तुरीमधील तणनियंत्रण

तूर हे जास्त कालावधीचे पीक आहे, तसेच सुरवातीला पिकाची वाढ हळू होत असते, त्यामुळे सुरवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो. तूर पिकासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी म्हणजे अशा कालावधीत जास्त तणनियं त्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. हा कालावधी सुरवातीचे 20 ते 60 दिवस असतो. अनियंत्रित तणांच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 50 ते 55 टक्के घट येऊ शकते.
तुरीतील तणनियंत्रणाकरिता पेरणी नंतर तीन, सहा व नऊ आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी. सध्या मजुरांची अनुपलब्धता व वाढते मजुरी दर यामुळे पूर्णतः कोळपणी व खुरपणीद्वारे तणनियंत्रण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे मशागतीय उपचारांच्या जोडीला तणनाशकांचा वापर करून तणनियंत्रण केल्यास ते अधिक प्रभावी व आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरेल.
तूर पिकातील तणनियंत्रण : पेरणी नंतर, परंतु उगवणीपूर्वी पेंन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) तणनाशक 2.5 ते 3.3 लिटर (0.75 ते 1.0 किलो क्रियाशील घटक) प्रति हेक्‍टरी किंवा पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी मेटोलॅक्‍लोर (50 ई.सी.) दोन किलो प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या पीक उगवणीपूर्वी तणनाशकाच्या जोडीला पेरणी नंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी जेणेकरून एकात्मिकरीत्या तणनियंत्रण साधले जाईल.
सोयाबीनमधील तणनियंत्रण
पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी सुरवातीचे 15 ते 45 दिवस एवढा असतो. या कालावधीत पीक तणमुक्त ठेवणे आवश्‍यक असते. अनियंत्रित तणां च्या वाढीमुळे पीक उत्पादनात 40-53 टक्के एवढी घट येऊ शकते. सोयाबीन मधील तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर, परंतु पीक उगवणीपूर्वी ऍलॅक्‍लोर (50 ई.सी.) चार लि. प्रति हेक्‍टरी (दोन किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) 750 ते 1000 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी (40 मि.लि. प्रती 10 लिटर पाणी) त्याबरोबर पीक पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.
किंवा
पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी पेंन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) 2.5 ते 3.3 लि. प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी (0.75 ते एक किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी. सोयाबीनमधील रुंद पानांच्या तणाच्या नियं त्रणाकरिता पीक पेरणीनंतर 15-20 दिवसांनी उभ्या पिकामध्ये इमॅझीथॅपायर (10 ई.सी.) 0.75 ते 1 लिटर प्रति हेक्‍टरी (75 ते 100 मि.लि. क्रियाशील घटक प्र ति हेक्‍टरी) 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

भुईमुगातील तणनियंत्रण
भुईमुगासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पेरणीनंतरचे 15-45 दिवस एवढा आहे. अनियंत्रित तणांच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 4045 टक्के एवढी घट येते. भुईमुगातील तणनियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी पेन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) 2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (0.75 ते 1.00 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) व त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी कोळपणी व खुरपणी करावी. भुईमुगा मधील रुंद पानांच्या तणाच्या नियंत्रणाकरिता पीक पेरणीनंतर 15-20 दिवसांनी उभ्या पिकामध्ये इमॅझीथॅपायर (10 ई.सी.) 0.75 ते 1 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

सूर्यफुलातील तणनियंत्रण
या पिकासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पीक पेरणीनंतर 15-45 दिवस एवढा आहे. अनियंत्रित तणामुळे उत्पादनात 30-33 टक्के एवढी घट येऊ शकते. सूर्यफुलातील तणनियंत्रणाकरिता पीक उगवणीपूर्वी ऑक्‍सिफ्लोरफेन (23.5 ई.सी.) 425 मि.लि. प्रति हेक्‍टरी (दहा मि.लि. क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे (4.25 मि.लि. प्रति दहा लिटर पाणी) व त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी कोळपणी व खुरपणी करावी.
किंवा
पीक उगवणीपूर्वी पॅन्डीमिथॅलीन (30 ई.सी. )2.5 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (0.75 लिटर क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) व पेरणीनंतर सहा आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी.

तीळ पिकातील तणनियंत्रण
तिळातील तणनियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी ऍलॅक्‍लोर (50 ई.सी.) चार लिटर प्रति हेक्‍टरी (दोन लिटर क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी) 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व त्याबरोबर पेरणीनंतर सहा आठवड्यांनी कोळपणी व खुरपणी करावी.

उडदामधील तणनियंत्रण
या पिकाचा पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी सुरवातीचे 15 ते 30 दिवस एवढा आहे. अनियंत्रित तणांच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 25-30 टक्के घट येऊ शकते. पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी ऑक्‍सिप्लोरफेन (23.5 ई.सी.) 425 मि. लि. प्रति हेक्‍टरी 450 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच पाच आठवड्यांनी खुरपणी व कोळपणी करावी.

मुगातील तणनियंत्रण
मुगासाठी पीक-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी सुरवातीचे 15 ते 30 दिवस एवढा असून, अनियंत्रित तणाच्या वाढीमुळे पीक उत्पादनात 25-30 टक्के घट येऊ शकते. मुगातील तणनियंत्रणासाठी पीक उगवणीपूर्वी पेंन्डीमिथॅलीन (30 ई.सी.) 2.5 ते 3.3 लिटर प्रति हेक्‍टरी 750 ते 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

लिंबाच्या झाडांना खत व्यवस्थापन

लिंबाच्या झाडांना त्यांच्या वयोमानानुसार योग्य प्रमाणात खतांच्या मात्रा दिलया, तर चांगले उत्पादन मिळते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शिफारशीनुसार चार वर्षे वयाच्या लिंबाच्या प्रत्येक झाडाला जून महिन्यात 15 किलो शेणखत, दोन किलो सुफला, 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश, 15 किलो निंबोळी पेंड देणे गरजेचे आहे; तसेच सप्टेंबर महिन्यात 150 ग्रॅम आणि जानेवारीत 150 ग्रॅम नत्र द्यावे. या खतांव्यतिरिक्त 500 ग्रॅम व्हॅम अधिक 100 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू अधिक 100 ग्रॅम ऍझोस्पिरीलम अधिक 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम द्यावे.

सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास 0.5 टक्के झिंक सल्फेट, 0.5 टक्के मॅग्नेशिअम सल्फेट, 0.5 टक्के मॅंगनीज सल्फेट, 0.25 टक्के फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे आवश्‍यक आहे.

भुईमूग लागवड

रुंद वरंबे सरी या पद्धतीने भुईमूग लागवड करताना पूर्वमशागत करून रान भुसभुशीत झाल्यानंतर रुंद वरंबे व सरी तयार करण्यासाठी शेतात 150 सें.मी. अंतरावर खुणा करून, रेषा मारून आखणी करावी. पुन्हा रेषा मारलेल्या ठिकाणी 30 सें.मी. रुंदीचा पाट पाडल्यास 120 सें.मी. रुंदीचे व 15-20 सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार होतील. हे वाफे प्रथम पाणी देऊन पूर्ण भिजवून वाफस्यावर आल्यावर त्यावर 30 सें.मी. रुंदीच्या चार ओळी बसवून अशा ओळींत दोन रोपांतील अंतर दहा सें.मी. ठेवून बियाण्याची टोकण करावी.

प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करावयाचा झाल्यास काळा किंवा पांढरा, सात मायक्रॉन जाडीचा, टोकण अंतरानुसार छिद्र पाडलेला प्लॅस्टिक कागद वाफ्याच्या आकारानुसार गादी वाफ्यावर अंथरूण, दोन्ही बाजूने वाफ्याच्या बगलेत माती घुसडून देऊन छिद्र असलेल्या ठिकाणी एक एक शेंगदाणा टोकावा. या तंत्राचा वापर केल्यास पाण्याचा निचरा चांगला होऊन जमिनीत हवा व पाणी यांचे योग्य प्रमाण साध्य करता येते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन, भरपूर फुलधारणा होऊन, भरपूर आऱ्या सहजतेने जमिनीत घुसून, शेंगधारणा वाढून शेंगा चांगल्या पोसतात. अशा रुंद वरंब्यावरील मधल्या दोन ओळींना पुरेसे पाणी मिळत नसेल, तर वाफ्याची रुंदी 120 सें.मी. ऐवजी 90 सें.मी. ठेवावी. अशा या रुंद वरंबा-सरी पद्धतीबरोबरच प्लॅस्टिक आच्छादन वापरून नोव्हेंबर महिन्याच्या थंडीतही भुईमूग पीक टोकून त्याची उगवण चांगली होऊन आवश्‍यक रोप संख्येसह पीक जोमदार वाढते. कारण अशा आच्छादनाने जमिनीचे तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढते. शेंगांचा आकार वाढून शेंगदाण्याचे वजन वाढते; तण, रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, गांडूळ व सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. तापमानात अचानक बदल झाला, तर आच्छादनामुळे पिकाचे रक्षण होते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होते. या सर्वांच्या एकत्रित चांगल्या परिणामाने उत्पादनात 40 ते 50 टक्के वाढ होते. पिकाला माती परिक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे.

बीजप्रक्रिय
पेरणीसाठी शिफारस केलेल्या वाणांचे शुद्ध व प्रमाणित बियाणे वापरावे, त्यामुळे उत्पादनात 35-40 टक्केपर्यंत वाढ होते. पेरणीपूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर शेंगा फोडून बियाणे तयार करावे. फुटके, बियाण्याचे आवरण निघालेले, किडके, तसेच बारीक व चिरमुटलेले बियाणे बाजूला काढून पेरणीसाठी टपोरे बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे रोपावस्थेत येणाऱ्या रोगांपासून संरक्षण होऊन उगवण चांगली होते, झाडांची मर होत नाही. याचबरोबरीने दहा किलो बियाण्यास भुईमूग पिकासाठी शिफारशीत केलेले 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक आणि 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. यामुळे झाडांच्या मुळांवरील गाठींची वाढ चांगली होऊन उत्पादनात 12 ते 15 टक्केपर्यंत वाढ होते.

मूग आणि उडीद

महाराष्टात मुगाचे पीक सुमारे ६.५६ लाख हेक्टरवर आणि उडीदीचे पीक सुमारे ५.३१ लाख हेक्टरवर खरीप हंगामात घेतले होते. त्यापासुन २.५८ लाख टन मूग आणि २.१७ लाख टन मूग आणि २य१७ लाख टन उडीदाचे झाले. विदर्भात सुमारे २.८३ लाख हेक्टरवर मूगाचे व १.६४ लाख  हेक्टरवर उडदीचे पीक घेतल्या जाते. ही पीके पश्चिम व मध्. विदर्भातील सर्व जिल्ह्यात मुख्यत्वेकरून खरीप हंगामात घेतात. पृर्व विदर्भात रबी उडीद व मूगाचे मोजके क्षेत्र आहे. बहुतेक रबी मूग व उडीद पृर्व विदर्भात धानाचे पीक काढल्यानंतर घेण्यात येतात. उन्हाळी मूगाचे त्क्षेत्र फार कमी आहे. उडीद, मूग अल्पावधित तयार होणारी (६५ ते ९० दिवस ) पिके आहेत. त्यामुळे ज्वारी, कापुस यासारख्या प्रमुख पिकामध्ये ते आंतरपिक म्हणून घेतात.

ओलीत व्यवस्थापनातः

 

हे पीक ऐन  उन्हाळ्यात येत असल्यामुळे  ओलिताच्या साधारपणे ५ ते६ पाळ्या द्याव्यात. पहिली पाळी पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनीं म्हणजेच विरळणीपने व नांगे भरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जमिनीच्या मगदूराप्रमाणे साधारपणे ८ ते १० दिवसानंतर ओलिताची पाळी घ्यावी.

 

पीक संरक्षणः

 

पुढील कारणामुळे या पिकांची उत्पादकता कमी झालेली आहे.

(१) मान्सून पावसाचे लहरीपणामुळे पेरणी वेळेवर (म्हणजे जून अखेरपर्यत ) न होणे.

(२) पेरणी केल्यानंतर ३०-३५ दिवसाचे आंत पावसामुळे व्.ववस्थित आंतरमशागत (कोळपणी,खुरपणी / निंदणी )न होणे.

(३) पिकाचे प्रथमवस्थेत रोग व तिडीचा पोषक हवामानामुळे जास्त प्रादुर्भाव होतो, त्यावर पीक संरक्षक फवारणी केली असता पावसामुळे परिणाम न होणे.

(४) पीक फुलो-यावर असंताना सतत जोराचा पाऊस येणे, त्यामुळे शेंगा धरण्याचे प्रमाण घटणे.

(५) पक्क शेंगा तोडण्यास विलंब होंणे व त्यास कोंब फुटून नुकसान होणे.

(६) तसेच पक्क शेंगा तोडल्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश नसल्यामुळे त्या वाळत घालण्यास शेतक-याजवळ पूरेशी संलक्षित जागा उपलब्ध न होणे इत्यादी त्यामळे उत्पादनात अनिश्चितता जास्त असून सुध्दा विदर्भात त्याचे मोठे आहे. हे पीक लवकर (६० ते ६५ दिवसात ) तयार होऊन दुबार पीक घेता येतो.

 

या पिंकावर मुख्यतः मावा, पाने खाणारी अळी, पिसू व भुगेंरे या किडीचा प्रादुर्भाव होतो. मावा ही किड पानाच्या खालच्या भागावर बसून रस शोषण करते. त्यामुळे झाडे निस्तेज होतात व दाणे सुध्दा भरत नाहीत. भंगेरे ही पाने कुरडतात. त्यामुळे पानावर छिद्रे पडतात. या किडीच्या नियंत्रणाकरिता २५ टक्के डायमेटॉन ८० मिली किंवा ३० टक्के डायमेथोएट १० मिली अथवा ५० टक्के मॅलथिऑन १० मिली, प्रमाणात आढळून आल्यास १५ दिवसांनी फवारणी करावी.

 

१) भूरीः

हा रोग येरीसायफी पॉलीगोनी या बुरशीमुळे होतो. ढगाळ व आर्द्र हवामानात यो रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. ६० ते ७० टक्के आर्द्रता व २० अंश २५ अंश.से. तापमानात लाभदायक आहे. रोगाची तीव्रता अधिक आढळल्यास ५० ते ६० टक्के नुकसान होते.

लक्षणेः प्रथम जुन्या पानाच्या वरच्या भागावर पांढरी बुरशी आढलून येते. नतंर  संपुर्ण पानावर, फांद्यावर तसेच फुलावर वाढून फुले व पाने करपून गळतात. रोगाची तीवता अधिक असल्यास संपूर्ण झाडांवर पांढरी भुकटी पडल्यासारखे दिसते.

प्रसारः या रोगाचे प्रसार हवेद्वारे होतो.

उपायः रोग दिसताक्षणीच २.५ ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा डिनोकॅप (कॅराथन) १ मि.ली. किंवा ट्रायडेमार्फ ( कॅलीक्झीन ) ०.५ मि.ली. १ लिटर पाण्यात मिसणुन फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. ट्राटडेमार्फ १.५ टक्के भुकटी उपलब्ध  असल्यास तिची धुरळणीसुध्दा फायदेशीर ठरेल.

 

२)    मुळकूजः हा रोग “रायझोक्टोनिया” नावाच्या बुरशीमुळे होतो.

लक्षणेः सर्वसाधारपणे ह्या रोगाचा प्रादुर्भाव रोपवस्थेत तसेच वाढीच्या अवस्थेत तसेच वाढीच्या अवस्थेत आढळून येतो. रोगट पाने पिवळी पडतात व झाडे एका आठवडयाच्या आत मरतात. झाडे उपटून पाहिल्यास मुळाचा भाग कुजलेला आझळतो.

प़सारः रोगाचा प्रसार बियाण्यापासूम तसेच जमिनीमध्ये ्सलेल्या रोगट अवशेषापासून होतो.

उपायः रोगट झाडे उपटून नष्ट तरावीत. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम तीन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करून पेरणी करावी.

 

३) पानावरील चट्टे : हा रोग “रायझोक्टोनिया”, “सरकोस्पोरा” व “कोलेटोट्रीकम”इत्यादी वर्गाच्या बुरशीमुळे बोतो.

लक्षणे: पानावर एक ते दोन मि.मी व्यासाचे, करड्या रंगाचे ,लहान लहान चट्टे आढळतात. ते कालांतराने मोठे होतात व एकमेकात मिसळतात.असे चट्टे पानाच्या देठावर व खोडावर सुद्धा आढळतात. या रोगात साधारणतः शेंगा भरण्याच्या काळात पीक बळी पडते. त्यामुळे फारसे नुकसान होत नाही.पंरतु रोगाची लक्षणे फुले-शेंगा असतांना आढळ्यास त्याचे बुरशी नाशकाव्दारे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

प़सार: खरीप हंगामातील आद़्र हवामानात रोंगांचे प़माण जास्त आढळून येते. रोगट फांद्या, पाने यात रोंगाचे बिजाणू सुप्तावस्थेत राहतात. बुरशिच्या बिजाणूचा प़सार हवेव्दारे होतो व रोगाची नव्याने सुरूवात होते.

उपाय: १) रोगगट फाद्या, पाने इत्यादी जाळून नाश करावा. २) पिकावर २.५ ग़ँम डायथेन एम ४५ प़ति लीटर पाणी याप़माणे फवारणी करावी.

 

४) केवडा: हा विषाणूमुळे होतो व तो उडीद, मुग, राजमा, वाल व चवळी इत्यादी पीकावर आढळतो .याचा प्रसार  रबी आणी उन्हाळी पीकावर जास्त होतो. परंतु कधी कधी खरीप पिकात देखील तो आढळतो. साधारणपणे खरीपातील एरसारखे ७ ते १० दिवस आलटुन पालटुन उघाडीचे जाऊन पाऊस आल्यास या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. आउलट पाऊस नियमेत पणे रोज किंवा दोन तीन दिवसाची उघडिप देऊन येत राहील्यास प्रादुर्भाव कमि होतो. अरेथात पांढ-या माशीला उपयुक्त हेवामानात प्रसार जास्त होतो.

उपायः

१)    रोग प्रतीबंधक जातीचा वापर करावा.

२)रागाचा शिरकाव रोगट बियाण्याद्वारे होत असल्याणे रोगट बीयाणे वापरु नये.

३)प्रथामाअवस्थेच रोगट झाडे उपटुन जाळावीत.

४)      पीकावर आंतरप्रवाहीत कीटकनाशकांची योग्यवेळी उपाययोजना करावी साधारम पणे पाऊस समाणाचा अंदाज पाहुन रोगाची लक्षणे दिसण्या पुर्वीच पांढ-या मासीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवुन तीच्या बंदोबस्ताची व्यवस्था करणे जास्त उपयुक्त आहे.

 

पूर्वमशागतः

अगोदरच्या हंगामातील पीक निघाल्यानंतर वखराच्या साह्याने जमीन भुसभुसीत करावी. जमीन भुसभुसित नसल्यास या पिकांच्या मुळाची वाढ बरोबर होत नाही, व पर्यायाने मुळावरील गाठींची संख्या  सुध्दा कमी होते. शक्य असल्यास हुस-या कुळवाच्या पाळीचे अगोदर हेक्टरी १०-१५ गाड्या कुदलेले शेणखत टाकून जमिनीत मिसळून द्यावे व नंतर एक कुळवाची पाळी द्यावी.

 

पिकांची काढणी, मळणी व साठवणः

मुगाचे पीक साधारण ६५ ते ७० दिवसात काढणीस येते. वाळलेल्या शेंगा उन्हात चागंल्या वाळल्यानतंर काठीने किंवा बैलाच्या पायाखाली तुडवून मळणी करवी. नतंर उपणनी करून बी अलग करवे. साठवण करण्यापूर्वी बियाणे एक दोन दिवस उन्हात चांगले वाळवावे. साठवणीत भूंगे किंवा सोंडे खूप नुकसान  करतात, त्यासाठी साठवण कोरड्या जागेत करावी. साठवणुकीकरिता योग्य कोठी किंवा कोठराचा वापर करावाजेणेकरून धान्याला ओलसर हवेमुळे नुकसान होणार नाही. अलीकडे मळणी यंत्राद्वारे/ उडीदाची मळणी केल्या जाते.

 

खरीप मूग / उडीद

 

पेरणीची वेळः

पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात  किंवा समानधारक पाऊस पडल्यास त्या अगोदर करावी. पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट होते. म्हणून पेरणी शक्य त्त्या लवकर करवी.

 

बीज प्रकियाः

या पिकांवरील मुख्यतः मुळकूज हा रोग आढळून येतो. मुळकूज रोगामुळे झाडाची मुळे कुजतात व झाड वाळून जाते. पेरणीपूर्वी दर किलो बियाण्यास ३ ग्रॅम ‘थायरम’  बुरशी  नाशक किंवा  ५ ग्रॅम ट्रायकोडमा बुरशी संवर्धन चोळल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

हेक्टरी बियाणे व लागवडीची पध्दतः

प्रति हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पाभारीने करावी. दोन ओळीकतील अंतर ३० से.मी. पर्यत वाढविल्यास हरकत नाही, मात्र बियाण्याचे प्रमाण १२ ते १५ किलो प्रति हेक्टर इतकेच ठेवावे.

 

सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापरः

१० ते १२ गाड्या प्रतिहेक्टर शेणखत व २० किलो नत्र तसेच ४० किलो स्फरद दिल्यास उत्पन्नात चागंली भर पडू शकते.

 

जिवाणू  खताचा वापरः

पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम जिवाणू खते लावल्यास उत्पाजनात अंदाजे १० ते १५ टक्के वाढ होते. रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धनाचे वापरद्वारे रासायनिक खताची ५० टक्के मात्रा कमी करता येते.

आंतर मशागतः

पेरणीपासून दोन ते तीन आठवड्यात एक खुरपणी व एक डवरणी करावी. प्रथम २५ ते ३० दिवस पिकात तण वाढू न दिल्यास चांगले उत्पन्न मिळते. त्यानंतर पिकाचे जोमदार वाढीमुळे शेत झाकले की तण फारसे वाढत नाही. परतु शेतात तण पिकांचे वर वाढल्यास ते ४० ते ४५ दिवसाचे आत उपटुन काढावे.

उन्हाळी मूग आणि उडीद:

योग्य वाणांची निवडः

उन्हाळी मुगाकरिता पीडीएम-११, पुसा १५३१ किंवा पुसा वैशाखी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. काही कारणास्तव या जातीचे बियाणे उपलब्ध नसल्यास पीकेव्ही मूग ८८०.२, के -८५१ किंवा उहाईप ४४ यापैकी कोणत्याही वाणाचे बियाणे वापरावे. उडीदाचा टी-९ किंवा पीडीयू-१ हा वाण वसंत ऋतुत तसेच उन्हाळी लागवडीकरिता शिफारशीत आहे. वसंत ऋतुत पेरणीसाठी एचयुएम-१ या वाणाची शिफारस केली आहे.

 

पेरणीची वेळः

उपलब्ध ओलिताची साधने आणि खरीप किंवा रबी हंगामाचे पिकाची कापणीच्या वेळेनपसार मूग  किंवा उडीदाचीपेरणी जानेवारीनतंर थंडी कमी होताच केल्या जावू शकते. सर्वसाधारपणे २० मार्च पूर्वी पेरणी झाल्यास त्याला वसंत ऋतुची पेरणी म्हणतात. त्यापुढच्या पेरणीला उन्हाळी म्हणता येईल. उत्तर भारतात उन्हाळी मुगाची पेरणी “वैशाख” महिन्यात करतात. ती साधारणतः मार्चच्या शेवटी किमवा एप्रिलच्या सुरूवातीला करतात आणि तेथेअशा पेरणीचे पीक पावसांत सापडत नाही. महाराश्टात तसे केल्यास जूनच्या पावसामुळे नुकसान संभवते. त्याचप्रमाणे ५ मार्च पूर्वी पेरणी केल्यास पिकाचे रोपावस्थेत रस शोषण करणा-या किडींच्या जास्त प्रादुर्भाव संभवतो. म्हणून उन्हाळी मूग किंवा उडीद सर्वसाधारपणे ५ मार्च ते १५ मार्च हा कालावधी योग्य ठरतो. पेरणीची पध्दत, त्यापूर्वी द्यावयाची खते आणि आंतरमसागत खरीप मूग- उडीदप्रमाणेच असावी.

आंतरपिकेः

तूर, ज्वारी व कपाशी या पिकासोबत मूग, उडीदाचे पीक घेता येते. या द्रुष्टीने निरनिराळ्या प्रयोगांती असे दिसून आले आहे की, ज्वारी नव कपाशीच्या एक किंवा दोन ओळीनंतर मुगाची एक ओळ पेरल्यास मुख्य पिकाचे उत्पन्नात फारशी घट न होता आंतरपिकापासून जास्तीचे उत्पन्न मिळते.

 

खरीप मूग आणि उडीदाचे लागवड तंत्र:

या पिकांसाठी मध्यम ते भारी, सपाट व निचरा होणारी जमीन निवडावी. हलक्या जमिनीत हे अल्प मुजतीचे पीक घेता येते. परतु उत्पादन कमी येते.  मागील पिके काढल्यानंतर जमीन नागंरून वखराच्या दोन –तीन पाळ्या देऊन भुसभुसीत करावी. आम्ल – विम्ल निर्देशांक (पीएच) ६.० ते ८.५ असलेल्या मध्यम ते भारी काळ्या जमिनीत ही पिके चागंली येतात. पाणथळ जमीन या पिकांच्या वाढीकरिता संवेदशील अलल्यामुळे चागंला निचरा होणारी जमीन निवडावी ६५० ते ७०० मिलीमीटर पावसाचे वितरण समप्रमाणात झाल्यास या पिकांची वाढ जोमाने होऊन उत्पादक चागंले येते. फुलो-यावर असतांना पाऊस अल्यास शेंगा कमी धरतात व उत्पादन कमी होते.

 

 

उन्हाळी मूग आणि उडीदाचे लागवड तंत्र:

उन्हाळी हंगामात उष्ण व अधिक सूर्यप्रकाशात कीड व रोग याचे प्रमाण कमी राहते पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी उडीद किंवा मुगाचे पीक फायदेशीर ठरते.हे पीक ५६ ते ७५ दिवसात (मार्च-एप्रिल ) तयार होत असल्यामुळे, हे पीक काढल्यानंतर खरीप हंगामातील पेरणी वेळेवर करता येते. उन्हाळी लागवड करतांना खाली तंत्राचा अवलंब केल्यास अधिक उत्पन्न मिळते.

 

ग्रॅन्युलेटेड मिश्रीत खत युनिटांची यादी

अनु.

क्र.

उत्पादकाचे नाव

कार्यालयाचा पत्ता

कारखाना पत्ता

उत्पादन अनुज्ञप्ति क्र.

निर्गमन तारिख पर्यंत वैध क्षमता / वर्ष
मे. टनामध्ये
1 धी एमएआयडीसी लि.

 

राजन हाउस, प्रभादेवी, मुंबई-25 प्लॉट नं.एफ1/1, एफ1/2, एमआयडीसी एरिया, वर्धा जीएम041

 

2/17/1988

 

2/12/2009

 

60000

 

2 बीईसी फर्टिलायझर्स

 

111/ए, करिमजी बिल्डींग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई गाव – गुंजखेडा,
ता. – देवली, जि. – वर्धा
जीएम034

 

7/30/1999

 

7/27/2008

 

30000

 

सुक्ष्म मुलद्रव्यं खत उत्पादक

अनु.

क्र.

उत्पादकाचे नाव कार्यालयाचा पत्ता कारखाना पत्ता संपर्क व्यक्ति व पत्ता

प्रमाणपत्र क्र.

1 मे. मायक्रोप्लेक्स बायोटेक अँड अँग्रोकेम, वर्धा

 

36, मोहता मार्केट, मेन रोड, वर्धा

फोन – (07152)42662

ए-1, ए-2 एमआयडीसी

धानोरा,
ता. व जि. वर्धा

श्री श्रीकांत जी. राठी, 9 बाहुबली नगर, गोपुरी, नागपुर रोड, वर्धा,
एफ 140, फोन – 242662,252734
एमएम-215

29/08/04 ते

28/08/2007

 

2 मे. मा भगवती बायोटेक अँड केमिकल्स, पिपरी मेघे समृद्धवाडी,
भामतीपुर चौक, वर्धा

 

ब्लॉक नं.6,7,8,9 व 10 म्हाडा कॉलनी जवळ, पिपरी मेघे, वर्धा

 

श्री जगदीश साधुराम जोटवानी,
साई मंदिर रोड, वर्धा

 

एमएम -071

26/09/03 ते

23/12/2007

 

3 मे. महाराष्ट्र अँग्रो केमिकल्स

 

सिविल लाइन्स, नागपुर रोड, वर्धा

 

सिविल लाइन्स,
नागपुर रोड, वर्धा
श्री महेश मदनलाल पुरोहीत, जुने कापड मार्केट, वर्धा,
फोन = 242232
एमएम -193

1/12/92 ते

28/03/2007

 

4 मे. हिंदुस्तान ऑर्गेनिक लेबोरेटरी, वर्धा

 

24, चेतना डीएड कॉलेज जवळ,
देओली रोड, वर्धा-1
24, चेतना डीएड कॉलेज जवळ, देओली रोड,
वर्धा-1
श्री बलराज अंबादास लोहवे, 24, चेतना डीएड कॉलेज जवळ, सावंगी (मेघे) रोड, पो. – वर्धा गंज, वर्धा फोन – 07152-270296 एमएम -127

06/03/06 ते

05/03/2009

 

5 मे. अँग्रोफर्ट इंडस्ट्रीज, तळेगाव, वर्धा

 

सेक्टर नं.10, मौजे दौतपुर, तळेगाव, ता. आष्टी, जि.- वर्धा-4 ए/पी. तळेगाव, आर्वी रोड, काकद्दारा,
जि.- वर्धा-4
श्री प्रजवल हरिभाउजी चोरे, आर्वी रोड, काकद्दारा, ता. आष्टी, जि.- वर्धा फोन – 07156-236373 एमएम -177

14/02/07 ते

13/02/2010

 

6 मे. सुखकर्ता सीड्स प्रा.लि., वर्धा यशवंत कॉलनी, नागपुर रोड, वर्धा

 

यशवंत कॉलनी,
नागपुर रोड, वर्धा
श्री विजय राजेश्वरराव काटकमवार

यशवंत कॉलनी, नागपुर रोड, वर्धा

एमएम -188

11/05/2007 ते

10/05/2010

7 मे. वैभवलक्ष्मी बायो कंट्रोल लँबोरेटरीज, वर्धा गुप्ता फुटाणा फॅक्टरी जवळ, चितोडे रोड, बोरगाव मेघे,
ता. व जि. वर्धा
गुप्ता फुटाणा फॅक्टरी जवळ, चितोडे रोड, बोरगाव मेघे,
ता. व जि. वर्धा
श्री धनंजय मधुकरराव पहाडे,
फोन – 07152-246792,
मोबाईल – 9422140056

 

एमएम -118

02/12/05 ते

01/12/2008

 

8 संजीवनी लॅबोरेटरीज, गडचिरोली

 

अनमोल नगर, पवनार नाक्याजवळ, नागपुर रोड, वर्धा

 

ए-112, एमआयडीसी गडचिरोली,
ता. व जि. – गडचिरोली
श्री राजेंद्र सत्यनारायण खंडाळ, अनमोल नगर, पवनार नाका, नागपुर रोड, वर्धा-442001
फोन – 07152-230099
एमएम -136

07/06/06 ते

06/06/2009

 

 

बीज तपासणी प्रयोगशाळा

 

अनु. क्र.

प्रयोगशाळेचे नाव

पत्ता

फोन

विश्लेषण क्षमता

प्रयोगशाळेचा क्षेत्राधिकार

 

सॅम्पलचा प्रकार

क्षमता

1. बीज तपासणी प्रयोगशाळा, परभणी

 

लक्ष्मी नगर, जुना पेडगाव रोड, जायकवाडी धरणाजवळ, परभणी

पिन-431401

(02452)

242976

 

एसीटी

 

3300

 

औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हा.
प्रमाणित./

पुनर्मुल्यांकन

8400

 

सेवा / सत्यनिष्ठा 3885

 

एकुण  

 

 

बीज उत्पादकांची यादी

 

अनु. क्र. पत्त्यासहित कंपनीचे नाव अनुज्ञाप्ति क्र. पर्यंत बैध
1 अरुण हायब्रीड सिड्स लि.187, समर्थ वाडी, वर्धा 14

 

5/14/2010

 

2 दफ्तरी एग्रो प्रा.लि., दफ्तरी हाउस, बाजार रोड, मु. व पो. सेलु – 442104, जि. वर्धा

 

254

 

6/19/2009

 

3 खांडवा ऑइल (इटारसी ऑइल्स अँन्ड फ्लोअर्स लि.चे एक युनिट) श्री प्रविण टी. कोठारी,
मे. कोठारी मनी रोड, हिंगणघाट – 442301, जि. वर्धा
225

 

7/3/2008

 

4 महागुजरात सीड एजन्सी, मेन रोड, सिंधीत, वर्धा.

 

34

 

6/12/2010

 

5 शीवा एग्री जेनेटीक प्रा.लि., सिविल लाइन, नागपुर रोड, वर्धा-442 001

 

291

 

4/26/2010

 

6 सनटेक सिड्स प्रा.लि., 43, हिंदुस्तान कॉलनी, वर्धा रोड, नागपुर – 15

 

229

 

10/20/2008

 

7 स्वयम बायोटेक प्रा. लि., भोगावर कॉम्प्लेक्स, किराणा लेन, वर्धा.

 

340

 

8/20/2010

 

8 यशदा हायब्रिड सिड्स प्रा. लि., लक्ष्मी टॉकिज जवळ, हिंगणघाट, जि. वर्धा 442 304.

 

94

 

4/26/2008

 

 

 

किटकनाशक उत्पादनाचा तपशिल

 

अनु.

क्र.

उत्पादन युनिटांचे नाव कार्यालयाचा पत्ता स्थान / पूर्ण पत्ता

अनुज्ञप्ति क्र. निर्गमन तारिख समाप्ति तारिख
1 मे. मायक्रोप्लेक्स बायोटेक अँड
एग्रोकेम प्रा.लि.
03, मोहता मार्केट, मेन रोड, वर्धा एस.नं.162 व 163, मौझा रोठा, ता. व जि. वर्धा

 

2701/1668/एम/इ 4.10.2007 3.10.2009
2 मे. मायक्रोप्लेक्स (इंडिया) 36, मोहता मार्केट, मेन रोड, वर्धा ए-1, ए-2, एमआयडीसी,
सेवाग्राम रोड, वर्धा

 

2701/1400/एम/इ 24.4.2002 23.4.2008
3 मे. महाराष्ट्र इंटिग्रेटेड पेस्ट कंट्रोल लेबोरेटरीज सिविल लाइन्स, नागपुर रोड, वर्धा मु. सटोडा, पो. नलवाडी,
ता. व जि. वर्धा

 

2701/0863/ए/डी 17.5.1999 16.5.2009
4 मे. मा भगवती बायोटेक अँड केमिकल्स समर्थवाडी, साई मंदिर रोड, वर्धा ब्लॉक नं.6,7,8,9, म्हाडा कॉलनी, पिपरी मेघे, वर्धा

 

2701/1635/एम/इ 8.12.2006 7.12.2008
5 मे. वैभव लक्ष्मी बायोकंट्रोल लँबोरेटरी पोद्दार गार्डन जवळ,
शास्त्री स्क्वेयर, वर्धा
गुप्ता फुटाणा फँक्टरी जवळ, चितोडा रोड, बोरगाव मेघे, वर्धा

 

2701/1646/एम/इ 23.3.2007 22.3.2009
6 मे. श्री जी बायोटेक अँग्रिकल्चर अँड इक्विपमेंट ए-25, एमआयडीसी,
सेवाग्राम रोड, वर्धा
बी-25, एमआयडीसी,
सेवाग्राम रोड, वर्धा
2701/1655/एम/इ 9.4.2007 8.4.2009

 

 

मुगाचे सुधारित वाण

१)कोपरगांवः

हा वाण फार जुना असला तरी चकाकणाच्या हिरव्या टपोर दाण्यामुळे तो अजूनही महाराष्टात खरीप लागवडीखाली लोकप्रिय आहे. ६० ते ६५ दिवसात तयार होतो. परंतु भूरी रोगास अति बळी पडतो. भूरी रोगाचा प्रादुर्भाव शेंगा धरण्यापूर्वी फुलो-याचे कालात झाल्यास .या वाणाच्या उत्पान्नावर फार अनिष्ट परिणाम होतो. सरासरी / हेक्टरी ८ ते १२ क्विंटल उत्पन्न मिळते.

२) टीपीए ७

हा वाण ६० ते ६५ दिवसांत तयार होतो. भूरी रोगास कमी बळी पडतो. दाणे चकाकणारे व हिरवे आहेत. परंतु दाण्याचा आकार बारीक आहे. १०० दाण्याचे वजन २.७५ ग्रॅमआहे. उत्पन्नामध्ये कोपरगांवपेक्षा सरस असून दर हेक्टरी सरासरी उत्पन्न १० ते १२ क्विंटल मिळते.

३) एकेएम८८०३

या वाणचे बहुतेक गुणधर्म कोपरगांव मुगाप्रमाणेच आहेत. फरक आहे तो.शेंगा आणि दाण्याचा कमी टपोरपणामध्ये, बूरी रोगाचे मध्यम प्रतिबंधकतेमध्ये आणि सुमारे २२ टक्के वाढीव सरासरी उत्पन्नामध्ये. खरीप हंगामात लागवडीत योग्य आहे. १०० दाण्याचे वजन सुमारे ३.५ ग्रॅम आहे. दर हेक्टरी सरसरी उत्पन्न १२ ते १५ क्विंटल मिळते.

४) फुल मूग २

हा वाणा ६५ ते ७० दिवसात तयार होतो. दाणे चकाकीदार हिरवे पंरतु बारीक (१०० दाण्याचे वजन २.९ ग्रॅम ) आहेत. उक्पनात कोपरगांव पेक्षा सरस आहे. )सुमारे १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टर ) भूरी रोगास बळी पटतो.

५) बीएम् ४

हा वाण सुमारे ८० ते ९० दिवसात तयार होत असून त्याच्या शेंगा २ ते ३ वेळा तोडाव्या लागतात. दाणे बारीक (१०० दाण्याच्या वदन २.७ ग्रॅम) असून त्यांना चकाकी नाही. बूरी रोगास फार जास्त प्रमाणात बळी पडतो. सरसरी उत्पन्न १२ ते १५ क्विंटल हेक्टर मिळते.

६) टीएआरएम १८

महाराष्टात खरीप लागवडीसाठी प्रसारित झालेला हा पहिला भूरी रोगप्रतिबंधक वाण आहे. त्यवर भूरी रोग इतर वाणपेक्षा १५ ते २० दिवस उशिरा येतो. आणि त्याचा पानावर प्रसार फार हळु होतो. उत्पादनात तो सरस असून (सरासरी १२ ते १५ क्विंटल हेक्टर) भूरी रोगाचा उत्पन्नावर फारसा प्राभाव बोत नाही. १०० दाण्याचे वजन सुमारे ३.० ग्रॅम असुन त्यांना चकाकी आहे. हा वाण करपा रोगास देखाल प्रतिबंधक आहे. त्यमुळे खरीप लागवडीत योग्य. आहे.

७) पिकेव्ही मूग ८८०२

हा चमकदार हिरव्या टपोर दाण्याचा वाण कोपरगांव वाणाच्या तुलनेत सुमारे २६ टक्के जास्त उत्पन्न देतोव ६० ते ६५ दिवसात तयार होतो. रोपावस्थेत २०-२२ दिवसात पिकाची दोमदार वाढ होतो. त्यमुळे जमीन झाकल्यावर तणांवर मात करण्यास उपयुक्त आहे.

८) जळगांव ७८१

ही चमकदार टपोर दाण्याची दात खानदान आणि विदर्भात काङी भागांत पूर्वी लागवडीखाली होती. परंतु सध्या तिचे क्षेत्र आढळत नाही.

९) बीपीएमआर १४५

हा वाण भूरी रोग प्रतिबंधक आहे. १०० दाण्याचे वदन सुमारे ३.६ ते ३.८ ग्रॅम असून दाणे चमकदार आहेत.

१०) वैभव (फुले मूग ९३३९)

हा वाण भूरी रोग पर्तिबंधक आह. १०० दाण्याचे वदन सुमारे ३.६ ते ३.८ ग्रॅम आहे. दाणे चमकदार आहेत.

११) टीएआरएम २

हा वाण पूर्व विदर्भात रबी लागवडीसाठी प्रसारित करण्याची विद्यापिठाचे संशोधन समितीचे १९९१ मध्ये शिफारिस केली आहे. हा वाण भूरी रोग पर्तिबंधक आहे. रबी हंगामात त्याचे सरसरी उत्पन्न १२ क्विंटल प्रति हेक्टर आहे. दाणेे चमकदार हिरवे व लहान आकाराचे (१०० दाणे = २.७५ ग्रॅम ) आहेत.

१२)     हा वाण अखिल भारतीय स्तरावर विदर्भात आणि दक्षिण विभागात रबी लागवडीसाठी पर्सारित (१९९४) झाला तो भूरी रोगास प्रतिबंझक आहे. १०० दाण्याचे वजन सुमारे २.७ ग्रॅम असुन दाणे चकाकणारेआहेत. सरासरी उत्पन्न सुमारे १२-१३ क्विंटल / हेक्टर मिळते.

१३) पुरेसा वैशाखी

हा वाण उन्हाळी हंगामात परण्यास योग्य आहे. उन्हाळी हंगामात त्याचे दर हेक्टरी ६ ते ७ क्विंटल उत्पन्न मिळते. त्यचे दाणे मध्यम आकाराते व भुरकट हिरवे आहेत.

 

 

उडीदाचे सुधारित वाण:

१)नं. ५५

उडीदाची खरीप हंगामात पेरणीसाठी नागपूर येथून १९५६ साली प्रसारित झालेली ही जात चागंल्या टपोर दाण्याची आहे. तिचे १०० दाण्याच्या वजन कुमारे ४.५ ग्रॅम आहे. परिपक्क होण्यास ७५ ते ८० दिवसलागतात सरसरी उत्पन्न जर हेक्टरी ६ ते ७ क्विंटल मिळते. अलीकडे या वाणाचेक्षेत्र नगण्य झाले आहे.

 

२) टीएयू १

कानपूर येथून विकसित झालेली ही जात खरीप तसेत सरसरी दर किंवा उन्हाळी हंगामात चागंली येते. परिक्क होण्यास ६५ ते ७० दिवस लागतात तिचे सरसरी दर हेक्टरी उत्पन्न १४ किवंटल मिळते. तिची वाढ बुटकी आहे. दाण्याचा आकार बारीक आहे. (१०० दाण्याचे वजन ३.२ ग्रॅम)

 

३) टीएयू १

हा टपोर दाण्याचा (१०० दाणे वजन ४.४ ग्रॅम ) वाण खरीप हंगामात टी -९ प्रमाणेच लवकर (६५ ते ८० दिवसात ) तयार होत असून सरसरी उत्पन्न १४ क्विं./ हेक्टर मिळते. या वाणाच्या झाडाची वाढ टी- ९ पेक्षा बरीच जास्त होते. त्यमुळे गुरांकरिता कुटार पण जास्त मिळते. रोपावस्थेतील जोमदार वाढ होत अस्यामुळे तणामुले होणारा त्रास कमी होतो.

 

४) टीएयू २

हा टपोर दाण्याचा लवकर तयार होणारा वाण आहे. भरी खोल जमिनीत तो उत्पान्नात टीएयु-१ पेक्षा जास्त सरस आहे. हा ७० ते ८० दिवसांत तयार होतो. याचे दर हेक्टरी उत्पन्न १५-२० क्विंटल मिळते.

 

५) पीकेव्ही उडीद १५ (एकेयू)

हा टपोर दाण्याचा वाण आहे. (१०० दाण्याचे वजन सुमारे ४.३ ग्रॅम) खरीप हंगामात वाण आहे. तो सुमारे ७५ ते८० दिवसांत पक्क होत असून मूळकुजल्या रोगाला तसेच बुंध्याजवळ सडविण्याचा स्क्लेरोशियम बुरशीच्या रोगाला कमी बळी पडतो. सरसरी उत्पन्न सुमारे १४ ते १६ क्विं प्रति हेक्टर या वाणाची वाढ टीएयु-१ प्रमाणेच जोरदार असते त्यमुळे कुटारचे उत्पन्न देखील जास्त मिळते.

 

६) टीपीयू ४

हा वाण सन १९८९ साली अखिल भारतीय कडधान्य संशोधन प्रकल्पाद्वारे खरीप लागवडीसाठी मध्य विभागातासाठी म्हणजे महाराष्ट्र,गुजरात आणि मध्यप्रदेश टा राद्यासाठी प्रसारित करण्यात आला. याचे शंभर दाणयाचे वजन सुमारे ४.१ ग्रॅम आहे. सरसरी दर हेक्टरी उत्पादन सुमारे १४ क्विं. मिळते.

 

७) मेळघाट (एकेयू ४)

हा वाण पूर्व विदर्भात रबी लागवडीत करिता डॉ. पं. दे.कृ.वि.द्वारे १९९२ म्ध्ये प्रसारित करण्यात आला आहे. हा वाण भूरी रोगास पर्तिकारक असून टी-९ या वाणापेक्षा (रबी हंगामात ) ४० टक्के जास्त उत्पन्न देतो. (१३ ते १५ क्विंटल हेक्टर ) याच्या दाण्याचा आकार देखील टी-९ टपोरा आहे. (१०० वजन ५.० ग्रॅम)

उन्हाळी लागवडीकरिता उडीदाचा टी-९ हा वाण उत्कुष्ट आहे. उन्हाळी मूग, उडीदाला पाणचा ताण न पडल्यास विदर्भाचे उष्ण हवामाणात दर हेक्टरी सुमारे ७ ते १० क्विंटल इत्पादन  मिळते.

 

इतर राज्यात विकसित मूग आणि उडीदाच्या महाराष्टासाठी शिफारस केलेल्या वाणांची दिली आहे.

इतर राज्यात विकसित मूग / उडीदाचे महाराष्ट्राकरिता प्रसारित वाण

 

जातीचे नांव विकास करणारी

संस्था/प्रसारक वर्ष

विशेष गुणधर्म
मूगः
१) पुसा वैशाखी भा.कृअ. संस्था नवी दिल्ली १९७१ ६० ते ६५  दिवसात तयार होणारी, दाणा मध्यम जाट, दाण्याचा रंग मळकट  हिरवा, उम्हाळी लागवटीस योग्य, उत्पन्न ५ ते ६ क्विंटल हेक्टरी
२) पीएस १६ भा. कृ.अ. संस्था, नवी दिल्ली १९७९ ६० ते ६५ दिवसांत होणारी, दाणा हिरव्या रंगाचा, चकाकणारा, सरसरी फत्पन्न ६ ते ७ क्विंटल हेक्टरी
३)एमएल १३१ पंजाब कृषि विश्वविद्यालय, लुधियाना ८५ दिवसांत तयार होणारी, दाण्याचा रंग फिक्कट हिरवा तथा चकाकणारा, आकाराने लहान ( १०० दाण्याचे वजन २.९० ग्रॅम) केवटा रोगास प्रतिबंधक, सरसरी उत्पन्न. ६ ते ७ क्विंटर हेक्टरी
४) पुसा १०५ भा.कृ.अ.संस्था  नवी दिल्ली, १९८७ उभट वाढणारी, दाणा मध्यम जाड, (१०० दाण्याचे वजन ४ ग्रॅम) चकाकणारा, गर्द हिरवा, केवडा, भूरी व पानावरील करपा रोगास प्रतिकारक सरसरी उत्पन्न ६ ते ७  क्विंटल हेक्टर
५) एमएल ३३७ पंजाब कृषि विश्वविद्यालय, लुधियाना १९७५ ७२ दिवसात तयार होणारी, झाड उभट वाढणारे, दाण्याच्या आकार लहान (१०० दाण्याचे वजन ३ ग्रॅम ), रगं हिरवा, केवडा, भूरी व पानावरील ठिपक्याचा रोगास प्रतिबंधक, सरसरी उक्पन्न ६ ते ७ क्विंटल हेक्टर
६) पीडीएम ११ भारतीय कडधान्य संशोधन संस्था कानपुर, १९८७ ६० ते ७० दिवसात तयार होणारा, झाडाच्यां वाढीचा प्रकार उभट,  दाणा मध्यम जाड  (१०० दाणे – ३.५ ग्रॅम ),दाण्याचा रगं हिरवा,  भूरी रोगास प्रतिबंधक, पिवळा विशाणू पानावरील ठिपक्याचा रोगास प्रतिकारक. वसंत ऋतुत लागवडीसाठी, सरसरी,  उक्पन्न ६ ते ७ क्विंटल प्रति हेक्टर
७)एचयूएम १ बनारस हिंदू विश्व विद्यालय, वाराणसी, १९९९ वसंत ऋतुमध्ये पेरणीसाठी, कालावधी ८५ के ९० दिवस, केवडा रोग प्रतिबंधक, प्रति हेक्टरी उत्पान्न सुमारे ९ क्विंटल
८) पुसा ९५३१ भा. कृ. अ. संस्था  नवी दिल्ली,२००० उन्हाळी लागवडीसाठी, कालावधी ८० ते ८५ दिवस, केवडारोग प्रतिबंधक, सरासरी उत्पन्न सुमारे १० क्विंटल प्रति हेक्टर.

 

 

जातीचे नांव विकास करणारी

संस्था/प्रसारक वर्ष

विशेष गुणधर्म
उडीद
१) पंत यू ३० गोविंद वल्लभाई पंत कृषि

विश्वविद्यालय, पंत नगर, डि. नैनिताल

 
२) पीडीयू १ भारतीय कडधान्य संशोधन संस्था कानपूर १९९१ ६० जिवसात तयार होणारी, झाडाची वाढ उभट, दाण्याचा रंग काळा असून आकार मध्यम जाड (१०० दाणे – ३.७ ग्रॅम ) पिवळ्या विषाणूस  प्रतिबंधक, भूरी रोगास प्रतिकारक तसेच मावा व तुडतुडे या किडीस प्रतिबंधक आहे. सरसरी उत्पन्न ८ ते ९ क्विंटल पर्ति हेक्टर.
३) व्ही. बी. ३ वांम्बन  (तामिलनाडु) १९९५ कालावधी ७५ ते ८० दिवस, अधिक उत्पादन देणारी (सरसरी १२.२ क्विंटल प्रति हेक्टर )
३)          बरखा

(आरबीयू३८)

कृ. सं. के.,

बांसवाडा, राजस्थान १९९१

कालावधी ७५ ते ८० दिवस १०० दाण्याचे वजन ५.१ ग्रॅम सरसरी उत्पन्न ११ ते १२ क्विंटल प्रति हेक्टर स्थानिक वाणातून निवड पध्दतीले विकसित.

 


गवती चहाची लागवड

गवती चहासाठी निचरा होणारी, पोयट्याची किंवा रेताड जमीन योग्य असते. या गवताच्या कठीणपणामुळे विविध प्रकारच्या हलक्‍या ते भारी जमिनीत हे पीक घेता येते. केरळमध्ये हे गवत, बरड व उताराच्या जमिनीवर लावतात, त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते. हे पीक एकाच जमिनीवर एकदाच लावल्यानंतर तीन ते पाच वर्षांपर्यंत राहते, त्यामुळे सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे खरिपामध्ये लागवड करावी. त्यासाठी मार्च ते एप्रिल महिन्यात उभी व आडवी खोल नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीस शेणखत/कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

लागवडीसाठी ठोंबापासून, तसेच बियांपासून रोपे मिळविता येतात, परंतु सर्व बाबींचा विचार करता ठोंबापासून केलेली लागवड योग्य ठरते. त्यासाठी सरी-वरंब्यावर लागवड केल्यास फायदेशीर ठरते. सरी पाडताना 75 सें.मी. अंतरावर सरी पाडावी व नंतर 45 सें. मी. अंतरावर ठोंबाची लागवड करावी. लागवडीसाठी लागणारे ठोंब 20-25 सें.मी. उंचीचे व एक ते दोन वर्ष वयाचे असावेत. पर्णोत्सर्जन टाळण्यासाठी ठोंबांची टोकाकडील पाने छाटून टाकावीत. अंतराचा विचार करता हेक्‍टरी 30 हजार ठोंबे लागतात. नियमित सिंचनाची सोय असणाऱ्या जमिनीत वर्षातून कधीही लागवड करण्यास हरकत नाही. हे पीक बहुवर्षीय असल्यामुळे रोपे मेलेल्या जागेत सतत नांगे भरावे लागतात.

सुधारित वाण –
केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था – प्रगती, प्रमाण, कावेरी, कृष्णा, चिरहरित व निमा.
ओडाकल्ली- केरळ येथील संशोधन केंद्र- ओडी- 19, ओडी- 23 व ओडी-

440
जम्मू-काश्‍मीरच्या संशोधन केंद्र- सी.के. पी.- 25 व आर.आर.एल.- 16
जोरहटच्या संशोधन केंद्र- जी.आर.एल.- 1

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी- सी.के.पी.- 25 या जातीची महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली आहे. या जातीची पाने गर्द हिरव्या रंगाची, कमी रुंदीची, पाण्याचा ताण सहन करणारी व त्याचप्रमाणे सिट्रॉलचे प्रमाण जास्त असणारी आहे.

या पिकासाठी माती परीक्षणानुसार खतांचा वापर करावा. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर प्रति हेक्‍टरी 20 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. लागवडीच्या वेळी 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश द्यावे. प्रत्येक काढणीनंतर हेक्‍टरी 40 किलो नत्राचा हप्ता द्यावा व ताबडतोब पाणी द्यावे. लागवडीनंतर लगेच पाणी देणे आवश्‍यक असते. ऋतुमानानुसार पाणी व्यवस्थापन करावे. हिवाळ्यात 12 ते 15 दिवसांनी व उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे. उन्हाळ्यात पाण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाण्याचा ताण बसल्यास तेलाचा उतारा कमी मिळण्याची शक्‍यता असते. पावसाळ्यात आवश्‍यकता असल्यास पाणी द्यावे. या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. त्या वेळी पीक पहिले दोन-तीन महिने तणविरहित ठेवणे अत्यावश्‍यक आहे, त्यामुळे लावलेल्या रोपांची चांगली वाढ होऊ शकेल. त्याचप्रमाणे प्रत्येक काढणीनंतर एक खुरपणी करावी, म्हणजे वरची जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहण्यास मदत होते.

भाजीपाला

सध्या सगळीकडे थंडीचे वातावरण असून आकाश स्वच्छ आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात राहण्याची शक्‍यता आहे. मात्र तरीही कांदा, वाटाणा, टोमॅटो, वांगी या पिकांवर येणाऱ्या रोग-किडींच्या नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे वेळीच उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

कांद
कांदा पिकाचे करपा रोग व फुलकिडींमुळे मोठे नुकसान होते. नियंत्रणासाठी 25 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 25 ग्रॅम क्‍लोरोथॅलोनील किंवा दहा ग्रॅम कार्बेन्डाझीम अधिक दहा मि.लि. कार्बोसल्फान किंवा पाच मि.लि. डेल्टामेथ्रीन (2.8 ईसी) प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी.

वाटाण
पिकावर मावा या रसशोषक किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास चार मि.लि. इमिडाक्‍लोप्रीड प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 15 मि.लि. एन्डोसल्फान किंवा पाच मि.लि. डेल्टामेथ्रीन (2.8 ईसी) प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी.

टोमॅट
या पिकावर रस शोषणाऱ्या किडींमध्ये फुलकिडे व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी दहा मि.लि. डायमिथोएट किंवा दहा मि.लि. ऑक्‍झिडिमेटॉन मिथाईल (25 टक्के प्रवाही) प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 25 ग्रॅम मॅन्कोझेब अधिक टेब्युकोनॅझोल पाच मि.लि. किंवा 25 ग्रॅम क्‍लोरोथॅलोनील प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे.

वांग
वांगी पिकावरील फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी 20 मि.लि. प्रोफेनोफॉस किंवा दहा मि.लि. स्पिनोसॅड किंवा इंडोक्‍झाकार्ब प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी.

Previous Older Entries