भुईमूग

हमखास पावसाच्या प्रदेशात, मध्यम जमिनीत, खरीप भुईमूगाच्या टी.ए.जी. २४ आणि जे.एल.२२० (व्यास) या वाणाची पेरणी २६ व्या हवामान आठवड्यात (२५ जून ते १ जुलै) करावी.

हमखास पावसाच्या प्रदेशात खरीप भुईमूगाच्या तणाच्या बंदोबस्तासाठी, उगवणीपूर्वी पेन्डीमेथँलीन १ किलो क्रीयाशील घटक प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर ३० दिवसांच्या आत एक कोळपणी व एक निंदणी आणि ४५ दिवसांच्या आत दुसरी कोळपणी करावी.

उन्हाळी हंगामात भुईमूगाच्या टी.ए.जी.२४ आणिआय.सी.जी.एस.११ या वाणाची जळगाव जिल्ह्यात जानेवारीच्या तिस-या आठवड्यात पेरणी करावी.

उन्हाळी हंगामात फुईमूग पिकातील तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी ऑक्सीफ्लोरफेन ०.१८ किलो क्रियाशील घटक किंवा पेन्डीमेथँलीन १ किलो क्रियाशील घटक किंवा फ्ल्युक्लोरँलीन १ किलो क्रियाशील घटक ५०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर समप्रमाणात फवारणी करावी. त्यानंतर पिकात ३० आणि ४५ दिवसांच्या आत २ वेळा कोळपणी आणि ५० दिवसांच्या आत एक खुरपणी करावी.

उन्हाळी भुईमूगाच्या टी.ए.जी. २४ या वाणाच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीच्यावेळी प्रती हेक्टरी १० किलो नत्र अधिक ४० किलो स्फुरद आणि पेरणीनंतर ३० दिवसांनी प्रती हेक्टरी १० किलो नत्र द्यावे

उन्हाळी हंगामात भुईमूगाच्या अधिक उत्पादनासाठी टी.ए.जी.२४ या वाणास प्रती हेक्टरी २५ किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद व २५० किलो जिप्सम द्यावे यातील अर्धे जिप्सम पेरणीच्यावेळी व अर्धे जिप्सम आ-या सुटण्याच्या वेळेस द्यावे

भुईमूगावरील पाने खाणा-या किडींचे नियंत्रण करण्यासाठी डायक्लोरोव्हॉस (०.०५ टक्के) दोन वेळा फवारणी करावी.

उन्हाळी भुईमूग – जळगाव विभागासाठी शिफारस – उन्हाळी हंगामात भुईमूग पिकातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी भुईमूग पेरणीनंतर व उगवणीपूर्वी ऑक्सीफ्लोरफेन ०.१७५ कि.प्र.हे. (गोल २३.५ ई.सी. ७५० मि.ली.प्र.हे) किंवा पेरणीपुर्व फ्लुक्लोरँलीन (बासालीन ४५३ इ.सी) किंवा पेरणीनंतर व उगवणीपूर्वी पेन्डीमेथँलीन (स्टॉम्प ३० ई.सी) १ कि. क्रियाशील घटक प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून या तणनाशकाची जमिनीवर समप्रमाणात फवारणी करून त्यानंतर पिकास पेरणीनंतर ३० आणि ४० दिवस अगोदर दोन वेळा कोळपणी व ५० दिवस अगोदर एक वेळा खुरपणी करावी.

खरीप भुईमूग – जळगांव विभागासाठी हमखास पावसाच्या प्रदेशात खरीप भुईमूगातील बंदोबस्तासाठी पीक उगवण्यापूर्वी पेन्डीमेथँलीन १ कि.प्र.हे. (स्टॉम्प ३० इ.सी. ३.३ लि.प्र.हे.) ५०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर समप्रमाणात फवारणी करावी व त्यानंतर ३० दिवस अगोदर एक वेळ निंदणी तसेच ३० व ४५ दिवस अगोदर दोन वेळा कोळपणी करावी.

उन्हाळी भुईमुगावरील वायरवर्म या किडींच्या निंयंत्रणासाठी आ-या सुटण्याच्या वेळी ६ मि.ली. केनॉथिऑन ८० टक्के किंवा २५ मि.ली. क्लोरोपायरीफॉस किटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून केलेले द्रावण (५०० लि.प्र.हे.) दोन सरीच्या मध्ये झारीने देण्याची शिफारस करण्यात येत आहे.

खरीप भुईमूगावरील पाने पोखरणा-या व रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काच्या फवारणीची शिफारस करण्यात येते. भुईमूगाचा जे एल 501 हा वाण एसबी 11 व टिएजी 24 पेक्षा 40.8 व 18.8 टक्क्यांनी उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन देणारा असून 113 दिवसात तयार होणारा व तेलाचे प्रमाण 48 टक्के आहे. हि जात टिक्का बडनेक्रोसिस आणि रस्ट या रोगास व लिफ रोलर या किडीस बऴी पडते. याचा अभ्यास केलेला दिसून आला नाही. (म.फु.कृ.वि.राहुरी)

 1. ऊन्हाळी हंगामासाठी भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या दुस-या आठवड्यात करण्याची शिफारस केलेली आहे.

 2. पेंडीमेथेलीन। ऑक्झीफ्लोरेन या तणनाशकाची ऊगवणी पुर्वी फवारणी चांगली दिसून आली.

 3. उत्तर महाराष्ट्राच्या हमखास पावसाच्या प्रदेशात भारी जमिनीत कोरडवाहू भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी हेक्टरी 2.5 टन शेणखत टाकून पेरणी करावी. पेरणी करतांना पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक 4 ओळीनंतर एक ओळ सोडावी आणि पिक उगवल्यानंतर तेथे सरी काढावी.

 4. ऊन्हाळी भुईमुगाच्या बि- 95 (कोयना) या वाणाच्या अधिक ऊत्पादनासाठी प्रती हेक्टर 10 टन कुजलेले शेणखत आणि 50 किलो नत्र + 100 किलो स्फुरद देऊन रुंद सरी वरंबा (75*120सेंमी.) पध्दतीने लागवड करावी.

 5. ऊन्हाळी भुईमुगाच्या अधिक ऊत्पादनासाठी प्रती हेक्टरी 50 किलो स्फुरदची मात्रा रॉक फॉस्फेटद्वारे (150किलो हेक्टरी) देऊन प्रती किलो बियाण्यास 25 ग्रॅम बॅसिलस फ्लॅमिक्सा व सुडोमोनॉस स्ट्रायटाथा (स्फुरद विरघळणारे जिवाणू) बिजप्रक्रीया करुन पेरणी करावी.

 6. खरीपात भुईमुगाच्या अधिक ऊत्पादनासाठी 25 किलो नत्र + 50किलो स्फुरद प्रती हेक्टरी + 10 किलो लोह + 5 किलो जस्त + 1 किलो बोरॉन देण्याची शिफारस केली आहे मध्यम काळ्या जमीनीत.

 7. भुईमुग पिकातील तणांचे एकात्मीक व्यवस्थापन करण्यासाठी पेंडीमेथॅलीन या तणनाशकाची 0.750 किलो क्रीयाशिल घटक प्रती हेक्टरी पेरणीनंतर लगेच फवारणी करावी. किंवा फ्लुक्लोरॅलीन 0.750 कि.ग्रॅ. क्रीयाशिल घटक प्रती हेक्टरी 500 लीटर पाण्यात मिसळून पेरणीपुर्वी फवारणी करुन जमीनीत मिलळावे आणि पेरणीनंतर 15 दिवसांनी एक खुरपणी व 30 दिवसांनी एक कोळपणी करावी.

 8. ए.के. 280 हा वाण टी.ए.जी.-24 पेक्षा 20टक्के शेंगा जास्त व 17 टक्के टरफल जास्त असणार वाण आहे.

 9. भुईमुगाच्या वाळलेल्या शेंगांचे चांगले वजन येण्यासाठी व चांगला अर्थिक फायदा होण्यासाठी 75 टक्के प्रमाणित केलेली स्फुरदची मात्रा (37.5 किलो प्रती हेक्टर) पी.एस.बी. (3 किलो प्रती हेक्टर) सोबत वापरावी.

 10. अपेक्षीत उत्पादन सुत्रानुसार खते,कंपोस्ट खत,जैविक खते दिल्यास 23.75क्वींटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळाले.

 11. भुईमुग व गहू पिक पध्दतीत गहू पिकास 50टक्के शिफारशीतील नत्र मात्रा 25टक्के नत्र + पी.एस.बी.+ अँझो दिल्यास भुईमुगाचे 11.79 क्वींटल प्रती हेक्टरी उत्पादन

 12. भुईमुग टिक्का नियंत्रणात मॅन्कोझेब 0.25 टक्के + कॅलेक्झीन 0.05 टक्के – 65टक्के टिक्का नियंत्रण व 37 टक्के वाढ ट्रायकोडर्मा 34 टक्के टिक्का नियंत्रण + 5 टक्के उत्पादन वाढ

 13. भुईमुग पिकात पेंडीमेथॅलीन (स्टॉम्प 30 टक्के ई.सी) पेरणीनंतर आणि फ्लुक्लोरॅलीन (बाबालीन 45 टक्के ई.सी.) पेरणीपुर्वी 0.750 कि. क्रीयाशिल घटक प्रती हेक्टरी 500 ते 600 लीटर फवारावे पारंपारीक पध्दतीपेक्षा 40.82 आणि 36.55 टक्के भुईमुग उत्पादन वाढ.

 14. खरीप भूईमुगाच्या दोन ओळीतील अंतर 30X10 सेंमी. फुले प्रगती, आनंद 199 तंबाखूच्या एका ओळीची अंतर लागवडीची 90X75 सेंमी. लागवड करावी.

 15. खताची 40.120.0 हि संपुर्ण मात्रा एकाच वेळी दिली असता सर्वाधिक मात्रा एकाचवेळी दिली असता सर्वाधिक ऊत्पन्न ( 42.71 क्विंटल प्रती हेक्टर ) मिळाले परंतू ह्याच मात्रेबरोबर पालाश दिला असता भुईमूगाचे ऊत्पन्न वाढले परंतु ऊत्पादन वाढीमध्ये पालाशच्या प्रभाव आढळून आला नाही.

 16. भुईमूगाच्या पाने खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठी वाळलेल्या शेंगाच्या प्रती हेक्टर अधिक ऊत्पन्नासाठी फेनव्हालरेट 0.01 टक्के क्लोरोपायरीफॉस 0.08 टक्के यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाचे किडीच्या प्रादुर्भावापासून 15 दिवसाच्या अंतराने दोन फवारे द्यावे.

 

संपूर्ण खत मात्रा म्हणजेच नत्र 25 किलो प्रति हेक्‍टर, 125 किलो अमोनिअम सल्फेट किंवा 54 किलो युरियामधून द्यावी; तसेच हेक्‍टरी 50 किलो स्फुरद 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेटमधून द्यावे. याबरोबरच हेक्‍टरी दहा किलो झिंक सल्फेट व पाच किलो बोरॅक्‍स द्यावे. 50 टक्के फुलोरावस्थेत हेक्‍टरी तीन ते पाच क्विंटल जिप्सम द्यावे.