कांदा

कांदा-

  1. खरीप हंगामात फुले सफेद या वाणाच्या अधीक उत्पादनासाठी लागवड 15 X 10 से.मी. अंतरावर करावी आणि 100 : 50 : 50 किलो प्रती हेक्टरी नत्र : स्फुरद : पालाश द्यावे —- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अवर्षण प्रवण विभाग संशोधन अहवाल, विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समीती बैठक खरीप हंगाम 1995 – 96

  2. काढणीपूर्व 15 दिवस अगोदर कांद्याच्या बसवंत 780 आणि ऍग्री फाईड डार्क रेड या जातीवर मॅलिक हायड्राझाईड 2000 PPM तीव्रतेच्या फवारणीमुळे 90 दिवसांच्या साठवणूकीच्या काळात कोंब फुटणे आणि कुजण्यामुळे होणारे नुकसान कमी झाले.

  3. संजीवकांचा वापर करून डेंगळ्यांची संख्या कमी करण्याच्या प्रयोगामध्ये पिंपळगाव बसवंत येथे असे अढळुन आले की बसवंत 780 या जातीमध्ये लागवडीनंतर 85 दिवसांनी इथेपॉन या संजीवकाची 4000 PPM ची फवारणी केली असता डेंगळ्यांची संख्या (2.25 %) तुल्यापेक्षा कमी होते.

  4. देशातील निर्यातक्षम अशी पहीली सुधारीत जात RHR87015 (फुले सुवर्णा) ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी विकसीत केली असुन स वाणाचे कांदे पीवळ्या रंगाचे, मध्यम आकाराचे आणि साठवणीस चांगल्या गुणधर्माचे परदेशी बाजारपेठेसाठी चांगला. महाराष्ट्रातील कांदा पीकवणा-या भागासाठी पूर्वप्रसारीत. RHR 200 X RHR 155 यांचा संकर.

  5. फुले सफेद ही जात कांद्याची पावडर तयार करण्यासाठी शिफारस केलेली आहे.

  6. फुले समर्थ(एस-1) खरीप व रांगडा कांदा गर्दलाल, उभट गोल साठवणुकीस चांगली जात लागवडीस शिफारस केली(जुन 2004)

माना पडण्यापूर्वी शेतात कांद्याच्या पातीवर मॅलिक हायड्रॉक्‍साईड २५०० ते ३००० पी.पी.एम. फवारल्यास कांद्याना कोंब फुटण्यास प्रतिबंध होतो आणि वजनात घट कमी येते.

कांदा चांगला पोसण्यासाठी लागवडीनंतर ४५ दिवसांनी एपीक्वॉट क्‍लोराईट २०० पीपीएम तीव्रतेचे फवारावे.
नॅपथिलीन ऍसेटिक ऍसिड, इंडोल ऍसेटिक ऍसिड, इंडोल ब्युटेरिक ऍसिड ही संजीवके १००, २०० किंवा ३०० पी.पी.एम. या प्रमाणात फवारल्यास पानांची संख्या व कांद्याचे वजन वाढते.

फुले सफेद या पांढ-या कांद्याच्या वाणाची लागवड उन्हाळ्यातील मे व जून महिने वगळता वर्षभर करता येते. अधिक उत्पादनासाठी खरीप हंगामात फुले सफेद या वाणाच्या रोपांची लागवड १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या दरम्यान करावी. तसेच रब्बी हंगामासाठी रोपांची लागवड १ नोव्हेंबरला करावी. त्याचप्रमाणे उन्हाळी हंगामाकरीता रोपांची लागवड १५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत करावी. रोपांच्या लागवडीकरीता बियाण्यांची पेरणी रोपवाटीकेत ७-८ आठवड्यापूर्वी करावी अशी शिफारस करण्यात येत आहे.

रबी हंगामात कांदा जातीचे अधिक उत्पादन मिळणा-या (३९५ कि/हे.) एन. २-४-१ या वाणांचे प्रती हेक्टरी १२.५ कि. बियाणे (किंवा ७.५ ग्रँम बियाणे प्रती ३X३ मिटरच्या वाफ्याकरीता) १५ सें.मी. अंतरावर ओळीने पेरावे अशी शिफारस करण्यात येत आहे.

बडीशेप पिकाच्या जास्त उत्पादनासाठी प्रती हेक्टरी १०० किलो स्फुरद, ५० किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात येत आहे. पेरणी करतांना संपुर्ण स्फुरद व पालाश आणि नत्राची अर्धी मात्रा द्यावी. उरलेले अर्धे नत्र पेरणी केल्यानंतर पिकाला ३० दिवसांनी द्यावे.

कांदा (Palandu)

वर्णन
प्रसिध्द आहारोपयोगी कन्द, ६० सेमी, ते १ मीटर उंचीचे द्विवर्षायूक्षुप. पाने लांब मांसल पोकळ. पुष्प लांब आणि हिरव्या पुष्पदण्डाच्या अग्रभागी येणारी सवृन्त येणारी पांढरी क्वचित त्यांच्याबरोबर कलिकाकंद येतो.

फळ तीन कप्पे असलेले स्फुटनशील. बीज त्रिकोणी काळे, हिवाळ्यात फुले व नंतर फळ येतात. भारतात सर्वत्र आढळतो.
औषधगुणधर्म
वेदनास्थापन, शोथहर, लेखन, व्रणशोथपाचन आणि त्वगदोषहर असल्याने वातवाहिन्यांचा शूल व व्रणावर गरम कल्क, मुखरोगांवर स्वरस किंवा कल्काचा लेप, दृष्टिशक्तिकर असल्याने स्वरस आनि मधाचे अंजन व कर्णशूलावर गरम रसाचे थेंब कानात घालावेत.

रक्तस्तंभन असल्याने रक्तार्श व नाकातून रक्त येत असल्यास, तसेच उत्तेजक व शोथघ्न असल्याने हृदयदुर्बलता व सूज यावर उपयोग होतो तसेच वाताहर आणि वेदस्थापन असल्याने संधिवात, गृध्रसी (sciatica), आचके येणे (फिट येणे), यावर आणि मूत्रजनन असल्याने मूत्र त्रास असल्यास, शुक्रदौर्बल्यात, याचा उपयोग होतो. बल्य व ओजोवर्धक असल्याने सामान्य दौर्बल्य आणि प्लेग या रोगात प्रतिकारशक्ति वाढविण्यास तसेच लेखन आणि वाजीकर म्हणून बीज उपयुक्त.