संकरित तूर बिजोत्पादन

संकरीत तूरीखाली महाराष्ट्रात तसेच देशात एकुण क्षेत्र फारच नगण्य आहे. याचे कारण म्हणजे संकरित तूर वाणाचे बियाणे पुरेशा प्रमानात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधुंनी आपले गरजेपुरते संकरित बियाणे पुरेशा आपल्याच शेतात थोड्या फार क्षेत्रात (५ त् १० गुंठ) तयार केल्यास फायद्याचे होऊ शकते.

तूरीचे संकरित बीयाणे मादी आणि नर वाणाचा नैसर्गिकरितिने संकर घडवुन तयार करता येते. ज्वारी, बाजरी व सूर्यफुल मधील संकरित वाणाची मादी सायटोप्साझमीन नर नपुंसकता (सी.जी.एम.एस.) तत्त्वाचा उपयोग करुन तयार करतात तर तुरीमध्ये वर दिलेल्या संकरीत वामासाी जेनेटीक नरनपुंसकता (जी एम.एस.) तत्वाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे तुरीचे बियोत्पादन तंत्रामध्ये ज्वारी, बाजरी किंवा सुर्यफुलापेक्षा थोडा वेगळेपणा आहे. संकरित तुरीच्या बियोत्पादन कार्यक्रमामधील मादी वाणामध्ये ५० टक्के झाडे नरनपुंसक तर बाकी ५० टक्के फलमक्षम झाडे उपटुन टाकावी लागतात. मादी वाणातील फक्त नरनपुंसक झाडांपासक संकरित तूर बिजोत्पादन होते.

संकरित तूरीच्या अधिक बिजोत्पादनाकरिता डॉ.पं.दे.कृ.वि च्या खडधान्य संशोधन विभाग अकोलाद्वारे बिजोत्पादन तंत्रज्ञान विकसीत केले आहे. थोडक्यात ते देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

बिजोत्पादन लागवड तंत्रः

विलगीकरण अंतरः

बिजोत्पादन क्षेत्राचे चारही बाजुंनी ४०० मिटर विलयांतर ठेवावे. या परिसरात दुसरे तुरीचे पीक असतात कामा नये.

रासायनिक खतेः

पेरणापुर्वी हेक्टरी २५ किलो नत्र अधिक ५० किलो स्फुरद रासायनिक खताद्वारे द्यावा. नत्राची मात्री अमोनीयम सल्फेट व स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट मदुन द्यावी. कारण ही खते दिल्याने नत्र व स्फुरद व्यतिरिक्त गंधक व कॅलशीयम पिकास मिळतो. जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्याचे परीक्षन करुन आवश्यकता असल्यास प्रति हेक्टरी १० किलो गंधक आणि किंवा ५ ते १० किलो जस्ताची मात्रा द्यावी.

 

बियाणेः ३ ते ४ किलो मादी- १ ते २ किलो नर प्रती हेक्टर.

 

पेरणीची चैफुलीवर शुधारीत पदधतः

संकरित बिजोत्पादन क्षेत्राची पेरणी शक्यतो चौफुली पद्धतीने करावी आणि त्यासाठी दोन ओळीतील (९० त् १२० सें.मि) आणि दोन चैफुलीतील अंतर (६० सें.मि.) नेहमिच्या व्यापारी पीका करीता (तूर) वापरावयाच्या अंतरापेक्षा जास्त असावे. तसेच प्रत्येक चौफुलीवर मध्यभागी चांगले कुजलेले शेणखत (अंदाजे १०० ते १५० ग्रॅम-फुली) टाकावे किंवा उताराच्या विरुद्ध दिशेणे डव-याणे स-या ओढतांना रस्त्याद्वारे पेरावे. प्रत्येक चौफुलीवर मादीवाणाच्या चार बिया चैकोणी पद्धतीने चार ठिकाणी एकमेकापासुन साधारण २० ते ३० सें.मि अंतरावर लावाव्यात तर नर वाणाच्या २ ते ३ बीया लावाव्या.

बियाण्याची लागवड केल्यानंतर सरीमधुन पाणि सोडावे. त्यामुळे बीयाण्याची उगवण एकाट वेळी व चांगली होईल. व जनक वाणाच्या झाडाची वाढ सारखी मिळेल मादी आणि नर वाणाचे ओळीचे प्रमाण ४.१ किंवा ६.१ असे ठेवुन अशा क्षेत्राचे सभोवताल ४ ते ६ ओळी नर वाणाच्या पेराव्यात (आ.क्र.६) नर वाणाच्या ओळी ओळखण्याकरीता त्यात सुरवातीला मध्ये व शेवटी बुरु मका किंवा सुर्यफूलाचे बि लावावे. बिजोत्पादन क्षेत्राची लागवड जुन अखेर ते १० जुलै पर्यंत करावी.

 

पेरणीची जोड ओळ पद्धतीः

चैफुलीच्या पेरणात टोकन पद्धतीने पेरणा अवघड वाटस असल्यास आकृती क्र ४ मध्ये दाखवील्या प्रमाने जोड ओळ पद्धतीत टोकम पद्धतीने पेरणा करता येऊ शकेल.

सरळ ओळीची पेरणी सुद्धा करता येईल ,सरळ ओळ  किंवा जोड ओळीची पेरणी टोकण पद्धतीने किंवा त्याच्या सहाय्याने केली तरी चालेल परंतु एकाच ठिकाणी एक पेक्षा जास्त बिया पेरल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. उगवण फाल्यावर ७-८ दिवसाचे आंतरवीरळणी करुन १० ते २० स्.मी वर १ जाड राहील याची खात्री करुन घ्यावी.

 

 

आंतरमशागतः

तुरीचे पीक सुरवातीला अतीशय सावकाश वाढते तुरीच्या पीकाची वीरलणी बी उगवल्यानंतर साधारणपणे १० ते १५ दिवसांणी करावी. वीरळणी करतांना एका ठीकाणी एक कींवा दोन रोपे ठेवावी पहीली कोळपमी २५ ते ३० दिवसांणी करावी या नंतर २० ते २५ दिवसांच्या अंतराणे २ ते ३ कोळपण्या कराव्यात. त्याचप्रमाणे तीरीच्या पीकाला कमितकमि दोन वेळा निमणी करण्याची आवश्यकता आहे.तण नियंत्रणाचे दृष्टीणे तीरीचे पीक पेरणीपासुन सुमारे ६० ते ९० दिवसापर्यंत तण मुक्त ठेवणे आवश्यक आहे.

 

लागवड तंत्र

जमिन:

पाणथळ जमीन या पिकाच्या वाढीकरीता अतीशय संवेदनशील असल्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन या पिकाकरीता निवडावी. ६०० ते ९०० मि.मी. पावसाचे वितरण समप्रमाणात झाल्यास या पिकाची वाढ जोमाने होऊन उत्पादन चांगले होते. पिकाच्या प्रथमावस्थेत म्हणजे सुरवातीच्या दोन महीण्यात पाऊस चांगला झाल्यास पुढे पूक फुलो-यावरच्या कालावधीत तुरळक पावसाच्या सरी येऊन उघाङ पडल्यास या पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन मिळते.

 

१८ ते २९ अंश से. उष्णतामानात या पिकाची वाढ चांगली होते. सुमारे ३५ अंश से. पर्यंत उष्णतापमाण हे पीक सहन करु शकते. प्रखर सूर्यप्रकाशात या पिकाचे जास्तात जास्त उत्पादन मिळते. ढगाळ हवामानात मात्र पिकाची वाढ खुंटुन त्याचा उत्पादनावर विपरीत परीणाम होत. ६.० ते ८.५ चे दरम्यान आम्ल-विम्ल निर्देशांक असलेल्या मध्यम ते भारी काळ्या जमिनीत हे पिक चांगले येऊ शकते. सन २००४-०५ साली महाराष्ट्रात तूरीचे क्षेत्र सुमारे १०.७४ लाख हेक्टर असुन त्यातुन ६.५८ लाख डन उत्पादन होते. विदर्भात तूरीची लागवड ५.२३ लाख हेक्टरावर होते आणि ३.४४ लाख डन उत्पादन होते. सध्या लागवडीखालील बहुतेक वाण मध्यमते उशीरा कालावधीचे आहेत आणि सुमारे ९० टक्के पेक्षा जास्त क्षेत्र अशा वाणाखाली येते. मागील काही वर्षाच्या संशोधनाद्वारे हळव्या (लवकर तयार होणा-या) तसेच निमगरव्या (मध्यम उशीरा) सुधारीत वाणांचा विकास झाला आहे.

शेळ्या-मेंढ्यांतील आंत्रविषार

आंत्रविषार हा शेळ्या-मेंढ्यांमध्ये होणारा जिवाणूजन्य आजार आहे. या रोगाच्या जिवाणूंमुळे जनावराच्या आतड्यांत विषनिर्मिती होऊन विषबाधा झाल्यामुळे जनावर दगावते. हे जिवाणू मातीमध्ये व निरोगी जनावरांच्या आतड्यांमध्ये वास्तव्य करतात. या रोगामुळे शेळ्या-मेंढ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच उपचार करावेत.

 

शेळी-मेंढीपालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्त्व आहे, तसेच शेळ्यांचे आरोग्यसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आंत्रविषार हा शेळ्या-मेंढ्यांमध्ये होणारा जिवाणूजन्य आजार आहे. हे लक्षात घेऊन शेळ्या-मेंढ्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करावे, तसेच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळोवेळी उपचार करावेत.

रोगाचकारणे –
कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होऊन कोवळे गवत जास्त प्रमाणात दिसून येते. हे गवत शेळ्या-मेंढ्यांनी भरपूर खाल्ल्यामुळे याचा प्रादुर्भाव होतो. लहान कोकरांना, करडांना जास्त प्रमाणात दूध पाजणे, मका, गहू, ज्वारी इ. जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास याची लक्षणे दिसतात. जनावरांच्या आतड्यांमध्ये जंताचा जास्त प्रादुर्भाव असेल तर आतड्यातील वातावरण जिवाणूच्या वाढीस पोषक ठरते. शेळी-मेंढीच्या लहान तीन ते 20 आठवड्यांच्या करडांत, कोकरांत रोगाचे प्रमाण जास्त असते. दूषित चारा किंवा पाण्यावाटे आंत्रविषाराचे जिवाणू जनावरांच्या पोटात जातात. आतड्यांमध्ये विषनिर्मिती किती प्रमाणात झाली आहे आणि किती विष रक्तात शोषले गेले आहे यावर रोगाची लक्षणे, तसेच मरतूक अवलंबून असते.

लक्षणे –
लहान करडे, कोकरांमध्ये अल्पमुदतीचा आजार असून, लागण झाल्यापासून दोन ते 12 तासांत मृत्यू येतो. करडे, कोकरे निस्तेज दिसतात, दूध पीत नाहीत, सुस्त, एका जागेवर बसून राहतात. पातळ हिरव्या रंगाची संडास होते. तोंडास फेस येतो. बाधित पिल्ले हवेत उडी मारून जमिनीवर पडतात. चक्कर येते व काही मिनिटांमध्येच दगावतात.

मोठ्या शेळ्या-मेंढ्या 24 तासांपर्यंत राहतात. त्यांच्यामध्ये तोंडातून फेस येणे, लाल येणे, अडखळत चालणे, दात खाणे, तोल जाणे, गोल फिरणे, श्‍वासोच्छ्वासास त्रास होणे आणि शेवटच्या टप्प्यात पोटफुगी, जुलाब ही लक्षणे आढळून येतात.

उपचार
अल्प मुदतीचा आजार असल्यामुळे प्रभावी उपचारपद्धती नाही, पण पशुवैद्यकांच्या सल्ल्याप्रमाणे प्रतिजैविके द्यावीत, त्यामुळे पोटातील विष शोषण्याचे प्रमाण कमी होते व जिवाणूंची वाढ होणे थांबते. कोवळे, लुसलुशीत हिरवे गवत जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. लहान करडांना, कोकरांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नये.

अतिकर्बयुक्त पदार्थ (ज्वारी, मका इ.) जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. गाभण शेळ्या-मेंढ्यांना पशुतज्ज्ञांकडून योग्य कालावधीत आंत्रविषार लसीकरण करून घ्यावे किंवा पिल्लांना जन्मानंतर वयाच्या एक आठवड्याला पहिली मात्रा व पंधरा दिवसांनी दुसरी मात्रा द्यावी. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे.

शतावरी

शतावरी (Asparagus racemosus)
वर्णन

काटेरी झुपकेदार आरोहिणी वेल. फाद्यांवर उभ्या रेषांमुहे पन्हळी तयार होतात. काण्ड त्रिकोणी, स्निग्ध. कंटक ०.५ ते १ सेमी. लांब, खालच्या बाजूस वळलेले, काहीसे बाकदार.
पत्राभास काण्ड
ज्यांना शतावरीची पाने म्हणतात ते पत्राभास काण्ड होय. २ ते ६ संख्येच्या गुच्छात उगवणारे, १.२५ ते २.५ सेमी लांब, पातळ विळयाप्रमाणे भासणारे. पुष्पमंजिरी. २.५ ते ५ सेमी, लांब, एकेरी किंवा गुच्छस्वरूप त्यामध्ये लहान, सुगंधी पांढर किंवा गुलाबी फुले.
फळ
वाटाण्याच्या आकाराचे १ ते २ बीजांनी युक्त.
मूल
मूलस्तंभापासून जाड, लांबट गोल, दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी अनेक मूळे फुटतात. वर्षाऋतूच्या सुरूवातीला मृगनक्षत्र सुरू होण्याचे आसपास मुळांपासून नवीन शाखा फुटतात व त्यानंतर फुले व शरदात फळे येतात. भारतात सर्वत्र विशेष करून उत्तर भारतात.
औषधगुणधर्म
शतावरी सिध्द वातव्याधीवर अभ्यंगासाठी वापरावे. देवी विकारांमध्ये दाहशामक म्हणून पानाचा लेप करतात. स्तन्यवृध्दीसाठी शतावरीच्या मुळया दुधात वाटून ध्यावा, दाहावर शतावरीचा काढा दूध आणि थोडा मध घालून द्यावा. ज्वरावर शतावरीच्या मुळांचा रस व गाईचे दूध एकत्र करून त्यात जिऱ्याची पूड घालून ते मिश्रण द्यावे. शरीरपुष्टतेसाठी शतावरी चूर्ण १० ग्रॅम प्रमाणात रोज दूधातून घ्यावे. आम्लपित्तावर २५ ग्रॅम मात्रेत शतावरीने सिध्द केलेले गाईचे तूप घ्यावे.

वेलदोडे – इलायची

वेलदोडे – इलायची (Eataroa cardamaom)

वर्णन

 

जाड, रसाळ, बहुशाखीय मूलकाष्ठ आणि अनेक सरळ हवेत वाढणारी खोडे असणारी औषधी, काहीवेळा ३ मीटरपर्यंत उंच वाढणारी, पाने फार मोठी ३०-९० से.मी. लांब, अरूंद, एक ठळक मध्यशिरा व त्यापासुन निघणाऱ्या अनेक लघुशिरा असलेली, पुष्पविन्यासाचा दांडा खोडाच्या खालच्या भागात जमिनीजवळ निघतो फुले ४ से.मी. लांब, पांढरी किंवा फिकट हिरवी, ३०-९० से.मी. लांब गुच्छात.

फळे सुमारे १.५ से.मी. लांब फिकटी हिरवी, पिवळी, अंडाकृती, ३ कोष्ठकी, अनेक बिया असलेली, बिया त्रिकोणाकार, तपकिरी – काळया, झाडांचा आणि त्याच्या अवयवांचा आकार ठिकाणांवर आणि जातींवर अवलंबून असतो व बदलत असतो.

तथापि फळे आणि बियांच्या आकारात फारसा फरक दिसत नाही. बाजारात येणाऱ्या बहुतेक फळांना गंधकाची धुनी देऊन रंगहीन पांढरे केले जाते.
वितरण
दक्षिण भारतात ते विशेषत: म्हैसूर केरळच्या डोंगराळ भागातील ओल्या जंगलात नैसर्गिक अवस्थेत सापडते. ते भारतात इतरत्र सुध्दा लावले जाते.
औषधउपयोग
वाळलेल्या फळांचा औषधात समावेश होतो. आवश्यक तेवढी फळे फोडून बिया काढतात व या बियाच वापरल्या जातात. पोटाच्या फुग्यावर आराम मिळविण्यासाठी मुख्यत: कॉरडॅमॉमचा उपयोग होतो वस्तूत: ते पचनास मदत करते. ते रेचकाबरोबर वापरतात आणि सुगंधी पदार्थ म्हणून वापरतात.

कॉरडॅमॉमची आले, जिरे, लवंगा या बरोबर भुकटी करण्यात येते व ती अपचन इत्या. वर उपयोगी असते.
इतर उपयोग
स्वयंपाकात, विडयांमध्ये व मिठायामध्ये कॉरडॅमॉम मोठया प्रमाणावर वापरले जाते. बियांपासून काढलेल्या तेलास सुगंधी म्हणून पेयात वापरतात. १९७८-७९ मध्ये ५५० लक्ष रूपयांचे वेलदोडे निर्यात करण्यात आले.

वेखंड

झाड लहान व लांब सुगंधी बहुशास्त्रीय जमिनीत वाढणाऱ्या खोडांनी युक्त (मूलस्तंभे); कणिसाचा अक्ष पानासारख्या महाछदाने झाकलेला; फुले लहान हिरवट, ५ ते १० से. मी. लांब, गोल कणिसात कणिशकास छदकणिश म्हणतात, फळे पिवळसर रंगाची.
वितरण
हे झाड भारतात समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंचीच्या, मुख्यत: ओलसर व दलदलीच्या जागी सापडते किंवा हिमालयाच्या आग्नेय, ओलसर भागात सापडते. कर्नाटकात व भारताच्या इतर भागात याची लागवड करतात. ३ औषधी गुणधर्म असणाऱ्या या झाडाचे वाळवलेले मूलस्तंभ म्हणजे वेखंड होय आणि हे औषधात वापरतात.

वेखंडात बाष्पनशील तेल असल्याने ते वायूनाशी म्हणजे पोटांचे फुगणे आणि तत्सम वाटणे यावर गुणकारी आहे. वेखंडामुळे पचनशक्ति वाढ होते. वेखंड हे पोटदुखीवर घरगुती उपाय म्हणून प्रसिध्द आहे. यात असलेल्या बाष्पनशील तैलद्रव्यामुळे हे कफ पडण्यास मदत करते. वेखंडामुळे घशातील ग्रंथी वाहतात तसेच ते दम्यावर गुणकारी आहे. यात असलेल्या टॉनिक या द्रव्यामुळे तेसंग्रहणी, रक्ताचा अतिसार यावर उपयोगी आहे. वेखंड मोठया प्रमाणात घेतल्यास ते वांतीकारक म्हणून काम करते आणि मोठ्या प्रमाणावर वांत्या होतात. पाने आणि मूलस्तंभ सुगंधी पदार्थात, पेयात आणि कीटकनाशके तयार करण्यात वापरतात. मूलस्तंभातील तेल मज्जासंस्थेस उत्तेजित करणारे आहे.

अल्कोहोलमध्ये काढलेले तेलविरहित अर्क गुंगी आणणारे तसेच वेदनाशमन करणारे आहे. हे गुणधर्म वेखंडाची मानसिक रोगामध्ये उपयुक्तता सिध्द करतात. वेखंडाच्या मुळांची भुकटी कृमीउत्सर्जक असते.