सोयाबीन

सोयाबीनवर गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, नियंत्रणासाठी कोणते उपाय करावेत?
पावसाळा सुरू असल्याने या वातावरणात गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. गोगलगायी घास, द्राक्ष, वाल, कारली, भोपळा, काकडी, टोमॅटो, लसूण, मिरची, भुईमूग, भेंडी, फुलकोबी, सोयाबीन इत्यादी पिकांची रोपे कुरतडतात. पावसाळ्यात त्या चारीलगत, बांधालगत असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. अंड्यातून बाहेर आल्यानंतर सुरवातीच्या वाढीच्या काळात गोगलगायींचा खाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे सुरवातीच्या काळात पिकांचे जास्त नुकसान करतात.
एकात्मिक नियंत्रणाचे उपाय –
1) शेतालगतचे बांध स्वच्छ करावे. 2) गोगलगायी दिसताच चिमट्याने अथवा हाताने गोळा करून उकळलेल्या पाण्यात टाकून माराव्यात. 3) संध्याकाळी शेतामध्ये ठराविक अंतरावर गवताचे ढीग ठेवावेत व सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून त्यांचा नाश करावा, तसेच पिकांच्या मुळाशेजारी गोगलगायींनी घातलेली पिवळसर पांढऱ्या रंगाची (100 ते 150च्या पुंजक्‍यात) साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत. 5) दहा लिटर पाण्यात एक किलो गूळ मिसळावा व त्या द्रावणात गोणपाटाची पोती भिजवून संध्याकाळी गोगलगायीग्रस्त शेतात ठराविक अंतरावर पसरावीत. गोगलगायी अशा पसरलेल्या पोत्यांखाली जमा होतात, सकाळ होताच त्यांचा वेचून नाश करावा. 6) सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खड्ड्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकावी. 7) जास्त उपद्रव असल्यास शेताभोवती दोन मीटर पट्ट्यात राख पसरून त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना 2ः3 या प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा किंवा बांधाच्या शेजारी तंबाखू अगर चुन्याच्या भुकटीचा चार इंच पट्टा टाकावा, त्यामुळे गोगलगायींना शेतात येण्यापासून अटकाव करता येईल. पाऊस पडत असल्यास या पद्धतीचा उपयोग होत नाही. 8) मेटाल्डीहाईड कीडनाशकाच्या गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत. प्रादुर्भाव असलेल्या शेतात संध्याकाळच्या वेळी पाच किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शेतात टाकल्यास, त्या खाऊन गोगलगायी मरतात. 9) विषारी आमिष देऊनही गोगलगायी मारता येतात, त्यासाठी गव्हाचा किंवा भाताचा 50 किलो कोंडा दोन किलो गुळाच्या द्रावणामध्ये 10 ते 12 तास भिजवून ठेवावा. त्यामध्ये 25 ग्रॅम यीस्ट मिसळावे. या मिश्रणात मिथोमिल कीटकनाशकाची 50 ग्रॅम भुकटी मिसळून संध्याकाळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रात प्रति हेक्‍टरी पसरून टाकावे. मिथोमिल हे
विषारी कीटकनाशक असल्यामुळे त्याचा वापर करताना प्लॅस्टिकचे हातमोजे घालावेत आणि नाका-तोंडावर कापड बांधावे. हे आमिष जनावरे व पाळीव प्राणी खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 10) सामूहिक प्रयत्न केल्यास प्रभावी नियंत्रण होते.

पिके

पिके
राष्ट्रीय कृषी विमा योजना
सर्वकष पीक विमा योजनेची पीक कर्ज घेणाय्रा शेतकय्रांपुरते मर्यादीत स्वरूप बदलून कर्जदार तसेच बिगर कर्जदार अशा सर्वच शेतकय्रांना सहभागी करून घेणारी राष्ट्रीय कृषी विमा योजना हि सुधारीत स्वरूपात सन १९९९-२००० च्या रब्बी हंगामापासुन राज्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये विमा संरक्षित रकमेवरील मर्यादा (रू. १००००) रद्द होऊन पेरणी केलेल्या संपूर्ण क्षेत्राला विमा संरक्षण देण्याची तरतुद या राष्ट्रीय कृषी विमा योजनेत करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत सन १९९९-२००० रब्बी ते सन २००६-०७ खरीप हंगामापर्यंत रूपये ९२४ कोटींची नुकसानभरपाई अदा करण्यात आलेली आहे.
प्रमुख उद्देश
१) नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच कीड व रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकय्रांना सदरील योजनेच्या माध्यमातुन आर्थीक मदत देणे. २) शेतकय्रांच्या शेतामध्ये प्रगत तंत्रज्ञान तसेच योग्य त्या निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहित करणे. ३) आपतीसमयी शेतकय्रांना आथिक स्थैर्य देण्यामध्ये मदत करणे.
योजनेत भाग घेण्यासाठी पात्र शेतकरी
१) योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकय्रांना भाग घेता येतो. २) राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये शेतकय्रांकरिता खातेदारांच्या व्यतिरीक्त कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
१) नविन पिकांचा समावेश करून योजनेची व्याप्ती वाढविलेली आहे. ऊस, मुग, उडीद, कापूस, मका व कांदा पिकांचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे. २) विमा संरक्षित रकमेवरील मर्यादा काढुन टाकलेली आहे. ३) विमा संरक्षित रकमेची व्याप्ती वाढून त्याची सांगळ सरासरी उत्पन्न व किमान आधारभुत किमतीशी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रति हेक्टरी पीक कर्जदाराचे विमा संरक्षित रकमेवरील बंधन आपोआप नाहिसे होते. ४) शेतकय्रांना सर्वसाधारन जादा पीक संरक्षित रक्कम (सरासरी) उत्पन्नाच्या १५० टक्क्यापर्यंत विमा उपलब्ध आहे. ५) विविध पिकांचे राजस्व मंडळनिहाय उंबरठा उत्पन्न हे त्यापिकांचे मागील ३ ते ५ वर्षांचे सरासरी उत्पन्न आणि त्या पिकांचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित करण्यात येते. ६) अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी पीक विमा हप्ता रकमेत १० टक्के अनुदान आहे.
योजनेत समाविष्ट पिके
१) तृणधान्यः- भात, खरीप व रब्बी ज्वारी, बाजरी, नाचनी, मका, गहू.
२) कडधान्यः- तुर, उडीद, मुग, हरभरा.
३) गळीतधान्यः- भुईमूग, सोयाबीन, करडई, सुर्यफूल, तीळ, कारळे.
४) व्यापारी पिकेः- ऊस, कापूस, कांदा.
पीक विमा संरक्षित रकमेचे प्रमाण
योजनेमध्ये विमा संरक्षित रकमेवर कोणत्याही प्रकारची मर्यादा दिलेली नाही. संबंधित शेतकरी त्याच्याकडे असलेल्या जमिनीच्या क्षेत्राच्या आधारे विमा संरक्षण घेऊ शकतो. प्रति हेक्टरी किमान विमा संरक्षण हे सरासरी उत्पन्नाच्या ६० टक्के किंवा ८० टक्के (या उत्पन्नाला उंबरठा उत्पन्न म्हणतात) गुणिले किमान आधाभूत किमतीवर आधारित असून ३ / ५ वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणिले किमान आधाभूत किंमत यांच्यापेक्षा १५० टक्क्यांपर्यंत रकमेवर कमाल विमा संरक्षण घेता येईल. क्षेत्राची व रकमेची मर्यादा नाही.
विमा हप्ता दर: विमा हप्त्यांचे सर्वसाधारण दर खालीलप्रमाणे राहतील.
अ) खरीप हंगाम:
बाजरी व तेलबिया ३.५० टकके किंवा वस्तुनिष्ट दर यापैकी जो कमी असेल तो दर.
उर्वरित खरीप पिके: २.५० टकके किंवा वस्तुनिष्ट दर यांपैकी जो कमी असेल तो दर.
रब्बी हंगाम: गहू १.५० टकके किंवा वस्तुनिष्ट दर यापैकी जो कमी असेल तो दर.
उर्वरित रब्बी पिके: २.०० टकके किंवा वस्तुनिष्ट दर यापैकी जो कमी असेल तो दर.
वार्षिक,व्यापारी व फळवर्गीय पिके: वस्तुनिष्ट दर
विमा हप्त्यावर शासनाकङून मिळणारे अनुदान: या योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकय्रांसाठी १० टकके अनुदान देण्यात येते.
अल्प भूधारक: १ ते २ टकके हेक्टरपर्यंत धारण केलेले क्षेत्र.
अत्यल्प भूधारक: १ हेक्टरपर्यंत धारण केलेले क्षेत्र.
पीक विमा योजनेची अंमलबजावणी: पीक विमा योजना लागू करण्यासाठी मका, कांदा व ऊस  पिकांकरिता तालुकास्तरावर व इतर पिकांसाठी महसूल मंङळ हे घटक ठरविण्यात आलेले आहेत. पीक कापणी प्रयोगांवर आधारित सरासरी उत्पन्न त्या मंङळ / तालुक्यांचे  उत्पन्न राहिल.
नुकसानभरपाई ठरविण्यासाठी पध्दती
नुकसानभरपाई ठरवितांना चालू वर्षी असलेल्या सरासरी उत्पन्नाची तुलने ही त्या मंडळ / तालुक्याच्या उंबरठा उत्पन्नाशी करण्यात येते.
नुकसानभरपाई ठरविण्याचे सूत्र
नुकसान भरपाई=   (उंबरठा उत्पन्न – आलेले चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न/   उंबरठा उत्पन्न )
× विमा संरक्षित रक्कम
विदर्भातील ६ जिल्ह्यांतील शेतकय्रांना पॅकेजव्दारे विशेषबाब म्हणून पीक विमा योजनेव्दारे देण्यात आलेली सवलत.
विर्दभात घेण्यात येत असलेल्या पिकांचे उंबरठा उत्पन्न हे बहुतांशी ६० टक्के जोखीमस्तरावर ठरविले जात असल्याने परिणामी देय नुकसानभरपाई प्रमाणही कमी राहात असून शेतकय्रांना नैसर्गीक आपत्तीमुळे पिकांचेनुकसान होउनही अपेक्षेइतकी नुकसानभरपाई मिळू शकत नाही. योजनेतील या प्रमुख त्रुटींवर मात करण्यासाठी शासनाने विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ व वर्धा या ६ जिल्ह्यातील शेतकय्रांनसाठी विशेषबाब म्हणून कापूस पिकांचे उंबरठा उत्पन्न ८० टक्के जोखिमस्तरावर निश्चित करून त्यासाठी जो ज्यादा विमा हफ्ता दर शेतकय्रांना द्यावा लागेल तो द्यावा लागू नये म्हणून अल्प व अत्यल्प भुधारक शेतकय्रांना देण्यात येणारे अनुदान १० टक्क्यानऐवजी ७५ टक्के व इतर शेतकय्रांना यापूर्वी अनुदान देय नसतांना ५० टक्के अनुदान पॅकेजव्दारे घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतर पिकांसाठी मात्र उंबरठा उत्पन्न पातळी सर्वसाधारण येणाय्रा जोखीमस्तराप्रमाणे ठेवण्यात आलेली आहे, परंतु अल्प व अत्यल्प भूधारक शेतकय्रांना १० टक्के अनुदानाऐवजी ५० टक्के अनुदान देण्याबाबतची पॅकेजव्दारे तरतुद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी करावयाची कार्यवाही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकय्रांसाठी विमा प्रस्ताव सादर करावयाचे वेळापत्र
उच्च न्यायालय / सर्वोच्च न्यायालयाचे अंतरिम आदेशानुसार कर्जदार शेतकय्रांना पीक विमा योजना सक्तीची नाही. कर्जदार शेतकय्रांना योजना ऐच्छिक झाल्यामुळे बँका कर्जदार शेतकय्रांचा विमा हप्ता वसुलकरून विमा प्रस्ताव विमाकंपनीस पाठविणार नाहीत. कर्जदार शेतकय्रांना नविन नियमानुसार पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठीची पद्धती बिगर कर्जदार शेतकय्रांप्रमाणे राहनार आहे. कर्जदार शेतकय्रांना बिगर कर्जदार शेतकय्रांप्रमाणे विमा प्रस्ताव पत्र विमा हप्त्यासह ३१ जुलै २००७ पर्यंत बँकाकडे भरून योजनेत सहभागी व्हावे लागेल. (बँका पूर्वीप्रमाणे स्वतः कार्यवाही करणार नाही). कर्जदार शेतकय्रांनी स्वतः (ऐच्छिकरित्या) विमा प्रस्ताव पत्रक विमा हप्त्यासह बँकाकडे भरल्यानंतरच विमा संरक्षण मिळणार आहे.
शेतकय्रांनी घेतलेले पीक कर्ज व विमा योजनेतील सहभाग एकमेकांशी निगडीत राहीलेले नाही. योजनेतील नविन बदल पीक वीमा योजनेची अंमलबजावणी करणारे सर्व संबंधित बँका, जिल्हाधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यांना कृषी आयुक्तालयामार्फत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे सुधारीत वेळपत्रक पुढीलप्रमाणे आहे.
  • सर्व शेतकय्रांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) विमा प्रस्ताव बँकाना सादर करणेः ३१ जुलै २००७ (चालु वर्षी मुदत दिनांक ३१-०८-२००७ पर्यंत वाढविली आहे.)
  • बँकानी विमा प्रस्ताव कृषी विमा कंपनीस पाठविणेः ३१-०८-२००७ योजनेच्या अधिक माहितीसाठी क्षेत्रीय पातळीवर कोणाशी संपर्क साधावा ?
१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, २) राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा, ३) नजीकच्या विविध कार्यकारी सोसायट्या, ४) कृषी खात्याची मंडळ / तालुका / उपविभाग आणि जिल्हा स्तरावरील कार्यालये, ५) जिल्हाधिकारी कार्यालये.

सल्ला

सं प्रश्‍ तज्ज्ञांनी दिलेला सल्ला


काजू बोंडापासून बनणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांविषयी माहिती द्यावी. काजू बी आणि काजू बोंडे ही काजू पिकामध्ये दोन महत्त्वाची उत्पादने आहेत आणि काजू बीच्या सहा ते सात पट बोंडांचे उत्पादन मिळते. काजू बोंडाच्या रसामध्ये औषधी गुणधर्म असतात. जसे कातडीचे रोग (स्कर्वी), हगवण, स्त्रियांच्या गर्भाशयाच्या तक्रारी यांवर काजू बोंडाचा रस गुणकारी आहे. कॉलरा रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून तो वापरतात. काजू बोंडांच्या रसाचे नियमित सेवन केल्यास डोळे नेहमी पाणीदार राहतात. बाळंतपणात स्त्रियांनी काजू बोंडांचा रस घेणे फायदेशीर आहे. हे औषधी व पौष्टिक फळ (बोंड) असल्याने त्यावर प्रक्रिया करून, टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. काजू बोंडांपासून बनविण्यात येणारे टिकाऊ पदार्थ – 1) काजू बोंडांचे ताजे पेय (आरटीएस). 2) काजू बोंडांचे सरबत. 3) काजू बोंडांचा जॅम. 4) काजू बोंडांची कॅण्डी. 5) काजू बोंडांचे लोणचे. 6) काजू बोंडांची पावडर. 7) काजू बोंडांची टॉफी.
हे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्याविषयी अधिक माहिती प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग (संपर्क ः 02366 – 262234, 262693) येथे किंवा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे (02358) 280233, 280238 येथे संपर्क साधावा.


माती परीक्षण का करावे? कसे करावे? त्यामुळे काय फायदे होतात? जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन पिकांना त्यांच्या आवश्‍यकतेनुसार अतिरिक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा करता यावा यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यावरून पिकांना खतांचा योग्य प्रमाणात वापर करणे सोपे होते; तसेच कोणत्याही फळझाडांची लागवड करण्यापूर्वी जमिनीची योग्यता तपासून पाहणे शक्‍य होते. त्यावरून ती जमीन फळपिकासाठी योग्य वा अयोग्य याचा अंदाज घेता येतो. परीक्षणासाठी मातीचा नमुना घेण्यास टिकाव, कुदळ, सब्बल, फावडे, खुरपी किंवा स्क्रू-अगर (गिरमिट), घमेला, गोणपाट, पिशव्या आदी साहित्य लागते. पाण्याच्या पाटाजवळील जागा, विहिरीजवळील जागा, गुरे-ढोरे बसण्याची जागा, जुने बांध, कुंपणाजवळील जागा, नुकतीच खणलेली जागा, खतांच्या ढिगाऱ्याजवळील अथवा खड्ड्याजवळील जागेतून मातीचा नमुना घेऊ नये. भात, भुईमूग, ज्वारी, गहू इत्यादी पिकांसाठी 15 ते 20 सें.मी.; तसेच कपाशी, ऊस, केळीसाठी 30 सें.मी., तर फळझाडांसाठी बुंध्यापासून एक ते 1.5 फूट जागा सोडून बाहेरच्या परिघामधून 30 सें.मी. खोलीपर्यंतचा नमुना घ्यावा. नमुना उन्हाळ्यात 15 एप्रिल ते 15 मेपर्यंत घ्यावा. यामुळे माती परीक्षण अहवाल व त्याद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन पीक लागवडीपूर्वी मिळेल.
मातीचा नमुना घेताना संपूर्ण शेतीच्या मातीचा रंग, खोली, उतार याप्रमाणे भाग पाडावेत. हे भाग प्रत्येकी एक ते 1.5 हेक्‍टर क्षेत्राचे असावेत. प्रत्येक भागातील एक ते 1.5 हेक्‍टर क्षेत्रातून प्रत्येक क्षेत्रासाठी आठ ते दहा ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावर, वेगवेगळ्या दिशेने, म्हणजे थोडे सरळ, थोडे आडवे, थोडे तिरकस अशाप्रकारे स्थान निश्‍चित करावे व तेथे लाकडी खुंट्या ठोकाव्यात. नमुना घेताना त्या जागेवरील पालापाचोळा व काडीकचरा स्वच्छ करावा. नमुना घेताना त्या जागेवर 15 ते 20 सें.मी. खोलीचा व 15 ते 20 सें.मी. जमिनीवरील लांबीचा “व्ही’ इंग्रजी अक्षरासारखा खड्डा खोदावा. या खड्ड्यातून दोन्ही बाजूंनी 2.5 सें.मी. जाडीचा मातीचा थर पृष्ठभागापासून तळापर्यंत तिरकस दिशेने काढावा. साधारणपणे 2.5 सें.मी. जाडीची जमिनीच्या पृष्ठभागापासून ते खालील तळापर्यंतची माती नमुन्यासाठी दोन्ही बाजूंनी काढावी व गोणपाटावर जमा करावी. जमिनीच्या फरकानुसार प्रत्येक विभागातील आठ ते दहा नमुने घ्यावेत.
घेतलेले नमुने गोणपाटावर उत्तम प्रकारे एकत्रित करावेत. त्यातील लहान-मोठे दगड, पिकांची मुळे व त्यांचे अवशेष वेगळे करावेत. त्यानंतर त्या एकत्रित आठ ते दहा नमुन्यांच्या मातीचे चार समान भाग करावेत. गोणपाटाच्या चार ठिकाणी चारही नमुने समान भागात ठेवावेत. विरुद्ध बाजूचे समोरासमोरील कोणतेही दोन भाग एकत्रित करावेत. या एकत्रित भागामधून 500 ग्रॅम आदर्श नमुना कापडी पिशवीत ठेवावा व इतर राहिलेले विरुद्ध बाजूचे दोन भाग फेकून द्यावेत. शिल्लक राहिलेली माती कापडी पिशवीमध्ये भरावी.
पिशवीच्या लेबलवर नमुना क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, शेतकऱ्याचे पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, सर्व्हे नंबर, जमिनीचा उतार, पाण्याचा निचरा, पूर्वी घेतलेले पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीची खोली (सें.मी.), ओलित / कोरडवाहू, नमुना घेतलेल्या जमिनीचे प्रातिनिधिक क्षेत्र ही माहिती नोंदवावी. हा नमुना संपूर्ण माहितीसह कृषी विभागाच्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवावा.

माती परीक्षणाचे फायदे –
पीक पेरणीपूर्वी जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी पूर्ण माहिती होते. त्यानुसार पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते.
अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रा देऊन अनावश्‍यक खर्च टाळता येतो.
जमिनीचा सामू नियंत्रित (6.5 ते 7.5) ठेवून पिकांची अन्नद्रव्यांची शोषणक्षमता वाढवता येते.
उत्तम प्रकारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येत असल्याने पीक संवर्धनावरील खर्च वाचतो. जमिनीचे गुणधर्म टिकवून ठेवण्यास मदत होते.

मिश्र खत कसे तयार करतात? पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या दोन किंवा अधिक अन्नद्रव्ययुक्त खतांच्या मिश्रणाला मिश्रखत म्हणतात. दोन अन्नद्रव्ये असणाऱ्या संयुक्त खतांचे मिश्रण करूनही मिश्रखत तयार करता येते. शेतावरच मिश्रखत तयार करण्याची पद्धत – कोणत्याही विशिष्ट उपकरणांचा वापर न करता सरळ खतांचे मिश्रण करून मिश्रखते शेतावर तयार करता येतात. ही पद्धत आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. अशा तऱ्हेचे मिश्रण सिमेंट कॉंक्रिटचा पृष्ठभाग असणाऱ्या ओट्यावर तयार करता येते. यासाठी फावडे, चाळणी, लाकडी हातोडा, तराजू इत्यादी साहित्य पुरेसे होते. मिश्रखत पेरणीपूर्वी एक दिवस अगोदर तयार करावे. जेणेकरून त्यामध्ये खडे तयार होणार नाहीत. ठराविक मिश्रखत तयार करण्यासाठी आवश्‍यक असणारी सरळ खतांची मात्रा काढणे सुलभ आहे. उदा. ः एक टन 4-8-15 या ग्रेडचे मिश्रखत करायचे झाल्यास अमोनिअम सल्फेट, सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा पुढीलप्रमाणे काढता येते ः 100 किलो 4-8-15 ग्रेडचे मिश्रखत करण्यासाठी, म्हणजेच मिश्रखतामध्ये चार टक्के नत्र, आठ टक्के फॉस्फेट आणि 15 टक्के पोटॅश असण्यासाठी सरळ खतांची मात्रा पुढीलप्रमाणे काढावी. त्यानंतर एक टन मिश्रखत तयार करण्यासाठी आलेल्या सरळ खतांच्या मात्रेस दहाने गुणावे. अशा तऱ्हेने एक टन 4-8-15 ग्रेडचे मिश्रखत तयार करण्यासाठी 200 किलो अमोनिअम सल्फेट, 500 किलो सुपर फॉस्फेट आणि 250 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 50 किलो फिलरची गरज असते.
नत्र = 4 द 100 क्क 20 = 20 किलो अमोनिअम सल्फेट
स्फुरद = 8 द 100 क्क 16 = 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट
पालाश = 15 द 100 क्क 60 = 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश
100 किलो मिश्रखत = 95 किलो सरळ खत + पाच किलो फिलर
तयार करताना घ्यावयाची काळजी –
1) अमोनिया असणारी सरळ खते. उदा. – अमोनिअम सल्फेट, अमोनिअम नायट्रेट इत्यादी खते, बेसिक स्लॅग, फॉस्फेट रॉक या खतांसोबत मिसळल्याने नत्राचा वायूरूपात ऱ्हास होत असल्यामुळे ती मिसळू नयेत. 2) पाण्यात विद्राव्य स्फुरदयुक्त खते उदा. ः सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, अमोनिअम फॉस्फेट ही खते मुक्त चुना असणाऱ्या खतात मिसळल्याने विद्राव्य फॉस्फेट अविद्राव्य स्वरूपात बदलण्याची शक्‍यता असते आणि हा अविद्राव्य फॉस्फेट पिकांना उपलब्ध होत नाही. 3) सहज विद्राव्य होणारी आणि हवेतील बाष्प शोषून घेणारी खते. उदा. ः कॅल्शिअम, अमोनिअम नायट्रेट, युरिया इत्यादी खते मिसळल्यानंतर त्यात ढेकळे किंवा खडे तयार होतात; त्यामुळे अशा खतांचे पेरणीच्या थोडा वेळ अगोदर मिश्रण तयार करावे. सर्व प्रकारची नायट्रेट धारण करणारी खते, युरिया, पोटॅशिअम सल्फेट किंवा क्‍लोराइड्‌स खतांत मिसळल्यानंतर ती त्यांच्या जलाकर्षक गुणधर्मामुळे हवेतील पाणी शोषून घेतात व कठीण होतात, म्हणून अशा प्रकारची खते जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नयेत व ती केल्यास लगेचच पिकांना द्यावीत. द्रवरूप मिश्रखतांचा वापर फळबागा, भाजीपाला पिकांमध्ये करता येतो.


शेततळ्यासाठी अस्तरीकरण करायचे असल्यास कसे करावे? शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे असते. त्यासाठी बेन्टोनाईट, माती-सिमेंट मिश्रण, दगड-विटा-सिमेंट मिश्रण, चिकण माती किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. प्लॅस्टिक फिल्मची जाडी 300 ते 500 जी.एस.एम. असावी. सिमेंट व माती प्रमाण 1ः8 व जाडी पाच सें.मी. ठेवावी. शेततळे हे काळ्या खोल जमिनीत बांधले असेल, तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते, त्यामुळे शेततळ्यातील पाणी कमी होते; गाळाचे प्रमाण वाढते. यामुळे काही कालांतराने शेततळ्याची पाणी साठवणक्षमता कमी होते. असे होऊ नये म्हणून शेततळे घेण्यापूर्वी मृद्‌ व जलसंधारणाचे उपाय करावेत.


कांदा पिकाचे थंडी धुक्‍यापासून संरक्षण कसे करावे? कांदा लागवडीपासून दीड ते दोन महिन्यांत रात्रीचे तापमान दहा अंश से.च्या खाली गेले आणि सतत हेच तापमान 10 ते 12 दिवस राहिले तर कमी तापमानास संवेदनशील जातींमध्ये डोंगळे दिसतात. म्हणून हंगामानुसार योग्य जातींची लागवड करणे आवश्‍यक असते. धुके किंवा थंडीपासून कांदा पिकाला वाचविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कांद्याला तुषार सिंचनाचा वापर केला आहे त्यांनी ज्या दिवशी धुके, थंडी व दव जास्त असेल तेव्हा तुषार सिंचन संच सकाळच्या वेळी पाच ते दहा मिनिटे चालवावा. त्यामुळे कांदा पातीवर जमा असलेले दव पाण्याने धुतले जाईल. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण कमी होईल.
तुषार सिंचन नसेल त्या ठिकाणी स्प्रे पंपाने पाण्याची फवारणी करावी. धुके किंवा दव अशा अवस्थेमध्ये कांद्यावरील रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारशीत बुरशीनाशकाची स्टिकर मिसळून फवारणी करावी. सपाट वाफ्यात किंवा सरी वरंबा अथवा ठिबक वर कांदे लावले असतील तर हलके पाणी द्यावे. संध्याकाळी शेतात आठ ते दहा ठिकाणी ओला कचरा किंवा गवत जाळले तर शेतात रात्री धुराचे आवरण तयार होते. या आवरणामुळे शेतात उष्णता राहते. त्यामुळे थंडी, धुके व दव कांद्याच्या पातीवर जमत नसल्याने पिकाचे नुकसान होत नाही.


परसातील कोंबडीपालनासाठी कडकनाथ जातीच्या कोंबडीविषयी माहिती हवी, त्या कोठे मिळतील? कडकनाथ जातीच्या कोंबड्या मध्य प्रदेशातील झाबुआ व धार जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आढळतात. या कोंबडीचे मांस हे काळेशार असते. मांसातील प्रथिनांचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असून, रोगप्रतिकारशक्ती दणकट असते. या जातीच्या कोंबड्यांतील गुणसूत्रांमुळे त्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा तग धरून राहतात. गावकुसाबाहेर चरून कमी खर्चात हा पक्षी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो. सफल अंडी उत्पादन 55 टक्के असून, अंडी उबवणूक क्षमता 52 टक्के एवढी असते.


शेडनेट तयार करायचे आहे, कसे करावे? शेडनेटची उभारणी प्रामुख्याने उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी केली जाते, त्यामुळे शेडनेट उभारताना पुढील महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. शेडनेटमुळे हवा, आर्द्रता या घटकांवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होते, म्हणून त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. शेडनेट सांगाड्याशी ताणून बसवायला हवी. शेडनेटचा धागा तुटू नये याची काळजी घ्यायला हवी. सांगाड्याला थोडा उतार असणे आवश्‍यक आहे, त्यामुळे पावसाचे पाणी सरळ खाली न येता शेडनेटच्या धाग्यांवरून ओघळत खाली येते व पाण्याचा वेग कमी करता येईल. शेडनेटचे फाउंडेशन व सांगाडा उभारणी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाइपाचा सांगाडा भक्कम असतो. सांगाड्याची उंची ठरवताना कमीत कमी तीन मीटर व जास्तीत जास्त ती 4.5 मीटर ठेवावी. शेडनेट बसवताना त्या घटकाची टक्केवारी ठरवणे महत्त्वाचे असते. 35 टक्के, 50 टक्के, 75 टक्के व 90 टक्के असे त्यात प्रकार आहेत. शेडनेटची बांधणी करताना
सांगाडा वजनाने हलका असावा. तो साधा व उपलब्ध साहित्याचा असावा. सांगाड्याचा पृष्ठभाग चोहोबाजूंनी सारखा असावा.
सांगाडा असा असावा, की पॉलिथिन फिल्म सहजपणे बदलता यावी.
आतील झाडांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळावा, एकमेकांवर सावली येणार नाही, असे नियोजन करावे. शक्‍यतोवर दक्षिणोत्तर बांधणी अधिक फायदेशीर राहते.
लिंबाच्या झाडांना खत व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शनासाठी कोठे संपर्क साधावा? लिंबाच्या झाडांना त्यांच्या वयोमानानुसार योग्य प्रमाणात खतांच्या मात्रा दिलया, तर चांगले उत्पादन मिळते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शिफारशीनुसार चार वर्षे वयाच्या लिंबाच्या प्रत्येक झाडाला जून महिन्यात 15 किलो शेणखत, दोन किलो सुफला, 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश, 15 किलो निंबोळी पेंड देणे गरजेचे आहे; तसेच सप्टेंबर महिन्यात 150 ग्रॅम आणि जानेवारीत 150 ग्रॅम नत्र द्यावे. या खतांव्यतिरिक्त 500 ग्रॅम व्हॅम अधिक 100 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू अधिक 100 ग्रॅम ऍझोस्पिरीलम अधिक 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम द्यावे. सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळल्यास 0.5 टक्के झिंक सल्फेट, 0.5 टक्के मॅग्नेशिअम सल्फेट, 0.5 टक्के मॅंगनीज सल्फेट, 0.25 टक्के फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करणे आवश्‍यक आहे.
उन्हाळी तीळ लागवड केव्हा करावी, खते किती प्रमाणात द्यावीत? उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने “एकेटी-101′ ही तिळाची जात प्रसारित केली आहे. या वाणाचे गुणधर्म म्हणजे हा वाण उन्हाळी हंगामात 90-95 दिवसांत पक्व होतो. उन्हाळी हंगामाकरिता तीन ते चार किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कार्बेन्डाझिम यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति किलो तीन ग्रॅम, तसेच ट्र ायकोडर्मा व्हिरीडी प्रति किलो चार ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. उन्हाळी तिळाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आटोपावी. तिळाचे बियाणे फार बारीक असल्यामुळे समप्रमाणात वाळू / गाळलेले शेणखत / राख / माती मिसळावी. तिफणीने 30 सें.मी.वर पेरणी करावी. तीळ हे आपत्कालीन पीक, आंतरपीक आणि मिश्र पीक म्हणून घेता येते. आंतरपीक पद्धतीने तीळ + मूग (3ः3) फायदेशीर आढळून आलेले आहे. पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. 15-20 दिवसांनी प हिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. आवश्‍यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या / खुरपण्या कराव्यात.


जाने.-फेब्रुवारी महिन्यात कांदा लागवड करता येईल का? रब्बी हंगामासाठी ऑक्‍टोबर- नोव्हेंबरमध्ये रोपे टाकून योग्य वाढ झालेल्या रोपांची लागवड डिसेंबर – जानेवारीमध्ये करण्याची शिफारस आहे; मात्र बारमाही पाण्याची सोय असल्यास फेब्रुवारीमध्ये रोपे टाकून एप्रिलमध्ये पुनर्लागवड करावी. जून ते जुलैमध्ये कांद्याची काढणी करता येते. पुनर्लागवडी वेळी शेताची मशागत करताना नांगरणी व कुळवणी करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेत तयार करताना चांगले कुजलेले शेणखत हेक्‍टरी 20 टन याप्रमाणे शेतात मिसळावे. सपाट वाफे तयार करावेत. मातीची तपासणी करून शिफारशीनुसार रासाय निक खते पुनर्लागवडीच्या अगोदर वाफ्यांमध्ये मिसळावीत. त्यात हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश ही खते लागवडीपूर्वी द्यावीत.


रेतनानंतर किती दिवसांनी म्हशींची तपासणी करावी? उन्हाळ्यातील म्हशींचे व्यवस्थापन कसे करावे? रे तनानंतर 45 ते 60 दिवसांनंतर म्हशीची पशुवैद्यकाकडून तपासणी करणे योग्य, म्हणजे ती गाभण आहे की नाही हे कळेल. उन्हाळ्यात म्हशींना उन्हाच्या झळ्यांचा त्रास होऊ नये म्हणून थंड जागी ठेवावे, त्यांच्या अंगावर दिवसातून तीन-चार वेळा गार पाणी टाकत राहावे. त्यांच्या पाठीवर ओले कापड किंवा पोते ठेवणेही उपयुक्त ठरते. स्वच्छ व थंड पाणी कमीत कमी चार ते पाच वेळेस पाजावे. उन्हाच्या वेळेस म्हणजे सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत म्हशी चरावयास सोडू नयेत. उन्हात चरायला गेल्याने सूर्यकिरण शोषले जातात व पाठीवर चट्टे उठतात. म्हशींना नियमित हिरवा चारा, खनिजे, क्षार, कॅल्शिअम, फॉस्फरस पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावे. उन्हाळ्यात चार ते पाच महिन्यांत जनावरांच्या शरीराची झीज किंवा वजनातील घट फारच झपाट्याने होते, ज्या म्हशींची झीज उन्हाळ्यात कमी होईल, त्यांचे वजन पुढे पावसाळ्यात हिरवा चारा वगैरे खाल्ल्यामुळे लवकर भरून निघेल व त्यांची प्रजनन क्रिया पुन्हा लवकर सुरू होईल.


हिरवळीच्या खतांसाठी कोणती पिके घ्यावीत? त्यांची निवड कशी करावी? त्याचे काय फायदे होतात? हिरवळीच्या पिकांमध्ये ताग, धैंचा, उडीद, मूग, चवळी, गवार इ. द्विदल पिकांचा तसेच गिरिपुष्प, सुबाभूळ, करंज यांचा समावेश होतो. ही पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या वेळी नांगरून जमिनीत गाडली जातात. या पिकांच्या कोवळ्या फांद्या व हिरवी पाने जमिनीत गाडल्यामुळे जमिनीस सेंद्रिय पदार्थ पुरविले जातात. जमिनीची जलधारणशक्ती वाढते आणि पर्यायाने पीकपोषक अन्नद्रव्यांची उपलब्धताही वाढते. हिरवळीच्या खतासाठी पिकांची निवड करताना पुढील वैशिष्ट्ये असावीत. 1) हे पीक शेंगवर्गीय असावे तसेच त्यात जलद गतीने हलक्‍या किंवा मध्यम जमिनीत वाढण्याची क्षमता असावी. 2) या पिकास पाण्याची आवश्‍यकता कमी असावी. 3) पिकाची मुळे खोलवर जाणारी असावीत. जेणेकरून जमिनीच्या खालच्या थरातील पोषण-द्रव्ये वापरली जातात. 4) ही पिके पालेदार असावीत तसेच लवकर वाढणारी असावीत. 5) या वनस्पतीत तंतुमय पदार्थांचे प्र माण कमी असावे आणि त्यांचे विघटन लवकर व्हावे. या वनस्पतीमध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असावे.
हिरवळीच्या खतांचे यश हिरवळीचे पीक जमिनीत गाडण्याची वेळ व ते कुजण्यासाठी दिलेला पुरेसा वेळ यावर अवलंबून आहे. पीक जमिनीत गाडण्याची योग्य अवस्था म्हणजे फुलोऱ्याची अवस्था होय. हिरवळीचे पीक जमिनीत गाडण्यास उशीर झाला तर पिकातील कर्बाचे प्रमाण वाढते व नत्राचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे लवकर विघटन होत नाही. हिरवळीची पिके सर्वसाधारणपणे सहा -आठ आठवड्यांत फुलोरा अवस्थेत येतात.


टोमॅटो व वांगी लागवड करायची आहे. योग्य जाती कोणत्या? लागवडीविषयी मार्गदर्शन करावे. ज्या जमिनीत टोमॅटो लागवड करायची आहे, त्या ठिकाणी अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय म्हणजे वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत, कारण त्यामुळे कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. टोमॅटोची रोपे तयार करताना रोपे जोमदार, निरोगी तयार होण्यासाठी तीन मीटर लांब, एक मीटर रुंद व 15 सें.मी. उंच या आकाराचे गादीवाफे बांधावेत. प्रत्येक वाफ्यावर एक घमेले चांगले कुजलेले शेणखत बारीक करून मिसळावे. बी पेरण्याअगोदर गादीवाफ्यावर रुंदीशी समांतर अशा तीन ते चार बोटे अंतरावर एक सें.मी. खोल रेघा पाडाव्यात. या पाडलेल्या ओळींमध्ये बी हातावर घेऊन चिमटीतून पातळ पेरावे. एका ठिकाणी जास्त बी पडल्यास ते कमी पडलेल्या जागी टाकावे. बियाणे प्रक्रिया केलेले असेल तर उत्तमच, अना बी पेरण्याअगोदर थायरमची बीजप्रक्रिया करावी. ओळीमध्ये बी पेरल्यानंतर हलक्‍या हाताने बी मातीने झाकून घ्यावे. वाफ्यांना बी उगवून येईपर्यंत शक्‍यतो झारीने पाणी द्यावे. रोपांचे वाफे नेहमी तणमुक्त ठेवावेत. रोपे पुनर्लागण करण्याच्या एक आठवडा अगोदर रोपांना पाणी हळूहळू कमी करावे. बियाण्याचे प्र माण ठरविताना संकरित जातींसाठी 150 ग्रॅम प्रति हेक्‍टरी तर सुधा रित जातींसाठी 400 ग्रॅम प्रति हेक्‍टरी घ्यावे. लागवडीचे अंतर 90 ु 30 सें.मी. ठेवावे. खत व्यवस्थापन करताना माती परीक्षणानुसार, सरळ वाणांसाठी 200ः100ः100 किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्‍टरी, तर संकरित वाणांसाठी 300ः150ः 150 प्रति हेक्‍टरी वापरावे. टोमॅटोच्या जाती ः धनश्री, भाग्यश्री, राजश्री, फुले राजा (संकरित). वांगी –
या फळभाजीची लागवड वर्षभरात तीनही हंगामांत करतात. दर हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम बी पुरेसे होते. रोपे तयार करण्यासाठी एक मीटर रुंदी व सोयीनुसार लांबीचा गादीवाफा तयार करून आठ ते दहा सें.मी. अंतरावर रेषा ओढून बी पेरावे. हलक्‍या हाताने माती टाकून बी झाकून द्यावे. बी पेरल्यापासून पाच ते सहा आठवड्यांत 12 ते 15 सें.मी. उंचीची रोपे लागवडीस तयार होतात. बी पेरल्यानंतर वाफ्यांना सुरवातीला झारीने व त्यानंतर वाफ्याभोवती असलेल्या सरीमधून गरजेनुसार पाणी द्यावे. बी पेरताना दहा टक्के फोरेट प्रति वाफ्यास 25 ग्रॅम या प्रमाणात टाकावे. रोपांची पुनर्लागवड करताना जमिनीची चांगली नांगरट करून वखरणी करून जमिनीत दर हेक्‍टरी 40 ते 50 बैलगाड्या शेणखत मिसळून द्यावे. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सरी- वरंबे पाडावेत. कसदार जमिनीत 100 सें.मी. ु 100 सें.मी., मध्यम प्रकारच्या ज मिनीत 75 सें.मी. ु 75 सें.मी. व हलक्‍या जमिनीत 50 सें.मी. ु 50 सें.मी. अंतरावर सरी वरंबे तयार करून वरंब्याच्या एका ठिकाणी एकच रोप लावावे. लागवडीनंतर दहा दिवसांनी दाणेदार फ ोरेट हेक्‍टरी दहा किलो या प्रमाणात प्रत्येक झाडास बांगडी पद्धतीने द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार खताचे प्रमाण कमी-अधिक होऊ शकते. मध्यम काळ्या जमिनीत दर हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाशची शिफारस करण्यात आली आहे. जाती ः 1) मांजरी गोटा 2) वैशाली 3) रुचिरा 4) प्रगती.


कलिंगड लागवड कधी करावी? योग्य जाती कोणत्या? कीड-रोग व काढणीविषयी मार्गदर्शन करावे. क लिंगडाची लागवड 17 अंश ते 18 अंश से. तापमानात थंडी कमी झाल्यावर करावी. फळ लागल्यापासून ते फळ विक्रीसाठी तोडेपर्यंत किमान 40 ते 45 दिवस तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणे आवश्‍यक आहे. पिकाचा कालावधी जातीपरत्वे 90 ते 110 दिवसांचा असतो.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर व स्फुरद जिवाणू खताची 250 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. लागवडीसाठी चार मीटर अंतरावर रुंद सऱ्या कराव्यात. सरीच्या दोन्ही बाजूंस 90 सें.मी. अंतरावर खड्डे करून त्यात दोन किलो चांगले कुजलेले शेणखत आणि दहा ग्रॅम कार्बारिल पावडर टाकून खड्डे भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात दोन ते तीन बिया एकमेकांपासून तीन ते चार सें.मी. अंतरावर दोन ते अडीच सें.मी. खोलीवर पेराव्यात. एक हेक्‍टर लागवडीसाठी साधारण अडीच किलो बियाणे लागते. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 15 ते 20 टन शेणखत, 15 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. खते देताना संपूर्ण शेणखत, स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा व नत्राची 1/3 मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. उरलेले नत्र दोन समान हप्त्यांत लागवडीनंतर एक आणि दोन महिन्यांनी द्यावे. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे फळे तडकतात. तेव्हा पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे. फळे काढणीस तयार झाली किंवा नाही हे ओळखण्यासाठी फळावर टिचकी मारल्यास तयार झालेल्या फळाचा बदबद असा आवाज येतो व अपक्व फळांचा टणटण असा आवाज येतो. तयार फळांचा जमिनीलगतचा रंग किंचित पिवळसर होतो. फळाच्या देठाजवळील लतातंतू सुकलेले असतात. काढणी सकाळी करावी. त्यामुळे फळांचा ताजेपणा व आकर्षकता टिकून राहते व ती चवीला चांगली रुचकर लागतात.
कलिंगड पिकावर भुरी, करपा व मर रोगांचा आणि तांबडे व काळे भुंगेरे, फळमाशी, मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची अथवा ट्रायकोडर्मा जैविक रोगनियंत्रकाची पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. किडींच्या नियंत्रणासाठी बिगर हंगामात शेतीची चांगली नांगरट व कुळवणी करावी. म्हणजे तांबडे भुंगेरे, फळमाशी इ. किडींच्या सुप्त अवस्था नष्ट होऊन त्याच्या बंदोबस्तासाठी मदत होईल.


ढोबळी मिरची लागवड कशी करावी, बियाणे किती वापरावे? शेडनेटमध्ये ढोबळी मिरची लागवड फायदेशीर ठरते. लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. मातीचा सामू 5.5 ते 6.5 असावा. काळ्या मातीची निवड करू नये. लाल माती (70 टक्के), शेणखत (20 टक्के) आणि भाताचे तूस (दहा टक्के) किंवा वाळू (दहा टक्के) या प्रमाणात मिश्रण मिसळून लागवडीसाठी तयार करावे. दहा गुंठे शेडनेटसाठी लाल माती 90 ब्रास, शेणखत 30 ब्रास आणि भाताचे तूस चार टन किंवा वाळू चार ब्रास या प्रमाणात वापरावी. सदर संपूर्ण एकत्रित मिश्रण कल्टिव्हेटरच्या साह्याने शेडहाऊसमध्ये समपातळीत पसरून घ्यावे. सपाट सारे वाफे बनवून त्यामध्ये पाणी सोडावे. काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचा कागद त्यावर व्यवस्थित झाकावा. सात दिवसांनंतर सदर प्लॅस्टिकचा कागद काढून पुन्हा एकदा वाफ्यामध्ये पाणी सोडावे.
लागवडीसाठी वाफसा येताच गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्याच्या पृष्ठभागाची रुंदी 90 सें.मी., उंची 40 सें.मी. आणि दोन गादीवाफ्यांतील अंतर 50 सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर दोन ओळींत ढोबळी मिरचीची लागवड करावी. दोन ओळींतील (रांगांतील) अंतर 50 सें.मी. आणि दोन रोपांतील अंतर 45 ते 50 सें.मी. ठेवावे. रोपांची निवड करताना ती चार ते पाच आठवडे वयाची असावीत. प्रत्यक्ष रोपावर चार ते पाच पाने असावीत. रोपांच्या मुळाचा जारवा चांगला झालेला असावा. रोपे कीडमुक्त आणि रोगमुक्त असावीत.
झाडाला आकार येण्यासाठी छाटणी करणे आवश्‍यक असते, त्यासाठी सहा पाने झाडावरती ठेवून लागवडीनंतर 21 दिवसांनी झाडांची छाटणी किंवा पिंचिंग करावे. लागवडीनंतर फांद्यांना नायलॉन/प्लॅस्टिकच्या (जाडसर) दोरीने बांधून जमिनीस समांतर व जमिनीपासून तीन मीटर उंचीवर लावलेल्या लोखंडी तारांना या दोऱ्या टांगाव्या. वरच्या लोखंडी तारा मजबूत (12 गेजच्या) असाव्यात, जेणेकरून रांगेतील सर्व झाडांचे वजन त्या सहन करू शकतील. एका गादीवाफ्यावरील दोन ओळींच्या वरती तीन लोखंडी तारा बांधतात व एका झाडाला चार प्लॅस्टिक दोऱ्या बांधाव्या.
माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 15 ते 20 गाड्या चांगले कुजलेले शेणखत, तसेच माती परीक्षण अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार 150 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश पिकाला द्यावे. संबंधित खतमात्रा संदर्भासाठी दिली आहे. संपूर्ण पालाश, स्फुरद आणि शेणखत, तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी. उर्वरित अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिना व पन्नास दिवसांच्या अंतराने दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे. मिश्रखतांचा वापर केल्यास फायदा अधिक होतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पीकवाढीच्या अवस्थेत योग्य वेळी पाण्यात विरघळणाऱ्या खतांची फवारणी करावी.


केळीवर प्रक्रिया करून कोणकोणते पदार्थ तयार करता येतात? के ळीवर प्रक्रिया केल्याने मूल्यवर्धन होऊन चांगला फायदा होतो. केळीपासून बनविता येणाऱ्या विविध पदार्थांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील काढणीपश्‍चात तंत्रज्ञान विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे :
पीठ ः केळीचे पीठ तयार करण्यासाठी कच्ची केळी वापरली जातात. एक किलो पीठ तयार करण्यासाठी साधारणपणे साडेतीन किलो गर लागतो. यासाठी प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून त्याच्या चकत्या किंवा बारीक तुकडे करून सुकवतात. सुकविण्यासाठी सूर्याच्या उष्णतेचा किंवा वाळवणी यंत्राचा वापर करतात. केळीच्या चकत्या वाळवून त्याच्यातील पाण्याचे प्रमाण आठ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आणले जाते. नंतर या चकत्यांपासून दळणी यंत्राचा वापर करून पीठ तयार करतात. हे पीठ जर काळे पडत असेल तर पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या 0.05 ते 0.06 टक्का तीव्रतेच्या द्रावणात 30 ते 45 मिनिटे केळ्याच्या चकत्या बुडवून वाळवतात व नंतर पीठ तयार करतात. तयार झालेले पीठ प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरून कोरड्या व थंड जागी साठवितात.
भुकटी ः यासाठी पूर्ण पिकलेली केळी लागतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या साह्याने लगदा करून घ्यावा. स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंवा फोम मॅट ड्रायरच्या साह्याने केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी करतात. तयार झालेल्या केळीच्या भुकटीला विशिष्ट गंध व चव असल्याने बाजारपेठेत वेगवेगळे पदार्थ (उदा. आइस्क्रीम) बनविण्यासाठी मोठी मागणी आहे. तयार झालेली भुकटी निर्जंतुक हवाबंद डब्यांत साठवून कोरड्या व थंड जागी साठवून ठेवावी.
चिप्स ः केळीचे चिप्स तयार करण्यासाठी हिरवी कच्ची केळी निवडावीत. ती स्वच्छ पाण्याने धुवावीत. त्याची साल काढून चिप्स (चकत्या) बनविण्याच्या यंत्राच्या (किसणी) साह्याने तीन मि.मी. जाडीच्या गोल चकत्या कराव्यात. या चकत्या 0.06 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या द्रावणात दहा मिनिटे भिजवल्यानंतर वनस्पती तुपात तळाव्यात. तळलेल्या चिप्सवर दोन टक्के मीठ टाकून ते चिप्सला व्यवस्थित लावावे. चिप्स दीर्घकाळ टिकविण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांत व्यवस्थित साठवाव्यात. दुसऱ्या पद्धतीने चिप्स बनविताना 7.5 टक्के मिठाचे द्रावण तयार करून त्यात 0.05 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट टाकावे. हे द्रावण व्यवस्थित उकळून, कोमट करून त्यात वरील पद्धतीने तयार केलेल्या चिप्स 30 मिनिटे बुडवाव्यात. नंतर द्रावणातून काढून वनस्पती तुपात तळून वरील पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशव्यांत साठवावे.
प्युरी ः पूर्ण पिकलेली केळी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन, साल काढून, पल्पर यंत्राच्या साह्याने लगदा तयार करून घ्यावा. हा लगदा निर्जंतुक करून निर्जंतुक डब्यात हवाबंद करावा. ही तयार झालेली प्युरी लहान मुलांना खाऊ देण्यासाठी, आइस्क्रीमला चव आणण्यासाठी, मिल्कशेक तयार करण्यासाठी किंवा बेकरी उद्योगामध्ये वापरतात.
वेफर्स ः चांगल्या प्रतीचे वेफर्स तयार करण्याकरिता पूर्ण वाढ झालेली, परिपक्व, कच्ची केळी निवडावी. केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून यंत्राच्या साह्याने साधारणपणे तीन ते पाच मि.मी. जाडीच्या चकत्या कराव्यात. या चकत्या 0.1 टक्का सायट्रिक आम्ल किंवा 0.05 टक्का पोटॅशिअम मेटाबायसल्फाईटच्या द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवून ठेवाव्यात. यामुळे चकत्या काळसर न पडता पांढऱ्याशुभ्र राहतात. नंतर चकत्या उकळत्या पाण्यात तीन ते चार मिनिटे बुडवून, थंड करून प्रति किलो चकत्यांस चार ग्रॅम याप्रमाणे गंधकाची धुरी द्यावी. तयार झालेल्या चकत्या उन्हात किंवा वाळवणी यंत्रात सुकवाव्यात. जर चकत्या वाळवणी यंत्राच्या साह्याने सुकवायच्या असतील, तर तापमान 60 अंश से.पेक्षा जास्त नसावे. तयार झालेले वेफर्स प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून, कोरड्या व थंड जागी साठवावे. आवश्‍यकतेनुसार ते तेलात किंवा तुपात तळून, मीठ किंवा मसाले लावून खाण्यासाठी वापरावे.


उन्हाळी मिरची लागवडीसाठी गादीवाफे कसे तयार करावेत? लागवड कशी करावी? मि रचीच्या रोपांकरिता गादीवाफे शास्त्रीय पद्धतीने तयार करून मगच बी पेरावे. त्यासाठी गादीवाफ्यांची रुंदी एक मीटर, लांबी दोन ते तीन मीटर आणि उंची 15 ते 20 सें.मी. ठेवावी. गादीवाफे पाणी उपलब्धतेच्या ठिकाणी तयार करावे, जेणेकरून सुरवातीला पाण्याची अडचण येणार नाही. पेरणीपूर्वी वाफ्यातील बुरशी नियंत्रणाकरिता मॅन्कोझेब दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वापरावे. एक हेक्‍टर मिरची लागवडीसाठी 250 ते 300 ग्रॅम बियाणे लागते. वाफ्याच्या रुंदीला समांतर सहा सें.मी. अंतरावर रेघा पाडून त्यात पातळ बी पेरावे. पेरणीपूर्वी तीन ते चार ग्रॅम थायरम प्रति किलो चोळून नंतर बियाणे पेरणी करावी. पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांत मिरची रोपे लागवडीस तयार होतात. रोपे तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष लागवड करण्याकरिता दोन फुटाच्या म्हणजे 60 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. दोन रोपांतील व दोन ओळींतील अंतर 60 ु 60 सें.मी. ठेवावे. रोपे लागवडीअगोदर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड दोन ग्रॅम प्रति लिटर द्रावणात बुडवून लागवड करावी.


सफेद मुसळीची लागवड कशी करावी? रब्बी हंगामात लागवड करता येईल का? जमीन कशी हवी? स फेद मुसळीचे कंद विक्रीस खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध असेल, तरच लागवड करणे फायदेशीर ठरते, त्यासाठी लागवडीपूर्वी आपण आपल्या भागातील बाजारपेठेचा विचार करूनच लागवड करणे योग्य ठरेल. त्याचबरोबर लागवडीपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी सफेद मुसळी लागवड केली असेल, त्यांचे अनुभव व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणेही आवश्‍यक आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील प्रक्षेत्रावर सुगंधी वनस्पतींमध्ये कस्तुरी भेंडी, गवती चहा, जावा सिट्रोनेला, जिरॅनियम, तुळस, दवणा, वाळा; तसेच औषधी वनस्पतींमध्ये अश्‍वगंधा, कळलावी, इसबगोल, खाजकुईली, ज्येष्ठमध, रानवांगी, शतावरी, सदाफुली, सर्पगंधा, सफेद मुसळी यांची लागवड केलेली आहे. उत्पादित मालाची खरेदी करण्याची हमी असेल, तर लागवड करण्यास हरकत नाही. सफेद मुसळीची लागवड खरीप हंगामात करतात. लागवडीसाठी भुसभुशीत-पोयट्याची जमीन लागते. लागवड 30 ु 15 सें.मी. अंतरावर करावी.पाने पिवळी पडल्यावर नोव्हेंबर-जानेवारीत काढणी करतात.


गहू पिकावर येणाऱ्या कीड-रोगांपासून पिकाच्या संरक्षणासाठी काय उपाय करावे? रा ज्यात गव्हावर प्रामुख्याने तांबेरा व करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तांबेऱ्यामुळे उत्पादनात घट येते. प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करणे आवश्‍यक असते.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार तांबेरा रोगाची लागण दिसताच 25 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाची तीव्रता लक्षात घेऊन 10-15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. गव्हावर करपा रोगाचादेखील प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रण करण्यासाठी रोगाची लक्षणे दिसू लागताच 25 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
खोडकिडीचा प्रादुर्भाव गहू ओंबीवर असताना आढळून येतो. अळ्या रोपट्यांच्या गाभ्यात शिरून गाभा पोखरतात. परिणामी रोपट्यांचा वरील भाग वाळतो. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त रोपे मुळांसह उपटून त्यांचा नायनाट करावा. किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास 40 ग्रॅम कार्बारिल (50 टक्के) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी. उंदीर गव्हाचे फुटवे व ओंब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. त्यासाठी धान्याचा भरडा 49 भाग, एक भाग झिंक फॉस्फाईड व थोडे गोडेतेल यांचे मिश्रण एकत्र मिसळावे. विषारी आमिष तयार करून प्रत्येक बिळात चमचाभर टाकून बिळे बुजवावीत.
कीडनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा.


गांडूळ खताची निर्मिती कशी करावी? सविस्तर मार्गदर्शन हवे. गां डूळ खताचे उत्पादन चार पद्धतीने उदा. : कुंडी पद्धत, टाकी पद्धत, खड्डा पद्धत आणि बिछाना पद्धतीने करतात. शेतावर मोठ्या प्रमाणावर गांडूळ खत तयार करण्यास खड्डा पद्धत अधिक सोयीची आहे.
गांडूळ खत तयार करण्याची पद्धत ः मोठ्या प्रमाणावर गांडूळ खत तयार करण्यासाठी पुढील पद्धतींचा वापर केला जातो :
1) खड्डा पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
2) सिमेंट हौद पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
3) बिछाना पद्धत (3 मी. लांब 2 मी. रुंद 0.6 मी. खोल)
वरील पद्धतींपैकी आपल्या सोयीनुसार एक पद्धत निवडावी. निवड केलेल्या पद्धतीसाठी लागणारी खड्ड्याची रचना ही गुरांच्या गोठ्याजवळ उंच जागेवर, योग्य निचरा असणाऱ्या ठिकाणी, मांडवाच्या किंवा झोपडीच्या सावलीत किंवा पत्र्याच्या शेडमध्ये करून घ्यावी. खड्डा भरताना सर्वच पद्धतींमध्ये थरांची रचना सर्वसाधारणपणे एकाच प्रकारे करावी. सुरवातीला तळाशी 15 सें.मी. जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा (उदा. : गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन, तूर, सूर्यफुलाचा भुस्सा, पालापाचोळा, चाऱ्याचा उरलेला भाग इ.) थर द्यावा. त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व चाळलेली माती 3ः1 या प्रमाणात मिसळून त्याचा 15 सें.मी.चा थर द्यावा. त्यावर ताज्या शेणाचा किंवा पाण्यामध्ये शेण कालवून त्याची रबडी करून दहा सें.मी.चा तिसरा थर द्यावा. शेवटी बिछान्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालावे. हा बिछाना पाण्याने ओला करावा. वातावरणानुसार व आवश्‍यकतेप्रमाणे पाणी द्यावे व खतामध्ये 50 टक्के ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. रचलेल्या थरांतील उष्णता कमी झाल्यावर एक ते दोन आठवड्यांनी वरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला सारून कमीत कमी एक हजार प्रौढ गांडुळे सोडावी. गांडुळांची संख्या कमी असेल, तर खत तयार होण्यास अधिक काळ लागतो, पण सर्वसाधारणपणे गांडुळांची संख्या दहा हजार झाली, की दोन महिन्यांत उत्तम असे एक टन गांडूळ खत तयार होते. गांडूळ खताचा रंग काळसर तपकिरी असतो. खत तयार झाल्यावर पाणी बंद करावे. वरचा थर कोरडा झाला, की पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे व त्याचा बाहेर सूर्यप्रकाशात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकूच्या आकाराचा ढीग करावा. उन्हामुळे सर्व गांडुळे तीन-चार तासांनंतर तळाशी जाऊन बसतील. नंतर वरचा खताचा भाग हलक्‍या हाताने अलग करून घ्यावा. ज्यामध्ये कुजलेले गांडूळ खत, तसेच गांडुळांची अंडी असतील.


कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे, तांत्रिक मार्गदर्शन कोठे मिळेल? कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याविषयीचे शास्त्रोक्‍त ज्ञान, तसेच त्यातील तांत्रिक गोष्टींची माहिती असणे आवश्‍यक आहे. साधारणपणे कुक्कुटपालन हे अंडी उत्पादनासाठी व मांसासाठी (ब्रॉयलर) करता येते. अंड्यासाठी कुक्कुटपालन करायचे असल्यास विविध जातींच्या कोंबड्या पाळता येतात. जसे- गावठी कोंबड्या, व्हाइट लेगहॉर्न, ऱ्होड आयलॅंड रेड इत्यादी.
अंड्यावरील कोंबड्यांचे वयोगटानुसार व्यवस्थापन करताना एक ते सहा आठवड्यांपर्यंत लहान पिल्लांची निगा राखणे, 6-20 आठवड्यांपर्यंत शरीरवाढीसाठी आणि 21 आठवड्यांपासून पुढे पक्ष्यांचा अंडी उत्पादनाचा काळ असतो. अशा पद्धतीने अंड्यावरील कोंबड्यांचे व्यवस्थापन करावे. कोंबड्यांना खाद्य व्यवस्थापन करताना वयोगटानुसार कोंबड्यांना चीक मॅश, ग्रोअर मॅश व लेअर मॅश द्यावे. कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी व सुव्यवस्थित व्यवस्थापनासाठी प्रत्येक पक्ष्याला वयानुसार साधारणपणे 1.5 ते 2.0 चौ. फूट जागा असावी. शहरी व ग्रामीण भागात कोंबडीच्या मांसासाठी (ब्रॉयलर कोंबड्यांसाठी) मागणी वाढत आहे. मांसासाठी कुक्कुटपालन करणे सोपे व फायदेशीर ठरते.
साधारणपणे पिल्ले जन्मल्यानंतर आठ आठवड्यांत विक्रीयोग्य होतात. पक्ष्यांची वाढ भराभर होत असल्याने असे पक्षी मांसासाठी वाढविणे किफायतशीर ठरते. कोंबडीच्या मांसासाठी विविध प्रकारच्या जातींचे पालन करता येते; परंतु भराभर वाढणाऱ्या व जास्त वजन देणाऱ्या जाती निवडाव्यात. मांसासाठी कोंबडीपालन करण्यासाठी व व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी शास्त्रोक्त व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, वेळच्या वेळी लसीकरण व बाजारपेठ महत्त्वाची आहे. साधारणपणे एका कोंबडीस एक चौ. फूट जागा पुरेशी होते.
कोंबडी फार्मची आखणी पूर्व-पश्‍चिम असावी. हवेशीर व आवाजापासून दूर असावी. कोंबड्यांना बसण्यासाठी खाली लाकडी भुस्सा किंवा शेंगांची टरफले यांचा पाच-दहा सें.मी.चा थर द्यावा. जेणेकरून जमिनीचा उबदारपणा टिकेल व कोंबड्यांची विष्ठा त्यात कालवली जाईल. कोंबडीघरात ऊब टिकण्यासाठी लाइटची व्यवस्था करावी. साधारणपणे दोन-तीन वॉट उष्मा प्रत्येक पक्ष्याला मिळावी, या दृष्टीने व्यवस्था करावी. कुक्कुटपालनासंबंधी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा :
ः 022 – 24131180, 24137030, विस्तार क्र. 136
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई


उन्हाळी मुगाची लागवड कधी व कशी करावी? खत व पाणी व्यवस्थापन कसे करावे? रब्बी हंगामातील पीक उदा. : गहू, हरभरा, करडई इ. पिकांनंतर उन्हाळी मूग घेता येतो. मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन योग्य असते. क्षारयुक्त, पाणथळ, तसेच उतारावरील हलक्‍या ते निकस जमिनीत लागवड करू नये, कारण मुळांवरील रायझोबियम जिवाणूंच्या गाठींची योग्य वाढ होत नाही व परिणामी रोपे पिवळी पडतात.
उन्हाळी मुगाकरिता एकेएम 8802, पीकेव्ही ग्रीनगोल्ड वाणांची निवड उन्हाळी हंगामात फायदेशीर दिसून आली आहे. पेरणी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांतील 10 सें.मी. राहील याची काळजी घ्यावी व पाभरीने पेरणी करावी. शिफारशीनुसार हेक्‍टरी 12 ते 15 किलो बियाण्याचा वापर करावा. बियाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया करावी.
सेंद्रिय खतांचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनात खूप महत्त्व आहे. दुसऱ्या वखराच्या पाळीच्या वेळेस 10 ते 15 गाड्या प्रति हेक्‍टर चांगले कुजलेले शेणखत टाकावे. या पिकाला नत्रापेक्षा स्फुरदाची जास्त आवश्‍यकता आहे, तरीपण सुरवातीच्या काळात पीक जोमदारपणे वाढण्याच्या दृष्टीने पिकाला 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद (43 किलो युरिया व 250 किलो स्फुरद किंवा 100 किलो डीएपी) प्रति हेक्‍टर एवढी खतमात्रा पेरणीच्या वेळी द्यावी. नत्र व स्फुरद एकाच वेळी पेरणीच्या वेळी जमिनीत बियाण्याच्या खाली पेरून द्यावे.
ओलित व्यवस्थापन ः हे पीक ऐन उन्हाळ्यात येत असल्यामुळे साधारणपणे पाच ते सहा ओलिताच्या पाळ्या द्याव्या लागतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे व वातावरणातील उष्णतेमुळे पाण्याच्या पाळ्या कमी किंवा जास्त होऊ शकतात. म्हणून पिकाला फुलोऱ्याच्या काळात, तसेच शेंगा भरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये. आवश्‍यकतेनुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.


शेवग्याच्या झाडास मोठ्या प्रमाणात बहर आला आहे, परंतु झाडांना फळधारणा होत नाही, त्याचे कारण काय? त्यावर काय उपाय करावेत? उन्हाळी मिरची पिकात काकडीचे आंतरपीक घेणे योग्य आहे का? शेवग्याच्या झाडास कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्यास फळधारणा होण्यावर परिणाम होतो. शेवग्यावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो, तसेच करपा रोगदेखील होतो. रोगामुळे पाने पिवळी पडतात. परागीभवन व्यवस्थित न झाल्याने देखील फळधारणा होत नाही. बुरशीजन्य रोगांमुळे फुलांची गळ होते. उपाय म्हणून 18ः18ः18 या विद्राव्य खताची पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आठ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. उन्हाळी मिरची पिकात काकडीचे आंतरपीक घेतल्यास काकडीवर होणारा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मिरचीवरदेखील लवकर होऊ शकतो. तसेच काकडीवरील रसशोषक किडींमुळे मिरचीचे नुकसान होऊ शकते, तेव्हा काकडीचे आंतरपीक न घेणे योग्य होईल.


दोडका लागवड करायची आहे, जमीन कशी हवी? खत व्यवस्थापन कसे करावे? दो डका लागवडीसाठी मध्यम, काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची चांगली मशागत करून हेक्‍टरी 15 ते 20 गाड्या शेणखत मिसळावे. दोडका लागवडीसाठी पुसा नसदार, कोकण हरिता, फुले सुचेता या सुधारित जाती निवडाव्यात. खरीप लागवड जून-जुलै, तर उन्हाळी लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी. ताटी पद्धतीने लागवड करताना 1.5 ु 1 मीटर अंतराने करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी दोन ते अडीच किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी तीन ग्रॅम थायरम किंवा अडीच ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाण्यास लावावे. लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. एक महिन्याने उर्वरित 50 किलो नत्राची मात्रा द्यावी. मगदुरानुसार पाणी व्यवस्थापन करावे, तसेच कीड व रोगनियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.


उन्हाळी भेंडी लागवडीचा योग्य कालावधी कोणता? लागवडीबाबत मार्गदर्शन करावे. न्हाळी हंगामात घेतले जाणारे भेंडी हे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. लागवड 15 जानेवारी ते फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत करावी. भेंडीची लागवड हलक्‍या ते भारी कोणत्याही जमिनीत करता येऊ शकते; परंतु शक्‍यतो काळी, कसदार, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. शेतास उभी-आडवी नांगरणी करून, ढेकळे फोडून वखराच्या पाळ्या द्याव्यात. त्यात चांगले कुजलेले शेणखत हेक्‍टरी 30-40 गाड्या टाकावे व त्यानंतर पुन्हा एक वखराची पाळी देऊन शेत तयार करावे. शेवटच्या वखरणीनंतर 60 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. गादीवाफ्यावर लागवड केल्यास उत्तम प्रतीची सारख्या लांबीची फळे, तसेच जास्त उत्पादन मिळते. गादीवाफ्यावर लागवड करणे फायद्याचे आहे. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपांतील अंतर 10 ते 15 सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी 10 ते 15 किलो बियाणे वापरावे. संकरित वाणांसाठी अंदाजे पाच ते दहा किलोपर्यंत बियाणे वापरावे. गादीवाफ्यावर लागवड करण्यासाठी दोन ओळींत 40 सें.मी. व दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. बियांची लागवड सरळ रांगेत करावी. एका ठिकाणी दोन बिया टोकून लावाव्यात. तापमान 17 अंश से.पेक्षा खाली गेल्यास बियाणे 55 ते 60 अंश से. गरम पाण्यात बुडवून प्रक्रिया केली असता उगवण लवकर होते. माती परीक्षणानुसार खताची मात्रा द्यावी. हेक्‍टरी 20 टन शेणखत पेरणीपूर्वी जमिनीत मिसळावे. ऍझोटोबॅक्‍टर व स्फुरद विरघळवणारे जिवाणूसंवर्धन अडीच ग्रॅम प्रत्येकी एक किलो बियाण्यास चोळावे व नंतर पेरणी करावी. रासायनिक खते देताना 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. यापैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश प्रति हेक्‍टरी पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले 50 कि. नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. पेरणीवेळी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. पिकास पहिले पाणी बियाणे उगवून आल्यानंतर द्यावे. त्यानंतरचे पाणी हे जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावे.


कामगंध सापळ्यांच्या वापराचे कोणते फायदे होतात? कोणत्या पिकांसाठी कोणते ल्युर वापरतात? शेतातील किडींची संख्या आर्थिक नुकसानपातळीच्या खाली ठेवण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. कीटक स्वकियांशी सुसंवाद किंवा संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात. तो गंध स्वकियांमध्ये विशिष्ट प्रकारच्या संदेशवहनाचे कार्य करतो. या वासामुळे नर/मादीमध्ये चेतना निर्माण होऊन नर-मादी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि समागमासाठी योग्य जोडीदार मिळवू शकतात, त्यामुळे या गंधाला कामगंध (फेरोमोन) असे म्हटले जाते. वेगवेगळ्या किडींचा फेरोमोन वेगवेगळा असतो. काही कीटकांमध्ये नर कीटक मादीला, तर काहींमध्ये मादी कीटक नराला आकर्षित करतात. कीटकांच्या या सवयी लक्षात घेऊन कृत्रिम कामगंध (फेरोमोन) तयार केले जातात. फेरोमोन सापळे मोठ्या प्रमाणात लावल्याने लिंग प्रलोभन रसायनांचे (ल्यूर) सूक्ष्म कण वातावरणात पसरतात. कीटकांच्या शरीरातून सोडला जाणारा गंध आणि वातावरणातील कृत्रिम रसायनांचा संदेश यातील फरक त्यांना कळेनासा होऊन त्यांचा गोंधळ उडतो आणि मिलन होऊ शकत नाही. महत्त्वाच्या बाबी – 1) सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकांसाठी हेक्‍टरी पाच सापळे आवश्‍यक. किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर पकडण्यासाठी हेक्‍टरी 15 ते 20 सापळे गरजेचे. 2) कापूस पीक 30-40 दिवसांचे असताना हिरवी अळी, ठिपक्‍याची बोंड अळी आणि तंबाखूची पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावाची माहिती व योग्य नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर करावा. 3) प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे सापळे वापरावेत. सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवड्याला काढून नष्ट करावे. 4) सापळ्यामधील लिंग प्रलोभने 15 ते 20 दिवसांनी बदलणे आवश्‍यक. 5) सापळा साधारणतः पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून दोन ते तीन फुटांवर राहणे आवश्‍यक. 6) सापळा वाऱ्याच्या दिशेला समांतर असावा, त्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून किडीचे जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षित होतात.
वापराचे फायदे – 1) किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य वेळी कीटकनाशकांची फवारणी शक्‍य. 2) एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशके फवारणीचा खर्च टाळता येतो. सापळ्यांचा खर्च कीटकनाशकांच्या खर्चापेक्षा कमी. 3) रसायनांचा वापर घटल्यामुळे परोपजीवी मित्रकीटक सुरक्षित राहून त्यांच्या संख्येत वाढ. नैसर्गिक नियंत्रणाचे चक्र क्रियाशील होते.4) सापळ्यातील रसायनांमुळे पर्यावणावर वाईट परिणाम होत नाही.


मिश्र खत कसे तयार करतात? पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या दोन किंवा अधिक अन्नद्रव्ययुक्त खतांच्या मिश्रणाला मिश्रखत म्हणतात. दोन अन्नद्रव्ये असणाऱ्या संयुक्त खतांचे मिश्रण करूनही मिश्रखत तयार करता येते. शेतावरच मिश्रखत तयार करण्याची पद्धत – कोणत्याही विशिष्ट उपकरणांचा वापर न करता सरळ खतांचे मिश्रण करून मिश्रखते शेतावर तयार करता येतात. ही पद्धत आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. अशा तऱ्हेचे मिश्रण सिमेंट कॉंक्रिटचा पृष्ठभाग असणाऱ्या ओट्यावर तयार करता येते. यासाठी फावडे, चाळणी, लाकडी हातोडा, तराजू इत्यादी साहित्य पुरेसे होते. मिश्रखत पेरणीपूर्वी एक दिवस अगोदर तयार करावे. जेणेकरून त्यामध्ये खडे तयार होणार नाहीत. ठराविक मिश्रखत तयार करण्यासाठी आवश्‍यक असणारी सरळ खतांची मात्रा काढणे सुलभ आहे. उदा. ः एक टन 4-8-15 या ग्रेडचे मिश्रखत करायचे झाल्यास अमोनिअम सल्फेट, सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅशची मात्रा पुढीलप्रमाणे काढता येते ः 100 किलो 4-8-15 ग्रेडचे मिश्रखत करण्यासाठी, म्हणजेच मिश्रखतामध्ये चार टक्के नत्र, आठ टक्के फॉस्फेट आणि 15 टक्के पोटॅश असण्यासाठी सरळ खतांची मात्रा पुढीलप्रमाणे काढावी. त्यानंतर एक टन मिश्रखत तयार करण्यासाठी आलेल्या सरळ खतांच्या मात्रेस दहाने गुणावे. अशा तऱ्हेने एक टन 4-8-15 ग्रेडचे मिश्रखत तयार करण्यासाठी 200 किलो अमोनिअम सल्फेट, 500 किलो सुपर फॉस्फेट आणि 250 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आणि 50 किलो फिलरची गरज असते.
नत्र = 4 द 100 क्क 20 = 20 किलो अमोनिअम सल्फेट
स्फुरद = 8 द 100 क्क 16 = 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट
पालाश = 15 द 100 क्क 60 = 25 किलो म्युरेट ऑफ पोटॅश
100 किलो मिश्रखत = 95 किलो सरळ खत + पाच किलो फिलर
तयार करताना घ्यावयाची काळजी –
1) अमोनिया असणारी सरळ खते. उदा. – अमोनिअम सल्फेट, अमोनिअम नायट्रेट इत्यादी खते, बेसिक स्लॅग, फॉस्फेट रॉक या खतांसोबत मिसळल्याने नत्राचा वायूरूपात ऱ्हास होत असल्यामुळे ती मिसळू नयेत. 2) पाण्यात विद्राव्य स्फुरदयुक्त खते उदा. ः सुपर फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट, अमोनिअम फॉस्फेट ही खते मुक्त चुना असणाऱ्या खतात मिसळल्याने विद्राव्य फॉस्फेट अविद्राव्य स्वरूपात बदलण्याची शक्‍यता असते आणि हा अविद्राव्य फॉस्फेट पिकांना उपलब्ध होत नाही. 3) सहज विद्राव्य होणारी आणि हवेतील बाष्प शोषून घेणारी खते. उदा. ः कॅल्शिअम, अमोनिअम नायट्रेट, युरिया इत्यादी खते मिसळल्यानंतर त्यात ढेकळे किंवा खडे तयार होतात; त्यामुळे अशा खतांचे पेरणीच्या थोडा वेळ अगोदर मिश्रण तयार करावे. सर्व प्रकारची नायट्रेट धारण करणारी खते, युरिया, पोटॅशिअम सल्फेट किंवा क्‍लोराइड्‌स खतांत मिसळल्यानंतर ती त्यांच्या जलाकर्षक गुणधर्मामुळे हवेतील पाणी शोषून घेतात व कठीण होतात, म्हणून अशा प्रकारची खते जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नयेत व ती केल्यास लगेचच पिकांना द्यावीत. द्रवरूप मिश्रखतांचा वापर फळबागा, भाजीपाला पिकांमध्ये करता येतो.


शेततळ्यासाठी अस्तरीकरण करायचे असल्यास कसे करावे? शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे असते. त्यासाठी बेन्टोनाईट, माती-सिमेंट मिश्रण, दगड-विटा-सिमेंट मिश्रण, चिकण माती किंवा प्लॅस्टिक फिल्मचा वापर करावा. प्लॅस्टिक फिल्मची जाडी 300 ते 500 जी.एस.एम. असावी. सिमेंट व माती प्रमाण 1ः8 व जाडी पाच सें.मी. ठेवावी. शेततळे हे काळ्या खोल जमिनीत बांधले असेल, तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते, त्यामुळे शेततळ्यातील पाणी कमी होते; गाळाचे प्रमाण वाढते. यामुळे काही कालांतराने शेततळ्याची पाणी साठवणक्षमता कमी होते. असे होऊ नये म्हणून शेततळे घेण्यापूर्वी मृद्‌ व जलसंधारणाचे उपाय करावेत.


कांदा पिकाचे थंडी धुक्‍यापासून संरक्षण कसे करावे? कांदा लागवडीपासून दीड ते दोन महिन्यांत रात्रीचे तापमान दहा अंश से.च्या खाली गेले आणि सतत हेच तापमान 10 ते 12 दिवस राहिले तर कमी तापमानास संवेदनशील जातींमध्ये डोंगळे दिसतात. म्हणून हंगामानुसार योग्य जातींची लागवड करणे आवश्‍यक असते. धुके किंवा थंडीपासून कांदा पिकाला वाचविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कांद्याला तुषार सिंचनाचा वापर केला आहे त्यांनी ज्या दिवशी धुके, थंडी व दव जास्त असेल तेव्हा तुषार सिंचन संच सकाळच्या वेळी पाच ते दहा मिनिटे चालवावा. त्यामुळे कांदा पातीवर जमा असलेले दव पाण्याने धुतले जाईल. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण कमी होईल.
तुषार सिंचन नसेल त्या ठिकाणी स्प्रे पंपाने पाण्याची फवारणी करावी. धुके किंवा दव अशा अवस्थेमध्ये कांद्यावरील रोगांच्या नियंत्रणासाठी शिफारशीत बुरशीनाशकाची स्टिकर मिसळून फवारणी करावी. सपाट वाफ्यात किंवा सरी वरंबा अथवा ठिबक वर कांदे लावले असतील तर हलके पाणी द्यावे. संध्याकाळी शेतात आठ ते दहा ठिकाणी ओला कचरा किंवा गवत जाळले तर शेतात रात्री धुराचे आवरण तयार होते. या आवरणामुळे शेतात उष्णता राहते. त्यामुळे थंडी, धुके व दव कांद्याच्या पातीवर जमत नसल्याने पिकाचे नुकसान होत नाही.


परसातील कोंबडीपालनासाठी कडकनाथ जातीच्या कोंबडीविषयी माहिती हवी, त्या कोठे मिळतील? कडकनाथ जातीच्या कोंबड्या मध्य प्रदेशातील झाबुआ व धार जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आढळतात. या कोंबडीचे मांस हे काळेशार असते. मांसातील प्रथिनांचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असून, रोगप्रतिकारशक्ती दणकट असते. या जातीच्या कोंबड्यांतील गुणसूत्रांमुळे त्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा तग धरून राहतात. गावकुसाबाहेर चरून कमी खर्चात हा पक्षी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकतो. सफल अंडी उत्पादन 55 टक्के असून, अंडी उबवणूक क्षमता 52 टक्के एवढी असते.


तज्ज्ञांनी दिलेला सल्ला आंबा – – आंब्याला येणाऱ्या नवीन पालवी व मोहोरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणासाठी दहा ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा दहा ग्रॅम थायोफीनेट मिथाईल किंवा 20 ग्रॅम प्रॉपीनेब प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर फवारणी करावी.
– आंबा मोहोरावरील तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी (17.8 टक्के) इ मिडाक्‍लोप्रिड तीन मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. ज्या ठिकाणी मोहोर पूर्णपणे उमलून आलेला आहे तेथे चौथी फवारणी घ्‌ यावी. त्यासाठी (35 टक्के) एन्डोसल्फान 15 मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यातून संपूर्ण मोहोरावर फवारावे. भुरी रोगाच्या नियं त्रणासाठी वरील दोन्ही फवारण्यांमध्ये दहा ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा पाच मि.लि. हेक्‍झाकोनॅझोल किंवा 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. गंधकाची फवारणी प्रखर उन्हातकिंवा अधिक तपमानात घेऊ नये. इमिडाक्‍लोप्रिडचा साततने वापर करू नये.
– हवामानातील बदलामुळे आंब्यामध्ये काही ठिकाणी फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी (45 टक्के) स्पिनोसॅड 25 मि.लि. किंवा (30 टक्के) डायमेथोएट दहा मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यातून संपूर्ण झाडावर फवारावे.
– ज्या आंबा कलमांना पुरेसा मोहोर आलेला आहे व थंडीमुळे त्या कलमांना परत मोहोर येण्याची शक्‍यता आहे अशा ठिकाणी परत येणारा मोहोर टाळण्यासाठी 50 पीपीएम जिब्रेलिक ऍसिडची फ वारणी प्रथम पूर्ण मोहोर उमललेला असताना व मोहोरीच्या आकाराची फळे झाल्यावर संपूर्ण झाडावर करावी. (50 पीपीएम द्रावण तयार करण्यासाठी एक ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड हे प्रथम अल्कोहोलमध्ये विरघळवून घ्यावे व नंतर ते एक लिटर पाण्यात चांगले मिसळल्यानं तर त्याचे एकूण 20 लिटर द्रावण करावे म्हणजे ते द्रावण 50 पीपीएम होईल.) फळांची प्रत सुधारण्यासाठी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती असताना एक टक्का युरिया आणि एक टक्का पोटॅशिअम नायट्रेटची तीन वेळा फवारणी करावी.
– पाण्याची उपलब्धता असल्यास आंबा झाडांना विस्तारानुसार प्रति झाड 150-200 लि. पाणी 15 दिवसांच्या अंतराने द्यावे.
काजू, नारळ
– नारळावरील गेंडा भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी माड साफ करावे. बागेतील शेणखताच्या खड्ड्यातील अळ्यांना मारण्यासाठी 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारिल भुकटी 40 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावी. नारळावरील सोंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी भुंग्याने पाडलेली भोके दहा टक्के कार्बारिल भुकटी व वाळूने बुजवून घ्यावीत.
– नारळाच्या पानांवरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
– काजूवरील रोठा किडीच्या नियंत्रणासाठी रोठ्याच्या अळ्या 15 मि.मी. आकाराच्या पटाशीच्या साह्याने काढून टाकाव्यात आणि (20 टक्के प्रवाही) क्‍लोरोपायरिफॉस दहा मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात द्रावण तयार करून प्रादुर्भित भाग त्या द्रावणाने चांगला भिजवावा व उरलेले द्रावण झाडाच्या बुंध्यालगत मुळाशी ओतावे.
– काजू पिकात नवीन मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर मोहोरावर ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो. नियं त्रणासाठी (35 टक्के) एन्डोसल्फान 15 मि.लि. प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. काजूमध्ये काही ठिकाणी फळधारणेस सुरवात झालेली आहे, अशा ठिकाणी ढेकण्या व फुलकिडींच्या नियं त्रणासाठी 50 टक्के कार्बारिल भुकटी 20 ग्रॅम किंवा पाच टक्के लॅ म्डा सायहॅलोथ्रीन सहा मि.लि. किंवा 50 टक्के प्रोफेनोफॉस दहा मि. लि. प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर फवारावे.
– पाण्याची उपलब्धता असल्यास काजू कलमांना प्रति झाड 100- 150 लि. पाणी 15 दिवसांतून एकदा देण्याची व्यवस्था करावी.
भाजीपाला
– पालेभाज्या व फळभाज्या पिकांवर मावा व पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणासाठी 15 मि.लि. डायमेथोएट प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून फवारणी करावी.
– कलिंगडाच्या रोपांवर, वेलींवर पाने खाणाऱ्या भुंग्यांचा व पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. नियंत्रणासाठी 15 मि.लि. डायमेथोएट प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
मत्स्यपालन
कृषी संशोधन केंद्र, मुळदे, ता. कुडाळ येथे शोभिवंत माशांचे मत्स्यबीज विक्रीसाठी उपलब्ध आहे. तळ्यातील माशांना नैसर्गिक खाद्याबरोबर पूरक खाद्य म्हणून शेंगदाणा पेंड, भाताचा कोंडा किंवा गव्हाचा कोंडा एकास एक या प्रमाणात एकत्रित करून पाण्यात भिजवून खाद्याचे प्रमाण ठरवावे.


ऍझोला निर्मिती कशी करावी? जनावरांसाठी खाद्य म्हणून वापराबाबत मार्गदर्शन करावे. ऍझोला हे एक वनस्पतिजन्य पूरक खाद्य आहे. ही पाण्याच्या पृष्ठभागावर वाढणारी नेचा वर्गातील वनस्पती आहे. ही वनस्पती हवेतील नत्र शेवाळाच्या मदतीने शोषून घेऊन सहजीवन पद्धतीने वाढते.
यात 25 ते 35 टक्के प्रथिने असून ते पचनास हलके आहे. दहा ते 15 टक्के क्षार व आठ ते दहा टक्के ऍमिनो ऍसिड आहेत, तसेच जीवनसत्त्व अ, कॅरोटीन आणि कॅल्शिअम, झिंक यांसारखी खनिजे आहेत. तसेच ऍझोलाचा वापर नत्र स्थिर करणारे जैविक खत म्हणूनही होतो. नत्रयुक्त पदार्थ, कॅलरीज, क्षार आणि जीवनसत्त्वांच्या उणिवेमुळे जनावरांतील दुग्धोत्पादन क्षमता कमी होते. या उणिवा भरून काढण्यासाठी पशुखाद्य पूरकांचा उपयोग करणे आवश्‍यक आहे.
ऍझोलासंवर्धनासाठी अनबिना ऍझोला या जातीचे वाण उत्तम आहे. ऍझोला लागवडीसाठी तीन मीटर एक मीटर 0.2 मीटर या आकाराचा समपातळी खड्डा खोदावा. यामध्ये सिल्पोलीन प्रकारचा पॉलिथिन कागद अंथरावा. त्यानंतर कडांच्या बाजूने विटा लावाव्यात. सिमेंट कॉंक्रीटचा वापर करून पक्के वाफे तयार करता येतात. या प्रकारात प्लॅस्टिक पेपर न वापरता ऍझोला लागवड करता येते. या वाफ्याला एका बाजूला पाणी बाहेर काढण्यासाठी छिद्रे सोडावीत. वाफ्यातील लहान खडे काढून टाकावेत, त्यामुळे प्लॅस्टिक पेपर फाटणार नाही. ऍझोलासंवर्धन करताना पहिल्यांदा वाफ्यामध्ये 10 ते 15 किलो चाळलेल्या मातीचा समपातळी थर द्यावा. दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गाईचे शेण 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट वाफ्यामध्ये सोडावे. ऍझोलाचे ताजे, बुरशी नसलेले बियाणे वापरावे. साधारणपणे एका वाफ्यासाठी 500 ग्रॅम ते एक किलो बियाणे पुरते. वाफ्यातील पाण्याची पातळी वरील बाजूस दोन ते तीन इंच वाफा रिकामा राहील अशी असावी.
ऍझोला निर्मितीसाठी ः 1) ऍझोलासंवर्धन शक्‍यतो झाडाच्या सावलीत किंवा कृत्रिम सावलीत करावे. 2) लागवडीसाठीच्या वाफ्यामध्ये चाळलेल्या मातीचा थर समप्रमाणात पसरून टाकावा. 3) 3 1 मीटर वाफ्यातून दररोज एक किलो ऍझोला काढून घ्यावा. 4) दर पाच दिवसांनी 20 ग्रॅम सुपरफॉस्फेट, एक किलो शेण, 20 ग्रॅम खनिज मिश्रण एकत्र करून वाफ्यामध्ये मिसळावे. 5) ऍझोला काळा पडल्यास दहा ग्रॅम कार्बेन्डाझीम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 6) दहा दिवसांनी 30 ते 35 टक्के पाणी बदलून त्यात स्वच्छ पाणी ओतावे. 7) प्रत्येक महिन्याला खड्ड्यातील पाच किलो माती काढून नवीन चाळलेली माती त्यात टाकावी. 8) दर सहा महिन्याने वाफे रिकामे करून स्वच्छ धुऊन पुन्हा मिश्रण भरावे.


मातीचा सामू कशाप्रकारे तपासला जातो? द्रावणाचा आम्ल-विम्ल निर्देशांक म्हणजे सामू (कि ) हायड्रोजन अणूच्या प्रमाणावर अवलंबून असल्याने त्याला पीएच (र्िीळीीरपलश वश कूवीेसशप) अशी संज्ञा आहे. सामू पीएच मीटरवर मोजला जातो. जमिनींची आम्लता, तसेच विम्लता तपासण्यासाठी सामू काढला जातो. सामू साडेसहापेक्षा कमी असल्यास जमिनी आम्लधर्मीय तर सामू 7.3 पेक्षा जास्त असल्यास जमिनी विम्लधर्मीय समजल्या जातात. सामू साडेसहा ते 7.3 इतका असल्यास अशा जमिनीत सर्व पिकांची वाढ चांगली होते. जमीन आम्लयुक्त असल्यास भात, नागली आणि विम्लयुक्त असल्यास कापूस, ऊस, गहू, कांदा, वांगी इत्यादी पिके चांगली येऊ शकतात.


रुंद वरंबे सरी पद्धतीने भुईमूग लागवड कशी करावी? लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया कशी करावी? रुंद वरंबे सरी या पद्धतीने भुईमूग लागवड करताना पूर्वमशागत करून रान भुसभुशीत झाल्यानंतर रुंद वरंबे व सरी तयार करण्यासाठी शेतात 150 सें.मी. अंतरावर खुणा करून, रेषा मारून आखणी करावी. पुन्हा रेषा मारलेल्या ठिकाणी 30 सें.मी. रुंदीचा पाट पाडल्यास 120 सें.मी. रुंदीचे व 15-20 सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार होतील. हे वाफे प्रथम पाणी देऊन पूर्ण भिजवून वाफस्यावर आल्यावर त्यावर 30 सें.मी. रुंदीच्या चार ओळी बसवून अशा ओळींत दोन रोपांतील अंतर दहा सें.मी. ठेवून बियाण्याची टोकण करावी. प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर करावयाचा झाल्यास काळा किंवा पांढरा, सात मायक्रॉन जाडीचा, टोकण अंतरानुसार छिद्र पाडलेला प्लॅस्टिक कागद वाफ्याच्या आकारानुसार गादी वाफ्यावर अंथरूण, दोन्ही बाजूने वाफ्याच्या बगलेत माती घुसडून देऊन छिद्र असलेल्या ठिकाणी एक एक शेंगदाणा टोकावा. या तंत्राचा वापर केल्यास पाण्याचा निचरा चांगला होऊन जमिनीत हवा व पाणी यांचे योग्य प्रमाण साध्य करता येते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन, भरपूर फुलधारणा होऊन, भरपूर आऱ्या सहजतेने जमिनीत घुसून, शेंगधारणा वाढून शेंगा चांगल्या पोसतात. अशा रुंद वरंब्यावरील मधल्या दोन ओळींना पुरेसे पाणी मिळत नसेल, तर वाफ्याची रुंदी 120 सें.मी. ऐवजी 90 सें.मी. ठेवावी. अशा या रुंद वरंबा-सरी पद्धतीबरोबरच प्लॅस्टिक आच्छादन वापरून नोव्हेंबर महिन्याच्या थंडीतही भुईमूग पीक टोकून त्याची उगवण चांगली होऊन आवश्‍यक रोप संख्येसह पीक जोमदार वाढते. कारण अशा आच्छादनाने जमिनीचे तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसने वाढते. शेंगांचा आकार वाढून शेंगदाण्याचे वजन वाढते; तण, रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, गांडूळ व सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. तापमानात अचानक बदल झाला, तर आच्छादनामुळे पिकाचे रक्षण होते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होते. या सर्वांच्या एकत्रित चांगल्या परिणामाने उत्पादनात 40 ते 50 टक्के वाढ होते. पिकाला माती परिक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे.
बीजप्रक्रिया
पेरणीसाठी शिफारस केलेल्या वाणांचे शुद्ध व प्रमाणित बियाणे वापरावे, त्यामुळे उत्पादनात 35-40 टक्केपर्यंत वाढ होते. पेरणीपूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर शेंगा फोडून बियाणे तयार करावे. फुटके, बियाण्याचे आवरण निघालेले, किडके, तसेच बारीक व चिरमुटलेले बियाणे बाजूला काढून पेरणीसाठी टपोरे बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे रोपावस्थेत येणाऱ्या रोगांपासून संरक्षण होऊन उगवण चांगली होते, झाडांची मर होत नाही. याचबरोबरीने दहा किलो बियाण्यास भुईमूग पिकासाठी शिफारशीत केलेले 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक आणि 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. यामुळे झाडांच्या मुळांवरील गाठींची वाढ चांगली होऊन उत्पादनात 12 ते 15 टक्केपर्यंत वाढ होते.


केळी लागवडीसाठी जमीन कशा पद्धतीची निवडावी? केळीसाठी जमीन भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी, हलक्‍या ते मध्यम प्रतीची, पोयटायुक्त आणि भरपूर सेंद्रिय कर्ब आणि 6 ते 7.5 सामू असलेली जमीन योग्य असते. जमिनीची क्षारता 0.05 टक्केपेक्षा जास्त नसावी. पाणी धरून ठेवणारी अत्यंत वालुकामय किंवा भरकाळीची आणि चोपण जमिनीमध्ये केळीची लागवड करू नये. केळी पिकाची मुळे अत्यंत नाजूक आणि मांसल असतात. मुख्य मुळे झाडाला आधार देण्याचे कार्य करतात आणि दुय्यम तंतुमय मुळे पाणी व अन्नद्रव्य शोषण्याचे कार्य करतात. केळी पिकाची मुळे जमिनीमध्ये 120 सें.मी.पर्यंत खोलवर जातात आणि जवळपास 150 सें.मी.पर्यंत आडवी पसरतात. त्यामुळे जमिनीची पूर्वमशागत चांगली होणे गरजेचे आहे.
केळीची मुळे जरी 120 सें.मी. पर्यंत खोलवर जात असली तरी कार्यक्षम मुळे जमिनीच्या सर्वांत वरच्या 30 सें.मी. भागामध्ये कार्यक्षम असतात, म्हणून जमिनीची खोल, आडवी नांगरट करून दोन-तीन वेळा वखरणी करून आणि मोठी ढेकळे असतील तेथे रोटाव्हेटर चालवून जमीन भुसभुशीत करावी. मध्यम, हलक्‍या, काळीच्या जमिनीमध्ये केळी ज्या अंतरावर लागवड करणार असाल, त्या अंतरावर लागवडीच्या दोन महिने आधीच सऱ्या पाडून लागवडीसाठी शेत तयार ठेवावे. शिफारशीत अंतरानुसार रोपांची लागवड करावी.


नारळ लागवड करायची आहे, यासाठी कोणत्या जाती निवडाव्यात? नारळ लागवड करण्यापूर्वी पूर्वनियोजन गरजेचे असते. ओलिताची सोय असल्यास सर्वच प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते. जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करणे आवश्‍यक आहे. रेताड जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता शेणखताचा वापर करून वाढवायला हवी, तर काळ्या चिकट जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळूचा, तसेच सेंद्रिय खतांचा वापर करायला हवा. शेताच्या बांधावरदेखील लागवड करता येते.
लागवड करताना सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन माडांतील अंतर. दोन माडांत योग्य अंतर असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. योग्य प्रमाणात उत्पादन मिळविण्यासाठी माडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 25 फूट (7.5 मी.) अंतर ठेवणे गरजेचे आहे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत लागवड करावयाची असल्यास 20 फुटांचे अंतर ठेवले तरी चालेल, तसेच ठेंगू जातीसाठीदेखील 20 फूट अंतर चालू शकते. जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा खोदणे जरुरीचे असते. वरकस किंवा मुरूमयुक्त जमीन, तसेच जी जमीन प्रथमच लागवडीखाली आणली जात आहे अशा जमिनीत 1 ु 1 ु 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करणे आवश्‍यक असते. नारळाच्या अनेक जातींची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे, त्यामध्ये बाणवली, प्रताप; तर संकरित टी ु डी आणि डी ु टी या जाती आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बाणवली जातीची रोपे तयार केली जातात, तर काही प्रमाणात प्रताप आणि संकरित जातींची रोपे तयार केली जातात. रोपवाटिका पिशवीऐवजी जमिनीमध्ये केलेली असल्याने संशोधन केंद्रातील नारळ रोपे पावसाळा सुरू झाल्यानंतरच विक्रीसाठी उपलब्ध होतात.
नारळ रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार देणे आवश्‍यक असते आणि म्हणूनच त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव अगोदरपासूनच करणे आवश्‍यक आहे. रोप लावल्यानंतर पश्‍चिमेकडील वाऱ्याने ते हलू नये म्हणून रोपांच्या उंचीच्या दोन काठ्या 45 सें.मी. अंतरावर रोपांच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.


सुरू हंगामातील ऊस लागवडीसंदर्भात मार्गदर्शन हवे. सुरू ऊस लागवडीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन योग्य असते. साधारणपणे जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. निवडलेल्या जमिनीची दोन वेळा उभी – आडवी नांगरणी करून मशागत करावी. दुसऱ्या नांगरणीपूर्वी हेक्‍टरी २० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे. मध्यम प्रकारच्या जमिनीत एक मीटर व भारी जमिनीत १.२० मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. कंपोस्ट – शेणखत उपलब्ध नसल्यास लागवडीपूर्वी ताग-धैंचा हिरवळीची पिके घेऊन जमिनीत गाडावीत.
वाणांची निवड ः को ८६०३२, को ९४०१२, कोएम ०२६५, कोसी ६७१, को ८०१४, को ७५२७, को ९२००५ बेणेप्रक्रिया करूनच उसाची लागवड करावी. जिवाणूंच्या बीजप्रक्रियेमुळे नत्रामध्ये ५० टक्के, तर स्फुरदाच्या मात्रेत २५ टक्के बचत होते. लागवड दोन डोळे टिपरी पद्धतीने करावी. दोन डोळ्यांचे टिपरे तयार करताना डोळ्याच्या वरील १/३ भाग ठेवून धारदार कोयत्याने बेणे छाटावे. ऊस लागवड करताना दोन टिपऱ्यांमधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावे. मध्यम काळ्या जमिनीसाठी (एक मीटर सरी अंतर) हेक्‍टरी ३०,००० टिपरी व भारी जमिनीसाठी (१.२ मीटर सरी अंतर) हेक्‍टरी २५,००० टिपरी बेणे लागते.


ऊस खोडव्याचे खत पाणी व्यवस्थापन कसे करावे? खोडवा व्यवस्थापनात पाणी, खत व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे. खोडव्यासाठी हेक्‍टरी २५० किलो नत्र, ११५ किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाश ही अन्नद्रव्ये विभागून द्यावीत. ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत वाफसा आल्यावर रासायनिक खताची पहिली मात्रा पहारीने द्यावी. ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत वाफशावर पहारीच्या साह्याने बुडख्यापासून १० ते १५ सें.मी. अंतरावर २० ते २२ सें.मी. खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला खतमात्रा देऊन छिद्र मातीने बुजवून घ्यावे. दोन छिद्रांमधील अंतर एक फूट (३० सें.मी.) ठेवावे. उर्वरित ५० टक्के खतमात्रा याच पद्धतीने सरीच्या दुसऱ्या बाजूस १२० ते १२५ दिवसांनी द्यावी. माती परीक्षणानुसार खोडवा पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी एकरी आठ किलो झिंक सल्फेट, दहा किलो फेरस सल्फेट, चार किलो मॅंगेनिज सल्फेट व दोन किलो बोरॅक्‍सचा वापर करावा. पाणी व्यवस्थापन करताना पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार १२ महिन्यांच्या खोडवा पिकास पाण्याच्या साधारण २८-३० पाळ्या द्याव्यात. पाचटामुळे पाणी पुढे जात नाही, अशा वेळी सरीमधून पाचट दाबत गेल्यास पाणी सरकते. त्यामुळे पाचट मातीला चिकटते व ते कुजण्यास मदत होते. ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत खते देऊन हलके पाणी द्यावे. उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी व इतर हंगामांत १२ ते १५ दिवसांनी गरजेप्रमाणे पाणी द्यावे.


सफेद मुसळी, बिब्बा, बेहडा, वावडिंग, भुईरिंगणी, अश्‍वगंधा, काडे चिरायत, सर्पगंधा, पानपिंपळी, इसबगोल या औषधी वनस्पतींचे कोणते भाग उपयोगी पडतात? सफेद मुसळी ः मुसळीचे कंद वापरण्यास उपयोगी ठरतात. शक्तिवर्धक, बाळंतपणाचे दोष दूर करण्यासाठी.
सर्पगंधा ः सर्पगंधाची मुळे आणि बियांचा वापर केला जातो. रक्तदाब कमी करणे, जीर्ण ज्वर, तसेच सुलभ प्रसूती होण्यासाठी उपयोगी.
पानपिंपळी ः वाळलेली फळे कफ, वात, दमा, खोकला, ताप, मूळव्याध यावर उपयोगी. बिब्बा ः बी हा वापरण्याचा भाग आहे. कफनाशक, वातनाशक म्हणून उपयोगी.
बेहडा ः फळे वापरतात. पचनशक्ती वाढविणे, त्रिफळा चूर्ण तयार करण्यास उपयोगी.
वावडिंग ः फळांचे चूर्ण, जंतनाशक, पाचनशक्ती वाढविते.
अश्‍वगंधा ः मुळे, बियांचा वापर होतो. अशक्तपणा, गर्भधारणेसाठी उपयोगी.
काडे चिरायत ः पाने, मुळे वापरतात. यकृत संरक्षणासाठी, संधिवात, पित्तनाशक म्हणून उपयोगी.
इसबगोल ः बियांचा वापर होतो. बद्धकोष्ठता, मूळव्याध, संधिवातावर उपयोगी ठरते.


पानवेल लागवड कशी करतात? पानवेलीसाठी सुपीक व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची आवश्‍यकता असते. क्षारयुक्त व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड करू नये. पानवेलीस उष्ण व दमट हवामान मानवते. पानवेल बागेत कायम सरासरी ६० ते ७० टक्के आर्द्रता असावी, त्यामुळे जमिनीची मशागत चांगल्याप्रकारे होणे आवश्‍यक असते. पानमळा लागवडीसंबंधी महत्त्वाचे मुद्दे ः १) पानमळ्यासाठी योग्य जमीन. २) वर्षभर भरपूर पाणीपुरवठा सोय. ३) पानमळ्यात काम करण्यासाठी कुशल मजुरांची उपलब्धता. ४) पानवेलीसाठी उपलब्ध बाजारपेठ व बाजारपेठेपर्यंत पाठवण्यासाठी वाहतुकीची साधने. ५) भरपूर प्रमाणात शेणखत व माती मिळण्याची शक्‍यता. ६) पानमळा उभारणीसाठी आवश्‍यक भांडवल. पानवेल हे नाजूक व सावलीप्रिय पीक असल्यामुळे पानवेलीची लागवड करण्याअगोदर सावलीसाठी व आधारासाठी शेवरी व शेवगा यांची लागवड करावी. पहिल्या पद्धतीमध्ये लागवड करण्यासाठी वाफ्याच्या लांबीच्या बाजूस शेवगा बियांची टोकण पद्धतीने लागवड करावी. शेवग्याच्या दोन झाडांमधील अंतर ६० सें.मी. ठेवावे. त्याच वेळी शेवरीच्या एक-दोन बिया शेवग्याच्या बियांबरोबर टाकाव्यात. पानवेल वाढीस लागल्यानंतर शेवरीची रोपे दोन आठवड्यात काढून टाकावीत. शेवग्याच्या विरुद्ध बाजूस एक मीटर अंतरावर शेवरीच्या बियाण्याची टोकण करावी.


शास्त्रोक्‍पद्धतीने कांदाचाळ उभारण्याविषयी मार्गदर्शन करावे. अपुरी साठवणूकक्षमता असल्याने कांद्याची नासाडी होते. शास्त्रोक्त पद्धतीने कांदाचाळ उभारून साठवणीत होणारे कांद्याचे नुकसान कमी करता येते, त्यासाठी कांदाचाळ बांधकामास सुरवात करण्यापूर्वी शासनाने ठरवून दिलेल्या विविध मापदंडाप्रमाणे चाळीचे बांधकाम करावे. चाळ उभारणी करताना शक्‍यतो उंच जागेची निवड करावी. पाणथळ किंवा उसाच्या शेताजवळील जागेची निवड करू नये.
जमिनीच्या प्रकारानुसार आवश्‍यक तेवढा पाया खोदून आराखड्यानुसार पायासाठी सिमेंट कॉंक्रिटचे पिलर/ कॉलम उभारावेत. तळाशी एक फूट माती काढून त्यामध्ये वाळू भरावी. नंतर चाळीची उभारणी करावी. कांदा साठवणुकीची जागा दीड ते दोन फूट उंच असावी, त्यामुळे खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरेल व गरम झालेली हवा चाळीच्या त्रिकोणी भागातून बाहेर निघेल. अशा रीतीने उत्तम वायुविजन होईल. पाया/आरसीसी खांब/ पिलर/ कॉलम, वरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपूर्ण सांगाडा तयार करावा. कांद्याची साठवणूक ही जास्तीत जास्त पाच फूट उंचीपर्यंत करावी.

ऑनलाइन ठिबक पद्धती

एकेरी लॅटरल पद्धतीत झाडाच्या मुळांच्या विस्तारानुसार व वयानुसार एकाच लॅटरलवर एक ते तीन ड्रीपर्स लावावे; परंतु झाडाचा विस्तार वाढल्यानंतर लॅटरलवर छिद्रे पाडून झाडाच्या खोडापासून दोन्ही बाजूस ड्रीपर्सची आवश्‍यकता असते. यासाठी सूक्ष्म नलिका लॅटरलमध्ये टाकून त्याच्या दुसऱ्या टोकास ड्रीपर बसवावे. सध्या बाजारात आऊटलेट ड्रीपर्स उपलब्ध आहेत, त्यानुसार एकाच छिद्रातून सूक्ष्म नळ्यांद्वारे झाडाच्या दोन्ही बाजूस पाहिजे त्या अंतरावर ड्रीपर्सची मांडणी करता येते.
श्रदुहेरी समांतर लॅटरल पद्धत : झाडाचा विस्तार जास्त झाल्यास एकेरी लॅटरल पद्धती वापरण्यात अनेक मर्यादा येतात. अशा वेळी दुहेरी समांतर लॅटरल पद्धतीचा वापर करणे आवश्‍यक असते. यामध्ये झाडाच्या दोन्ही बाजूंस खोडापासून समान अंतरावर दोन नळ्या समांतर टाकलेल्या असतात. झाडाच्या पाण्याच्या गरजेनुसार प्रत्येक नळीवर ऑनलाइन ड्रीपर्स जोडलेले असतात. या पद्धतीमध्ये झाडाच्या मुळाजवळ ओलाव्याचे प्रमाण एकेरी नळी पद्धतीपेक्षा वाढलेले असते, तसेच झाडाच्या मुळाचा विस्तार व्यापला जातो.
श्ररिंग पद्धत : ऑनलाइन पद्धतीचा वापर झाडाच्या मुळाच्या परिघामध्ये रिंग पद्धतीने केला जातो; मात्र ऑनलाइन ठिबक पद्धतीचा वापर रिंग पद्धतीने केल्यास ठिबक तोट्या लॅटरलमधून निसटून जाऊ शकतात.
श्रऑनलाइन पद्धतीतील दुहेरी समांतर लॅटरल पद्धत सर्वांत योग्य. मात्र, लॅटरल जमा करताना किंवा पसरविताना या पद्धतीतील तोट्या निघून जाऊ शकतात. प्रत्येक आंतरमशागतीच्या वेळी लॅटरल उपमुख्य पाइपपर्यंत गुंडाळून ठेवावे लागते, तसेच बरेचदा मोठ्या झाडाच्या मुळाच्या परिघापर्यंत पाण्याचा ओलावा स मान पसरत नाही.
इनलाइन ठिबक सिंचन पद्धत
श्रअलीकडच्या काळात इनलाइन ठिबकचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात केला जातो. ओळीतील झाडांचे अंतर कमी असल्यास ही पद्धत वापरली जाते. यामध्ये दोन ड्रीपर्समधील अंतर जमिनीचा प्रकार किंवा जमिनीत पाणी कसे पसरते, यानुसार 40 ते 75 सें.मी.पर्यंत निवडावे.
श्रइनलाइन ठिबक लॅटरलमध्ये ड्रीपर्स लॅटरलच्या आतमध्ये असल्यामुळे हे ड्रीपर्स निघून पडण्याची शक्‍यताच नाही; मात्र या पद्धतीमध्ये ड्रीपर्स बंद पडल्यास उघडून स्वच्छ करण्याची सोय नसते, त्यामुळे त्यांना क्‍लोरिन किंवा आम्ल प्रक्रियेद्वारे स्वच्छ करता येते.
श्रएकेरी किंवा दुहेरी लॅटरल पद्धत : काही शेतकरी ओळींतील अंतर जास्त ठेवून, प्रत्येक ओळीत झाडांतील अंतर कमी ठेवून मोसंबीची लागवड करतात, त्यामुळे अशा लागवडीसाठी इनलाइन ठिबक पद्धतीतील एकेरी किंवा दुहेरी लॅटरल मांडणी योग्य; मात्र सुरवातीच्या काळात जेव्हा झाडांचा विस्तार कमी असतो, त्या वेळी झाडातील रिकाम्या क्षेत्रातसुद्धा पाणी दिले जाते.
श्ररिंग पद्धत : इनलाइन ठिबक पद्धतीचा वापर रिंग प्रकारच्या मांडणीमध्ये सर्वांत योग्य असतो. यामध्ये प्रत्येक झाडास त्याच्या मुळांच्या परिघाप्रमाणे इनलाइन लॅटरलची रिंग करून मुळांचा विस्तार व्यापला जातो. एका ओळीतील सर्व झाडांच्या अशा रिंग उपमुख्य नळीपर्यंत साध्या (बिनछिद्राच्या) लॅटरलने जोडल्या जातात. या पद्धतीने पाण्याचा ओलावा समान रीतीने पूर्ण परिघामध्ये पसरला जातो, तसेच लॅटरल गुंडाळताना दोन रिंगमधील जोडणीची नळी तेवढीच काढून झाडाच्या आळ्यामध्ये ठेवता येते. यामुळे लॅटरल गुंडाळताना किंवा पसरविताना होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

हेलिओथिस अळी

हेलिओथिस अळी म्हणजेच बोंडअळी किंवा घाटेअळी, या अळीमुळे कापूस, तूर, हरभरा या पिकांप्रमाणेच मका, ज्वारी, सूर्यफूल, टोमॅटो अशा अनेक पिकांचे अपरिमीत नुकसान होते. भारतात या किडीमुळे सुमारे १००० कोटी रुपये उत्पादनाचे नुकसान होते. बाजारात उपलब्ध असलेल्या कीटकनाशकांना या किडीची प्रतिकारक्षमता वाढली आहे. तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या अवास्तव फवारण्यांमुळे पीक उत्पादनात विषारी अंश (Residue) दृष्टोत्पत्तीस येवू लागले आहेत. बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी परिणामकारक कमी खर्चाची जैविक कीड नियंत्रण द्ध प्रचलित झाली आहे. यामध्ये भक्ष्यक कीटक, परोपजीवी   कीटक किडीमध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्मजीव यांचा वापर केला जात आहे
 
हेलिकोवर्पा न्युक्लिअर पॉलिहेड्रॉसिस विषाणू 
(
एच.एन.पी.व्ही.)मोठय प्रमाणावर उत्पादन करुन घाटेअळी / बोंडअळी नियंत्रणासाठी वापरात येतो. ग्रामीण भागातील महिलांनी एच.एन.पी.व्ही. निर्मिती व वापर तंत्रज्ञानाबाबत आता प्रशिक्षण घेतले पाहिजे. एच.एन.पी.व्ही. च्या फवारणीमुळे प्रभावी कीड नियंत्रण होते. यासाठी महिलांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पुढाकार घ्यावा. म्हणून एच.एन.पी.व्ही. निर्मितीची सोपी व घरगुती पद्धत समजावून घेणे गरजेचे आहे.
पिके
हेलिओथिस अळीची ओळख
हरभरा
घाटेअळी
ज्वारी, बाजरी, मका
कणसातील अळी
गहू
ओंबी खाणारी अळी
तूर, मूग, चवळी,    वाटाणा
शेंगा पोखरणारी अळी
कपाशी
अमेरिकन बोंडअळी
सूर्यफूल, झेंडू
फुलांवरील अळी
करडई
बोंडअळी
टोमॅटो, कारली, मिरची
फळ पोखरणारी अळी
एच.एन.पी.व्ही. निर्मितीसाठी लागणारे साहित्य
  • लहान कुपी किंवा पारदर्शक डबी अथवा बाटली.
  • दोनशे मिली एच. एन. पी. व्ही. मातृवाण
  • मातीचे भांडे
  • भेंडी किंवा हरभरा
  • पांढरा शुभ्र कापूस
  • काळे कापड
  • मध किंवा साखर
एच.एन.पी.व्ही. निर्मितीची सोपी पद्धत
शेतातील कपाशी, तूर अथवा हरभरा पिकातून काही बोंडअळया वेचून प्रत्येक   कुपीत किंवा डबीत एक याप्रमाणे ठेवावी.
१.      या अळयांना कोषावस्थेत जाईपर्यंत (म्हणजे २ ते १० दिवस) कुपीमध्ये किंवा डबीमध्ये भेंडी किंवा कपाशीची कोवळी बोंडे खायला द्यावीत.
२.     तळाशी ओली वाळू असलेल्या मातीच्या भांडयात तयार झालेले कोष पसरवून काळया कापडाने भांडयाचे तोंड व्यवस्थित बंद करावे.
३.     ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा साखर मिसळून द्रावण तयार करावे.
४.     या तयार केलेल्या साखरेच्या किंवा मधाच्या द्रावणात कापूस बुडवून पिळून काढावा. नंतर कोषातून बाहेर पडलेल्या पतंगावस्थेतील प्रौढ कीटकाला हाच कापूस खाद्य म्हणून मातीच्या भांडयाच्या तळाशी ठेवावा. भांडयाचे तोंड मात्र काळया कापडाने झाकून घ्यावे.
५.    मातीच्या भांडयातील पतंगांनी काळया कापडावर घातलेली अंडी गोळा करावीत.
६.      अगोदरच भिजविलेले हरभरा/भेंडी, पारदर्शक डबी/बाटलीत घेऊन त्यामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे अंडी टाकावीत.
७.    अंडयातून बाहेर पडलेल्या अळयांचे १० दिवसांपर्यंत पारदर्शक डबी/ बाटलीत संगोपन करावे.
८.     मिली पाण्यामध्ये १ मिली एच.एन.पी.व्ही. मातृवाण मिसळल्याने द्रावण सौम्य होते.
९.      अळी १० दिवसांची झाल्यावर तिच्या तिसया अवस्थेपर्यंतच्या काळात सौम्य एन. पी. व्ही. द्रावणात भिजवलेले हरभरा खाद्यासाठी वापरल्याने अळीस एन. पी. व्ही. विषाणु ची बाधा होते.
१०.  अशा एन. पी. व्ही. विषाणूग्रस्त अळीमध्ये सूस्तपणा येणे, पोटाचा भाग गुलाबी  होणे, शरीरातन द्रव स्त्रवणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. नंतर अशी रोगग्रस्त अळी लवकरच मरते.
११.   या मेलेल्या अळया गोळा करुन उकळून थंड केलेल्या पाण्यात एक आठवडाभर साठवाव्यात.
१२.  अळया पाण्यात पूर्णपणे चिरडून द्रावण तयार करावे. हे मिश्रण ढवळून घ्यावे आणि असे मिश्रण कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यावे.
१३.  हे द्रावण थंड ठिकाणी साठवून बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ठराविक कालावधीमध्ये वापरता येते. तसेच त्याचा त्वरित वापर करावयाचा असल्यास ही फवारणी संध्याकाळच्या वेळेस पिकावर केल्याने बोंडअळीचे प्रभावीपणे नियंत्रण होते.
 
 टीप-
  • मि.ली. एन.पी.व्ही. मातृवाणापासून तयार केलेले ५० मिली द्रावण ७५० अळयांना एन.पी.व्ही. चा प्रादुर्भाव होण्यासाठी पुरेसे असते. या रोगग्रस्त अळयांपासून तयार केलेले एन.पी.व्ही. विषाणूयुक्त द्रावण एकर फवारणीसाठी पुरेसे आहे.
  • ४० एकर पिकावर फवारणी करण्यासाठी लागणारे द्रावण आणि त्यासाठी पुरेशा प्रमाणात रोगग्रस्त अळया मिळण्यासाठी कृषि विद्यापीठे तथा संशोधन केंद्राकडून उपलब्ध झालेले २०० मि.ली. एच.एन.पी.व्ही. मातृवाण पुरेसे होते.

गांडूळ मित्रांचे अस्तित्व

भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.
वनस्पती सेंद्रीय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्टेतून सेंद्रीय पदार्थ बाहेर पडतात. मासांहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खात तेव्हा त्यांचे विष्ठेत सेंद्रीय पदार्थ असतात. शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंडया जमिनीवर पडतात. शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करुन आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रीय पदार्थ जमिनीत मिसळतात. अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात. कच्चे सेंद्रीय पदार्थ आपणास ओळखता येतात, पण ते पुर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मूळचा आकार राहत नाही. तेंव्हा त्याला ह्युमस असे म्हणतात.
ह्युमसची व्याख्या
ह्युमसची व्याख्या खनिज जमिनीत चांगल्याप्रकारे कुजलेला कमी अधिक स्थिर असलेला सेंद्रीय पदार्थाचा भाग अशी करतात. हा सेंद्रीय पदार्थ कोलोईडल
(colloidal) असतो. त्याचा रंग काळा किंवा गडद तपकिरी असतो. त्यामध्ये सेंद्रीय स्वरुपात मूलद्रव्ये असतात. मुख्यतः कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन व गंधक असतात. इतर मूलद्रव्ये कमी प्रमाणात असतात. झाडाचे लिग्नीनपासून मोठया प्रमाणात ह्युमस तयार होतो.जमिनीतील जिवाणू ह्युमसमध्ये राहातात. त्याचे शरीर बांधणीसाठी ह्युमसचा उपयोग होतो. सेंद्रीय पदार्थाचे ह्युमसमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला ह्युमीफिकेशन म्हणतात.
सेंद्रीय पदार्थ-
सेंद्रीय पदार्थ कार्बनच्या अनेक संयुगाने बनलेले असतात. खडक व खनिजे यापासून तयार झालेल्या जमिनीच्या असेंद्रीय घटकामध्ये सेंद्रीय पदार्थांचे मिश्रण झालेले असते. अशा जमिनीला सेंद्रीय जमीन म्हणतात. जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजण्याची क्रिया सतत चालू असते आणि अखेरीस सेद्रीय पदार्थांचे रुपांतर साध्या असेंद्रीय संयुगात होते.
जमिनीच्या उत्पादन क्षमतेत सेंद्रीय पदार्थांचे कार्य सुपीक जमीन बनविण्यात सेंद्रीय पदार्थाचा प्रत्यक्ष सहभाग असतो. कारण त्यामधून हळूहळू अन्नद्रव्ये पिकांना मिळत असतात. जिवाणुंमुळे सेंद्रीय पदार्थ कुजण्याची हळूहळू क्रिया होते, तेव्हा त्यातील अन्नद्रव्ये पिकासाठी मुक्त होतात. सेंद्रीय पदार्थाचे खनिजीकरणामुळे हळूहळू कार्बन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस, व इतर मूलद्रव्ये मुक्त होतात. भारी जमिनीत चिकण कणांचे प्रमाण जास्त असते. अशा जमिनीची मशागत करणे अवघड असते. अशा जमिनीत पाणी हळूहळू मुरते, त्यामुळे बरेचसे पाणी वाहून जाते. अशा जमिनीत हवा खेळती रहात नाही, भारी जमिनीत सेंद्रीय पदार्थ मिसळल्यास ती जमीन भुसभुशीत होते, व मशागत करणे सोपे जाते. जमीन भुसभुशीत झाल्यावर पाणी मुरते, पाणी वाहून जात नाही. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते, हवा खेळती राहते. जमिनीच्या पृष्ठभागावर पोपडा तयार होत नसल्याने पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगली होते.
याउलट हलक्या जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असते. हवा भरपूर असते, परंतु अन्नद्रव्यांचा अभाव कमी असतो, अशा जमिनीत सेंद्रीय पदार्थ मिसळल्यास जमिनीची जलधारणेची क्षमता वाढते. अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो.
गेली ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या ५०-६० वर्षांपासून शेतकरी रासायनिक खते वापरत आहेत. पाणी व रासायनिक खताच्या अति वापरामुळे महाराष्ट्रातील जमिनी चोपण होत आहेत व अशा जमिनी पडीक पडत आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे १९६० साली उसावर संशोधन केले असता गांडूळामुळे उसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा वाढतो हे सिद्ध झाले आहे. सध्या पुणे, मुंबई येथील खाजगी सहकारी संस्थानी गांडूळ व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प मोठया प्रमाणात सुरु करुन विक्री चालू केली आहे.
हजारो वर्षापासून गांडूळे अस्तित्वात असून त्यांचे रंग व आकार भिन्न भिन्न प्रकारचे आढळून येतात. गांडूळे जांभळी, लाल, तांबडी, निळी, हिरवी, तपकीर व फिकट तांबूस अशा विविध रंगाची असतात.सर्वात लहान आकाराची गांडूळे इंचापेक्षाही कमी लांबीची, तर सर्वात मोठे १० फूट लांबीची गांडूळे ऑस्ट्रलियात आहेत. दक्षिण आफ्रिकेत अलिकडे अजगरासारखी अजस्त्र आकाराची गांडूळे दिसून आली आहेत. त्यांची लांबी २० फूट व मध्यभागाची जाडी सुमारे ३ फूटांपर्यंत असते. पण सर्वसाधारण नेहमी आढळून येणारे गांडूळे ६ ते ८ इंच लांबीची असतात, मोठया प्रकारची गांडूळे जमिनीत ३ मीटर खोलीपर्यंत जातात. आणि माती हे खाद्य म्हणून वापरतात.
गांडूळ खत निर्मितीसाठी इसिनीया फेटीज ही परदेशी जात जगामध्ये सखोल संशधनाअंती सर्वप्रकारे सर्वोत्तम अशी आढळून आली आहे. पेरीओनिक्स एक्सकॅहेटस ही गांडूळाची स्थानिक जातसुध्दा गांडूळ खत तयार करण्यास चांगली असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या इसिनीया फेटीज ही जात सगळीकडे गांडूळ खत निर्मितीसाठी मोठया प्रमाणात वापरात आहेत.
गांडूळांना वानवे, वाळे, केचळे, शिदोढ, काडू किंवा भूनाग अशा अनेक प्रकारच्या नावाने ओळखले जाते. प्राणीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे गांडूळे ऍनेलिडा या वर्गात मोडतात.जगामध्ये गांडूळांच्या ३००० प्रकारच्या जाती आहेत. तर भारतामध्ये ३०० प्रकारच्या जातींचे गांडूळे आढळून येतात.
अतिशय नाजूक मऊ व गुळगुळीत शरीराचा जंतासारख्या लवचिक आकारात २ इंचापासून ते २ फूटांपर्यंत लांबी असलेले गांडूळ रिंग्जने बनलेले असून त्याचे शरीर लांबट आकाराचे असते. ह्या रिंग्जवर छोटे छोटे तंतू असतात. ज्यांच्या मदतीने गांडूळाची हालचाल होते व त्यांना बिळांना घट्ट धरुन ठेवता येते.गांडूळाच्या शरीराचा रंग त्याच्या रक्त्तातील हिमोग्लोबीनमुळे आलेला असतो. त्याच्या शरिरावर अस्थिपंजर अस्तित्वात नसते व त्याची शरीर रचना एकावर एक बसणा-या दोन नलीकांप्रमाणे असते. आतील नलिका म्हणजे त्याची पचनसंस्था व बाह्य नलिका म्हणजेच स्नायूंची बनलेली त्वचा होय. वयात आलेल्या गांडूळाच्या गळयाभोवती एक उभट गोलाकार पट्टा असतो. त्यास क्लायटेलम म्हणतात व ह्याच भागात जननेंद्रिय आढळतात. गांडूळाला डोळे नसतात. गांडूळाच्या अंगावर सर्व दूर पसरलेल्या प्रकाश संवदेनशील ग्रंथी असतात. त्यामुळे त्यास प्रकाशाची तीव्रता समजते. ग़ांडूळास तीव्र प्रकाश सहन होत नाही. त्याच त्वचेवरील रसायन संवेदनशील ग्रंथीमुळे त्यांना सभोवतालच्या वातावरणातील रासायनिक बदल लगेच जाणवतात व अन्नपदार्थ ओळखता येतात. त्यासाठी गांडूळाची त्वचा ही ओलसर असते. त्वचेतील हिमोग्लोबीन प्राणवायुच्या कमी दाबात देखील कार्य करु शकत असल्यामुळे गांडूळे जमिनीत खोलवर राहू शकतात.
गांडूळाचा जीवनक्रम / आयुष्य
गांडूळहा उभयलिंग प्राणी आहे. अंडावस्था, बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि प्रौढावस्था अशा चार त्याच्या जीवनक्रमाच्या अवस्था आहेत. अंडावस्था ३ ते ४ आठवडे, बाल्या व तरुण्यावस्था ४-१० आठवडे तर प्रौढावस्था ६-२४ महिन्यापर्यंत आढळते. प्रयोगशाळेतील अभ्यासानुसार गांडूळाचे आयुष्य १५ वर्षे असते. परंतु निसर्गामध्ये गांडूळाचे कोंबडया, गोम, पक्षी, रानडुकरे, मुंगूस इत्यादी शत्रू असतात. तारुण्य अवस्थेमध्ये २ गांडूळे एकत्र आल्यानंतर दोन्ही गांडूळे एक कोष (ककून)टाकतात. या कोषात १८ ते २० अंडी असतात. प्रत्येक कोषातून ३ ते ४ गाडूळे बाहेर पडतात. याप्रमाणे गांडूळांची एक   जोडी ६ ते ८ पिल्लांना जन्म देते. एक गांडूळ दर ७ ते ८ दिवसांनी एक कोष देते. एक कोष पक्व होवून पिल्ले बाहेर येण्यास १४ ते २१ दिवस लागतात. त्यासाठी दमट वातावरण आवश्यक असते. एका वर्षात गांडूळे ते ६ पिढया तयार करतात.जीवनच्रकाचा कालावधी जातीनुसार व हवामानानुसार बदलत असतो. प्रजननक्षमता ही मुख्यतः जात, आर्द्रता आणि सेंद्रीय पदार्थांची उपलब्धता व कर्ब, नत्र गुणोत्तर यावर अवलंबून असते.
गांडूळ हा निरुपद्रवी प्राणी बीळ करुन रहाणारा आहे. बिळात राहून सतत तोंडावाटे माती व सोबत येणारे सेंद्रीय पदार्थ गिळून विष्टा बाहेर टाकतात. सेंद्रीय पदार्थ हे गांडूळाचे मुख्य अन्न होय, म्हणून ते मोठया प्रमाणावर सेंद्रीय पदार्थ खातात. गांडूळांच्या काही प्रजाती जमिनीवर पडलेली झाडाची पाने खाण्यासाठी आपल्या बिळात ओढून नेतात तर काही प्रजाती रात्री जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन तेथील सेंद्रीय पदार्थ खातात. इतर गांडूळे माती खातात तेंव्हा त्या मातीतील सेंद्रीय पदार्थ त्यांना मिळतात. एक गांडूळ एक वर्षात ४०० ग्रॅम शुष्क सेंद्रीय पदार्थ खात असतो. एका चौरस मीटरमध्ये गांडूळाची संख्या २०० असल्यास प्रती वर्षी हेक्टरी ८० टन सेंद्रीय पदार्थ खातात. परंतु प्रत्यक्षात शेतातील गांडूळे एवढया प्रमाणात सेंद्रीय पदार्थ खात नाहीत. कारण शेतीची जमीन दिर्घकाळ कोरडी रहाते. त्यामुळे निष्क्रीय ( सुप्तावस्थेत ) राहतात.
गांडूळाची पचनसंस्था म्हणजे एक सरळ नळी असते. सुरवातीला तोंड, स्नायुयुक्त घसा, अन्ननलिका, क्रॉप गिझार्ड आणि आतडी असे भाग असतात. ज्यावेळी गांडूळे सेंद्रीय पदार्थाचे तुकडे करुन खातात, त्यावेळी घशाच्या स्नायुच्या आकुंचन प्रसारणामुळे गांडूळे तोंडावाटे अन्न आत ओढून घेतात. हे अन्न म्हणजे कुजलेले सेंद्रीय पदार्थ होय. अन्नपदार्थ अन्ननलिकेद्वारे क्रॉपमध्ये जातात तेथे तात्पुरता अन्नसाठा होतो व पुढे ते स्नायुयुक्त गिझार्डमध्ये ढकलले जाते. तेथे त्याचे चर्वण होऊन भुग्यात रुपांतर होते. या प्रक्रियेत गिळलेल्या मातीतील वालुकामय कणांचीही मदत होते. या भुग्यामुळे अन्नकणांच्या पृष्ठभागात वाढ होऊन पचनक्रियेस हातभार लागतो. असे अन्नकण पुढे आतडयात आल्यावर निरनिराळया पाचके व उपयुक्त जिवाणू यांच्यामुळे जैविक, रासायनिक प्रकिया होऊन त्याचे विघटन होते. पचनक्रियेत योग्य तापमान व सामू राखण्याशिवाय बॅक्टेरिया कार्यपवण होवू शकत नाहीत. घशाच्या मागील बाजूस कॉल्सिफेस नावाच्या ग्रंथील अन्ननलिकेत जोडलेल्या असतात. या ग्रंथीतून पाझरणा-या कारबॉनिक अनहॅड्रज नावाच्या द्रव्यामुळे शरीरातील सामू योग्य प्रमाणात राखण्यास मदत केली जाते, जेणे करुन पाचके कार्यप्रवण राहातात. गाडूळाच्या शरीरातून चयापचयानंतर उत्सर्जित झालेल्या मृद गंधयुक्त, काळसर रंगाच्या, वजनास हलके आणि कणिदार दिसणा-या विष्टेसवर्मिकंपाष्टअसे म्हणतात. एक गांडूळ दररोज त्याच्या वजनाइतकी विष्टा शरीराबाहेर टाकते. एक गांडूळ दररोज त्याच्या वजनाइतकी विष्टा शरीराबाहेर टाकते. त्याच्याशिवाय गांडूळाच्या विष्टेतून नत्र, स्फुरद, पालाश, चुनखडी, मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम ही मूलद्रव्ये शेजारच्या जमिनीपेखा अधिक प्रमाणात पिकांना मिळतात, शिवाय गाडूळाच्या विष्टेतील सामू शेजारच्या जमिनीपेक्षा अधिक उदासीन असतो.
गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते, कारण जमिनीतील खनीज नत्राचे प्रमाण वाढते आणि तो नत्र पिकांना मिळतो, गांडूळाच्या शरीराच्या कोरडया वजनाच्या ७२ टक्के प्रथिने असतात. मेलेल्या गांडूळाचे शरीर जमिनीत कुजल्यानंतर पिकांना नत्र मिळतो. म्हणजेच एका मेलेल्या गांडूळापासून १०मिलीग्रॅम नायट्रेट मिळते. जमिनीत गांडूळांची संख्या ३७.५ लाख असल्यास हेक्टरी सुमारे २१७ किलो सोडीयम नायट्रेट इतका नत्र मिळतो. पण प्रत्यक्षात फार थोडे गांडूळ मरतात. सेंद्रीय पदार्थातील कार्बन, नायट्रोजन गुणोत्तर २०.१ किंवा त्यापेक्षा कमी झाल्याशिवाय त्यातील नत्र पिकांना मिळत नाही. हे गुणोत्तर कमी करण्याचे कार्य गांडूळे करीत असतात.
गांडूळ आणि जमिनीची रासायनिक सुपीकता
गांडूळे त्याचे निम्म्या वजनाचीमाती दररोज खात असतात. गांडूळे जमिनीत बिळे करतात. तेथील माती खाऊन मार्ग मोकळा करतात. एक चौरस मीटर जागेतील गांडूळे दरवर्षी ३.६ किलो माती खातात. त्यामुळे जमिनीच्या पृष्टभागावर ६० वर्षात १५ से.मी. जाडीचा थर तयार होतो. काही गांडूळे त्यांचे बिळातच विष्ठा टाकतात. गांडूळे माती खातात तेंव्हा सेंद्रीय पदार्थाबरोबरमातीचे कण त्याचे शरीरात आणखी बारीक होतात, त्यामुळे त्यांचे विष्टेतील मातीचे कण बारीक असतात. जमिनीच्या खोल थरातील माती गांडूळे पृष्टभागावर आणून टाकतात. याप्रमाणे गांडूळे हेक्टरी २ ते २.५ टन मातीची उलथापालथ करतात. गांडूळाच्या विष्ठेतील मातीची कणीदार संरचना असते, त्यामुळे ही विष्ठा पाण्याने वाहून जात नाही. जमीन घट्ट बनत नाही. ओली व कोरडी जमीन भुसभुशीत राहाते. कणीदार संरचनेमुळे पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमिनीत मुरते, पृष्ठभागावरुन वाहून जात नाही. जमिनीतील पाण्याचा योग्यप्रकारे निचरा झाल्याने जमिनीत हवा खेळती राहते. गांडूळे नसलेल्या जमिनीपेक्षा गांडूळे असलेल्या जमिनीतून पाण्याचा निचरा ४ ते १० पटीने अधिक होतो. गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व त्यामुळे सहजिकच पिकाचे उत्पादन वाढते. गांडूळामुळे जमिनीची जलधारणाशक्ती २० टक्के ने वाढते.
पिकांना अधिक पाणी मिळते व पर्यायाने पाण्याचा ताण सहन करावा लागत नाही.
गांडूळाच्या विष्टेत नत्राचे प्रमाण आजूबाजूच्या मूळ जमिनीच्या तुलनेत पाच पटीने जास्त असते. तर स्फुरद सात पटीने व पालाश अकरा पटीने जास्त असतात. ही प्रमुख अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध अवस्थेत मिळतात. त्याशिवाय कॅल्शियम व मॅग्नेशियम उपलब्ध अवस्थेत दुप्पट प्रमाणात विष्टेत असतात.
पिकाचे पोषक अन्नद्रव्ये
गांडूळांची विष्ठा
जमिनीचा थर
शेरा
वाढीचे प्रमाण
० ते १५ सें.मी.
१५ ते २० सें. मी.
सेंद्रीय पदार्थ (नत्रयुक्त)
१३.१
९.८ टक्के
४.९ टक्के
दुप्पट
उपलब्ध स्फुरद (पीपीएम)
१५०
२१
दहापट
उपलब्ध पालाश    (पीपीएम )
३५८
३२
२७
बारापट
उपलब्ध मॅग्नेशिम (पीपीएम)
४९२
१६२
६९
चौपट
उपलब्ध कॅल्शियम (पीपीएम)
२७९३
९९३
४८१
चौपट
उपलब्ध पीएच
६.४
६.१
जैविक सुपीकता
गांडूळाच्या विष्ठेतीलबॅक्टैरिया या जिवाणूंचे प्रमाण जमिनीतील जिवाणूंच्या संख्येच्या तुलनेने १३ पट अधिक होते, असे पानोमरेव्हा या शास्त्रज्ञास १९६२ साली आढळून आले आहे. जमिनीत हे जंतू ५.४ दशलक्ष प्रती ग्रॅम इतके होते, याशिवाय फंगस व ऍक्टिनोमायसीटस्‌ काही प्रमाणात तर ऍझोटोबॅक्‌अर हे नत्र स्थिर करणारे जिवाणू बयाच मोठया संख्येने गांडूळ विष्ठेत आढळून आले. सेंद्रीय पदार्थाचे जिवाणूंच्या सहाय्याने विघटन कार्य विष्टा बाहेर टाकल्यानंतरही बरेच दिवस ब-याच वेगाने चालू असते. त्यांची विष्टा त्यातील जिवाणूंचे आजूबाजूच्या जमिनीवर प्रसार करण्याचे केंद्र बनते.
गांडूळाच्या विष्टेत असलेलेनेकार्डिया, ऑक्टिनोमायसिट्स व स्टेप्टोमायसेससारखे जिवाणू अँटीबायोटिकस्स सारखे परिणामकारक असतात. अशाप्रकारे गांडूळाची आतडी सुमारे एक हजार पटीपेखा अधिक संख्येने जिवाणूंची संख्या वाढवून एक प्रकारे नैसर्गिक रिऍक्टरचे (Bio-reactor) काम करतात. तर विष्टेद्वारा बाहेर पडलेले सुक्ष्म जिवाणू जमिनीची जैविक सुपीकता वाढविण्याचे प्रसार केंद्राचे कार्य करतात.
भौतिक सुपीकता
जमिनीचा पोत (Structure) सुधारण्याचे कार्य माती खाऊन त्यातील जाड वाळूसारख्या कणांचे आतडयांत भरडून पोयटयाचे कणांत व पोयटयाच्या आकाराच्या कणांचे चिकण मातीच्या आकारमानासारख्या कणात भरडून बारीक करण्याचे कार्यही गांडूळे करतात. शिवाय खालच्या थरातील माती वर आणून ती विष्टेच्या स्वरुपात जमिनीच्या पृष्ठभागावर टाकतात. काही वर्षांनी जमिनीचा वरचा १० ते १५ सें.मी. जाडीचा थर कणांची चांगली जडण घडण झालेल्या दाणेदार मातीचा बनतो. हे दाणे (Aggregate) पाण्यातही स्थिरावस्थेत राहतात. त्यांचा व्यास ते २ मि. मि. असतो.
गांडूळखत निर्मिती
१. गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी.
२. खड्डयाच्या जवळपास मोठी वृक्ष/झाडे नसावीत. कारण झाडांची मुळे गांडूळ खतामधील
पोषक घटक शोषून घेतात.
३. गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते. त्यासाठी छप्पर किंवा शेड करणे आवश्यक आहे.
छप्पर बांधणीची पद्धती
ऊन आणि पावसापासून बचाव करण्याकरिता ८ फूट उंच, १० फूट रुंद व ३० ते ४० फूट लांब, आवश्यकतेनुसार लांबी कमी जास्त चालू शकते. छपरात / शेडमध्ये शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी रुंद कडेची बाजू मोकळी ठेवावी. सुरक्षितता नसेल तर लांबीच्या दोन्ही बाजूंना कूड घालावा.
गांडूळ पालनाची पद्धती
छपरामध्य दोन फूट रुंदीचा मधोमध रस्ता सोडून त्यांच्या दोन्ही बाजूने तीन फूट रुंदीच्या दोन ओळी ठेवा. त्या दोन ओळीवर उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करुन सहा इंच उंचीचा थर द्यावा. त्यामुळे गांडूळांना जाड कच-यात आश्रय मिळेल. दुसरा थरचांगल्या मुरलेल्या, रापलेल्या खताचा किंवा सुकलेल्यास्लरीचा द्यावा. तो उष्णता निरोधनाचे काम करील. त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकल्यास गांडूळांना खाद्य म्हणूनकामी येईल. बीज रुप म्हणून या थरावर साधारण ३ x ४० फूटासाठी १० हजार गांडूळे समान पसरावीत. त्यावर कच-याचा फूट जाडीचा थर त्यावर घालावा. पुन्हा चार-पाच इंच कच-याचा द्यावा. ओल्या पोत्याने / गोणपाटाने सर्व झाकून ठेवावे.
बेड थर
१.
जमीन
२.
सावकाश कुजणारा सेंद्रीय पदार्थ २”-जाडीचा थर (नारळाच्या शेंडया, पाचट, धसकट इत्यादी )
३.
कुजलेले शेणखत/गांडूळखत २”- जाडीचा थर
४.
गांडूळे
५.
कुजलेले शेणखत / गांडूळखत जाडीचा थर
६.
शेण, पालापाचोळा वगैर १२ जाडीचा थर
७.गोणपाट
शेणखतामध्ये गांडूळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोडयाची लिद यापासूनसुध्दा खत तयार होते.
गांडूळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत व सेंद्रीय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरुन गांडूळ खत तयार करता येते.
गांडूळ खाद्यामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले
पिकाचे अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड यांचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडूळासाठी वापरताना त्यामध्ये १:३ या प्रमाणात शेणखत मिसळणे आवश्यक आहे.
गांडूळखाद्य नेहमी बारी करुन टाकावे, बायोगॅस प्लॅन्टमधून निघालेली स्लरीसूध्दा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते.
खड्डयामध्ये गांडूळे टाकण्याअगोदर गांडूळ खाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे. म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल.
सुक्ष्म जिवाणू संवर्धके (बॅक्टेरीयल कल्चर) वापरुन खत कुजविण्याच्या प्रक्रियेस वेग देता येतो. त्यासाठी टन खतास अर्धा किलो जिवाणू संवर्धके वापरावीत.
या व्यतीरिक्त गांडूळखाद्य किलो युरिया व किलो सुपर फॉस्फेट प्रती टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रिया लवकर होवून गांडूळ खत लवकर तयार होईल.
गांडूळ खाद्य
इतर प्राण्याप्रमाणे गांडूळांना खाण्याकरिता त्यांचे आवडी-निवडीचे अन्न लागते. त्यामुळे गांडूळांची वाढ व प्रजोत्पादन झपाटयाने होते.
झाडांची पाने, कापलेले गवत, तण, काडीकचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकावू भाग, प्राण्यांची विष्टा (कोंबडयांची विष्टा वगळता ) कंपोस्टखत, शेणखत, लेंडीखत इत्यादी पदार्थ गांडूळाचे आवडीचे आहेत.
गांडूळ खत वेगळे करण्याची पद्ध
गांडूळखत हाताला भुसभुशीत व हलके लागते अशा स्थितीत गांडूळ खत तयार झाले असे समझावे खत तयार झाल्याचे दिसून आल्यावर दोन दिवस पाणी मारणे बंद ठेवावे. म्हणजे वरचा थर कोरडा झाल्याने गंडूळे खाली जातात. नंतर उघडया जागते एकदा हलक्या हाताने काढू ढिग करावा. उजेड दिसताच सर्व गांडूळे ही खालच्या बाजूला जमा होतात. नंतर वरवरचा थर परत एकदा थंड जागेत साठवण्यास ठेवावा आणि परत वरील पद्धतीचा क्रमाक्रमाने अवलंब करुन गांडूळांना खद्य पुरवून खताची निर्मीती सुरु ठेवावी.
गांडूळखत वेगळे करताना कुदळी, टिकाव, फावडे, खुरपे, यांचा वापर करुन नये, जेणे करुन गांडूळांना इजा पोहोचणार नाही.
या गांडूळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्याची विष्टा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते असे खत शेतामध्ये वापरता येते.
निरनिराळया पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष जमिनीत टाकावे.
गांडूळखत व कंपोस्ट / शेणखत यातील फरक
अ.क्र.
गांडूळखत
शेणखत / कंपोस्ट खत
गांडूळखत लवकर तयार होते (गांडूळे गादी वाफयावर स्थिरावल्यावर २-३ आठवडे)
मंदगतीने तयार होते (जवळ जवळ ४ महिने लागतात)
घाण वास, माशा, डास यांचा उपद्रव नसून आरोग्याला अपायकारक नाही
घाण वास, माशा, डास यांपासून
उपद्रव संभवतो
जागा कमी लागते
जागा जास्त लागते
x x ७५ फूटआकाराच्या गादीवाफया पासून ( म्हणजेच ३०० घनफूट ) दर पंधरा दिवसाला ३ टन खत मिळते
x १० x १० फूट आकाराच्या खड्डयापासून दर महिन्यांनी १० टन खते मिळते.
उर्जा, गांडूळखत, द्रवरुप खत
कंपोस्ट व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळत नाहीत.
हेक्टरी मात्रा ५ टन लागते
हेक्टरी मात्रा १२.५० टन लागते
तापमान फार वाढत नसल्यामुळे जिवाणूंचे कार्य जोमात होते.
तापमान वाढत असल्यामुळे जिवाणूंचे कार्य मंद असते.
नत्र उपलब्ध २.५ ते ३ टक्के
नत्र उपलब ०.५ ते १.५ टक्के
स्फूरद उपलब्ध १.५ ते २ टक्के
स्फूरद उपलब्ध ०.५ ते ०.९टक्के
१०
पालाश उपलब्ध १.५ ते २ टक्के
पालाश उपलब्ध १.२ ते १.४ टक्के
११
सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध होतात
सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात
१२
गांडूळे विक्री करुन अतिरिक्त उत्पन्न मिळते
कोणतेही अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही.
गांडूळांचे व गांडूळ खता चे उपयोग
अ) माती च्या दृष्टिने
१. गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो
२. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
३. गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते.
४. गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
५. जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते
६. जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
७. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
८. जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
९. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
१०. गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
११. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.
ब) शेतकयांच्या दृष्टीने फायदे
. इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने
वाटचाल.
२. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
३. पाणी देण्याचा कालावधी कमी होतो
४. झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.
५. रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.
६. मजूर वर्गावर होणारा खर्च कमी.
७. गांडूळखत निर्मितीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलबध होते.
क) पर्यावरणाच्या दृष्टीने
. माती, खाद्य पदार्थ आणि जमिनीतील पाण्याच्या माध्यमाद्वारे होणारे प्रदुषण कमी होते.
२. जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते.
३. पडीक जमिनीची धूप व क्षाराचे प्रमाण कमी होते.
४. रोगराईचे प्रमाण कमी होऊन आरोग्य चांगले राहाते.
५. कच-याच्या विल्हेवाटीने आरोग्यासंदर्भाचे प्रश्न कमी होतात.
ड) इतर उपयोग
. गांडूळापासून किंमती अमिनो ऍसिड्स, एंझाईमस्‌ आणि मानवासाठी औषधे तयार करता येतात.
२. पक्षी, कोंबडया, पाळी जनावरे, मासे यांना उत्तम प्रती खाद्य म्हणून गांडूळ वापरता येतात.
३. आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो.
४. पावडर, लिपस्टिक, मलमे यांसारखी किमती प्रसाधने तयार करण्यासाठी गांडूळांचा  वापर केला जातो.
५. परदेशात पिझाज, आमलेट, सॅलेड यासारख्या खाद्य वस्तूमध्ये प्रथिनांची कमतरता भरुन काढण्यासाठी गांडूळांचा उपयोग करतात.
६. गांडूळांच्या कोरडया पावडरमध्ये ६० ते ६५ टक्के प्रथिने असतात. तिचा अन्नात वापर करता येतो.
गांडूळांच्या संवर्धनासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
. एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त २००० गांडूळे असावीत.
२. बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रुंपासून गांडूळाचे संरक्षण करावे.
३. संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान २० अंश ते ३० अंश सेंटिग्रेडच्या दरम्यान ठेवावे. गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
४. गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा ४० ते ४५ टक्के ठेवावा.
५. गांडूळे हाताळतांना किंवा गांडूळ खत वेगळे करताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडूळे वेगळी करावीत, जेणेकरुन इतर गांडूळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.
उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळण्यासाठी महत्वाच्या बाबी
. शेणखत, घोडयाची लीद, लेंडी खत , हरभ-याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाजीपाल्याचे अवशेष, सर्व प्रकारची हिरवी पाने व शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे गांडूळाचे महत्वाचे खाद्य होय.
२. स्वयंपाकघरातील वाया गेलेले भाजीपाल्याचे अवशेष , वाळलेला पालपाचोळा व शेणखत समप्रमाणात मिसळले असता गांडूळाची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
३. हरभ-याचा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३:१० या प्रमाणात मिसळल्यास उत्तम गांडूळ खत तयार होते.
४. गोरगॅस स्लरी, प्रेसमड, शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
गांडूळ खत वापरताना घ्यावयाची काळजीः
   १.      गांडूळ खताचा वापर केल्यानंतर रासायनिक खते कीट कनाशके किंवा तणनाशके जमिनीवर वापरु नयेत.
२. गांडूळ शेतीत पिकांच्या मुळांभोवती चांगला ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच तो वर्षातून ९ महिने टिकवणे आवश्यक आहे.
३. गांडूळ आच्छादनरुपी सेंद्रीय पदार्थांचा वापर अन्न म्हणून करत असल्यामुळे त्या सेंद्रीय आच्छादनाचा पुरवठा वरचेवर करणे आवश्यक आहे.
४. योग्य प्रमाणात ओलावा आणि आच्छादनाचा पुरवठा झाला नाही तर गांडूळांच्या कार्यक्षमतेते घट येते.
गांडूळांचा वापर करुन सेंद्रीय खत निर्मिती या तंत्रज्ञानाचा वापर करुन सन १९९३-९४ पासून कृषि विभागामार्फत तालुका बीज गुणन प्रक्षेत्रावर गांडूळ खत/ कल्चर उत्पादन कार्यक्रम कार्यान्वित केला आहे. आतापर्यंत १७९ तालुका बीज गुणन केंद्रावर हा कार्यक्रम सुरु असून तालुक्यातील शेतकयांना लगतच्या प्रक्षेत्रावर गांडूळ खत/कल्चर  उपलबध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रक्षेत्रावर उत्पादीत केलेले गांडूळ कल्चर रुपये ४००/- प्रतीहजार व गांडूळ खत रुपये २०००/- प्रती टन या दराप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. तसेच कृषि चिकित्सालयामार्फत गांडूळ खत उत्पादनाचे प्रशिक्षण / प्रात्यक्षिक शेतकयांना देण्यात येत

 
MODEL SCHEME ON COMPOSTING THROUGH NADEP METHOD
 
Introduction
In dryland conditions, organic manures play a great role as they not only supply balanced nutrients but also retain substantial amount of moisture. Traditionally, farmers used to apply farmyard manures to crops grown under rainfed condition.  No scientific procedures are followed for preparing the manure and as a result the quality of the manure used to be very poor. Slowly over a period of time farmers have lost interest in farmyard manure and mainly started depending on chemical fertilizers, which further deteriorated the soil health, infiltration and water holding capacities.
Organic manures are relatively bulky materials, such as animal and plant wastes, added to the soil mainly to improve the physical condition to replenish its humus content, to maintain optimum conditions for microbial activity and make good a small part of the plant nutrients removed by crops or lost through leaching or soil erosion.
Farmyard manure (FYM) is the most commonly used organic manure in India.  It consists of mixture of cattle dung, the bedding used in stable and remnants of straw fed to cattle.  Traditional method of preparing and storing FYM is generally faulty.  The cattle dung together with stable waste and house sweepings is heaped loosely.  The loose heap lie exposed to sun and the raw organic matter dry up. . In rains, it gets drenched and all the soluble nutrients get leached out from the manure. Also, while the organic matter decomposes, the ammonia etc. escapes in to atmosphere.  The wastage of nitrogen rich urine, the loss of nitrogen due to the fermentation of exposed cattle dung, washing away of soluble mineral elements by leaching etc. reduce the manurial value of the FYM.
The loss of nitrogen and mineral elements caused by unscientific handling can be reduced greatly by storing dung in a stone or brick lined pits, mixing large quantities of straw and other vegetable matter with cattle dung and keeping the heap compact and moist. This encourages bacterial decomposition of raw organic matter, prevents loss of soluble mineral elements through seepage and minimizes nitrogen losses.  The quality of manure is also improved by the concentrated feeds given to the cattle.  Manure from cattle fed on cereal straws, grass hay is much less valuable than that from animals fed on legume hays, grains and concentrates.   Use of preservatives also enhances the quality of the manure.  Gypsum and super phosphate have proved most promising in preventing escape of ammonia.
There are several improved methods of compost making, which increase the rate of decomposition and minimize the losses of nutrients.   Composting is the process of reducing vegetable and animal refuses to quickly utilizable condition for maintaining soil fertility. 
Various methods of composting have been researched both under aerobic and anaerobic conditions.  NADEP method of composting developed by Shri N.D. Pandhari Pande from Maharashtra is one such processes facilitating aerobic decomposition of organic matter.  The compost made out of this process has been tested by several institutions like IIT, New Delhi, Gandhigram University, Centre for Science, Wardha etc. including the farmers field and found to be useful.   This method takes care of all the disadvantages of heaping of farm residues and cattle shed wastes, etc. in the open.
 
2.  Details of NADEP method of composting 
The method requires construction of a tank admeasuring 3m x 1.8 m or 3.6 m x 1.5 internally with 25 cm thick perforated brick wall all around in mud or cement mortar to a height of 0.9 m above ground.  The above ground-perforated structure facilitates passage of air for aerobic decomposition.  The floor of the tank is laid with bricks.  The tank is covered above with a thatched roof.  This prevents loss of nutrients by seepage or evaporation and the contents are not exposed to sun and rain.  The ingredients for making compost are agro-wastes, animal dung and soil in the ratio of 45:5:50  by weight.  The ingredients are added in layers starting with vegetable matter followed by dung and soil in that order.  Each layer can be about 45 kg vegetable matter, 5 kg of dung mixed in 70 l of water and 50 kg of soil so that 30 layers will fill the tank.  For convenience the number of layers could be reduced to half this number by doubling the quantities of ingredients in each layer.  Tree loppings and green manure crops can also be used to fill up the tank if sufficient farm wastes are not available at time.  The nutrients produced in the manure are absorbed by the soil layers thus preventing their loss.  About 22-50 1 of water is to be sprinkled twice a week after the tank is loaded.  The material loaded has to be left in the tank for about 100 to 120 days for complete decomposition of the material.  One tank can be used three times a year.  With production of 3 tons to 3.5 tons of compost produced per cycle about 9 to 10 tons of compost can be made annually from one tank.  The compost can be stored for future use, preferably in a thatched shed after air drying and maintaining it at about 20% moisture level by sprinkling water when ever needed.  By following the procedures suggested above, the compost could be preserved for about 6 to 8 months. It is advisable to sprinkle cultures like Trichoderma, Azatobacter and PSB in layers to enhance the speed of composting process.
There are certain inconveniences experienced by the farmers adopting this method.  These include difficulty in following the filling procedure as recommended, requirement of labor is more compared to traditional methods, filling is difficult during the raining period, expenditure on transport of silt when the unit is away from the field.  As the process needs 1.5 t of soil for every cycle, this results in removing soil. However, if the tanks are installed in the same field where agro-wastes are generated and manure to be used, this is not a limiting factor. It is very simple to construct and easier to operate. In this method compost can be prepared with minimum quantity of cow dung use and hence, it can be considered as very versatile model.
3.  Unit Cost
The cost of construction of the tank with brickwork in cement morter and light thatched roof has been estimated at Rs.4100/- per unit and the operational cost has been estimated at Rs.950/- per cycle per plant.  The details of the cost estimation are given in Annexure-I.
4. Production from one unit
About 3 t of compost is generated per tank per cycle. In the first year 2 cycle and from the 2nd years onward 3 cycles can be produced.  Thus, each tank can produce 6 t in the first year and 9 t from the 2nd year onwards.
5.  Return from the manure
It is expected that the improved compost is used in the own farm only and the crop yields go up as a result substantially. The excess manure can be sold to the neighboring farmers. If any farm is having large quantities of bio-wastes from orchards, vegetable farming etc., more no of tanks can be installed and the excess production can be sold to other farmers so that some cash is generated from farm wastes.
For working out the economic viability, however, the cost of the compost is assumed as Rs.1000 per ton.  Based on the returns at this value the repayment schedule for one unit of 2 tanks is given in the Annexure-III.  For units of 4 tanks, the repayment may be increased accordingly. 
6.  Unit Size
It is necessary that a farmer should have at least 2 tanks so that when one is filled up the other one is available for loading the material generated in his farm. Thus, for a farm size of 5 acres dryland a unit of two tanks is needed. If the farmer is having mixed farm of dry land and irrigated farm, one should have 4 tanks. Hence, the following unit costs are suggested.
 
Farm size
No of tanks
Investment RS
Margin RS
Bank loan RS
Dry land up to 5 acres
2
8200
820
7380
Dryland of 5-10 acres
4
16400
1640
14760
Mixed farm of dry and irrigated land of 5 acres
4
16400
1640
14760
 
For other farm configurations, different nos can be considered taking the above as a guidance.
7.  Financial Analysis
The cash flow statement covering the Benefit Cost Ratio (BCR), Net Present Worth (NPW) and Internal/financial rate of return (IRR/FRR) have been worked out for the project.  Normally the BCR should be greater than 1, NPW should be positive and IRR should be greater than 15%.  Results of Financial analysis for the project based on discounted cash flow technique are as under :
go to top
 
NPW (Rs.)
39690
IRR (%)
> 50
BCR
2.12
Average DSCR
2.67
Repayment Period
6 years with 1 year grace period
 
The detailed financial analysis has been given in Annexure-III.
8.  Financial Assistance
The financing of compost through NADEP method would be considered for refinance support by NABARD.  Therefore, all participating banks may consider financing this activity subject to their technical feasibility, financial viability and bankability.
9.  Margin Money
The Beneficiaries / Farmers should normally meet 10% of the project cost out of their own resources as margin money.  However, it may undergo changes subject to guidelines issued from time to time.
10.  Interest Rate
Interest is as determined by financing bank.  However, for the present model interest rate has been assumed at 12 per cent.
11.  Security
Banks may obtain security as per RBI norms.
12.  Repayment Period
Depends upon the gross surplus generated.  The principal and interest will be repayable in 6 years with 1 year grace.
13.  Refinance Assistance
As per the existing policy, NABARD provides refinance assistance @ 90% of bank loan.  However, it may vary from time to time.
 
Annexure – I

NADEP COMPOST TANK – UNIT COST
1.         Specifications  –  Capacity                    –           4.86 m3
                                              Size                          –           3m x 1.8m x 0.9m
                                             Thickness of wall      –           25 cm
2.         Construction cost

 
Bricks 1200 nos @ Rs.1500/1000·        Cement       200 kgs @ Rs.3.00 per kg          Sand      3 m3 @ Rs.100/ per m3 
Masons   3 No. @ 100/ per day              
Labourers   8 No. @ Rs. 60/ per day            Light thatched roof, LS                                 Total                                                   
1800
600
300
300
480
620
4100
 
Maintenance cost          per year                –           200
4. Operational cost                                                                

  • Cow dung 150 kg @ Rs.0.20/kg                                                                               –             30
  •  Agro-waste 1350 kg @ Rs.0.25/kg                                                                          –           335
  • Soil (a) Cost of digging 1500 kg by two labourers  @  Rs.60/-labourer                       –           120

 (b) Cost of transport 2 carts @ Rs.50/-                                                                              –           100
·        Water sprinkling charges – Once in 4 days 30 times 45 minutes
each time 22.5 hrs i.e 3 labourers @ Rs.60/- per day                                                            –           180

  • Cost of tank filling 2 laborers half day                                                                          –             60
  • Cost of unloading, removing undecomposed material etc.
  • one  labour @ Rs.60/- per day                                                                                   –             60

·        Miscellaneous                                                                                                              –             65
                                                                                                                                                       —–
                                                                                                                    Total                            950

Annexure – II

Economics of NADEP Compost – Unit of 2 tanks

 
Sr. No.
Items
Years
I
II
III – XV
A
Cost
8200
1
Construction of tank
8200
2
Operation Cost
3800
(2 cycles in a year)
5700
5700
(3 years in a year)
3
Maintenance Cost
400
400
4
Interest on operation & maintenance cost
532
854
5
Total Cost
12000
6632
6954
B
Benefits
6
Capacity available (ton)
12
18
18
7
Capacity utilization
50%
80%
90%
8
Actual Production (ton)
6
14.4
16.2
9
Actual Benefit
(Rs.1000/ton.)
6000
14400
16200
10
Net Benefit
(-) 6000
7768
9246
 
 
 
Annexure-III Model scheme on composting through NADEP method

नॅडेप कंपोस्ट खत

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रीय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदोर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.
नॅडेप कंपोस्ट खत
ही पद्धत गांधी वादी शेतकरी श्री. नारायण राव देवराव पांढरीपांडे, मु. पुसद, जि.यवतमाळ यांनी येथील गोधन केंद्रात त्यांच्या स्वतच्या प्रयोगशिलतेतून विकसित केली आहे. त्यांच्या नावावरून या पद्धतीला नॅडेप कंपोस्ट पद्धती असे नामकरण करण्यात आले. या पद्धतीचे वैशिष्टय म्हणजे कमी कालावधीत चांगले कुजलेले कंपोस्ट तयार होते. तयार होणा-या खतात अन्न द्रव्याचे प्रमाण वाढते तसेच कमी शेणाचा उपयोग करून जास्तीतजास्त कंपोस्ट खत तयार करता येते.
टाक्याचे बांधकाम
या पद्धतीत चांगला पाया भरून जमिनीवर पक्क्या विटांच्या सहाय्याने ३ मीटर लांब, १.८० मीटर रूंद व ०.९० मीटर उंच (१० x x ३ फूट) अशा आकाराचे टाके बांधले जाते. टाक्याच्या भिंतीची जाडी २२.५ सेंमी. (९इंच) असावी. विटांची जुळवणी व बांधकाम मातीत करावे. टाके पडू नये म्हणून वरच्या थरांची जुळाई सिमेंटची करावी. टाक्याच्या तळाचा भाग धुमसाने विटा व दगड घालून टणक बनवावा. या टाक्यात मोकळी हवा खेळती रहावी याकरिता टाके बांधताना चारही बाजूच्या भिंतींना छिद्र ठेवावे लागते. विटांच्या दोन थरांची जुळाई झाल्यानंतर तिस-या थराची जुळाई करताना प्रत्येक वीट १७.५ सेंमी ( ७ इंच ) रिकामी जागा सोडून जुळाई करावी म्हणजे चारही बाजूला १७.५ सेंमी अंतराचे छिद्र तयार होऊन त्यातून मोकळी हवा खेळू शकेल. यामुळे काडीकचरा, पालापाचोळा कुजण्याची क्रिया चांगली होते. पहिल्या ओळीच्या दोन छिद्राच्यामध्ये दुस-या ओळीचे छिद्र व दुस-या ओळीच्या दोन छिद्राच्यामध्ये तिस-या ओळीचे छिद्र येईल. या पद्धतीने जुळाई करावी. अशाप्रकारे ३-या, ६ व्या व ९व्या थरामध्ये छिद्र तयार होईल. टाक्याच्या आतील व भूपृष्ठाचा भाग शेण व मातीने लिंपावा. टाके वाळल्यानंतर उपयोगात आणावे.
नॅडेप कंपोस्ट करण्याकरिता लागणारी सामग्री
१) शेती किंवा इतर भागातील काडीकचरा, पालापाचोळा, मुळ्या, टरफल, सालपटे इत्यादी १४०० ते १५०० किलोग्रॅम  यात प्लॅस्टीक, काच, गोटे इत्यादी वस्तूंचा समावेश असू नये.
२) ९० ते १०० किलोग्रॅम (८ ते १० टोपले) शेण (गोबर गॅस संयंत्रातून निघालेल्या
शेणाच्या लगद्याचा सुद्धा उपयोग करता येईल.)
३) कोरडी माती शेतातील किंवा नाल्यातील बारीक गाळलेली माती १७५० किलो (१२० टोपली )
४) पाणी कोरडा पालापाचोळा, काडीकचरा व इतर वनस्पती यांच्या वजनापेक्षा २५ टक्के जास्त पाणी ( १५०० ते २००० लिटर) कंपोस्ट खताची गुणवत्ता वाढविण्याकरिता गाईचे किंवा इतर जनावरांचे मुत्र जमा करून त्याचाही उपयोग करावा.
नॅडेप कंपोस्ट टाके भरण्याची पद्धती
पहिली भराई
टाके भरण्याचे काम सुरू करण्यापूर्वी टाक्याच्या आतील भिंती व तळ शेण व पाणी यांचा धोळ करून ओल्या कराव्यात.
अ)पहिला थर
काडीकचरा व पालापाचोळा, देठ, मुळे इत्यादी वनस्पतीजन्य पदार्थाचा पहिला १५ सेंमी.चा (६ इंच) थर टाकावा.
ब) दुसरा थर
१२५ लीटर पाणी व ४ किलो शेण यांचे मिश्रण पहिल्या काडी कच-याच्या थरावर शिंपडावे जेणेकरून संपूर्ण वनस्पतीजन्य पदार्थ ओले होतील.
क) तिसरा थर
साफ वाळलेली व गाळलेली माती वनस्पतीजन्य पदार्थाच्या ५० टक्के (५० ते ६० किलो) याप्रमाणे शेण व पाण्याच्या मिश्रणाने ओल्या केलेल्या वनस्पतीजन्य पदार्थावर पसरावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावे.
वरील पद्धतीने प्रत्येक वेळी ३ थर देण्याच्या पद्धतीचा अवलंब करून टाक्याच्यावर ४५ सेंमी (१.५ फूट) उंच थर येतील याप्रमाणे टाके भरावे. साधारणत ११ ते १२ थरामध्ये टाके भरले जाते. त्यावर ७.५ सेंमी (३ इंच) मातीचा थर (४०० ते ५०० किलो) टाकून त्यावर शेण व पाणी यांच्या मिश्रणाने व्यवस्थित लिंपून टाकावे. वाळल्यानंतर भेगा पडल्यास पुन्हा शेण व पाण्याच्या मिश्रणाने लेप द्यावा.
२) दुसरी भराई
१५ ते २० दिवसानंतर या टाक्यात टाकलेली सामग्री आकुंचन पाऊन साधारणत २० ते २२.५ सेंमी (८ ते ९ इंच) खाली दबलेली दिसून येईल. तेंव्हा पुन्हा पहिल्या भराई प्रमाणेच वनस्पतीजन्य पदार्थ शेण व मैंती मिश्रण आणि गाळलेल्या मातीच्या थराने पुन्हा थराची रचना करून टाक्याच्या वर ४५ सेंमी उंचीपर्येंत टाके भरून पुन्हा ७.५ सेंमी (३ इंच) मातीचा थर देऊन शेण व माती यांचे मिश्रणाने लिंपून बंद करावे.
या पद्धतीमध्ये टाके भरल्यापासून चांगले कंपोस्ट खत तयार होण्याकरिता ९० ते १२० दिवस लागतात. या संपूर्ण कालावधीत पडलेल्या भेगा शेण व पाण्याच्या मिश्रणाने बुजविणे व शिंपडणे चालू ठेवणे याबाबत दक्षता घ्यावी. टाक्यावर गवत उगवल्यास ते काढून टाकावे, आर्द्रता कायम ठेवणे , तसेच जास्त ऊन असल्यास गवत किंवा चटईने टाके झाकून ठेवावे.
खताची परिपक्वता
तीन चार महिन्यात खत परिपक्व होऊन खताचा रंग भुरकट होतो. खताचा दुर्गंध नाहिसा होतो. अशा खतामध्ये १५ ते २० टक्के ओलावा कायम असावा. हे खत चाळणीने गाळून चाळणीच्या वरील अर्धकच्या वनस्पतीजन्य पदार्थाचा भाग पुन्हा टाक्यात वापरावा. चाळणीमधून गाळलेले खत जमिनीमध्ये पेरून घ्यावे. या टाक्यातून साधारणत १६० ते १७५ घनफूट चाळलेले खत व ४० ते ५० घनफूट कच्चा माल मिळतो.
कंपोस्ट खत देण्याची पद्धत
पुरेशा प्रमाणात आपणाजवळ नॅडेप कंपोस्ट खत तयार असल्यास दरवर्षी प्रती हेक्टर ७.५ ते १२.५ टन खत पेरणीच्या १५ दिवस अगोदर पसरून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेल्या कंपोस्ट खताची उपलब्धता कमी असल्यास पेरणीच्या वेळी चाडयामधून द्यावे. खत देण्याचे चाडे पुढे ठेवून बियाणे पेरणीकरिता चाडे मागे असावे. जेणेकरून खत प्रथम जमिनीत पडेल व त्यानंतर बियांची पेरणी होईल. टाक्यामधून खत काढल्यानंतर ते मोकळ्या जागेत ठेवू नये. खत प्रत्यक्ष देण्यापूर्वी काही दिवस साठवून ठेवायचे असल्यास ढीग लावून व त्यावर गवताचे आच्छादन टाकून ठेवावे. मधून मधून पाणी शिंपडावे. त्यामुळे आर्द्रता कायम राहण्यास मदत होईल.
तरी सर्व शेतक-यांनी नॅडेप कंपोस्ट खत पद्धतीचा अवलंब करून उत्तम कंपोस्ट खताची निर्मिती करावी, व त्याचा वापर करून जमिनीचा पोत व उपजाऊशक्ती कायमस्वरूपी राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. यामुळे राष्ट्राची खताची समस्या सोडविण्यास हातभार लागेल.