रबी ज्वारी

रबी ज्वारी-

 1. रब्बी ज्वारीच्या फुले रेवती वाणाने सध्याच्या वाणांपेक्षा सुमारे 20 ते 40 टक्के अधिक उत्पन्न दिले. या वाणाचे दाणे ठोसर व गोलाकार असून पांढ-या रंगाचे आहेत. या वाणाच्या भाकरीची प्रत मालदांडी वाणाइतकी चांगली असून हा वाण खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगांना प्रतिकारक असल्याने पश्चिम महाराष्टरातील बागायती भारी जमीनीवर लागवडीकरीता प्रसारीत करण्यात आला आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)

  रब्बी ज्वारीच्या फुले पंचमी या वाणाच्या लाह्यांचे प्रमाण सुमारे 15 ते 54 टक्के जास्त आहे. मक्याच्या लाह्यांच्या तुलनेत 5.8 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाण आहे. या वाणाच्या लाह्या मोठ्या प्रमाणावर फुलून रंगाने पांढ-या शुभ्र होत असल्याने त्याची प्रत इतर वाणांपेक्षा सरस आहे. हा वाण खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे. महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी खास लाह्यांसाठी हा वाण प्रसारित झाला आहे. (म.फु.कृ.वि.राहुरी)

  रबी ज्वारीच्या आर एस एल जी 262 माऊली हा वाण राहुरी येथून प्रसारीत. आवर्षन प्रतीकार क्षमता चांगली. हलक्या ते मध्यम जमीनीसाठी शिफारस. मालदांडीचे ऊत्पादनापेक्षा 19.7 टक्के व एस-3 पेक्षा 19.1 टक्के कडब्याचे 7-3 व 27.6 टक्के जादा ऊत्पादन.

 2. AKSV-00/3R हा वाण मालदांडी 35-1 व CSV-14R पेक्षा जास्त ऊत्पादन देणारा आहे.

 3. खरीप ज्वारीच्या ईनपुट आऊटपुट रेशो चांगला येण्यासाठी 40 कि.ग्रॅ. प्रती हेक्टरी पालाश हायब्रिड ज्वारीसाठी 20 कि.ग्रॅ. पालाश प्रती हेक्टरी लोकल वाणासाठी वापरण्याची शिफारस आहे.

 4. खरीप ज्वारी पावसावरती अवलंबून असलेल्या क्षेत्रात पोल्ट्री खत 1.5 टन प्रती हेक्टरी + बिजप्रक्रीया अँझोस्पायरीलम आणि पि.एस.बि.250 ग्रॅम + 50 टक्के शिफारस केलेली मात्रा (40.20 कि.ग्रॅ. नत्र व पालाश ) देण्याची शिफारस आहे.

  ज्वारी हे कोरडवाहू जमिनीमध्ये घेण्यात येणारे मुख्य पीक आहे. त्याकरिता 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रति हेक्‍टरी देणे आवश्‍यक आहे. यातील 40 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश म्हणजेच 200 किलो सुफला 20 :20 :00 + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 87 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीबरोबर द्यावे व उरलेले 40 किलो नत्र 87 किलो युरियाचे माध्यमातून पीक 25 ते 30 दिवसांचे झाल्यावर द्यावे.

  खरीप ज्वारी

  खरीप ज्वारीपासून अधिकतम नफा मिळण्यासाठी संकरीत ज्वारीच्या वाणासाठी ४० किलो पालाश व सुधारीत वाणासाठी २० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. (डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला)

  खरीप ज्वारीपासून अधिक नफा मिळण्याकरीता कोरडवाहू खरीप ज्वारीला प्रतीहेक्टरी १.५ टन कोंबडीचे खत अधिक अँझोस्पायरीलम अधिक पी.एस.बी. (२५० ग्रँम प्रत्येकी) अधिका ५० टक्के शिफारस केलेल्या रासायनिक खताची मात्रा (४०-२० किलो नत्र व स्फुरद) या प्रमाणात द्यावे. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत खरीप खोडकिड्यांच्या नियंत्रणाकरीता जैविक किटकनाशक (बी.टी.के) १ किलो या प्रमाणात २५ व ३५ व्या दिवशी फवारणी करावी. (डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला)

  मराठवाडा विभागातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये उन्हाळी ज्वारीचे अधिक धान्य व कडबा उत्पादनासाठी सी.एस.एच.१५ आर, मालदांडी किंवा फुले यशोदा या रबी वाणांची डिसेंबरच्या दुसरा पंधरवाडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्या पर्यंत पेरणी करावी. (म.कृ.वि.परभणी)

  मध्यम ते भारी काळ्या जमिनीवर (६०-९०सें.मी.) कोरडवाहू रब्बी ज्वारीचे अधिक धान्य आणि कडबा उत्पादन तसेच जास्तीचा आर्थिक नफा मिळविण्यासाठी बळीराम नांगराने दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. किंवा ६० सें.मी. किंवा सुधारीत वखराने ४५ सें.मी. अंतर ठेवून पेरणीपुर्वी १५ दिवस अगोदर स-या काढाव्यात आणि त्यात तिफणीच्या सहाय्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. सरीमध्ये केल्यानंतर रासनी करू नये. (म.कृ.वि.परभणी)

  खरीप ज्वारीचे अधिक उत्पादन व आर्थिक उत्पादन मिळविण्याकरीता खरीप ज्वारीला ३ टन शेणखत आणि १०० टक्के शिफारस केलेली रासायनिक खताची मात्रा (८०.४० किलो नत्र व स्फुरद प्रती हेक्टर) व सोबत अँझोटोबँक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू (२५० ग्रँम प्रती १०) बियाण्यास लावण्याची शिफारस करण्यात येत आहे. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  जमिनीतील ओलावा टिकवून रबी ज्वारीचे अधिक उत्पन्न मिळण्यासाठी शिफारस केलेली खत मात्र (४०.२०) नत्र आणि स्फुरद प्रती हेक्टर) आणि मातीचे आच्छादन (२ वेळा कोळपणी) किंवा शिफारस केलेली खत मात्रा आणि सेंद्रीय आच्छादन (पेरणी नंतर तीन आठवड्यांनी काडी, कचरा, धसकटे इ. ज्वारीच्या दोन ओळीमध्ये करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उत्तम शेणखत (०.७५ टन शेणखत अधिक २० किलो नत्र प्रती हेक्टर) अधिक मातीचे आच्छादन (दोन वेळा कोळपणी) किंवा उत्तम शेणखत अधिक सेंद्रीय आच्छादन यांची शिफारस करण्यात येत आहे. (म.कृ.वि.परभणी)

  हमखास पाऊस पडणा-या विभागात मध्यम, खोल काळ्या जमनीमध्ये मूग, उडीद किंवा सोयाबीन एमएयुएस-४७ सारख्या लवकर येणा-या वाणानंतर रबी ज्वारी, शिफारस केलेल्या खतांच्या मात्रेसह (४०.२ किलो नत्र अधिक स्फुरद प्र.हे.) घेण्याची शिफारस करण्यात येत आहे. (म.कृ.वि.परभणी)

  रबी ज्वारीवरील खोडमाशीचे नियंत्रण, धान्याचे जास्तीत जास्त उत्पादन आणि खर्चाच्या तुलनेत मिळणा-या फायद्याचे महत्तम गुणोत्तर मिळविण्याकरीता थायोमेथोझम ७० डब्ल्युएस, १० ग्रँम प्रती किलो. किंवा इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यु.एस. १० ग्रँम प्रती किलो याप्रमाणे बिजप्रक्रीया करण्याची शिफारस करण्यात येत आहे. (डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला)

  बाजरी-सोयाबीन पीक फेरपालट पध्दतीमध्ये खरीप बाजरी पिकास शिफारस केलेले ५० टक्के नत्र (३० किलो प्रती हेक्टर) युरीया खतातून व ५० टक्के नत्र गांडूळ खताद्वारे (३० किलो प्रती हेक्टर) बियाणे. पुढील खरीप हंगामातील सोयाबीन पिकास शिफारस केलेल्या रासायनिक खतांच्या ५० टक्के नत्र व स्फुरद (२५ किलो नत्र अधिक २७.५० किलो प्रती हेक्टर) अवर्षण प्रवण धुळे विभागातील पर्जन्य गट ३ व ४ साठी शिफारस करण्यात येत आहे. (म.फु.कृ.वि.राहूरी)

  फुले अनुराधा हि जात सिलेक्शन -3 या वाणापैक्षा 51.1 टक्के जास्त धान्य उतपादन देणारा असुन खोडमाशीस प्रतिकारक आहे. धान्य व चा-याची प्रत उत्तम असून हा वाण पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या जमीनीसाठी शिफारस करण्यात येत आहे.