्फुरद या मात्रेबरोबर हेक्‍टरी 225 किलो पोटॅश खतांची मात्रा सल्फेट ऑफ पोटॅश स्वरूपात देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

खते देण्याच्या पद्धती व काळजी
रासायनिक खतांची उपयुक्तता वाढविण्यासाठी खतांचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्‍यक आहे. मुख्यत्वे खते जमिनीवर पसरून देणे, जमिनीतून देणे व फवारा या तीन पद्धतीने दिली जातात. खते जमिनीत पेरून अथवा ठिबक सिंचनाने देणे फारच फायदेशीर ठरते. तुषार सिंचन पद्धतीनेही पाण्याबरोबर खते देता येतात.
श्ररासायनिक खते कुदळीने चळी घेऊन किंवा खत देण्याच्या अवजारांच्या साह्याने द्यावीत. खत दिल्यानंतर चळी मातीने बुजवून घ्याव्यात, म्हणजे युरियासारखी खते मातीच्या ओल्या भागाबरोबर मिसळतील. युरियाचे विघटन होऊन अमोनिअम नत्रामध्ये रूपांतर होते व अमोनिअम नत्र मातीच्या कणाशी घट्ट धरला जातो व हवेद्वारे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.
श्रउभ्या पिकात खते देताना जमिनीत थोडासा ओलावा असावा. रासायनिक खते दिल्यानंतर लगेच पाणी देऊ नये. शक्‍यतो दुसऱ्या दिवशी हलके पाणी द्यावे. कारण युरियासारखी खते पाण्यात विरघळून निचऱ्यावाटे वाहून जातात किंवा सरीच्या एका कडेला जमा होतात.
श्रयुरियातील नत्राची पिकास उपयुक्तता वाढविण्यासाठी निचऱ्यावाटे किंवा हवेद्वारे होणारे नत्राचे नुकसान कमी करण्यासाठी युरिया व निंबोळी पेंडीची भुकटी 6ः1 प्रमाणात मिसळावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे व मिश्रण चांगले घुसळून घ्यावे. युरियाच्या कणांवर निंबोळी पेंडीचे आवरण तयार होते व त्यामध्ये असलेल्या निमीन, निंबीबीन व निबीनीन या घटकद्रव्यांमुळे नत्रीकरण मंद गतीने होते व त्यातील नत्र पिकास योग्य प्रमाणात हळूहळू उपलब्ध होते. या पद्धतीने युरिया (नत्र) दिल्यास युरियाच्या वापरात 25 टक्के बचत करता येते.
श्रस्फुरद युक्त खतातील स्फुरद, नत्रासारखे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करत नाहीत कारण जमिनीत घातल्यानंतर स्फुरद लगेच मातीच्या कणांशी घट्ट चिकटून बसतो व जमिनीतील चुना, लोह याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन स्फुरदाची काही अविद्राव्य संयुगे तयार होतात आणि स्फुरद पिकास उपलब्ध होत नाही. त्यासाठी स्फुरदयुक्त खते मुळाच्या सान्निध्यात किंवा कंपोस्ट खतात मिसळून द्यावीत. एकरी चार किलो स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खताचा वापर केल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.
श्रहिरवळीचे पीक घेऊन ऊस लागवड करावयाची असल्यास उसास देण्यात येणारा स्फुरद खताचा पहिला हप्ता हिरवळीच्या पिकास द्यावा. त्या वेळी उसाची लागवड करताना स्फुरद खत देण्याची गरज नाही.
श्रस्फुरदयुक्त खतांप्रमाणे पालाशयुक्त खते पाण्याच्या निचऱ्यावाटे वाहून जाण्याचा धोका कमी असतो. ही खतेदेखील सरीमध्ये रांगोळी पद्धतीने द्यावीत. शक्‍यतो ही खते नत्रयुक्त खताबरोबर दिल्यास चांगला परिणाम होतो.