पेरु


  1. पेरुचा जुन्या बागेचे पुन्हा सेटींग करण्यासाठी शेंडयाकडून 3 सेंमी जाड कांड्या मे महिन्याचा सुरुवातीला कापाव्यात 20 वर्षापेक्षा जास्त वर्ष वर्ष झालेल्या हि पध्दत वापरतात. त्यामध्ये जास्त उत्पन्न व एकसारखे प्रॉफिट मिळते.

  2. पेरु पिकात प्रॉपिकोनॅझॉल 0.1% किंवा मॅन्कोझेब + कार्बेडाझीन 0.2+0.1% फवारल्यास देवी रोगाचे प्रभावीरित्या नियंत्रण होते.

   3    पेरूमध्ये १००० पी.पी.एम सायकोसील पाणी तोडलेल्या कालावधीत फवारल्यास तसेंच २,४-डी १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारल्यास      ५० पी.पी.एम. बहाराच्या पहिल्या पाण्याच्या वेळी फवारल्यास फुलोरा वाढतो. (म.फु.कृ.वि.राहुरी)

   4     पेरूमध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त उत्पादनासाठी २, ४, ५-टी ७० पी.पी.एम. पानांवर फवारावे. (म.फु.कृ.वि.राहुरी)

   5      ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पाणी थांबविल्यानंतर ५० पी.पी.एम. २,४-डी डीसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फवारल्यास त्यानंतर

     जानेवारी बहाराच्या वेळी आणखी एकदा फवारल्यास पेरूमध्ये उत्पादन वाढते. (म.फु.कृ.वि.राहुरी)

  6     जुन्या पेरू झाडांचे नुतनीकरण करताना आणि जास्त उत्पादनासाठी पेरूच्या जून्या झाडांच्या उपफांद्या एप्रीलच्या शेवटच्या आठवड्यात      ३१ ते ६० सें.मी. ठेवून कापाव्यात (पं.दे.कृ.वि.अकोला)

  7     हस्तबहारात १० आणि २५ सप्टेबर रोजी हलकी छाटणी करून उत्पादन घेतल्यास परूचे उत्पादन आणि प्रत सुधारते (म.फु.कृ.वि.राहुरी)

 8    पेरूच्या जुन्या झाडाचे पुनरुज्जीवन आणि जास्त उत्पादनाकरीता उप फांद्यांची छाटणी ३१ ते ६० सें.मी. पर्यंत एप्रिल महिन्याच्या       शेवटच्या आठवड्यात करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

Advertisements