कापूस वाणाचा लागवड

कोरडवाहू शेतीमध्ये देशी कापूस वाणाचा लागवड खर्च अमेरीकन संकरीत आणि सुधारीत वाणापेक्षा कमी व आर्थिक मिळकत अधिक असल्यामुळे देशी सुधारीत वाणाच्या एकेए-५ व एकेए-७ लागवडीस प्राधान्य देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे.
-कपाशीचे लागणीसाठी २२ ते २५ सें.मी. खोल नांगरट, २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन हेक्टरी २० ते २५ गाड्या कंपोस्ट खत जमिनीत मिसळून जमीन तयार ठेवा.
-बागायती कपाशीसाठी एल.आर.एच. ५१६६ किंवा जे.एल.एच. १६८ या सुधारीत वाणांची निवड करा. तसेंच संकरीत वाणापैकी फुले ४९२, एन.एच.एच.४४, फुले-३८८ संकर ६ किंवा संकर १० यापैकी संकरीत वाणांची निवड करावी.
-बागायती कापसाची लागवड १० ते २५ मार्च या कालावधीत करावी.
-उगवण चांगली होण्यासाठी बियाणे ६ तास पाण्यात भिजवावे. तसेंच नंतर ते १ टक्का सक्सिनीक आम्लात ६ तास बुडवावे. त्यामुळे चांगली व लवकर उगवण होणेस मदत होते.
-लागणीसाठी सुधारीत वाणाचे हेक्टरी ८ ते १० किलो आणि संकरीत वाणांचे २.५ ते ३ किलो बियाणे वापरा.
-लागणीचे अंतर खालीलप्रमाणे ठेवा.
-संकरीत जाती – मध्यम जमिन – ९० बाय ९० सें.मी.
-भारी जमिन – १२० बाय ९० सें.मी.
-सुधारीत वाण – एल.आर.ए. ५१६६ – ९० बाय ९० सें.मी.
-पेरणीपुर्वी अँझोटोबँक्टर जीवाणूची २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर प्रक्रीया करावी.
-पेरणीपूर्वी हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत अथवा कंपोस्ट खत टाकावे.
-बागायती कापसात हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. त्यापैकी लागवडीचेवेळी हेक्टरी २० किलो नत्र (४५ किलो युरीया) संपूर्ण स्फुरद (३१५ किलो सिगल सुपर फॉस्फेट) व संपूर्ण पालाश (८५ किलो म्युरेट ऑफ पोटँश) द्यावे. पिकास पाने येणेच्या वेळेस हेक्टरी ४० किलो नत्र (९० किलो युरीया) व पुन्हा फुले येणेच्या वेळेस हेक्टरी ४० किलो नत्र (९० किलो युरीया) द्यावे.

– कापसावरील एकात्मिक किड नियंत्रण पध्दत –
कापसाचे रोग व किडीमुळे प्रचंड नुकसान होते. तसेंच किड व रोग नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांवर पैसा खर्च होतो ते टाळणेसाठी कापसावर खालील एकात्मिक किड नियंत्रण पध्दतीचा अवलंब करावा.
-एका गावात एका जातीची संकरीत वाणांची लागवड करावी.
-बीजप्रक्रीया इमिडँक्लोप्रीड १० ग्रँम प्रती किलो बियाणे
-एका आठवड्यात सर्वांनी लागवड करावी.
-लागवडी अगोदर नत्राची अर्धी मात्रा व संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे.
-मका व चवळी शेताच्या कडेला मिश्र पीक घ्यावे, त्यासाठी शेताच्या सभोवताली एक ओळ मक्याची टोकावी, दोन मक्याच झाडामध्ये एक बी चवळीचे टोकावे.
-पक्ष्यांना बसणेसाठी प्रत्येकी ९ ते १० कपाशी ओळीमध्ये एक ओळ राळा किंवा ज्वारी घ्यावी.
-पीक ६०-६५ दिवसांचे झाले किंवा पाते येणेस सुरूवात होताच शेतात प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत, सापळ्यामध्ये हिरव्या अळीचे पतंग दिसल्यास परोपजीवी किटक ट्रायकोग्रामा चिलोनीस प्रति हेक्टरी दिड लाख याप्रमाणे १५ दिवसाचे अंतराने दोन वेळा सोडावेत.
-ठिपक्याची बोंडअळी व अमेरीकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के दोन ते तीन वेळा १५ दिवसाचे अंतराने फवारावे. अमेरीकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. विषाणू याची ५०० रोगग्रस्त अळ्या प्रती हेक्टर या प्रमाणात एक फवारणी करावी.
-जर बोंडअळ्याच्या नुकसानीचे प्रमाण १० टक्के पेक्षा जास्त (१० टक्के कळ्यांचे, फुलांचे, बोंडाचे, पात्यांचे नुकसान) गेल्यास एन्डोसल्फान ०.०५ टक्के कार्बारील ०.२ टक्के क्विनॉलफॉस ०.०५ टक्के यापैकी एका किटकनाशकाची एक फवारणी करावी.

कपाशी


कपाशी हे विदर्भातील एकमेव नगदी पीक असून पीकाखाली सुमारे १३ लाख हेक्टर क्षेत्र आहे. परंतु सरासरी उत्पादकता ३०० किलो रुई /हेक्टर ही भारताच्या सरासरी पेक्षा (५०३ किलो रूई/हेक्टर ) तुलनात्मकरित्या कमी आहे.अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारीत लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल.

कापूस (गॉसीपीयम एसपीपी) सिंथेटीक फायबर्सचा उपयोग वाढत असून देखील मनुष्याद्वारे उपयोग करण्यात येणारे मुख्य टेक्सटाईल फायबर आहे. कापूस 2000 पेक्षा अधिक वर्षां पासून कपडे बनविण्याकरिता भारतामध्ये पिकविण्यात येतो आहे. कापूस पिकविण्या करिता योग्य हवामान स्थिति सोबत हे क्षेत्र अनुकूल आहे, जेथे तापमान 260 सेल्सीयस पेक्षा कमी नाही आहे व पावसाचे प्रमाण 1200 ते 1500 मिमी. आहे. कापूस पीक जड माती व पीएच 5.2 ते 8+/ च्या श्रेणी सोबत माफक प्रमाणात सुपीक जमीनीवर चांगले जोमाने वाढते. चांगली कापूस माती चिकण माती व रेताड चिकणमातीचे मिश्रण आहे, ज्यामध्ये कार्बनी पदार्थाची एक उचित मात्रा व उपलब्ध नायट्रोजन, फॉस्फोरस व पोटॅशची माफक प्रमाणात मात्राचा अंतर्भाव आहे. कापूस युक्तता विश्लेषम निर्दिष्ट करते की, 59% योग्य क्षेत्रा मधील जवळपास 52.8% कापसा करिता उच्चतम योग्य आहे, 6.2% किरकोळ प्रमाणात योग्य आहे. जवळपास 27.2% क्षेत्र जिल्ह्यामध्ये योग्य (अस्थायी) नाही आहे व 8.4% क्षेत्र योग्य (स्थायी) नाही आहे.