घराच्या बागेत लॉन

ज्या जागेवर लॉन तयार करायचे, ती जागा चारही बाजूंनी मोकळी हवा येईल, जिथे नेहमी सूर्यप्रकाश येत असेल अशी निवडावी. ज्या ठिकाणी लॉन लावायचा आहे ती जमीन उत्तम निचरा करणारी पाहिजे. ज्या जागेवर लॉन लावायचे आहे, तेथे पाण्याची भरपूर उपलब्धता असावी. लॉन लागवडीपूर्वी जमीन कुदळ-फावड्याने खोदून तीन-चार वेळा माती खालीवर करावी. नंतर सपाट करून त्यावर भरपूर प्रमाणात शेणखत मिसळावे. रानटी गवत, अनावश्‍यक असलेली झुडपे तोडून टाकावीत. जमीन तयार करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कीडनाशके मिसळावीत, तसेच लॉनच्या जलद वाढीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा मातीत मिसळावी. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी हरळी गवत लॉनसाठी वापरले जाते. गवताच्या पात्याच्या आकारानुसार विविध प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये ऍग्रिटीस टिनीअस, ऍग्रिटीस कॅनीना, फिस्टूला ओव्हीना, किस्टूला रूबरा, पोरीनिअल रे ग्रास, मेक्‍सिकन गवत हे प्रकार आहेत. लॉन लागवड पेरणी पद्धत, टोकण पद्धत, गादी पद्धतीने केली जाते. पेरणी पद्धतीमध्ये गवताचे बी लागवडीसाठी वापरतात. टोकण पद्धतीमध्ये टोकणाच्या साह्याने छिद्र पाडून 5 ु 5 सें.मी. अंतरावर गवताची लागवड मुळासकट करतात. गादी पद्धतीने लागवड करताना गवताची विशिष्ट आकाराच्या गादीची लागवड करण्यात येते.

लॉन जिथे लावायचे असेल त्या जागेवर खत व माती यांचे मिश्रण जमिनीवर समांतर पसरावे व नंतर निवडलेल्या गवताचे छोटे छोटे हिस्से (मुळासकट) ठराविक अंतराने जमिनीत दाबून टाकावे. जवळ जवळ गवत लावल्याने लॉन लवकर तयार होते. गवत लावल्यानंतर पाणी शिंपडणे आवश्‍यक आहे. लॉनला रोज सायंकाळी पाणी द्यावे. पावसाळ्याच्या सुरवातीला लॉनची लागवड केल्यास वाढ झपाट्याने होते. लॉन लावल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी त्यावरून रोलर फिरविला, तर गवताची मुळे सगळीकडे सारख्या प्रमाणात जमिनीत जातील व समप्रमाणात रुजतील. शिवाय लॉन सर्वत्र सारखे होण्यास मदत होईल. तयार झालेले लॉन मशिनच्या साह्याने कापायला हवे, गवत कापताना मशिन एका बाजूने सरळ राहील, तसेच मध्ये कोणतीही जागा सुटणार नाही याची काळजी घ्यावी. गवत कापून झाल्यावर लॉनची कडा सुटणार नाही, याची काळजी घ्यावी. गवत कापून झाल्यावर लॉनच्या कडा खुरप्याने कापून टाकाव्यात. लॉनला नियमित सकाळ-संध्याकाळ पाणी द्यावे. हिवाळ्यात एक दिवसाआड, तसेच पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावे.सुंदर लॉन तयार करण्यासाठी लॉनला लागणाऱ्या खताकडे वेळोवेळी लक्ष देण्याची गरज असते. त्यासाठी गवत कापणीनंतर शेणखत व मातीचे मिश्रण पसरविणे फायदेशीर असते. हे मिश्रण फेब्रुवारी-मार्च महिन्यात गवताला दिले पाहिजे. बाजारात लॉनसाठी लागणारी खते उपलब्ध आहेत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांचा वापर करावा.

एक नवीन उपक्रम

विवेकानंदन, कोईम्बतूर, आपल्‍या दळणयंत्रासह दिसत आहेत

श्री.के.विवेकानंदन, कोईम्बतूर, (तामिळनाडु) यांनी रू.8 लाखांची गुंतवणूक केली आहे आणि मिरची व धणे दळण्‍यासाठी 3 अश्वशक्ति पिन पल्‍वेरिझर तयार केला आहे. श्री. विवेकानंदन म्‍हणतात “हे दळण यंत्र ग्रामीण स्त्रियांसाठी त्‍यांची घरगुती मिळकत वाढविण्‍यासाठी एक आदर्श महसुल उत्‍पादक आहे.”

मिरची आणि धणे दळण्‍यासाठी सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या यंत्रांना उच्‍च अधिष्‍ठापन मूल्‍याची गरज असते आणि वीजदेखील खूप लागते, ग्रामीण क्षेत्रांत हे यंत्र अनुपयुक्‍त ठरते, कारण तेथे विजेच्‍या पुरवठ्यावर अवलंबून राहता येत नाही.

तोंड द्यावे लागलेली आव्‍हाने

श्री. विवेकानंदन यांनी यंत्र तयार केल्‍यावर विचार केला की त्‍यांनी 90 टक्‍के दळण संकटाचा उपाय केला आहे, आणि सुमारे अशी 100 यंत्रे निर्मिली. पण त्‍यांच्‍या दुर्देवाने त्‍यांना फक्‍त 20 ग्राहक मिळाले. काही ग्राहकांनी यंत्र परत दिले, कारण मिरची आणि धणे दोन्ही ही त्‍याच्‍या चाळणीतून निसरत नव्‍हते, आणि दळतांना फार धुराळा ही होत असे.

काम बंद होऊ लागल्‍याचे भासत होते, आणि सुमारे एक वर्षभर पुन्‍हा जोर धरला नाही. श्री.विवेकानंदांना व्हिलग्रो नांवाच्‍या एका संस्‍थेची माहिती मिळाली (ही संस्‍था ग्रामीण उद्यमींना सहाय्य करते) आणि त्‍यांनी मार्गदर्शनासाठी संस्‍थेशी संपर्क केला. व्हिलग्रोच्‍या कर्मचारीगणाने ह्या समस्‍येवर तोडगा काढण्‍यासाठी पुष्‍कळ प्रयत्‍न केले. तंत्रज्ञांनी सर्वप्रथम श्री.विवेकानंदांना एक 1 एचपी, सिंगल फेज यंत्र तयार करण्‍यास सांगितले, कारण यंत्र सुरूवातीलाच 3 एचपीसह चालू होऊ शकत नव्‍हते (ग्रामीण क्षेत्रांत एका 1 एचपी, सिंल फेज यंत्राचा वापर केला जाऊ शकतो कारण तेथे व्‍होल्‍टेज अनियमित असते). पुष्‍कळशा चाचण्‍यांनंतर त्‍यांना आढळले की मिरची आणि धणे यंत्राच्‍या स्‍क्रीनला चिकटून बसण्‍याचे कारण त्‍यांच्‍यातील फायबर घटक नव्‍हते तर रोटरचा वेग होता. त्‍याप्रमाणे, यंत्राचे वजन कमी करण्‍यात आले, त्‍याच्‍या भित्तिका, आकार, आणि स्‍टेटरचा व्‍यास व रोटर यांमध्‍ये बदल करण्‍यात आले ज्‍यायोगे ग्रामीण क्षेत्रांतील वापरास ते यंत्र उपयुक्‍त ठरावे.

 

 

मूल्‍य

 

जास्‍त माहितीसाठी वाचकांनी कृपया संपर्क करावा:
श्री. के.विवेकानंदन,
मे. विवेगा/विवेका इंजिनियरिंग वर्क्स,
न्‍यू नं.:116-118,
कोईम्बतूर – 641006
मोबाइल नं.94437-21341